मभागौदि २०२५ शशक- ऋन्मेऽऽष सर - ऋन्मेऽऽष

Submitted by ऋन्मेऽऽष on 1 March, 2025 - 03:51

मभागौदिनिमित्त स्पर्धा चालू होती.

चिठ्ठीत जो शब्द येईल त्यावर गोष्ट सांगायची.
त्याने कधीही न ऐकलेल्या सहा शब्दांची..

एकेक स्पर्धक येत होते.
एका शब्दाचे शंभर शब्द करत होते.
लोकं कौतुकाने टाळ्या वाजवत होते.
त्याला हे सारे बालिश वाटत होते.

त्याचे मराठीवर प्रेम होते
त्यानेही नाव नोंदवले होते.

त्याचा नंबर आला,
त्याने चिठ्ठी उचलली..
उघडली.. वाचली.. मिटली..!

तो गोंधळून गेला,
ईतके सोपे नव्हते हे..

वेळ सुरू झाली,
पन्नास सेकंद उलटले..
तो ठोंब्यासारखा ऊभाच!

लोकं खिल्ली उडवू लागले,
संयोजक वेळ संपल्याची वॉर्निंग देऊ लागले..
अठरा.. सतरा.. सोळा..

त्याने चिठ्ठी उघडत पुन्हा तो शब्द वाचला..
आणि समोर जमलेल्या गर्दीकडे पाहून म्हणाला,
मी.. माझे.. मला..

- सर ऋन्मेऽऽष

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान.......
त्याचा नंबर आला,
त्याने चिठ्ठी उचलली..
उघडली.. वाचली.. मिटली..!>>>>>> कुछ कुछ होता है प्रेरित वाटलं

कुछ कुछ होता है प्रेरित वाटलं >>>> हो, ते लिहिताना मनात आलेले.. आणि शाहरूख कनेक्शन असल्याने मूळ कथा बदलायचा मोह झालेला.. पण मोहावर विजय मिळवला Happy कारण हेच लिहायचे होते. यातून एकमेकांशी साधर्म्य नसलेले दोन अर्थ निघतात. भले ते कोणाच्या लक्षात येतील न येतील तो भाग वेगळा..

संपादित.
Submitted by मानव पृथ्वीकर on 1 March, 2025 - 22:43
>>>>>
आणि मी २२.४५ ऑनलाईन...
आता मला रात्रभर झोप नाही काय प्रतिसाद होता या विचाराने....

स्पेशल धन्यवाद मामी Happy
कोणीतरी हसण्याची रिअ‍ॅक्शन दिली, जीवात जीव आला Proud

भरत,
माझ्यातीलच एका रिपूबद्दल लिहिले आहे. तो तुम्हाला माहीत नसेल तर चांगलीच गोष्ट आहे. पण यात कोणाला टोमणा वगैरे नाही.
थांबा थोडावेळ, संत्रे सोलतो Happy

माझे सारे लिखाण आणि प्रतिसाद "मी.. मला.. माझे.." असेच असतात अश्या मी बरेच कॉमेंट वाचतो. जे खरेच आहे. ते असे का याचा विचार/आत्मपरीक्षण करता दोन शक्यता वाटल्या. दोन्ही अर्थ या कथेत येतील हे बघितले.

अर्थ १
कथानायक स्वतःतच मग्न असतो. याला एखादा षड्रिपु म्हणू शकतो. जो त्या चिठ्ठीत लिहीला होता. ज्यावरून तो विषयाला अनुसरून सुरू झाला.. मी.. माझे.. मला..

अर्थ २
फार वाचन नाही. कुठल्या विषयाचे सखोल ज्ञान नाही. कशावर अधिकारवाणीने बोलणे शक्य नाही. पण बोलायचे/लिहायचे तर आहेच. त्यामुळे स्वतःवरच आणि स्वतःच्या अनुभवांवरच बोलणे हा सोपा मार्ग.
चिठ्ठीतील विषयाचे ज्ञान नाही, त्यावर काय बोलायचे हे त्याला सुचले नाही, तर पुन्हा तो सुरू झाला, मी.. माझे.. मला..

