क्रिकेट - ९

Submitted by ऋन्मेऽऽष on 3 January, 2025 - 02:37

२०००+ पोस्ट झाल्या म्हणून नवीन धागा

बॉर्डर गावस्कर ट्रॉफीचा निर्णायक धुमाकूळ इथे घालूया Happy

क्रिकेटचा मागचा धागा ईथे बघू शकता
https://www.maayboli.com/node/83589

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अर्थात वरचे देखील काही वशिल्याचे खेळाडू नाहीत. ते तसेच खेळले आहेत म्हणून त्यांचे तसे नाव झाले आहे. पण खेळायचे बंद झाले तरी त्यांना हलवता येत नाही अशी गोची झाली आहे.>> सर हा सगळा PR चा गेम आहे. This is not cricket! हमारे जमानेमे...

“ तुम्ही तसे म्हटलेय असे मी तरी कुठे म्हटलेय”

“त्यात ज्यांनी ज्यांनी योगदान दिले त्यांना कसे काय वगळणार? आणि कुठल्या आधारावर?” - सुरू… मेरी-गो-राऊंड सुरू

*पण खेळायचे बंद झाले तरी त्यांना हलवता येत नाही अशी गोची झाली आहे.* - मला वाटतं इतकं साधं सरळ गणित नाही हे. ' खेळायचे बंद होणं ' व करिअरच्या उत्तरार्धात 'बॅड पॅच ' येणं या दोन भिन्न गोष्टी आहेत व महान खेळाडूंच्या बाबतीत यातलं नेमकं काय होतंय हे ठरवणं जवळ जवळ अशक्य आहे. ( गावसकर जरी बिसीसीआयने कठोरपणे जे उपयुक्त ठरत नाहीत त्यांना हाकलून द्यायला हवं असं म्हणत असले, तरी त्यांनाही बोर्डाने त्यांचा मोठ्ठा ' बॅड पॅच ' चालू असताना संधी देणं थांबवलं नव्हतं व ते योग्यही ठरलं होतं !) बराच काळ भारताबाहेर एकही शतक न झालेल्या द्रविडने इंग्लंड दौऱ्यावर सलग चार सामन्यात शतकं झळकावली होती ! महान खेळाडूंच्या बाबतीत तरी ' श्रद्धा व सबुरी ' धोरण सफल होण्याचीच शक्यता जास्त असते, जरी तशी हमी देणं अशक्य असलं तरीही !

पाच वर्षे हा काही नुसता मोठा काळ नाही तर एखाद्याची अर्धी कारकीर्द असते.
काढणे किंवा ब्रेक देणे तर दूर कधी निवड समिती सदस्या मध्ये कोहलीबाबत चर्चा झालेली सुद्धा मी ऐकली नाही.

पुजारा सुद्धा कसोटी फॉरमॅटमध्ये मोठा खेळाडूच होता. त्याचा मात्र असा गेम झाला की पुन्हा फिरून त्याच्या नावाची चर्चा सुद्धा होत नाहीये. ते देखील तो या फॉरमॅटमध्ये इतर ठिकाणी चांगले खेळत असूनही आता त्यावर जणू फुलीच मारली आहे.

आणि ऋषभ पंतचा या आधीचा २०-२० इंटरनॅशनल रेकॉर्ड असा काय होता जे त्याला अपघातातून परत आल्यावर एकही २०-२० किंवा कुठलाही इंटरनॅशनल सामना न खेळवता थेट वर्ल्डकप नेले.

सब पैसे का चक्कर है बाबूभैय्या...

