क्रिकेट - ९

Submitted by ऋन्मेऽऽष on 3 January, 2025 - 02:37

२०००+ पोस्ट झाल्या म्हणून नवीन धागा

बॉर्डर गावस्कर ट्रॉफीचा निर्णायक धुमाकूळ इथे घालूया Happy

क्रिकेटचा मागचा धागा ईथे बघू शकता
https://www.maayboli.com/node/83589

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

माझ्या मते, इंग्लंड, अमेरिका, ऑस्ट्रेलिया येथून येऊन भारतातल्या उष्ण, दमट हवेत, प्रदूषणात, गर्दीत आले की पोट बिघडणे, घसा दुखणे इ. रोग मागे लागतात. या गोष्टींची सवय व्हायला काही दिवस लागणारच. त्यामुळे इंग्लंड हरले यात मला आश्चर्य वाटत नाही.
अर्थात भारतीय खेळाडू चांगले खेळले हे कबूल करायलाच पाहिजे.

<<रोहित कोहली बुमरा पंत नसल्याचा परिणाम का? रुणम्या ब्रँड वॅल्यू बोलत असतो ते पटायला लागलंय आता मला पण.>>
बिच्चारे भारतीय खेळाडू, एव्हढे छान जिंकले तरी त्यांचे कुणि कौतुक करत नाहीत. पण रोहित नि विराट यांनी ऑस्ट्रेलियाच्या दौर्‍यावर काही केले नाही तरी त्यांची स्तुति!

Virat Kohli was the ICC Ambassador for the 2015 ICC Cricket World Cup. He was also the brand ambassador for the 2023 Men's ODI Cricket World Cup ad campaign

कोणताही खेळाडू खेळापेक्षा मोठा नसतो हे घासून गुळगुळीत वाक्य खरे मानले तरी एखादा खेळाडू इतर खेळाडूंपेक्षा मोठा नक्कीच असू शकतो Happy

२०-२० फॉरमॅट मध्ये आता फक्त वर्ल्ड कप, आशिया कप वगैरे टूर्नामेंटला व्हॅल्यू राहिली आहे. द्वीपक्षीय मालिकाना फार महत्त्व राहिले नाही. >> ब्रँड व्हॅल्यूबद्दल इतके बोलतोस तर थोडेसे बोर्डाचे फायनांशियल्स वाचून बघ. मल्टी नॅशनल टूर्नामेंट्पेक्षा द्वीपक्षीय मालिकांमधे किती पैसा मिळतो हे शोधलेस तर बरेच उलगडेल.

अजून एक गोष्ट लक्षात घ्या की अकराचा पूर्ण संघ या एकाच निकषावर निवडला जात नाही. जिंकायचे सुद्धा असतेच ना >> दहा खेळाडूंमधे सामने नक्कीच जिंकता येतील (एक ब्रँड व्ह्ञ्ल्यू वाला आहे असे धरूया) असे फिक्स्ड असते का ? टी २० वर्ल्ड कपला कोहली, रोहित , पांड्या हे पंतपेक्षा अधिक ब्रँड व्हॅल्यू असलेले लोक संघात होते. आता पंतला ब्रँड व्हॅल्यू मूळे नेले होते असे तू म्हणत असशील तर चार जण निव्वळ ब्रँड व्हॅल्यू वर संघात होते म्हणायचे का ?

एखादा खेळाडू इतर खेळाडूंपेक्षा मोठा नक्कीच असू शकतो Happy >> ह्या वाक्यांचा पंत ब्रँड व्हॅल्यूमूळे टीममधे आला ह्याच्याशी काय संबंध आहे ?

काल इंग्लंड अगदीच सपक खेळले. कलकत्त्याला सामना होता नि आपण टॉस जिंकला इथेच आपण अर्धी अधिक मॅच जिंकली होती.

पंत हा ब्रँड व्हॅल्यू मध्ये पांड्या पेक्षा वरचढ असावा..

ब्रँड व्हॅल्यू असलेला खेळाडू त्याच कारणाने संघात असतो असा आपला गैरसमज झालेला आहे.
रोहीत कोहली पांड्या हे मागच्या २०-२० विश्वचषकात आपल्या खेळामुळे संघात होते. त्यांची ब्रँड व्हॅल्यू जास्त असली तरी त्यांचे सिलेक्शन त्या कोट्यातून झाले नव्हते.

पण सध्या कसोटी संघात ते आहेत त्याला मात्र ब्रँड व्हॅल्यू जबाबदार आहे.

