मभागौदि २०२५ शशक- ऋन्मेऽऽष सर - ऋन्मेऽऽष

Submitted by ऋन्मेऽऽष on 1 March, 2025 - 03:51

मभागौदिनिमित्त स्पर्धा चालू होती.

चिठ्ठीत जो शब्द येईल त्यावर गोष्ट सांगायची.
त्याने कधीही न ऐकलेल्या सहा शब्दांची..

एकेक स्पर्धक येत होते.
एका शब्दाचे शंभर शब्द करत होते.
लोकं कौतुकाने टाळ्या वाजवत होते.
त्याला हे सारे बालिश वाटत होते.

त्याचे मराठीवर प्रेम होते
त्यानेही नाव नोंदवले होते.

त्याचा नंबर आला,
त्याने चिठ्ठी उचलली..
उघडली.. वाचली.. मिटली..!

तो गोंधळून गेला,
ईतके सोपे नव्हते हे..

वेळ सुरू झाली,
पन्नास सेकंद उलटले..
तो ठोंब्यासारखा ऊभाच!

लोकं खिल्ली उडवू लागले,
संयोजक वेळ संपल्याची वॉर्निंग देऊ लागले..
अठरा.. सतरा.. सोळा..

त्याने चिठ्ठी उघडत पुन्हा तो शब्द वाचला..
आणि समोर जमलेल्या गर्दीकडे पाहून म्हणाला,
मी.. माझे.. मला..

- सर ऋन्मेऽऽष

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

१) सावल्या _ शतशब्दकथा (१०० शब्दांत कथा)
https://www.maayboli.com/node/44507
Submitted by तुमचा अभिषेक on 7 August, 2013

२) वॅलेंटाईन डे ! _ शतशब्दकथा
https://www.maayboli.com/node/44552
Submitted by तुमचा अभिषेक on 9 August, 2013

३) धाडस _ शतशब्दकथा
https://www.maayboli.com/node/44639
Submitted by तुमचा अभिषेक on 14 August, 2013

मुद्दाम तारखा सुद्धा दिल्या Happy
वाचा आणि नक्की कळवा.

छान लिहिल्या आहेत तीनही शतशब्दकथा.तिसरी धाडस खूप आवडली .मोजून शंभर शब्दांत कथा पोचवणे कठीण गोष्ट आहे.

लोभ प्रतिसादांचा?? तर येस, तो नेहमीच असतो. आता सुद्धा डोक्यात हेच चालू आहे की कुठला ट्रिगर दाबला की इथे शंभर प्रतिसाद येतील. >>>
तुमच्या तिन्ही शशक वर आणल्या.. शिवाय इकडे पण एक जास्तीचा रिप्लाय टाकला..
थँक मी लेटर Happy

धन्यवाद हपा
आणि हो, स्पेशल धन्यवाद छन्दिफन्दि
वाचन कधी फुकट जात नाही असे म्हणतात, त्याच प्रमाणे लिखाण सुद्धा कधी फुकट जात नाही. कित्येक वर्षांनी देखील त्यावर प्रतिसाद येत राहतात Happy

Pages