फेरफटका,
तुमच्या पोस्ट मधील मुद्यावर मी माझी पोस्ट पुढे लिहिली तर तुम्हाला वाटते की तुमची पोस्ट खोडायला मी माझी पोस्ट लिहिली आहे. त्या वाटण्याचे मी काही करू शकत नाही Happy

रोहित व विराट ह्यांना अजूनही संघात स्थान देणं योग्यच आहे, असं मी देखील छातीठोकपणे म्हणत नाहीय. पण, त्यांना तसं स्थान देण्यामागे सबळ क्रिकेटिंग कारणंही असू शकतात, हे मात्र मी ठामपणे म्हणतो आहे.
*आणि ऋषभ पंतचा या आधीचा २०-२० इंटरनॅशनल रेकॉर्ड असा काय होता ..?? कुठलाही इंटरनॅशनल सामना न खेळवता थेट वर्ल्डकप नेले.* - बिशाद काय होती कोणाची, तुमच्या हिरोला सामान्य खेळाडूसारखं वागवायची !!! Wink

काढणे किंवा ब्रेक देणे तर दूर कधी निवड समिती सदस्या मध्ये कोहलीबाबत चर्चा झालेली सुद्धा मी ऐकली नाही. >> कर्णपिशाच्च !! Lol

बिशाद काय होती कोणाची, तुमच्या हिरोला सामान्य खेळाडूसारखं वागवायची !!! >> भाऊ ऐकत नाहीत आजकाल.

इंग्लंडविरुद्ध टी २० मधे संघात असलेले पण चँपियन्स ट्रॉफीसाठी नसलेले जबरदस्त खेळले पाहिजेत. मजा येईल त्यांना (विशेषतः जे काही मोजके वन डे खेळले आहेत ओडीआय वर्ल्ड कप नंतर त्यांना) का वगळले ह्याची कारण मीमांसा देताना Wink खर तर चॅम्पियन्स ट्रॉफीचा संघ नवोदितांचा हवा होता जे पुढच्या वल्ड कपमधे असण्याची शक्यता असणार्‍यांचा.

त्यांना तसं स्थान देण्यामागे सबळ क्रिकेटिंग कारणंही असू शकतात
>>

काळ बदलला आहे भाऊ
निवडीचे राजकारण काही नवीन नाही. आता त्यात या खेळात असलेला भरमसाठ पैसा हा अजून एक घटक ऍड झाला आहे.

प्रश्न नुसता स्थान देण्याचा नाही तर कोहलीच्या कामगिरीवर प्रश्नचिन्ह सुद्धा उपस्थित केले जात नाहीये. कारण त्याच्या सन्मानाला पर्यायाने त्याच्या ब्रँड व्हॅल्यूला धक्का पोहोचवायचा नाहीये.

ऋषभ पंत आवडीचा खेळाडू आहे. त्याने व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये सुद्धा चमकावे अशी इच्छा आहेच. पण ते आधी चमकावे आणि वर्ल्डकपसाठी तयार व्हावे. थेट तिथेच चमकेल हा एक जुगार वाटतो. आणि इतरांवर अन्याय.
पण स्पर्धा राहुलशी असेल तर साखळी सामने राहुलने खेळावे आणि नॉक आउट प्रेशर गेम पंतने.. कारण राहुलला ते झेलता येत नाही

प्रश्न नुसता स्थान देण्याचा नाही तर कोहलीच्या कामगिरीवर प्रश्नचिन्ह सुद्धा उपस्थित केले जात नाहीये. >> फॅमिली बरोबर ट्रॅव्हल करणे, बॉडीगार्ड, वेगळ्या होटेल मधे राहणे हे मुद्दे कोणाला धरून आहेत असे तुला वाटते ?

नॉक आउट प्रेशर गेम पंतने.. >> पंतच्या टेस्ट मधल्या एक्सेप्शनल अ‍ॅबिलिटी बाजूला ठेवून पंतने कुठले आंतरराष्ट्रीय वन डे नॉक आउट सामने जिंकून दिल्याचे आठवत नाहीये. ( आयपील धरत नाहीये . ) किपिंग चा स्लॉट सॅमसनाचा होता. तो मधले सामने जबरदस्त खेळला आहे पण दुर्दैवाने त्याला खेळवायचे तर रोहित किंवा गिल ह्यामधल कोणी तरी एक ओपनर उडणार इथे त्याच हा पत्ता कटला आहे.

फॅमिली बॉडीगार्ड काय मुद्दे आहेत का हे. दिखाव्याची मलमपट्टी. आम्ही काहीतरी करतोय हे दाखवायला...