पुढचा प्रश्न सर्वाँना आहे.
गेल्या चार वर्षांतील २०-२० द्विपक्षीय मालिका किती तपशीलात आठवतात आणि कसोटी मालिका किती तपशीलात आठवतात?

वर माझी जी पंत बद्दलची निर्णायक कसोटी सामन्यांची पोस्ट आहे त्यासाठी मला एका शब्दाचे गूगल करायची गरज भासली नाही.

वर गंमत अशी चालू आहे ना की मी डाय हार्ड पंत फॅन बोलत आहे की पंतची २०-२० वर्ल्डकप निवड त्याच्या ब्रँड व्हॅल्यू मुळे झाली होती.
आणि असामी म्हणत आहे की छे, तो तर हे संजू आणि राहुल यांच्या आधी डीजर्व्ह करत होता.
तर मला या वादात हरायला सुद्धा आवडेल Happy

पंत हा ब्रँड व्हॅल्यू मध्ये पांड्या पेक्षा वरचढ असावा.. >> क्रियापद नीट बघ तुझे. इकॉनॉमिक्स टाईम्स चेक कर.

रोहीत कोहली पांड्या हे मागच्या २०-२० विश्वचषकात आपल्या खेळामुळे संघात होते. त्यांची ब्रँड व्हॅल्यू जास्त असली तरी त्यांचे सिलेक्शन त्या कोट्यातून झाले नव्हते. >> नि पंतचे ब्रँड व्हॅल्यू मूळे झाले होते ? हे सरळ धोपट विधान सरळ एका गुणी खेळाडूवर अन्याय करणारे आहे असे तुला वाटत नाही हे दुर्दैवाचे आहे.

आपण एखाद्या खेळाडूचे डाय हार्ड फॅन असलो म्हणजे इतर नसतातच वगैरे कसे समजू शकतात लोक हे माझ्या समजेबाहेर आहे.

गेल्या चार वर्षांतील २०-२० द्विपक्षीय मालिका किती तपशीलात आठवतात आणि कसोटी मालिका किती तपशीलात आठवतात? >> पंतचा डायर्ड फॅन असून त्याची ब्रँड व्ह्यल्यू किती आहे , ती पांड्यापेक्षा कमी आहे कि जास्त आहे हे तुला माहित नाही, हे लक्षात घेऊन हा प्रश्न विचारला असतास तर बरे झाले असते. 'पंतने ऑस्ट्रेलियामधे पहिल्या सामन्यामधे चौथ्या चेंडूवर पिचच्या उजव्या बाजूला शॉट मारला होता कि डाव्या बाजूला हे पंतच्या डाय हार्ड फॅनला माहित नसणे' जितके निरर्थक आहे तितकेच तुझा प्रश्न 'द्विपक्षीय मालिकांमूळे बोर्डाला फायनांशियल गेन्स होतात कि वर्ल्ड कप मूळे' ह्याचे प्रत्त्युत्तर म्हणून आहे.

आपण एखाद्या खेळाडूचे डाय हार्ड फॅन असलो म्हणजे इतर नसतातच वगैरे कसे समजू शकतात लोक
>>>

छे .. असे कसे समजेल.
रोहीत पंत धोनी यांची ब्रँड व्हॅल्यू काही माझ्या एकट्याचा जीवावर झाली नाहीये. कित्येक फॅन असतील म्हणूनच झाली असेल ना..

मी पंतचा फॅन आहे ते त्याच्या खेळामुळे.. मला त्याच्या ब्रँड व्हॅल्यू आणि पर्सनल लाईफशी काही घेणे देणे नाही.

यावरून एक आठवले,
माझी मुलगी सुद्धा रोहीत शर्मा फॅन आहे. ती मला इंस्टा रील बघून रोहीत शर्मा बद्दल काहीबाही त्याच्या पर्सनल लाईफबाबत प्रश्न विचारत राहते. मला त्यातले बरेचसे माहीत नसते. पण तिला माहीत असते.
मग एक दिवस मी तिला रोहितचे एकेक रेकॉर्ड आणि क्रिकेटचे काही नियम विचारले..
तेव्हा तिला फरक समजला आणि ती शांत बसली Happy

तेव्हा तिला फरक समजला आणि ती शांत बसली >> मग ' पंतचा खेळामूळे फॅन आहे नि ब्रँड व्हॅल्यूशी कर्तव्य नाही' म्हणत 'पंत ब्रँड व्हॅल्यू मूळे संघात वेळोवेळी आलाय ' असे ंहणत वाद घालतोस हे बघून पोरीमधे असलेले शहाणपण तुझ्यामधे नाही हे तात्पर्य धरायचे का ? Wink

१) पंतचा खेळामूळे फॅन आहे नि ब्रँड व्हॅल्यूशी कर्तव्य नाही'

२) 'पंत ब्रँड व्हॅल्यू मूळे संघात वेळोवेळी आलाय

>>>>

दोन्ही वाक्ये आपल्या जागी योग्य आहेत.

