Submitted by ऋन्मेऽऽष on 4 March, 2024 - 01:57
आधीचा धागा भरला म्हणून हा नवीन धागा.
नवीन प्रदर्शित होणार्या चित्रपटांच्या ट्रेलरवर चर्चा करायला हा धागा.
मराठी, हिंदी, ईंग्लिश तिन्ही भाषेतील चित्रपट याच धाग्यात चालतील.
चित्रपट प्रदर्शित झाल्यावर आणि बघितल्यावर मात्र चित्रपट कसा वाटला हा धागा वापरा
जुना धागा ईथे - https://www.maayboli.com/node/61689
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
टोस्टर - राजकुमार राव,
टोस्टर - राजकुमार राव, सान्या मल्होत्रा..
https://www.youtube.com/watch?v=PoJ70Xxw1cY
डीडीएलजे + कहो ना प्यार है
डीडीएलजे + कहो ना प्यार है (गश्मीरच्या दोन गेट-अप्सवरून तसा असावा असं वाटलं) + मुझसे दोस्ती करोगे + डाव्या बाजूला तोंडीलावणी म्हणून यशराजचे इतर अनेक बर्फाळ सिनेमे - अशी सगळी आठवण आली. >>>
एक हीरो, त्याच्यावर मरणार्या दोन हिरॉईन्स (आणि जाईल तिकडे झुंडीने मरणार्या जनरल पोरी. परदेशात शक्यतो गोर्या) ही टॉलीवूड फॅण्टसी मराठीतही आली आहे आता. इथे तर पिक्चरच्या नावातच आहे. त्यामानाने हिंदीतच कॉमन नाही.
हिंदीतच कॉमन नाही.>> कूछ कूछ
हिंदीतच कॉमन नाही.>> कूछ कूछ होता है विसरलास की काय फा?
एकही नाही असे नाही रे.
एकही नाही असे नाही रे. चित्रपटांचे प्रमाण आणि त्यामानाने अशा ष्टोर्या कमी आहेत तुलनेने, अशा अर्थाने
तसे "शर्त द चॅलेंज" आहे, लगान अहे. पण अधूनमधून. तेलुगु मधे मी तुलनेने खूप जास्त पोस्टर्स मधे पाहतो.
हे बहुतेक ते पियर्स ब्रॉस्नान
हे बहुतेक ते पियर्स ब्रॉस्नान च्या बाँड पटांकडून आले असेल. त्यात नेहमी एक चांगली आणि एक वाईट बाँड गर्ल्स असायच्या
दोन हिरोईन असायलाच पाहिजेत
हो एक दोन बॉण्डच्या
हो
एक दोन बॉण्डच्या पोस्टरमधे सुद्धा आहेत ना? गोल्डन आय मधे लक्षात आहे.
दोन हिरोईन असायलाच पाहिजेत >>
दोन हिरोईन असायलाच पाहिजेत >> संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे च्या चालीत वाचलं
संयुक्त महाराष्ट्र झालाच
संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे
>>>
"शर्त द चॅलेंज" आहे>>>>>>
"शर्त द चॅलेंज" आहे>>>>>> मराठीत "शर्यत" पाहणं सुद्धा चॅलेंज" आहे
मराठीत "शर्यत" पाहणं सुद्धा
मराठीत "शर्यत" पाहणं सुद्धा चॅलेंज" >

मराठीत "शर्यत" पाहणं सुद्धा
मराठीत "शर्यत" पाहणं सुद्धा चॅलेंज" >>>:हाहा: पाहिला नाहीये कधी. आता उत्सुकता वाढली.
रॉयल्स टीजर https://youtu.be
रॉयल्स टीजर https://youtu.be/O46iLIVjVEI?si=g7L1B_OaaM_x1xLz ईशान खट्टर ,भूमी पेडणेकर आणि झीनत अमान
Crazxy क्रेझी टीजर https://youtu.be/1wZ4pbLJo60?si=DGXbF70Fj2FbmoWa. हा जबरदस्त असणार टीजर वरूनच वाटतंय सोहम शाह आहे म्हणजे प्रश्नच नाही
हा ऋन्मेऽऽष तुझ्यासाठी खास https://youtu.be/jmq22MHucR8?si=5cBsHuyPJViqCGRS पाणचट विनोद असतील तर कोणी बघणार नाही हास्यजत्रा वाल्यांचे स्कीट चांगले असतात पण चित्रपट फसतात असा अनुभव आहे.तरीही ट्रेलर पेक्षा चित्रपट बरा असेल तर ott वर यायची वाट पाहीन काही कलाकार खरंच टॅलेंटेड आहेत जसे की यातला रोहित माने .याला चांगले चित्रपट मिळायला हवेत.
