मराठी चित्रपट कसा वाटला? - 1

Submitted by मोक्षू on 16 May, 2020 - 05:23

चित्रपट कसा वाटला या विषयाचा चौथा धागा नुकताच सुरु झालाय.. म्हणून लगेच हा वेगळा धागा काढला... मराठी चित्रपट पाहायचा असला की नेहमीच्या धाग्यावर खूप शोधाशोध करावी लागते.. म्हणून सगळ्यांनी मराठी चित्रपटांबद्दल ह्या धाग्यावर चर्चा करावी ही विनंती...

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मी सुद्धा सुरवंटाचं फुलपाखरू इमॅजिन करून एकटीच हसत होते Rofl

नाकाखाली लोंबणार्‍या पारंब्या आठवल्या. (सखाराम गटणे)

"मठ्ठा" हे लग्नात जिलबीबरोबर असते म्हणून. मठ्ठा हे इथे संबोधन नाही>>>>>>>>>>> Lol
सुरवंट Lol काय एकेक भारी उपमा सुचतात

बादवे, या अचाट सिनेमाचं नाव जिलबी का आहे म्हणे? काय लॉजिक. मी सिनेमा बघणार नाहीये पण उगीच उत्सुकता टायटलबद्दल.

काल पूर्ण केला आणि तो करमरकर डायलॉग ऐकला एकदाचा. Lol
सिनेमा संपल्यावर हाच प्रश्न मी पण विचारला की नाव जिलबी का आहे? मग लगेच समजलं एक साडेसात सेकंदाचा शॉट आहे ज्यात जिलब्या तेलात सोडलेल्या दाखवल्या आहेत. शेजारी करमरकर साहेब उभे किंवा बसलेले आहेत. मग जिलबीच पाहिजे ना नाव!
बाकी तेलातून काढून त्या पाकान न टाकताच तो हलवाई खायला देतो असा मला संशय आला. Proud

अरे मराठी सिनेमा चालवण्याचा प्रयत्न करत आहात की बुडवण्याचा? जे २-३ लोक चालवण्याचा प्रयत्न करत आहेत, त्यांचं तरी गपगुमान बसून ऐका. Proud

चालवायचा आहे होय! आम्ही आपला आनंद घ्यायचा आणि वाटायचा प्रयत्न करतोय.
ती जिलबी जशी पाकात टाकली तरच तिची गोडी! नाहीतर नुसतं तळलेलं पीठ!! जीवनाचे. करमरकरांचे, आणि यातील व्हिलनचे ही असेच आहे.!!! विजय करमरकर त्या बापुसाहेब करमरकरांविना अपुरा, व्हिलन पैशाच्या टेकू विना अपुरा. आणि जीवनाचं काय? अं अं अं ... ते करमरकरांच्या बंदुकीतून सुटलेल्या गोळीने आलेल्या मरणाविना अधुरे. जमला जमला. तिया जमला. सम चुकली पण चालतंय की! संभाजी महाराजांचा विजय असो.

यात पर्ण पेठे पण आहे. तिने पुणेरी ब्राह्मण मुस्लिम मुलीचे चांगले काम केले आहे. ते एक राहिलं लिहायचं.

तिने पुणेरी ब्राह्मण मुस्लिम मुलीचे चांगले काम केले आहे >>> Lol मला ट्रेलरमधेही तसेच वाटले होते Happy

जिलब्या तेलात सोडलेल्या दाखवल्या आहेत. शेजारी करमरकर साहेब उभे किंवा बसलेले आहेत. मग जिलबीच पाहिजे ना नाव! >>> Lol बोराचे झाड्/बोराच्या झाडाच्या लाकडाचे चाक या सुभाषितात सुद्धा यापेक्षा जास्त कनेक्शन आहे Happy

मराठी सिनेमा चालवण्याचा प्रयत्न करत आहात की बुडवण्याचा >>> साजिरा - हा प्रश्न असे पिक्चर काढणार्‍यांनाही विचारायला हवा Happy परवा तो मुक्काम पोस्ट पाहिला. त्या "इव्हा, वा वा" अशा कोट्याही विनोदाच्या नावाखाली आल्या. (अर्थात थिएटर मधे त्यालाही हसणारे थोडेफार नग सापडतात)

>>>>>>>> अर्थात थिएटर मधे त्यालाही हसणारे थोडेफार नग सापडतात

अपवित्र: पवित्रो वा सर्वावस्थां गतोपि वा या श्लोकात वर्णिल्याप्रमाणे म्हणजे या श्लोकार्थास समांतर- अतिबालबुद्धी ते तैलबुद्धी सर्वावस्थेतिल प्रेक्षक प्रेक्षागृहात सापडतात. Happy त्यांनाही आपले म्हणा.

