Submitted by ऋन्मेऽऽष on 4 March, 2024 - 01:57
आधीचा धागा भरला म्हणून हा नवीन धागा.
नवीन प्रदर्शित होणार्या चित्रपटांच्या ट्रेलरवर चर्चा करायला हा धागा.
मराठी, हिंदी, ईंग्लिश तिन्ही भाषेतील चित्रपट याच धाग्यात चालतील.
चित्रपट प्रदर्शित झाल्यावर आणि बघितल्यावर मात्र चित्रपट कसा वाटला हा धागा वापरा
जुना धागा ईथे - https://www.maayboli.com/node/61689
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
झिम्मा पासुन नुसत (की नसत?
झिम्मा पासुन नुसत (की नसत?)पेव फुटलय...
https://www.youtube.com/watch?v=iO4d28vlWBI&ab_channel=EverestMarathi
सेनापती चे वय 103 असेल
सेनापती चे वय 103 असेल.त्यांनी यावर काही लॉजिकल स्पष्टीकरण द्यायला हवे कथेत>>> अनू साऊथ बेस असलेल्या पिक्चर कडून असल्या अपेक्षा?
सेनापती चे वय 103 असेल. >>
सेनापती चे वय 103 असेल. >> सोप्पं आहे. २९ फेब्रुचा जन्म दाखवायचा, म्हणजे तो अगदी २५-२६चाही दाखवता येईल.
हेहे
हेहे
ह पा सहीच, हाहाहा.
ह पा सहीच, हाहाहा.
बॅड न्युज चा ट्रेलर पाहिला.
बॅड न्युज चा ट्रेलर पाहिला. त्रिप्ती ला हिट व्हायचे/काम मिळायचे गिमिक गवसले आहे.. विक्की कौशल फिट & मस्त दिसतो. दुसरा हिरो माहित नाही. हे बेबी चा उलट प्रकार काहिसा. ट्रेलर मधेच सर्व स्टोरी उलगडून सांगितलीये

प्राईम वर येणारे त्यामुळे बघणार
दुसरा हिरो माहित नाही
दुसरा हिरो माहित नाही
>>
83 मधे बलविंदर सिंग संधू च्या रोल मधे होता
bardovi.. तुंबाड म्हणजे लिमिट
bardovi.. तुंबाड म्हणजे लिमिट वाटली होती, पण हे ट्रेलर पाहिलं आणि तुंबाड म्हणजे लिमिट नाही हे जाणवलं. पहिल्याच दिवशी बघणार.
छावाचा टीझर पाहिला. माझे
छावाचा टीझर पाहिला. माझे दोन्ही ऑटाफे कलाकार आहेत. पण विकी कौशलला संभाजी महाराजांच्या रोलमध्ये रोहित शेट्टी स्टाईल vfx (किल्ल्यावर बोटीचा नांगर घेऊन?) लढाया करताना नी मळकट राखाडी काळ्या रंगातले युनिफॉर्मसदृश कपडे घातलेले मुगल सैनिक पाहून डोके फिरले. रश्मीका मंदाना पण असणाराय हे वाचून धीर सुटलाच आहे आल्मोस्ट. आता औरंगजेब उड्या मारून तलवार फिरवताना दिसला की सुडोमि. तरीही बघेन कदाचित विकी आणि अक्षयसाठी.
हो विकी कौशल सिंहासनावर बसतो
हो विकी कौशल सिंहासनावर बसतो ती फ्रेम जबरी आहे. पण लढाया साउथच्या वळणावर आहेत. तरीही पिक्चर चालेल असे वाटते. व्हॉटसॅप मधून जी माहिती फिरते त्यावर आधारित असावा पिक्चर
नको रे नको अजून ऐतिहासिक
नको रे नको अजून ऐतिहासिक व्हीएफक्स वाले पिक्चर! खलीबली फिलिंग येतंय ते सगळी़कडे काळंकाळं मातकट बघून!
विकी कौशल ला म्हणताना ऐकलं की परदेशात अॅव्हेंजर्स, सुपरमॅन, स्पायडरमॅन सारखे मुव्हीज बनवावे लागतात कारण त्यांच्याकडे सुपरहिरो नाहीत पण आपल्याकडे हे खरेखुरे सुपरहिरो होऊन गेलेत पण म्हणून असे उडणारे दाखवाल? काहीही.
टिझर आवडला..विकी फार मेहनती
टिझर आवडला..विकी फार मेहनती आहेत त्यामुळे चान्गल काम करेल.अक्षय खन्ना अजिबात ओळखु आला नाही...बाकी राखाडी रन्गापेक्षा चोळणा,अगरखा, विजार भगव्या पगड्या घ्यायला हव्या होत्या.