आणि पंतबाबत मी उलट तेच म्हणतोय की त्याची कसोटी ब्रँड व्हॅल्यू आहे म्हणून तो व्हाईट बॉल संघात आहे.
मालिकेतील अखेरच्या आणि निर्णायक कसोटीत तो नेहमीच परफॉर्म करत आला आहे. मागे मी आमच्या क्रिकेट ग्रूपवर एकाला हे मोजून दाखवले होते. कॉपी पेस्ट करतो नंतर ती पोस्ट.
याउलट राहुल नेहमी अश्या सिच्युएशनला पसरतो.

ऑस्ट्रेलियातील पहिले शतक
अखेरच्या निर्णायक कसोटीत

इंग्लंडमधील पहिले शतकं शेवटच्या कसोटीत, चौथ्या डावात.

सिडनी आणि गाबा दोन्ही ऐतिहासिक इनिंग.
दोन्ही निर्णायक कसोटीत..

इंग्लंडविरुद्ध भारतातले डिफिकल्ट सिच्युएशन मध्ये आलेले सामनावीर मिळवून देणारे शतक.. अखेरच्या आणि निर्णायक कसोटीत.

आफ्रिका विरुद्ध आफिकेतील झुंझार शतक.
निर्णायक कसोटीत सगळे फेल गेले असताना..

पुन्हा इंग्लंडमध्ये पाचव्या आणि निर्णायक कसोटीत वन मॅन शो शतक..

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलमध्ये दुसऱ्या डावात सगळे कोसळत असताना सर्वाधिक धावा..

एक दिवसीयमध्ये इंग्लंडमध्ये आलेले एकमेव शतक. ते सुद्धा अवघड परिस्थितीत आणि निर्णायक सामन्यात.

नुकतेच झालेल्या न्यूझीलांड मालिकेत अखेरच्या कसोटीत चौथ्या डावात पंत विरुद्ध किवीज असाच सामना रंगला होता.

ऑस्ट्रेलियात अखेरच्या कसोटीत सुद्धा काही वेगळे चित्र नव्हते.

नाम तो सूना ही होगा...
ऋषभ पंत !

पंतच्या टेस्ट मधल्या एक्सेप्शनल अ‍ॅबिलिटी बाजूला ठेवून पंतने कुठले आंतरराष्ट्रीय वन डे नॉक आउट सामने जिंकून दिल्याचे आठवत नाहीये. >> थोडे शब्द बोल्ड केले आहेत.

माझाच मुद्दा मलाच का बोल्ड करून दाखवत आहात?
सुरुवातीला जा.. तिथेच मी लिहिले आहे की पंत व्हाईट बॉल आयसीसी टूर्नामेंट मध्ये त्याच्या ब्रँड व्हॅल्यू मुळे सिलेक्ट होतो.

आणि हो, पंत फक्त ३१ वन डे खेळला आहे.
त्यात देखील गेल्या पाच वर्षात फक्त १६
त्या १६ सामन्यात १ शतक ४ अर्धशतक ४०+ सरासरी १०६+ strike rate.. आकडे तर तसे चांगले आहेत.
यात knock out खेळलाच नसेल तर ते आकडे निर्माण करणे शक्य नाही.

पण त्याचे इंग्लंडमध्ये अखेरच्या निर्णायक वन डे सामन्यात शर्मा, धवन, कोहली आणि सूर्या या चार विकेट लवकर गेल्यावर आलेले शतक मात्र स्पेशल होते.
आधी डाव सांभाळला आणि मग तुटून पडला.

त्यात त्याने एका ओवरला मारलेले पाच चौकार अजून आठवतात. पहिले पाच बॉल पाच फोर मारल्यावर आता हा सहाव्याला जाणार असे वाटताना त्याने सहावा बॉल (बहुधा यॉर्कर length) नुसताच खेळला. कॉमेन्ट्री ला असलेले सुद्धा म्हणाले की असे अनपेक्षित फक्त ऋषभ पंतच करू शकतो.