मी तर आता स्वतःला अतिबालबुद्धी समजून थेटरात जातच नाही. पण जाणारे न जाणारे सारे आपले, हेही आहेच. खोटं वाटेल, पण तिकिट ब्लॅक क्रणार्‍याचं करियर आपलं व्हावं अशी एकेकाळी जबरदस्त इच्छा होती. आता ती रेअर स्पेसीज झाली.

अपवित्र: पवित्रो वा सर्वावस्थां गतोपि वा या श्लोकात वर्णिल्याप्रमाणे म्हणजे या श्लोकार्थास समांतर- अतिबालबुद्धी ते तैलबुद्धी सर्वावस्थेतिल प्रेक्षक >> Lol Lol हे आवडलंय

मराठी सिनेमा चालवण्याचा प्रयत्न करत आहात की बुडवण्याचा >> Lol
मभागौदि चे विषय काय आहेत या वेळी ? Wink

जीवनाचे. करमरकरांचे, आणि यातील व्हिलनचे ही असेच आहे.
यात पर्ण पेठे पण आहे. तिने पुणेरी ब्राह्मण मुस्लिम मुलीचे चांगले काम
>>> Lol

मराठी सिनेमा चालवण्याचा प्रयत्न करत आहात की बुडवण्याचा
>>> Rofl

थिएटर मधे. इथे महाराष्ट्र मंडळाने शो आयोजित केला होता. पहिला बराच भाग मी डुलक्या मारल्या. थिएटरमधे जाउन पाहिलेले पिक्चर मला आवडले नाहीत किंवा मी तेवढ्यापुरतेही एन्जॉय केले नाहीत असे फार क्वचित होते. हा एक अपवाद आणि दुसरा तो चाळीशीतले चोर वाला.

जीवनाचे. करमरकरांचे, आणि यातील व्हिलनचे ही असेच आहे. >>> Lol हे राहिलेच आधी लिहिताना.

तिने पुणेरी ब्राह्मण मुस्लिम मुलीचे चांगले काम केले आहे>>> Biggrin

जिलबी जशी पाकात टाकली तरच तिची गोडी! नाहीतर नुसतं तळलेलं पीठ!! जीवनाचे. करमरकरांचे, आणि यातील व्हिलनचे ही असेच आहे >>>>
काही दिवसात अमितव काकाफॉमध्ये मास्टरी मिळवणारसं दिसतंय.

जिलबी जशी पाकात टाकली तरच तिची गोडी! नाहीतर नुसतं तळलेलं पीठ!! जीवनाचे. करमरकरांचे, आणि यातील व्हिलनचे ही असेच आहे >> Lol

अमित Lol
मध्ये फाने 'मितवा' हा 'मित्र-तत्त्वज्ञ-वाटाड्या'चा शॉर्टफॉर्म आहे असं लिहिलं होतं - तसं 'जिलबी' हे 'पुणेरी ब्राह्मण मुस्लिम मुली'चं प्रतीक असेल, कुणी सांगावं. Proud

त्या मितवा सिनेमात सोकुला एकदम रोमँटिक मूडमध्ये 'टेडी बेअर' देऊन तोच शॉर्ट फॉर्म सांगतो स्वजो. मग ती वेडी होते. खरंच. इतकं ओढूनताणून केल्यावर दुसरं काय होणार. Happy

जिलबी जशी पाकात टाकली तरच तिची गोडी! नाहीतर नुसतं तळलेलं पीठ!! जीवनाचे. करमरकरांचे, आणि यातील व्हिलनचे ही असेच आहे >> Lol