छावा चे नवे गाणे आले आहे
छावा चे नवे गाणे आले आहे.
https://youtu.be/x2J1qbndOmU?si=xcO2_-MlksAechAD
सुरुवातीला "ये मराठोंका अंत नही मुघलोंकी विनाश की शुरुआत है" या डायलॉगची डिलिवरी आणि त्यासोबत हातवारे एकदम टपोरी छाप आहेत.
रहमान ने फुल्ल पाट्याटाकू संगीत दिलेले आहे. नुसता गोंगाट , शब्द कळतच नाहीत . तसेही ते ही तितकेच टुकार आहेत " आओ विराजो अधिराजो" असले विचित्र शब्दप्रयोग. काहीतरी साउथ चा डब्ड सिनेमा बघितल्याचा फील आला.
या निमित्ताने मीही त्या ट्रेलर वर हिट्स वाढवते आहे याची कल्पना आहे पण पिसे काढायची तर कुणाशी तरी शेअर करायला हवी ना
छान असू शकतो... स्क्रिप्ट
छान असू शकतो... स्क्रिप्ट मध्ये दम हवा
हास्य जत्रा कलाकारांबाबत सहमत.. चित्रपटांमध्ये हे लोक पसरतात.. त्यामुळे यात स्वप्निल जोशीने त्यांना सांभाळून घ्यायला हवे.
या डायलॉगची डिलिवरी आणि
या डायलॉगची डिलिवरी आणि त्यासोबत हातवारे एकदम टपोरी छाप आहेत
अगदी
अनिलकपूर स्टाईल..
हास्यजत्रा वाल्यांचे स्कीट
हास्यजत्रा वाल्यांचे स्कीट चांगले असतात पण चित्रपट फसतात असा अनुभव आहे. >>> बरोबर. कारण हास्यजत्रेच्या स्किट्स च्या यशाचे मुख्य श्रेय लेखकांचे आहे. लेखन चांगले नसेल तर हे कलाकार गुणी असूनही काहीही करू शकत नाहीत हे ओंकार भोजने , गौरव मोरे इ. च्या जत्रे नंतरच्या करीयर च्या सपशेल अपयशामुळे सिद्ध झालेले आहे.
छावा चे नवे गाणे आले आहे.
छावा चे नवे गाणे आले आहे.
>>> चाल 'जाने तू या जाने ना' मधल्या 'जाना, मेरे जाना' गाण्यासारखी आहे अगदीच.
त्यासोबत हातवारे एकदम टपोरी
त्यासोबत हातवारे एकदम टपोरी छाप आहेत.>>> एकदम रणवीर सिंग आलाय त्याच्यात
मै +१
मै +१
एक अक्षर कळेल तर शपथ्थ!! नुसताच कलकलाट आहे..
सारे जहाँ से अच्छा टीजर-
सारे जहाँ से अच्छा टीजर- प्रतीक गांधी तीलोतम्मा
https://youtu.be/yp-eXwOALwo?si=i5oQKcpu85u-g7Mw नेटफ्लिक्स येडं झालंय पूर्ण वर्षभराचे ट्रेलर एका दिवसात टाकलेत अजून चार पाच नवीन चित्रपट सीरीज चे टीजर आलेत ते नेटफ्लिक्स इंडिया वर जाऊन पहा.
https://www.youtube.com/watch
https://www.youtube.com/watch?v=VSMiXJYK8Rk
जयदीप , वेगळ्या लूक्मध्ये .
जयदीप भारीच दिसतोय.
जयदीप भारीच दिसतोय.
https://youtu.be/wcPsGUGdNXw
https://youtu.be/wcPsGUGdNXw?si=5lnRUnIvBCh08WVh
स्वजो, बेहेरे आणि माळी चा नवीन सिनेमा
काय पण तरी गाणं आहे.. गाणं बघूनच धन्य..
हा वरचा प्रायव्हेट व्हिडीओ
हा वरचा प्रायव्हेट व्हिडीओ आहे म्हणून येत आहे यूट्यूबवर.
