Submitted by ऋन्मेऽऽष on 4 March, 2024 - 01:57
आधीचा धागा भरला म्हणून हा नवीन धागा.
नवीन प्रदर्शित होणार्या चित्रपटांच्या ट्रेलरवर चर्चा करायला हा धागा.
मराठी, हिंदी, ईंग्लिश तिन्ही भाषेतील चित्रपट याच धाग्यात चालतील.
चित्रपट प्रदर्शित झाल्यावर आणि बघितल्यावर मात्र चित्रपट कसा वाटला हा धागा वापरा
जुना धागा ईथे - https://www.maayboli.com/node/61689
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
वैभव तत्ववादी चांगला अॅक्टर
वैभव तत्ववादी चांगला अॅक्टर आहे. पण दिसत नाही जास्त सिनेमांमधे.>>>+१
तत्ववादी आहे.. अमुक तमुक
तत्ववादी आहे.. अमुक तमुक चित्रपटात काम करणार नाही अशी तत्वे जपत असेल![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
जोक्स द अपार्ट, मलाही आवडतो त्याचा अभिनय. सहज सुंदर नैसर्गिक आहे. त्याने हिंदीत सुद्धा ट्राय करावे.
त्याने हिंदीत सुद्धा ट्राय
त्याने हिंदीत सुद्धा ट्राय करावे.
>>
होता की...
बाजीराव मस्तानी पासून आर्टिकल 370 पर्यंत...
हो बरोबर.. बाजीराव मस्तानी
हो बरोबर.. बाजीराव मस्तानी मध्ये पाहिला. तेच मी आठवत होतो पोस्ट लिहिल्या पासून की आलाय कुठेतरी.. पण त्यात वेगळाच दिसतो नाही.. कसा लक्षात येणार.
आर्टिकल ३७० नाही पाहिला.
आर्टिकल ३७०>>> चांगलं काम आहे
आर्टिकल ३७०>>> चांगलं काम आहे त्याचं आणि एक पाँडिचेरी नावाचा मराठी सिनेमा. मस्त !! मी दोन वेळा फक्त त्याच्यासाठी पाहिला.
हिंदीत चांगली कामं केली आहेत
हिंदीत चांगली कामं केली आहेत त्याने.
वैभव तत्त्ववादी त्या
वैभव तत्त्ववादी त्या 'लिपस्टिक अंडर माय बुरखा' मध्येपण होता. जास्त मोठा रोल नव्हता. काहीच्या काही वाटला होता मला तो पिक्चर.
वैभवची घरवापसी नावाची हिंदी
वैभवची घरवापसी नावाची हिंदी वेब सिरीजही आहे
https://www.instagram.com/p
https://www.instagram.com/p/DEkF_RxTAdZ/
हेमंत ढोमे आणि क्षिती जोग आता ग्रामीण महाराष्ट्रात. म्हणजे सगळे शहरी कलाकार ण ला न म्हणणार.
दम लगा के व तत्सम हिंदी चित्रपटांच्या पठडीतला वाटतोय.
म्हणजे सगळे शहरी कलाकार ण ला
म्हणजे सगळे शहरी कलाकार ण ला न म्हणणार.![Wink](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/wink.gif)
>>>> ऐकावे ते णवलच म्हणायचे..!
म्हणजे सगळे शहरी कलाकार ण ला
म्हणजे सगळे शहरी कलाकार ण ला न म्हणणार. >>![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
मानपमान चा ट्रेलर पाहिला.
मानपमान चा ट्रेलर पाहिला.
वैदेही छान वाटतेय.
बघू बाकी उत्सुकता आहे.
सु भा चा सिनेमा म्हणजे..
मला खूप आवडला fussclass
मला खूप आवडला fussclass Dabhade चा trailer...जमलं तर theater ला नक्की पाहीन...
धुमधाम https://youtu.be
धुमधाम
टीझर https://youtu.be/tIStUY8Z0PA?si=NtzLGF5p4gIHWH3u
प्रतीक गांधी आणि यामी गौतम
हा आणखी एक अँक्शन
हा आणखी एक अँक्शन
देवा(हे चित्रपटाचे नाव आहे)
https://youtu.be/9fjIXDhfXpQ?si=Q4kLxjFi4xwcyL7-शाहिद कपूर फटा पोस्टर निकला हिरो नंतर परत एकदा पोलीस झालाय . तो फ्लॉप झाला होता हा बघुया हिट होतोय का? ट्रेलर तर बरा आहे.
जिलबी पाहिला ठीक आहे . वन
जिलबी पाहिला ठीक आहे . वन टाइम बघायला ठीक . मर्डर मिस्टरी, डबल रोल , व स्वजो चा swag . केसांचा विग चेंज केला बहुदा . पूर्वग्रदूषित ठेवून पाहू नका .