जिलबीचे भजं झाल्याने 'पाणीपुरी' पाहिला, फक्त वीस मिनिटे. मकरंद देशपांडे कौटुंबिक न्यायालयात वकील आहे. मराठी चित्रपटात जगप्रसिद्ध आहे, त्याला सायली संजीव नावाची कन्या आहे. सुरवातीला सहा जोडपी एकमेकांशी विनाकारण वितंडवाद करताना दाखवली आहेत. यात सगळ्या वयाचे, व पार्श्वभूमीचे जोडपं घेऊन डायव्हर्सिटी आणली आहे. सुमित राघवन सुरवातीला नवरा बायकोचं नातं म्हणजे कसं पाणीपुरी सारखं असतं, थोडं आंबट पाणी, चटणीचा गोडवा पुरीचा कुरकुरीत पणा ई पण यापैकी एकही गोष्ट कमी जास्त झाली की भांड्याला भांडं लागून घटस्फोट होता-असं म्हणत नॅरेशनला सुरवात करतो तेथेच त्याने कैच्याकै - वपु सदृश फॉरवर्ड वाईब्ज दिल्या. पाणीपुरी आहे का रॉकेट सायन्स. गाड्यावर सुकी पुरी, नुसतं जाळ पाणी, शेवपुरी किती प्रकार मिळतात त्यामुळे लॉजिक पटले नाही. नंतर उगाच भांडत बसणारे नवरा-बायको दाखवले. हे तर आपण घरीही करू शकतो म्हणून मी बंद केला. Happy

मध्ये फाने 'मितवा' हा 'मित्र-तत्त्वज्ञ-वाटाड्या'चा शॉर्टफॉर्म आहे असं लिहिलं होतं >>> (खाली पाहा. याने मी ऑल्मोस्ट ऑफेण्ड झालो आहे Wink )

त्या मितवा सिनेमात सोकुला एकदम रोमँटिक मूडमध्ये 'टेडी बेअर' देऊन तोच शॉर्ट फॉर्म सांगतो स्वजो >>>> धन्यवाद. स्वजो ने पिक्चरमधे सांगितलेला शॉर्टफॉर्म आहे तो. नाहीतर उद्या मी असले काहीतरी सांगितले आहे असे पसरायचे इथे Happy

तेव्हा To reiterate, हा मी रचलेला शॉर्टफॉर्म नव्हे. मी कधीकधी रिकामटेकडा असतो, पण इतकाही नाही Happy मला अजून व्हॉअ‍ॅ अंकल व्हायला बरीच वर्षे आहेत.

सुमित राघवन सुरवातीला नवरा बायकोचं नातं म्हणजे कसं पाणीपुरी सारखं असतं, थोडं आंबट पाणी, चटणीचा गोडवा पुरीचा कुरकुरीत पणा ई पण यापैकी एकही गोष्ट कमी जास्त झाली की भांड्याला भांडं लागून घटस्फोट होता-असं म्हणत नॅरेशनला सुरवात करतो तेथेच त्याने कैच्याकै - वपु सदृश फॉरवर्ड वाईब्ज दिल्या. >>>
पाणीपुरी आहे का रॉकेट सायन्स. गाड्यावर सुकी पुरी, नुसतं जाळ पाणी, शेवपुरी किती प्रकार मिळतात त्यामुळे लॉजिक पटले नाही. नंतर उगाच भांडत बसणारे नवरा-बायको दाखवले. हे तर आपण घरीही करू शकतो म्हणून मी बंद केला. Happy >>> Lol या नंतर घातलेल्या पॅरा मधले सगळेच लोल आहे.

फा Lol
सॉरी सॉरी, मी नीट लिहिलं नाही. तो अर्थ तू लावला नव्हतास, पण तो तसा आहे हे तुझ्या पोस्टमुळे मला कळलं होतं. Happy

Lol असे अर्थ उकरून काढणे ही अंकलगिरीकडे वाटचाल आहे त्यामुळे घाबरलो.

ते पाणीपुरी लॉजिकबद्दल - भारतात तरी इतक्या फुटकळ कारणांनी घटस्फोट होउ दिले जात नसावेत Happy पूर्वीतरी न्यायालयाचा अ‍ॅक्टिव्ह रोल असे, आणि कायदा अजूनतरी बदललेला नाही.

पाणीपुरी लंडनमधे चित्रीत नाही का?

Pages