थोड अतिशोयक्ती वाटतय पण होपफुली मुव्ही चान्गला असेल..
रश्मिकाला साउथच्या बस मधे बसवा कुणीतरी...ती नकोच होती..त्यापेक्षा श्रद्धा कपुर किवा शरवरी वाघ वैगरे चालली असती
मला तरी टिझर आवडला. ते खोट्या
मला तरी टिझर आवडला. ते खोट्या खोट्या व्ही एफ एक्स आर्मी पेक्षा हे खरे सैनिक आणि युद्ध भारी वाटले. विकीचा लूक पण चांगला जमला आहे.
रया गेलेला औरंगजेब म्हणून अक्षय खन्ना जबरदस्त वाटतोय
दोघांनी काम मस्त केलं असेल
दोघांनी काम मस्त केलं असेल त्यामुळे पहाणार.
विकी कौशल ला म्हणताना ऐकलं की
विकी कौशल ला म्हणताना ऐकलं की परदेशात अॅव्हेंजर्स, सुपरमॅन, स्पायडरमॅन सारखे मुव्हीज बनवावे लागतात कारण त्यांच्याकडे सुपरहिरो नाहीत >> काहीही हा विकी! रियल लाईफ हिरो जगात सगळीकडे कधी ना कधी होऊन गेलेत, अजूनही होत आहेत. पण त्यांची आणि सुपरहिरोजची तुलनाच होऊ शकत नाही. फिक्षन हे नेहमीच जास्त आकर्षक असतं.
छान दिसला आहे विकी कौशल, विकी
छान दिसला आहे विकी कौशल. विकी लिहिले की पुढे 'डोनर' येऊ लागले. ऑटोकरेक्ट पण आगाव झाले आहे.
तर विकी कौशल इतिहासाच्या पाठ्यपुस्तकातील चित्राकृती सारखा वाटला. त्याच्यात भयंकर एनर्जी आहे, तो निभावून नेईल. पण कथा, मांडणी, संवाद, चित्रीकरण, कपडेपट सांभाळून कुठेही अती न करण्याचा मोह व खलीबली टाईप गाणं न टाकण्याचा मोह आवरला असेल का याविषयी साशंक आहे. माझा पेशंस संपला आहे बहुधा. इच्छा सुद्धा नाही बघायची.
संभाजी महाराजांना बाहुबली करण्याऐवजी, काल्पनिक सुपरहिरो तयार करावेत सरळ. कल्पकता आटली की असे प्रयोग करून पुन्हा ते 'सेलेबल' करण्यासाठी त्याला सध्याच्या मार्केट प्रमाणे कस्टमाईज- आचरट करायचे थांबवावे. इतिहास 'सेलेबल' करणे / सध्याच्या राजकीय मतांप्रमाणे वाकवणे पटत नाही.
रश्मिका मंदाना येसुबाई आहे
रश्मिका मंदाना येसुबाई आहे म्हणे. कुफेहीपा?
कुठेही अती न करण्याचा मोह >>
कुठेही अती न करण्याचा मोह >> जरा डाउटच आहे. ट्रेलर मधे तो एकदा हवेत उडाल्यासारखा लढता लढता किल्ल्यातील वरच्या तटावर गेला आहे.
लोकांनी ऐतिहासिक चित्रपट कसे
लोकांनी ऐतिहासिक चित्रपट कसे बनवायचे ते संजय भन्साळी यांच्याकडून शिकावं. त्यांनी *बाजीराव मस्तानी* ज्या पद्धतीने बनवला, तो खरोखरच अफलातून होता. त्या चित्रपटात काहीही अतिशयोक्ती नव्हती. आता *छावा* चित्रपटातह चांगली गाणी असतील अशी अपेक्षा आहे.
विकीची अभिनयाची रेंज खूपच जबरदस्त आहे. *साम बहादूर* पासून *तौबा तौबा* आणि आता *छावा* पर्यंत, काय अफलातून अभिनेता आहे तो! आणि त्याच्या समोर आहे अक्षय, जो तितकाच महान अभिनेता आहे जसा विकी आहे. विकीची अभिनयशैली मला ओम पुरी, नसीरुद्दीन शहा यांच्या अभिनयाची आठवण करून देते.
बाजीराव मस्तानी* चित्रपटात
बाजीराव मस्तानी* चित्रपटात काहीही अतिशयोक्ती नव्हती >>>>
हे तुम्ही उपरोधाने लिहिलं आहे का? बाकी सर्व एक वेळ माफ पण बाजीरावाने सुईणगिरी करणे जऽऽरा जास्तच.