बाकी सर हि पदवी मला आहेच..
ॲन्ड आय एम अब्सोल्युटली ओके विथ इट Happy

फार वाचन नाही. >>>
Happy
मी काही अंशी रिलेट करू शकते..

मा बो वर एकदा " अगं तू रा. ग. गडकरी वाचले नाहीस? " हा प्रश्न इतक्या आश्चर्याने विचारला होता की
एकदम पहिली नापास असल्याचं फिलिंग आलेलं Happy

ससा का बरीच उशिरा समजली.

सर, ही कथा षड्रिपूंपैकी कोणत्या रिपूबद्दल आहे, ते अजूनही मला कळले नाही. अर्थात माबुदो.
>>>>>

कसे कळणार.. कारण कथा सातव्या रिपूबद्दल आहे Happy

पहिल्या सहा पासून मी बऱ्यापैकी दूर आहे, किंवा ते कंट्रोलमध्ये आहेत.

सर, ही कथा षड्रिपूंपैकी कोणत्या रिपूबद्दल आहे, ते अजूनही मला कळले नाही. अर्थात माबुदो
>>
मोह म्हणुया मी पणाचा ? किन्वा लोभ प्रतिसादांचा ?

मोह म्हणुया मी पणाचा?
>>>
ते अहंकाराच्या जवळ जाणारे झाले. ते नसावे.. मी फारच डाऊन टू अर्थ आहे.

लोभ प्रतिसादांचा?? तर येस, तो नेहमीच असतो. आता सुद्धा डोक्यात हेच चालू आहे की कुठला ट्रिगर दाबला की इथे शंभर प्रतिसाद येतील.

अभिषेक तुम्ही तुमच्यावरच शशक लिहिलित...तुम्हाला कोणी काहीही बोललं तरी तुम्ही कमालीच्या शांततेने प्रत्युत्तर देत राहता...पण खरोखरच तुम्ही आत्मपरीक्षण करावं असं वाटतं हे प्रामाणिकपणे सांगावेसे वाटते...कारण तुमची लेखन प्रतिभा खरोखरच अफाट आहे... या शशकमधूनही तेच दिसतंय 'तुमचा अभिषेक'चं लिखाण वाचलं तर लगेच लक्षात येत...या सगळ्या गदारोळात ते लेखन, ती प्रतिभा कुठेतरी
लुप्त होतेय....मला वैयक्तिकरीत्या ॠन्मेषचे विनाकारण वाद घालणारे प्रतिसाद वाचण्यापेक्षा तुमचा अभिषेकचे विविधरंगी लिखाण आणि त्याखालचे कौतुकाचे प्रशंसेचे अभिप्राय वाचायला जास्त आवडेल...अर्थात कोणताही आयडी वापरून लिखाण करा पण लिखाण पुन्हा चालू करा....

मोक्षू आपल्या प्रामाणिक अभिप्रायाबद्दल धन्यवाद.
प्रतिभा मर्यादित आहे. पण ते ठीक आहे. पॅशन जास्त महत्वाचे.
यातून प्रेरणा घेऊन पुन्हा नव्याने प्रामाणिक प्रयत्न करून बघेन.

धन्यवाद धनुडी
तुला धन्यवाद देताना दोन वेळा धन धन लिहायला फार छान छान वाटते Happy

या निमित्ताने सरांना सर© ही पदवी प्रथम मी दिली होती हे नमूद करतो.
मायबोलीची बखर लिहिली जाईल तेव्हा याची नोंद व्हावी.

हे ग्रेट आहे मोरोबा.. कुठलाही ट्रेंड सेट करणे.

यानिमित्ताने मी सुद्धा हे नमूद करू इच्छितो की,
मायबोलीवर पहिली शतशब्द कथा मी लिहिली होती.
दुसरी आणि तिसरी सुद्धा मीच लिहीली होती.
आणि आता त्याशिवाय इथले उपक्रम होत नाहीत Happy

Pages