माझाच मुद्दा मलाच का बोल्ड करून दाखवत आहात? >> तुझ्या "पण स्पर्धा राहुलशी असेल तर साखळी सामने राहुलने खेळावे आणि नॉक आउट प्रेशर गेम पंतने.." ह्या वाक्याला मी उत्तर दिले होते. आधीचे पोस्ट बोल्ड करण्याचे मह्त्व कळावे अशी अपेक्षा. जर साखळी सामने राहुल खेळला नि चांगले खेळला तर नॉक आउट मधे त्याच्या जागी पंत ला आणणे हा उफराटा प्रकार करण्याची शक्यता शून्य आहे. खुद्द पंतसुद्धा असे सुचवणार नाही. "यात knock out खेळलाच नसेल तर ." हे तूच म्हटलेले असल्यामूळे खर तर तुझ्याच हे लक्षात यायला हवे होते. " ब्रँड व्हॅल्यू मुळे सिलेक्ट होतो." ह्यावर पोस्ट नव्हते.

राहुल ३ नॉक आउट मॅचेस खेळला आहे त्यात एक सपशेल फेल्ञुअर आहे नि उरलेल्या दोन सामन्यांमधे मिळून शंभर धावा आहेत.

जर साखळी सामने राहुल खेळला नि चांगले खेळला तर नॉक आउट मधे त्याच्या जागी पंत ला आणणे हा उफराटा प्रकार करण्याची शक्यता शून्य आहे.
>>>>>>

हो माहीत आहे असे प्रकार कोणी करत नाही...
पण दुर्दैवाने त्याचीच किंमत आपल्याला वर्षानुवर्षे मोजावी लागत आहे!

Knock आऊट किंवा फायनल गेम यांचे प्रेशर वेगळेच असते. त्याखाली कित्येक खेळाडूंचा गेम बदलतो. बरेचदा नाही जमत साखळी सामन्यात चमकलेल्या खेळाडूना नॉकआऊट प्रेशर गेम मध्ये खेळणे.

19 वर्षाखालील महिला विश्व कप फॉलो करतंय का कुणी?

ही मुलगी प्रॉमिसिंग वाटतेय. त्रिशा. GONGADI TRISHA

ओपनिंग बॅटर / लेग स्पिनर.

वरून चक्रवर्ती फॉर्मात आहे गेले काही काळ सीजन..
मागे एका वर्ल्डकपला असेच फॉर्म दाखवून फसवले होते त्याने.. पण येत्या वर्ल्डकपला नुकसान भरपाई करेल त्याची असे वाटते.

*दुसऱ्याच ओवरला २२ धावा ठोकल्या संजू ने* -
संजू कांहीं काळ तरी नियमितपणे भारतीय संघात रहावा अशी माझी तीव्र इच्छा आहे; आणि हे आत्ताच होणं गरजेचं आहे, कारण वेळोवेळी चांगली कामगिरी करूनही त्याचं आंत - बाहेर खूपच वर्ष चाललं आहे !

संजू कांहीं काळ तरी नियमितपणे भारतीय संघात रहावा अशी माझी तीव्र इच्छा आहे; आणि हे आत्ताच होणं गरजेचं आहे, कारण वेळोवेळी चांगली कामगिरी करूनही त्याचं आंत - बाहेर खूपच वर्ष चाललं आहे ! >> +१

एक गमतीची गोष्ट लक्षात आली ती म्हणजे भारताच्या टी २० संघामधे पंत नाहिये. सूर्याच्या आजच्या मुलाखतीमधे संजू ला प्राधान्य दिले जाईल असे म्हटलय म्हणजे ब्रँड व्हॅल्यू ला मह्त्व दिलेले नाहिये असे धरायचे का (सध्या तरी) ?

“म्हणजे ब्रँड व्हॅल्यू ला मह्त्व दिलेले नाहिये असे धरायचे का (सध्या तरी) ?” - उघड…. कॅन ऑफ वर्म्स सताड उघडा टाक.. Lol

अजून लक्षात नाही आले का?
सध्या चॅम्पियन ट्रॉफी आहे तर पंत एकदिवसीय संघात आहे.
मागे २०-२० वर्ल्डकप झाला तर पंत तिथे डायरेक्ट एन्ट्री होता.
कसोटीत तर त्याला पर्याय नाही.
२०२६ ला जेव्हा २०-२० वर्ल्डकप येईल तेव्हा अचानक पंत त्यात दिसला तर नवल वाटू घेऊ नका.
कारण २०-२० च्या या द्विपक्षीय मालिकाना तितके कोणी विचारत नाही. त्यामुळे इथे तुम्हाला बूमराह सुद्धा जीव जाळताना दिसणार नाही. पण २०-२० वर्ल्डकप संघात तो असणारच...