एक राधा एक मीराचा ट्रेलर पाहिला. काय चालले आहे काही कळाले नाही. "असं आतून बुडबुडे आल्यासारखे होत आहे" हा रोमॅण्टिक डॉयलॉग आहे? आमच्या येथे लहानपाणी एखाद्याला कुरापती काढून भांडायचा/मारामार्या करायचा खूप किडा असेल तर "त्याला लै बुडबुडा आहे" असे म्हणत.
छावाच्या ट्रेलरमधे आपले लोक पाण्यात लपून बसून मग एकदम ८-१० फूट वर कसे उचलले गेले कळाले नाही. तेही धनुष्य बाणाचा नेम धरून तयार पोज मधे व्हर्टिकली वर येतात. वॉटरवर्ल्ड च्या शो मधे डॉल्फिन्स त्या परफॉर्मर्सना उचलतात तसे काहीतरी वाटले.
बाकी एक राधा एक मीरा व तत्सम
बाकी एक राधा एक मीरा व तत्सम पिक्चर्स बद्दल - काहीतरी फंकी कपडे घालून स्वॅग दाखवत चालत येणे ही "स्टाइल" म्हणून दाखवणे हे क्लिशे होउन जमाना झाला. बदला ते आता. हिंदीतही ते पकाऊ आहे.
अरे फा, तो पिक्चर सुरू करून
अरे फा, तो पिक्चर सुरू करून काही वर्षं झालीत म्हणे. उशीराचा रिलिज आहे, समजून घे!
एक राधा एक मीरा ट्रेलर अगदीच
एक राधा एक मीरा ट्रेलर अगदीच बंडल. मृण्मयी देशपांडे बिचारी अगदीच नाही आवडत. त्यामुळे पास.
अरे फा, तो पिक्चर सुरू करून
अरे फा, तो पिक्चर सुरू करून काही वर्षं झालीत म्हणे. उशीराचा रिलिज आहे>> ह्म्म्म! जाणवत आहेच ते, पण काहितरी सॉफ्ट लेन्स लावुन शुटिन्ग केलय का?...२० वर्शापुर्वी आमच्या कॉलेज जवळ एक फोटो स्टुडिओ सुरु झाला होता...तो असे सॉफ्ट लेन्सने फोटो काढायचा..फार पॉप्युलर झाला होता तो प्रकार..
छावा ट्रेलर पाहिला. इथे धागा
छावा ट्रेलर पाहिला. इथे धागा उघडताना त्या वर काही तरी चर्चा चालू आहे ते दिसलं. पण आधी काय वाटलं ते लिहिलेलं बर. नंतर प्रतिसाद वाचून बघेन.
मोहित्यांची मंजुळा लहान असताना ब्लॅक अँड व्हाईट मधे रविवारी सकाळी (स्पे शो) प्रभात कि वसंत ला पाहिला होता. परत बघायला लागेल तो. पण त्यातले संभाजी महाराज चेहरा आणि घसा ताणून बोलत नव्हते (सूर्यकांत?). जेव्हढं लक्षात आहे त्या प्रमाणे मनात चाललेलं द्वंद्व त्या वेळी सुद्धा समजलं.
थोरले महाराज (चंद्रकांत?) मिस्कील सुद्धा होते. राग नियंत्रणात होता. हताशा सुद्धा दाखवली होती. मुलाबद्दल प्रेम, कर्तव्ये यात कर्तव्य निवडताना सुद्धा नैसर्गिक वाटत होते. नंतर त्या काळातले अनेक शिवपट पाहिले. त्यात एक गोष्ट लक्षात आली ती म्हणजे महाराज आणि राजघराण्यातील व्यक्तींचा अभिनय आब राखून असायचा. अनियंत्रित संताप खलपात्रांचा असायचा आणि मावळे (वसंत शिंदे / दादा कोंडके) यांचा राग रांगडा दाखवत.
विकी कौशल ने संभाजी महाराज रंगवताना आक्रस्ताळेपणा केला आहे.
छावा च्या नटी वरून आठवलं.
छावा च्या नटी वरून आठवलं. देखणी & तरूण अशी शर्वरी वाघ आहे, अभिनय & लूक्स दोन्ही चांगलेत. शिवाय- छावा- वाघ
)
(फाको चा मोह आवरला नाही
Pages