मला पंतचा खेळ आवडतो आणि मला त्याच्या ब्रँड व्हॅल्यूचे मला कौतुक नाही.

पण पंतची ब्रँड व्हॅल्यू बरेपैकी आहे आणि त्याला याचा एडवांटेज सुद्धा मिळतो हे fact आहे. मग मला त्यात इंटरेस्ट असो नसो.

आयपीएलमध्ये त्याच जीवावर त्याला २७ करोड मिळालेत.
उपयुक्तता + ब्रँड व्हॅल्यू.
आणि धोनीला काय उगाच अजून एक वर्षे करत खेळवतात का.. चेन्नई इज इक्वल टू धोनी ही त्याची ब्रँड व्हॅल्यू आहे. चार कोटी खेळायचे आणि कित्येक कोटी जाहिरातीचे म्हणून दिले असतील त्याला..

झोपायला जायच्या आधी तुम्हाला एक गंमत सांगू का?

भारतात रात्रीचा एक वाजला आहे. पण क्रिकेट धाग्यावर सहसा न फिरकणारे सुद्धा आता हा धागा वाचत असतील.

यालाही कारण ब्रँड व्हॅल्यू Happy

चला शुभरात्री त्या सर्वाँना Happy

मी हा धागा आत्ता उघडला, ह्याचा अर्थ मला ब्रँड व्हॅल्यूत इंटरेस्ट नाही असा घ्यायचा ना? Wink

मला आपले उगाच ते हिमालयातले एक टांग वर केलेल्या वाघिणीचे दूध पिणारे बाबा आठवताहेत - Who are you ? Who am I ? and who is he ? he is the who of the you in the I of the he in which you are the I and I is the you - and that you in you and he in you ........... Wink

ऑस्ट्रेलिया मधे गेलेल्या खेळाडूंना डोमेस्टिक क्रिकेट खेळत नाही म्हणून कान पिचक्या दिल्या गेल्या नि त्याआधीच जस्ट संपलेल्या डोमेस्टिक वन डे टूर्नामेंटमधे दणकून खेळलेल्या एकाही फलंदाजाला वल्ड कपसाठी घेतला नाही ! Happy

“ ऑस्ट्रेलिया मधे गेलेल्या खेळाडूंना डोमेस्टिक क्रिकेट खेळत नाही म्हणून कान पिचक्या दिल्या गेल्या नि त्याआधीच जस्ट संपलेल्या डोमेस्टिक वन डे टूर्नामेंटमधे दणकून खेळलेल्या एकाही फलंदाजाला वल्ड कपसाठी घेतला नाही” - संजूला विजय हजारेत खेळला नाही म्हणून घेतला नाही आणि करूण नायरला त्याच विजय हजारेत ७५०+ रन्स करूनही घेतलं नाही . Happy

काल बीकेसी ग्राऊंडवर शर्माजी का बेटा १९ चेंडूत ३ धावा करुन बाद झाला. आउटस्विंग होत असलेला चेंडू अर्धामुर्धा पुल करताना शॉर्ट एक्स्ट्राकव्हरला सोप्पा कॅच काढून दिला. 😠

बालगंधर्व सिनेमात जशी त्यांची कवळी उडून पडते गाताना आणि ते स्वत: हात जोडून "आता पुरे करा देवा" असं म्हणतात तशी वेळ आली आहे असं वाटलं.

रोहित भैय्या बस्स करो अब. 🤬

मला आपले उगाच ते हिमालयातले एक टांग वर केलेल्या वाघिणीचे दूध पिणारे बाबा आठवताहेत <<
ते बरे.
इथे बैल गाभण सांगत फिरणारा बाबा आहे.

