चित्रपटाचा ट्रेलर कसा वाटला - २

Submitted by ऋन्मेऽऽष on 4 March, 2024 - 01:57

आधीचा धागा भरला म्हणून हा नवीन धागा.

नवीन प्रदर्शित होणार्‍या चित्रपटांच्या ट्रेलरवर चर्चा करायला हा धागा.
मराठी, हिंदी, ईंग्लिश तिन्ही भाषेतील चित्रपट याच धाग्यात चालतील.
चित्रपट प्रदर्शित झाल्यावर आणि बघितल्यावर मात्र चित्रपट कसा वाटला हा धागा वापरा Happy

जुना धागा ईथे - https://www.maayboli.com/node/61689

शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सिनेमातून काढतील, पण यूट्यूबवर वगैरे ठेवतील - राजाश्रय आणि लोकाश्रय दोन्हींची सोय! गुड मूव्ह!

ओपन to changes पेक्षा न करून काय करणार आहेत अशी परिस्थिती जास्त दिसतेय. मंत्र्यानीच त्याशिवाय प्रदर्शित होऊ देणार नाही वगैरे सांगितल्यावर जर न्यायालयात जाऊन लढायचं नसेल तर मान्य न करून काय करणार

बेसिकलीच मागे पण इतर ऐतिहासिक चित्रपटांमधील गाण्यांना अक्षेप घेतला गेलेला आहे. तरी उगीच हे लेझिम गाणे टाकायची काय गरज होती. नाही नाचवले विकी कौशलला तर चालत नाही का Lol

कदाचित वाद निर्माण करून फुकट जाहिरात होते ते हवे असेल. सगळीकडे फुकटात बातम्या Wink

बाकी जोश भारी आहे त्याचा !

जर कोणी खोडसाळपणा म्हणून कोणाच्या भावना दुखावत असेल जसे मागे राम सीता वगैरे भूमिका करणारे कलाकारांचे त्याच गेटअप मध्ये सिगारेट ओढतानाचे आणि शिवीगाळ करतानाचे चित्रण वगैरे तर तो खोडसाळपणा तात्काळ हाणून पाडायला हवा.

पण कोणी पब्लिक डिमांड लक्षात घेता सिनेमॅटिक लिबर्टी घेत असेल तर काय चूक आणि काय बरोबर हा निर्णय सेन्सर बोर्डाला घेऊ द्यावा. कायदेशीर मार्गाने तक्रार नोंदवावी आणि न्याय व्हावा.

बेसिकलीच मागे पण इतर ऐतिहासिक चित्रपटांमधील गाण्यांना अक्षेप घेतला गेलेला आहे. तरी उगीच हे लेझिम गाणे टाकायची काय गरज होती. नाही नाचवले विकी कौशलला तर चालत नाही का <<< +1

खोडसाळपणा असो नाहीतर सिनेमॅटिक लिबर्टी - दोन्हीकडे फक्त कायदेशीर मार्गानेच दाद मागायला हवी. इतरांना त्यात शिरकाव करून दिला की एक नवीन घटनाबाह्य बॉडी तयार होते. मग ते ठरवणार काय खोडसाळ आहे आणि काय लिबर्टी. मुळात या दोन्हीतील फरक सब्जेक्टिव्ह आहे. प्रत्येकाचा वेगळा असेल.