मला खूप आवडला fussclass
मला खूप आवडला fussclass Dabhade चा trailer...जमलं तर theater ला नक्की पाहीन.. - सेम
स्वीट ड्रीम्स चं ट्रेलर
स्वीट ड्रीम्स चं ट्रेलर पाहिलं. कन्सेप्ट चांगली वाटते आहे. पण माणसं (लीड्स) आणि संवाद अजून चांगले हवे होते असं वाटलं. हाताळणी पण थोडी ग्लॅमरस चालली असती. त्यातही मिथिला बरी वाटते आहे. अमोल मात्र आवडला नाही. चांगलं हिरो मटेरिअल उरलंच नाहीये की काय बॉलिवूडात?
https://www.youtube.com/watch?v=U4R05IHL27E
धुमधाम >> ट्रेलर आवडले आहे.
धुमधाम >> ट्रेलर आवडले आहे.
देवा >> ठीकठाक वाटतो आहे.
फटा पोस्टर खरं म्हणजे मस्त पिक्चर होता. संतोषी ने अंदाज अपना अपना नंतर पहिल्यांदाच इतका फनी पिक्चर बनवला होता. पण तो बरोबर वेळेस आला नाही बहुतेक. शाहिद त्यात पोलीस नसतो फक्त आई करता अक्टिंग करत असतो.
फटा पोस्टर खरं म्हणजे मस्त
फटा पोस्टर खरं म्हणजे मस्त पिक्चर होता. संतोषी ने अंदाज अपना अपना नंतर पहिल्यांदाच इतका फनी पिक्चर बनवला होता.
>>>>
अच्छा.. बघायला हवा मग
त्यातली हिरोईन पण मस्त आहे.
धुमधाम >> ट्रेलर वरून काही
धुमधाम >> ट्रेलर वरून काही सांगू शकत नाही पण यामी वरून सांगू शकतो. तिचे पिक्चर मस्त आणि हटके असतात नेहमी. दिसते फार गोड हा बोनस
फर्स्ट क्लास दाभाडे ट्रेलर
फर्स्ट क्लास दाभाडे ट्रेलर बघून घरत गणपती आठवला..
झिम्मा टीम आहे म्हणजे मनोरंजनाची खात्री..
सिद्धार्थ चांदेकर सोबत अमेय वाघ म्हणजे मस्त जुगल बंदी बघायला मिळू शकते.
परिक्षणाची वाट न बघता थिएटर जायची रिस्क घेऊ शकतो असे वाटते.
पोलीस नसतो फक्त आई करता
पोलीस नसतो फक्त आई करता अक्टिंग करत असतो.>>>>हो पद्मिनी कोल्हापूरेची इच्छा असते त्याला पोलीस बघण्याची खोटा पोलीस असला तरी वर्दीतला त्याचा पहिला चित्रपट. मलापण आवडला होता स्पेशली त्यातलं गाणं मै रंग शर्बतों का तू मिठे घाट का पानी.
रॅबिट हाऊस. मराठी कलाकार आहेत
रॅबिट हाऊस. मराठी कलाकार आहेत पण सिनेमा हिंदी भाषेत आहे.
https://www.youtube.com/watch?v=gFneIf0CGtU
स्पेशली त्यातलं गाणं मै रंग
स्पेशली त्यातलं गाणं मै रंग शर्बतों का तू मिठे घाट का पानी.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
>>>
ते आमच्या आतिफचे आहे
धूमधाम "उरी" वाल्या आदित्य धर
धूमधाम "उरी" वाल्या आदित्य धर (यामीचा नवरा)चा आहे बायकोला चांगलेच रोल देतो त्याच्याच याआधीच्या "आर्टिकल 370" मधेही यामीचा मेन रोल होता.
'फटा पोस्टर' चांगला होता व ते
'फटा पोस्टर' चांगला होता व ते गाणे माझेही आवडते आहे.
ते आमच्या आतिफचे आहे >>>
ते आमच्या आतिफचे आहे >>>>आमच्या तुमच्या करू नकोस नाहीतर आपले हे ते येतील .आवडता गायक आहे गायकच राहू दे.
कल्की,
कल्की,![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
आतिफ अस्लम आवडता गायक नाही तर इमोशन आहे.. म्हणून आमचा आतिफ म्हटले
इथे वाचा -
आतिफ ! अस्लम !
6 September, 2015
https://www.maayboli.com/node/55443
मला धागाही माहीत आहे आणि तुला
मला धागाही माहीत आहे आणि तुला आतिफ किती आवडतो हेही .एकमात्र आहे स्वताच्या धाग्याची लिंक द्यायची संधी सोडत नाहीस.असू दे चांगलच आहे.त्यानिमित्ताने गाणी ऐकली.
Pages