इथे प्रतिभावान, कर्तबगार अशा कांहीं माबोकरांची ब्रॅण्ड व्हॅल्यूही उच्च व वादातीत आहे, हे मात्र नक्की !! Wink

शर्माजी के बेटे ने आता मुंबईला हरवायचा चंग बांधलेला दिसतो. त्याच्यासाठी मुंबईच्या कोणत्या खेळाडूला बाहेर बसवलं?
तिकडे पँटनेही दिवे लावलेत.

*शर्माजी के बेटे ने आता मुंबईला हरवायचा चंग....* -
खूप वर्षांनी रणजी लेव्हलला खेळतोय, जरा त्या लेव्हलचा सराव व्हायला वेळ लागणारच ना. तिकडचं हरणं वेगळं, रणजीत खेळणं वेगळं !! Wink

खूप वर्षांनी रणजी लेव्हलला खेळतोय, जरा त्या लेव्हलचा सराव व्हायला वेळ लागणारच ना. तिकडचं हरणं वेगळं, रणजीत खेळणं वेगळं !! >> काय राव भाऊ , तुम्ही सुद्धा ? पहिल्या इनिंगमधे बाद झालेला प्रकार ऑस्ट्रेलियामधेही झालेला. इथे तर अनोळखी खेळाडू होता. हरणाचीच मृगया सुरू आहे. बिचारा आयुष म्हात्रे बाहेर बसवला गेला ह्या (आगरकर्/गंभीर/... आपल्याला पटेल असे नाव घालून घ्या) च्या हट्टापायी.

संजूला विजय हजारेत खेळला नाही म्हणून घेतला नाही आणि करूण नायरला त्याच विजय हजारेत ७५०+ रन्स करूनही घेतलं नाही > > Lol

आयुष म्हात्रे बाहेर बसवला गेला याचे खूप मीम फिरत आहेत.
सिनिअर खेळाडूंनी रणजी खेळायचे पण तिथले प्लेअर बसवायचे नाही. कसे शक्य आहे?

मीम्स फिरत आहेत कारण तो चांगल्या इनिंग्स खेळला आहे ह्या सीझनमधे (त्याचा डेब्यू असतानाही). आता दोन इनिंगमधे फेल गेल्यावर रोहित च्या जागी त्याला आणायचे का ? तू काय करशील एक निपक्षपाती सिलेक्टर म्हणून ?

रोहित आहे म्हणून लोकं स्टेडियम. टिव्हीवर मॅच बघतात. रोहित नसेल तर कोण जाणार मॅच बघायला? रोहितचा मैदानावरचा वावर लोकांसाठी पुरेसा असतो. त्याने दोन चार फोर मारून १५-२० रन बनवले तरी लोकांचे पैसे वसूल झालेले असतात. सचिन रिटायर्ड झाला तेव्हा भरपूर लोकं क्रिकेट बघणं बंद करणार होते पण रोहितच्या आकर्षक आणि आक्रमक फलंदाजीने त्यांना क्रिकेट बघणे भाग पाडले. आता रोहित रिटायर्ड झाला की लोकं कशाला क्रिकेट बघतील? काही लोकांना हे गणितच कळत नाही. उगीच आपल्याला भारी काहीतरी माहीत आहे या आविर्भावात मोबाईल उचलायचा आणि बटणं दाबायला सुरू करायची.

असामी,
म्हणजे बघा हं, रोहीत आणि कोहलीला सांगायचे की डोमेस्टिक खेळा आणि फॉर्म परत मिळावा.. आणि खेळायला गेले की म्हणायचे बाबा तुझा फॉर्म नाही तर तुला आम्ही रणजी संघात घेऊ शकत नाही Happy

जे मीम फिरवतात त्यांना इतके कळत असते तर प्रश्नच नव्हता. रोहीत कोहली कोणीही राष्ट्रीय संघातील खेळाडू काय पूर्ण सीजन खेळणार नाहीत. जर अजून एक सामना खेळला तर पुढच्यावेळी त्या जागी एखादा शिवम दुबे बसवता येईल.

*भाऊ , तुम्ही सुद्धा ?* - असामिजी, त्या पोस्टच्या पुढे असलेली स्माईली नजरेतून निसटलैली दिसते ! Wink

नवोदित खेळाडूला छान कामगिरी होत असतानाही जर बाहेर बसवलं, तर त्याची कारणं काय आहेत हे त्याने समजून घेणं हा शिक्षणाचाच भाग आहे. मला नाही वाटत आयुष म्हात्रेच्या मनावर किंवा करिअरवर रोहितमुळे बाहेर बसावं लागल्याचा विपरीत परिणाम होईल.

Pages