बाकी ट्र्रेलरबद्दल. आपल्याकडे गेल्या १०-१५ वर्षांत एक नवीन फॅनगट तयार झालेला आहे. सोयीसाठी त्याला केजीफ क्राउड म्हणू Happy यांचा पिंड मार्व्हल, डीसी ते साउथ मधले सुपरहीरोपेक्षा कमी नसलेले हीरोज यावर पोसलेला आहे. यांच्या पिक्चर्स मधले, स्टाइलमधले न्युआन्सेस त्यांना कळतात. त्यांना का कोणास ठाउक पण मराठी इतिहासातील खरी व्यक्तिमत्त्वे या सुपरहीरो स्वरूपात दाखवलेली प्रचंड आवडतात. "तुम्हाला मार्व्हलमधे हीरोने अमुक केलेले चालते, तर..." हा एक नेहमी केला जाणारा युक्तिवाद आहे. या प्रेक्षकवर्गाला अशा पद्धतीने सादर केलेले चित्रपट आवडतात. तान्हाजीच्या वेळेसही हे आर्ग्युमेण्ट ऐकले होते. एरव्ही शेती करणारा पण मोहीम असली की लढायला जाणारा मावळा हा दिसायला साधा असला तरी प्रचंड काटक असतो, पण तो तसा दाखवण्यात "शो" काही नाही. म्हणून तो सिक्स पॅक वाला दिसला पाहिजे. एका तलवारीच्या फटकार्‍यात त्याने ७-८ गनीम लोळवले पाहिजेत. तो नेहमी पळताना रेसमधे धावण्याचे ट्रेनिंग घेतल्यासारखा हाताच्या एअरोडायनॅमिक अ‍ॅक्शन्स करून धावला पाहिजे. त्याच्या पायात गडावर धावत चढण्याची ताकद असली तरी ती "दिसत" नाही त्यामुळे तो एका उडीत वरच्या मजल्यावर जाताना दिसला पाहिजे. असले काही असेल की या पब्लिकला ते प्रचंड आवडते. या पब्लिकच्या व्याख्येत बसला तर पिक्चर तुफान चालेल.

उगीच हे लेझिम गाणे टाकायची काय गरज होती. नाही नाचवले विकी कौशलला तर चालत नाही का
कदाचित वाद निर्माण करून फुकट जाहिरात होते ते हवे असेल
>>> असं असावं. तेवढीच प्रसिद्धी

खोडसाळपणा असो नाहीतर सिनेमॅटिक लिबर्टी - दोन्हीकडे फक्त कायदेशीर मार्गानेच दाद मागायला हवी. इतरांना त्यात शिरकाव करून दिला की एक नवीन घटनाबाह्य बॉडी तयार होते

>>> १००

फारेण्ड म्हणतात तसा केजीफ फॅनगट असू शकेल. त्यांची आवड ध्यानात धरली असेल. पण त्यामुळे फक्त चित्रपट एकसुरीच होतो असं नाही तर जो मेसेज जायला पाहिजे की शिवाजी/संभाजी महाराजांनी सामान्य माणसाला असं चेतवलं की त्यातून तानाजी, बाजीप्रभू, संताजी धनाजी निर्माण झाले तो मेसेजच डायल्युट होतो. त्यापूर्वीचे मावळे शूर नव्हते का? आदिलशहा, निजामशहा वगैरेचे मातब्बर सरदारही मराठे होते. But it was these iconic figures that gave meaning to their valour. सामान्य माणसाला कॉमन गोलसाठी ओरीएंट करणं हेच तर चांगल्या लीडरचं लक्षण आहे ना. या ३ डी गदारोळात व ६ पॅक्स बॉडीज् मध्ये नेमकं तेच ठसवलं जात नाही.

१ उदयनराजे भोसले यांनी दिग्दर्शल लक्ष्मण उतेकर यांना भ्रमणध्वनी केला होता आणि इतिहासतज्ज्ञांना विचारात घेऊन संबंधित प्रसंगांमध्ये आवश्यक बदल केल्यास वादंग संपेल असे सांगितले होते.

२ राज ठाकरे यांचे वाचन अफाट असून त्यांना इतिहास चांगला माहीत आहे. त्यामुळे त्यांची भेट घेऊन सल्ला घ्यायचे ठरवले - उतेकर.

३ लेझीम हा आपला पारंपरिक खेळ असल्यामुळे संभाजी महाराज यांनी होळी उत्सव साजरा करताना लेझीम नृत्य केले असल्याचा विचार आपसूकच मनात आला. भावना दुखावण्याचा मुळीच हेतू नव्हता.