त्यामुळे इथे तुम्हाला बूमराह सुद्धा जीव जाळताना दिसणार नाही. >> बुमरा इंजर्ड आहे म्हणून नाहिये. २०-२० वर्ल्डकप ला पंतला नेलेला कारण त्याच्या जरा आधी किशन नि अय्यर चा डीसीप्लिनरी प्रकार झाला होता. तोवर किशन नियमितपणे टीममधे असायचा कीपर म्हणून.

चॅम्पियन ट्रॉफी मधे अय्यर संघात का आहे ? राहुल का आहे ? ब्रँड व्हॅल्यू वर खेळाडू निवडले जातात हे म्हणणे गुणी खेळाडूंवर अन्यायकारक आहे.

काल एव्हडा चांगला सामना जिंकला तरी २-४ कमेंट आल्या फक्त. रोहित कोहली बुमरा पंत नसल्याचा परिणाम का? रुणम्या ब्रँड वॅल्यू बोलत असतो ते पटायला लागलंय आता मला पण.

बुमरा इंजर्ड आहे म्हणून नाहिये
>>>
अच्छा, हे नव्हते मला माहीत Happy

बूमराह इंजर्ड नसता तरी तो ही २०-२० मालिका खेळला नसता. सरावासाठी वनडे आणि मग चॅम्पियन ट्रॉफी खेळला असता. असे नाही वाटत का?

तो ऋषभ पंत सुद्धा तितक्याच सातत्याने खेळत आहे. तो येत्या २०-२० वर्ल्डकपचा प्लान असो किंवा नसो, तो देखील विश्रांती म्हणून दुय्यम महत्त्व असलेली द्विपक्षीय २०-२० मालिका खेळण्याचा प्रश्नच येत नाही.

२०-२० वर्ल्डकपसाठी ईशान हा एकच पर्याय होता का? संजू आणि राहुल होतेच ना? अपघातातून आलेल्या पंतला थेट अकरामध्ये खेळवले. आणि पूर्ण वर्ल्डकप तोच खेळला.

असो,
जोपर्यंत खेळाडूंच्या निवडीला ब्रँड व्हॅल्यू कशी कारणीभूत ठरते यावर तुमच्या मते एखादा एक्स्पर्ट असलेल्या व्यक्तीचे जोपर्यंत आर्टिकल येत नाही तोपर्यंत तुम्हाला पटणार नाही याची कल्पना आहे. पण त्याने सत्य बदलत नाही.
आणि हो, अजून एक गोष्ट लक्षात घ्या की अकराचा पूर्ण संघ या एकाच निकषावर निवडला जात नाही. जिंकायचे सुद्धा असतेच ना Happy

काल एव्हडा चांगला सामना जिंकला तरी २-४ कमेंट आल्या फक्त. रोहित कोहली बुमरा पंत नसल्याचा परिणाम का?
>>>>>

२०-२० फॉरमॅट मध्ये आता फक्त वर्ल्ड कप, आशिया कप वगैरे टूर्नामेंटला व्हॅल्यू राहिली आहे. द्वीपक्षीय मालिकाना फार महत्त्व राहिले नाही. यापेक्षा द्विपक्षीय आंतरराष्ट्रीय मालिकेपेक्षा जास्त हवा आयपीएल वेळी होते.

“ २०-२० वर्ल्डकपसाठी ईशान हा एकच पर्याय होता का?” - त्यावेळी टी-२० मधे असामी म्हणतो तसा किशन बर्यापैकी फिक्स्ड होता. त्याने ती अफ्रिका टूर सोडून परत येणं, मेंटल ब्रेक च्या नावाखाली डोमेस्टिक मॅचेस मिस करणं वगैरे प्रकार केले नसते तर त्याचं स्थान टी-२० मधे पक्कं होतं.

Pages