Submitted by माबो वाचक on 22 February, 2025 - 09:07
माझ्या दोन मनांमध्ये संघर्ष सुरु होता.
सर्व सत्ता त्याला मिळेल आणि मग तुझा मुलगा त्याचा दास बनून राहील.
नाही, माझा राघव असा नाही. त्याचे माझ्या भरतवर जीवापाड प्रेम आहे.
सत्ता आल्यावर माणसे बदलतात, सर्व नाती संपतात.
खरंच असे होईल? माझा राघव बदलेल?
नाही, राघव माझ्या भरतला अंतर देणे शक्य नाही.
पण कोणी सांगावे उद्या काहीही होऊ शकेल.
पण महाराजांनाही राघवच त्यांचा उत्तराधिकारी व्हावा असे वाटते.
मग मला असे काहीतरी करावे लागेल कि ज्यामुळे राघव हे राज्य सोडून निघून जाईल.
महाराज, आपण मला एक वरदान दिले होते. ते पूर्ण करायची वेळ आली आहे. कैकेयी दशरथाच्या महालात शिरत उद्गारली.
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
आवडली.
आवडली.
छान
छान
छान.
छान.