४. लेझीम नृत्याचा प्रसंग हा महाराजांपेक्षा मोठा नाही, त्यामुळे हा प्रसंग आम्ही निश्चितच वगळणार.

एकाच बातमीतली चार वाक्ये.

लेझीम नृत्याचा प्रसंग हा महाराजांपेक्षा मोठा नाही, त्यामुळे हा प्रसंग आम्ही निश्चितच वगळणार >> काहीही युक्तिवाद! मग हा सिनेमासुद्धा महाराजांपेक्षा मोठा नाही, तो आख्खा वगळणार का? कैच्या कै

उत्तम झालं, तेव्हाही लेझीम होती म्हणणाऱ्या लोकांसाठी की तेव्हाही लेझीम असली तरी असे राजे भर चौकात बायकोसोबत नाचत नव्हते

स्वतः शिवाजी महाराजांनी भोई होऊन तुळजाभवानी ची पालखी वाहिली आणि नंतर कवड्यांची माळ घालून मशाल नाचवली असे उल्लेख आहेत पण म्हणून उद्या शिवाजी महाराज duet गीत असल्यासारखे सईबाई किंवा सोयराबाईकडे बघत नाचत आहेत असे गाणे सिनेमॅटिक लिबर्टी म्हणून टाकलेलं चालेल का??

फारएन्ड - अगदी बरोबर, त्यांना फक्त धंदा करायचा आहे, त्यांच्याकडे रेसिपी तयार आहे, हॉटेल मध्ये पनीर ची असते तशी, त्यालाच फक्त वेगवेगळ्या नावाने खपवतातात. त्यांना ना बाजीराव पेशवे यांच्याशी घेणेदेणे ना संभाजी महाराज
हे चालतंय ना नाणे मग खपवा
काय हवंय लोकांना दे दणादण फाईट, डान्स, जोशपूर्ण डायलॉग टाका मसाला
मग ते बाजीराव म्हणले काय, तान्हाजी म्हणले काय किंवा संभाजी महाराज किंवा बाजीप्रभू कुणीही चालतंय

आणि लोकांना अपार कौतुक बघा इतिहास कसा लोकापर्यंत पोचतोय

डोंबल त्यांचं

पण म्हणून उद्या शिवाजी महाराज duet गीत असल्यासारखे सईबाई किंवा सोयराबाईकडे बघत नाचत आहेत असे गाणे सिनेमॅटिक लिबर्टी म्हणून टाकलेलं चालेल का??
>>>>>>>>>>

तुमच्या प्रश्नातच याचे उत्तर आहे.
नाही चालणार.
तुम्हाला हे प्रश्न विचारतानाच माहीत होते. आणि म्हणूनच असे धाडस कोणी नाही करणार.
जे धंदा करतात त्यांना सुद्धा अक्कल असते की बहुतांश प्रेक्षकांना काय चालणार आणि काय नाही?
लोकांनी चित्रपट बघणे सोडून दिले की हे आपसूक थांबून जाईल.

आणि लोकांना अपार कौतुक बघा इतिहास कसा लोकापर्यंत पोचतोय

डोंबल त्यांचं>>>> +++११११

लोकांना फक्त चंद्रकोर, दाढी, कानातली बाळी, भगवा झेंडा, त्वेश, जोशाने जय शिवराय म्हटले की झाले आपण शिवभक्त असंच वाटतं. खराखुरा इतिहास किती लोकांना माहित असेल किंवा जाणून घ्यायचा प्रयत्न असेल?
पडद्यावर जे इतिहास म्हणून दाखवतात ते बघून किंवा शिवजयंतीला गाणी लावून लोकं नाचतात ते बघून भयंकर काहीतरीच वाटतं. लोकं मस्त एंजॉय करतात आणि आपल्यातच काय प्रॉब्लेम आहे का वाटत राहतं.

