मराठी चित्रपट कसा वाटला? - 1

Submitted by मोक्षू on 16 May, 2020 - 05:23

चित्रपट कसा वाटला या विषयाचा चौथा धागा नुकताच सुरु झालाय.. म्हणून लगेच हा वेगळा धागा काढला... मराठी चित्रपट पाहायचा असला की नेहमीच्या धाग्यावर खूप शोधाशोध करावी लागते.. म्हणून सगळ्यांनी मराठी चित्रपटांबद्दल ह्या धाग्यावर चर्चा करावी ही विनंती...

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सुभा कुठला आला ४० चा.. चांगलाच ४८ का ४९ आहे. त्याची शेजारीण मुलगी (त्याच्याच वयाची ) आमच्या गाण्याच्या क्लासला यायची शाळेत असताना.
तो म्हणजे, भरपूर वरण भात आणि पाव चमचाच साजुक तूप( विशिष्ट लोकांची पद्धत) घालून वाढलेला दिसतो.

मृकु आपले पुणेकरपणा जपून आहे, त्यातच समजा. प्रत्यक्षात पण तशीच.

पाणीपुरी मूवीसाठी पैसे फुकट घातले मदे आहे म्हणून. १० मिनिटात सोडला.
सुभाचा सलतात रेशीमगाठी - नादाला जावूच नका.
तोच प्रकार त्या देश्पांडे बहिणींचा- जराही अभिनय नाही जमत.

“त्यातच कोठेतरी "गच्ची" बसवायची होती ना, उजळली प्राचीला यमक म्हणून?” - Lol बरोबर!!! तो सिनेमा न बघून सुद्धा मला त्यातल्या ‘हिरॉईन’ चं नाव सुद्धा माहीत आहे - ‘अरुंधती’ (देवळातल्या पुजार्याची मुलगी) Happy

तो सिनेमा न बघून सुद्धा मला त्यातल्या ‘हिरॉईन’ चं नाव सुद्धा माहीत आहे - ‘अरुंधती’ (देवळातल्या पुजार्याची मुलगी) >>>

Lol त्यामुळे "आई कोठे काय करते" मधली अरूंधतीसुद्धा लेडी सितारिष्ट करा असे रावसाहेब म्हंटले असते Happy तिने एखाद्या एपिसोडमधे वाजवलीही असेल सतार. गात तर होतीच. तो "मोठा बॅनर" कोणता ते शेवटपर्यंत कळाले नाही.

मीठ भाकर या नावाचे दोन चित्रपट होते. >>> हिंदीत जसे नवा व जुना असे प्रकार असतात. तसे मराठीत खूप आहेत का? आत्ता एकदम लक्षात नाहीत. अर्थात हायवे एक सेल्फी आरपार किंवा मितवा- मित्र तत्त्त्वज्ञ वाटाड्या सारखी नावे वापरण्याची कल्पकता तेव्हा नव्हती. व नाव मराठी आहे की हिंदी वाटणारी तूहीरे सारखीही.

हायवे या नावाचे हक्क दुसऱ्याकडे असल्याने एक सेल्फी आरपार हे पुढे जोडले.

झापुक झुपुक.. खरंच..मला पण अजिबात नहीं आवडत. तसे कोणीच चांगले नव्हते या BB मध्ये..सगळे ओढून ताणून आणलेले आणि ओढून ताणून आव आणून बोलणारे.. खूपच बोअर..
आणि तो सारखा गळ्यात काय पडतो सगळ्यांच्या.. उठसूट मिठ्या मारतात सगळे ते इतका बेक्कार वाटत..अजिबात natural नाही वाटत..

अजिंक्यराव पाटील + 1 फर्स्टक्लास दाभाडे खरच खूप चांगला चित्रपट आहे मला आवडला पुरुषांचा इशू (परफॉर्मन्स प्रेशर )सोडला तरी या चित्रपटात खूप काही आहे .पुरुषांचा इशू तरी का सोडा उलट हा विषय चांगल्या रीतीने मांडण्यात यशस्वी झालाय ढोमे .मागे एका पोस्ट मध्ये लहान मुलांना नेऊ शकतो का ते विचारलं होतं .तर चित्रपट फॅमिली एंटरटेनमेंट आहे 16+तरी मी तर म्हणेन आपल्या 12 वर्ष किंवा त्यावरील टीनेजर मुलांना दाखवाच ऑकवर्ड झाले तरी चालेल उलट अजून दहा वर्षांनी ते तुम्हाला चित्रपट दाखवल्याबद्दल धन्यवादच देतील. आणि ott वर आल्यावर मुलं तो बघणारच आहेत ज्या पद्धतीने हल्लीच्या वेबसेरीज मध्ये बोल्ड सीन्स असतात त्यामानाने चित्रपटात एकही अश्लील सीन नाही .
चित्रपटाबद्दल बोलायचं झालं तर म टा चा रिव्यु वाचून मी गेले त्यात लिहिल्याप्रमाणे हा सिनेमा फक्त कुटुंबाच्या नात्यांबद्दल नसून त्यांच्यातील संवाद, विश्वास आणि एका वादातून मिळणारं शहाणपण याचा शोध घेणारा आहे.
अभिनयाबद्दल बोलायचं तर सगळ्यांची कामं उत्तम आहेत पण विशेष उल्लेख करायचा तर तिघांचा ज्यांच्यावर फिल्म बेतलिय क्षिती अमेय आणि सिद्धार्थ तिघांचा रोल आणि अभिनय भारी आहे.

एक कप च्या पण घ्या पदार्थांच्या नावांवरून मराठी सिनेमांमधे.

Submitted by वावे <<< +1
हा पिक्चर चांगला आहे

कच्चा लिंबू
गुळाचा गणपती
मोसंबी नारंगी
कैरी
पाणी

कॉफी आणि बरंच काही.

चहा आल्यावर कॉफीप्रेमी कॉफीचं लिहिणार.

एनिवे मला आवडलेला हा. दुसरा भाग वगैरे आला असेल तर तो बघितला नाहीये.

एक कप च्या पण घ्या पदार्थांच्या नावांवरून मराठी सिनेमांमधे.>> मला खूप आवडलेला हा चित्रपट.

हायवे या नावाचे हक्क दुसऱ्याकडे असल्याने एक सेल्फी आरपार हे पुढे जोडले. >>> ओके

एक कप च्या मलाही आवडला होता. माबोवरही लिहीले आहे त्याबद्दल.

फर्स्टक्लास दाभाडे - याचे प्रमोशन परवा एका मालिकेत होते. साधी माणसं मधे. सगळे प्रमुख कलाकार आले असावेत. झी च्या पिक्चर्सचे प्रमोशन चला हवा येउ द्या मधे होत असे. इथे मालिकेतच आहे. पिक्चरमधले कलाकार त्यातल्या भूमिकेसह येतात.

Pages