लष्कराच्या भाकऱ्या(२) : जागरूक वाचक मंच

Submitted by कुमार१ on 1 January, 2023 - 20:22

भाग १: https://www.maayboli.com/node/75324
..................................................................................................
नववर्षानिमित्त सर्व मायबोलीकरांचे स्वागत आणि सर्वांना शुभेच्छा !
भाग १ मधील पृष्ठसंख्या बरीच फुगल्यामुळे हा भाग काढतो आहे.

नव्या वाचकांसाठी थोडी पार्श्वभूमी :
वृत्तमाध्यमांमधून असंख्य बातम्या आणि विविध प्रकारची माहिती प्रसारित होत असते. अलीकडे माध्यमांमध्ये घाईघाईत अर्धवट बातम्या देणे, मूळ इंग्लिशमधील बातमीचे ढिसाळ व हास्यास्पद भाषांतर आणि एकंदरीतच लेखनाबद्दलची बेफिकिरी या गोष्टी मोठ्या प्रमाणावर दिसून येतात. अपवाद म्हणून काही माध्यमांमधून इतरांपेक्षा काहीतरी वेगळे किंवा चांगले सुद्धा सादर केले जाते. अशा वृत्तापैकी तुम्हाला आवडलेले/ नावडलेले/ खटकलेले असे काहीही तुम्ही इथे संबंधित दुव्यासकट लिहू शकता.

शीर्षकाच्या नामविस्तारासह सादर आहे हा “लष्कराच्या भाकऱ्याचा” दुसरा भाग..

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

Motor Paneer >>> Lol

वधू एकटीच आंतरजातीय कशी असणार? >>> Lol

वरील संदर्भात 'आंतरजातीय चालेल' हे मला फारसे चुकीचे वाटत नाही. (व्याकरणाचे काटेकोर नियम लावले तर चुकिचे असेलही)
एखादे वाक्य चुकिचे कसे आहे हे समजावून द्यावे लागत असेल तर मग त्या वाक्याला प्रवेश द्यायला हरकत नाही.
'मला भारतातील एखाद्या विमानतळाशेजारी ( शक्यतो आंतरराष्ट्रिय ) फ्लॅट विकत घ्यायचा आहे' हेही वाक्य अगदीच चुकिचे नसावे.

Motor Paneer, मानव Lol

यांना पाहुनच रवि वर्म्यांना हे चित्र सुचले...>>>

ॲक्चुअली ते खरंच आहे.
पण मुद्दा चित्राचा नाही. त्याखालची भयानक टायपो दिसली नाही का?

Pages