अन्जली +१
विकी कौशल गुणी कलाकार आहे , सभाजी राजे म्हणून शोभतोय त्याने १०० % दिलच असणार पण मुळात स्टोरी वरवरची असेल तर कठीण आहे मामला..मी खुप उत्सुक होते या मुव्हिसाठी पण ट्रेलरने घोर निराशा केली..हरहर महादेव म्हणून केलेली घोषणा सोडली तर काहिच फारच प्रॉमिसिन्ग वाटत नाहिये..
औरगजेब म्हणून अक्षय खन्ना लगेच ओळखु येतोय की.. तोन्डातल्या तोन्डात फार कष्ट न घेता बोलण्याचि युनिक स्टाइल आहे त्याची...त्याही शॉट मधे धडघडीत खोटा सेट दिसतोय.
लेझिमची कॉन्ट्रोव्हर्सि बझ निर्माण करायलाच केलीये हे तर कुणीही सान्गेल...

https://www.loksatta.com/explained/chhaava-movie-lezim-scene-controversy...
Shared by Loksatta android app
click here to download
https://loksatta.page.link/LS_app

इथे दिग्दर्शक असे म्हणाले असं दिलंय...

'दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांनी आता हे दृश्य चित्रपटातून हटवण्यात येणार असल्याचे सांगितले आहे. “आम्ही चित्रपटात महाराजांचे वय २० वर्षांचे दाखवले आहे. त्यांनी लेझिम नृत्य केले होते हे खरे आहे आणि का नाही? लेझिम नृत्य हा मराठा संस्कृतीचा भाग आहे. हे आपले पारंपरिक नृत्य आहे. परंतु, चित्रपटातील नृत्यामुळे किंवा लेझिम नृत्यामुळे कोणी दुखावले असेल तर आम्ही ते दृश्य काढून टाकू,” असे ते म्हणाले.'

आता हा कौशल 20 वर्षांचा कुठल्या अँगलने दिसतोय?

संभाजी राजे लेझिम नाचतानाचे दृश्य हटवत आहेत हे योग्य करत आहेत. पा या नादात आपले पारंपारीक लेझिम नृत्य सुद्धा कट होईल. आधीच ते गाणे संभाजी राजेंशिवाय असते तर बरे झाले असते. म्हणजे लेझिम वाचले असते.

ट्रेलर आता पुन्हा पाहिला. ते गाणे आणि नाच अजून त्यात आहे का बघायला. तर तिथे आहे सध्या.. जे मी माझ्या पहिल्या प्रतिसादात म्हटलेले की त्यातली एक स्टेप इशक तेरा ताऊबां ताऊबा स्टाईल वाटते ती जास्त खटकणारी वाटली.

हे असले ट्रेलर अन् सिनेमे पाहून मनोमन खात्री झाली आहे की लवकरच मास्टर अफजुलखान (तोच तो टॉप व्हिलन, हातात तलवार, तोंडात जम्बी, पाठीवर तोफ etc etc) पडद्यावर दर्शन देणार...

छावाचा ट्रेलर पाहिला.

संभाजीराजेंनी समूहनृत्याचेही प्रशिक्षण घेतले होते ही नवी माहिती मिळाली.

बाकी ट्रेलरमधेच विकी कौशल दोन वेळा चेहरा लालबुंद होईपर्यंत बेंबीच्या देठापासून किंचाळताना दाखवला आहे म्हणजे चित्रपटात तर डरकाळ्यांवर डरकाळ्या फुटणार आहेत एकंदरीत.

वाघाला किती दात असतात बाय द वे?

बाकी ट्रेलरमधेच विकी कौशल दोन वेळा चेहरा लालबुंद होईपर्यंत बेंबीच्या देठापासून किंचाळताना दाखवला आहे म्हणजे चित्रपटात तर डरकाळ्यांवर डरकाळ्या फुटणार आहेत एकंदरीत.
>>>

जे ओरडणे सर्वात भारी असते ते ट्रेलर मध्ये दाखवून मोकळे होतात. हातचे राखत नाहीत. कारण त्यावरच पहिल्या आठवड्यात कमाई करायची असते.

Pages