अलिकडच्या काळातील मला आवडलेला ऐतिहासिक चित्रपट म्हणजे जोधा-अकबर. त्यातही प्रचंड सिनेमॅटीक लिबर्टी घेतली आहे. पण पडद्यावर जे काय चाललं असतं ते किमान तत्क्षणी तरी बिलिव्हेबल वाटतं.
लोकांनी ऐतिहासिक चित्रपट कसे
लोकांनी ऐतिहासिक चित्रपट कसे बनवायचे ते संजय भन्साळी यांच्याकडून शिकावं. त्यांनी *बाजीराव मस्तानी* ज्या पद्धतीने बनवला, त्या चित्रपटात काहीही अतिशयोक्ती नव्हती.
>>
मस्त जोक मारा...
बादवे, असच कधीतरी वॉर मूव्ही बघून सिद्धार्थ आनंद ला कुणीतरी तुम वॉरफिल्म्स बनाव असं म्हणलं अन् त्यानी ते सीरियसली घेऊन फायटर बनवला असं म्हणतात (खखोदेजा). तसं ही कमेंट वाचून भन्साळी चेकाळला नाही म्हणजे झालं
नको नको त्या फायटर च्या आठवणी
नको नको त्या फायटर च्या आठवणी.ह्रितिक आहे म्हणून काहीही सहन करायचे काय लोकांनी?वॉर मध्ये ह्रितिक टायगर होते म्हणून विमानातून जीप वर उडी, जीप मधून बोट, बोटीतून बस, बाईक वरून रेल्वे असे काहीही इकडून तिकडे प्रकार सहन केले.पण म्हणून कॉपी पेस्ट करून थोडी जास्त देशभक्ती फोडणी देऊन परत तेच बनवायचं?आणि तेही ह्रितिक आणि दीपिका ची जोडी?
जोधा-अकबर मलाही आवडला होता
जोधा-अकबर मलाही आवडला होता.अकबराची हळवी कवी बाजू दाखवणारा चित्रपट. दोघांची केमिस्ट्री मस्त.
उलट बाजिराव मधे मला फक्त रनवीर ची देहबोली आवडली, दिपिका शी केमिस्ट्री भावली नाही उलट प्रियांकाचे वाह अर्थाने त्याला डोळे दाखवणं खूप आवडून गेलं..
प्रा श्रद्धा कुंभोजकर ह्या
प्रा श्रद्धा कुंभोजकर ह्या "हिस्टोरीयन रिॲक्ट्स टू..." काही ऐतिहासिक चित्रपटांवर व्हिडिओज करतात. बाजीराव मस्तानी वाला भाग बघण्यासारखा आहे. जोधा अकबर वर पण एक भाग आहे, पण त्यात बराच भाग कौतुक करणारा आहे त्यामुळे अनेकांना बोर होईल.
नको नको त्या फायटर च्या आठवणी
नको नको त्या फायटर च्या आठवणी >>> +१. मी थोडासा पाहून सोडून दिला. इतका सेट पॅटर्न वाटला सुरूवातीपासून. ट्रिगर घटना - एक फायटिंग - गाणं - अजून एक ट्रिगर - फायटिंग - गाणं याच लूप मधे चालतो तो पिक्चर. मग बास वाटलं.
तुंबाड रीरिलीज होतोय थेट्रात.
तुंबाड रीरिलीज होतोय थेट्रात. ट्रेलर नव्याने आलाय पुन्हा.
नव्या ट्रेलर मध्ये त्यांनी
नव्या ट्रेलर मध्ये त्यांनी सगळे म्हणजे सगळे मोमेंट उघड केलेत.कथेचा ट्विस्ट हा एक भाग असतो.त्याचं काही नाहीच.
अरे तुंबाड थिएटर मध्ये आला
अरे तुंबाड थिएटर मध्ये आला इथे तर नक्की जाणार. खूप दिवसांनी खरोखर घाबरणारा मूव्ही होता. तुंबाड -२ पण येतोय ना?
बाकी 'बाजीराव मस्तानी' मला पण 'जोधा अकबर' पेक्षा १०० पट आवडलेला.
गोवारीकरचा ही न आवडण्यात मोठा हात होता.
Not all the gold that is
Not all the gold that is beneath the moon,
Or even hath been, or there toil-worn souls,
Might purchase rest for one.
--------------तुंबाड
तुंबाड रीरिलीज होतोय थेट्रात
तुंबाड रीरिलीज होतोय थेट्रात
>>
काढलं तिकीट...
त्यावेळी पाहिलं की बॉम्बे टू गोवा अन् वीर झारा पण येताहेत सेम दिवशी...
Pages