Submitted by mrunali.samad on 5 July, 2024 - 10:53
चित्रपट कसा वाटला- ९ धागा २००० पार...
नवे,जुने,देशी,परदेशी सिनेमे कसे वाटले लिहिण्यासाठी नवा धागा तयार...
चित्रपट कसा वाटला - ९
https://www.maayboli.com/node/84513
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
आधीच्या पोस्ट्स मध्ये कुणी या
आधीच्या पोस्ट्स मध्ये कुणी या चित्रपटाबद्दल लिहिले असल्यास (प्राईमवर दादांचे चित्रपट अलीकडेच आले आहेत असे माबोवरच वाचले) त्यावर प्रतिक्रिया न देता आणि तसेच सध्या इतर काय चर्चा सुरू आहे यावर प्रतिकिया न देता.
झ्विगॅटो - कपिल शर्मा आणि
झ्विगॅटो - कपिल शर्मा आणि शहाणा गोस्वामी यांचा सुंदर अभिनय, अस्सल वाटेल असं घर, कपडे, संवाद... सगळंच खूप विचार करून केलं आहे. त्याचा स्ट्रगल - सत्य परिस्थिती दाखवली आहे. जाता जाता अनेक छोट्या मुद्द्यांना स्पर्शून जातो. तिची मसाज ची कामं, त्यातले अनुभव, कामाला येणाऱ्यांना वेगळीच सर्व्हिस लिफ्ट वापरायला लागणे, एका तरुण मुलीची तिच्यावर (अंगाचा वास, प्रोफेशनल नसणे वगैरे) प्रतिक्रिया आणि नकार इत्यादी. भुवनेश्वर बघायला मिळालं हे विशेष! सहसा ओरिसा कधी बघायला मिळत नाही. तिथल्या गोष्टी फार चर्चेत आणि पिक्चरमध्ये नसतात.
पण इतकं सगळं असून चित्रपटाला काही कथाच नाही. या गोष्टीला नावच नाही च्या बरोबर उलट -- या नावाला गोष्टच नाही. त्यामुळे एका पॉइंट नंतर कंटाळा येतो. यांची परिस्थिती कायम बिघडतच असते (ज्यांनी शिरीष कणेकर ऐकले आहेत त्यांना आठवेल). पुढे काहीच होत नाही. शेवट बरा आहे.
त्यामुळे नाही बघितला तरी चालेल. ज्यांना वरच्या पहिल्या परिच्छेदातल्या गोष्टींत रस आहे त्यांच्यासाठी बघणेबल.
हल्ली गोष्ट आणि ग्राफ आणि
हल्ली गोष्ट आणि ग्राफ आणि आर्क नसलेले सिनेमे/ वेबसिरीज काढायची फॅशन आहे का?
हल्लीच तिहार जेल मधली सिरिज बघितली. जेल मध्ये कॅमेरेलावून काही वर्षांचे/ केसेसचे डॉक्युमेंटेशन याशिवाय काही मुद्दाच नाही. उगा जाता जाता वरवर एकमेकांतील हेवेदावे असं रँडम स्किनडिप खरवड आहे. पण हे का बघतोय, का? काही झेपतच नाही.
चांगला कॅमेरा, अभिनय, कपडेपट सगळं आहे. पण कथाच रानोमाळ आहे आणि एक काही मूळ आलेख हवा असा काही नाहीच आहे.
या नावाला गोष्टच नाही
या नावाला गोष्टच नाही
यांची परिस्थिती कायम बिघडतच असते
>>>
मला एकदम 'औरोंमें कहाँ दम था' बद्दलची चर्चा आठवली
हल्ली गोष्ट आणि ग्राफ आणि आर्क नसलेले सिनेमे/ वेबसिरीज काढायची फॅशन आहे का? >>> हो
हर्पा, मला आवडला होता
हर्पा, मला आवडला होता झ्विगाटो. मी लिहिले होते येथे. त्यांच्या रोजच्या आयुष्यातील धकाधक हीच सिनेमाची गोष्ट, जी काही प्रेक्षकांना कदाचित कधीही कळली नसती. नंदिता दासचे डिरेक्शन, सिनेमाची मांडणी वगैरे मला आवडले होते.
A death in the Gung (prime )
A death in the Gung (prime )
विक्रांत मासी, गुलशन देवैय्या, तिलोत्तमा शोम, रणवीर शौरी, ओम पुरी, तनुजा, कल्की कोचलीन
दिग्दर्शिका - कोंकणा सेन - शर्मा
विक्रांत मासीने सुंदर काम केले आहे. अभ्यासात हुशार असणारा मुलगा वडील गेल्यापासून नैराश्यात जातो व ते कुणालाच लक्षात न येण्याने कशी वाताहत होत जाते हे त्याने चांगले दाखवले आहे. सर्वच कलाकार कसलेले आहेत. चित्रपटाची कथा १९७९ ची आहे, त्यामुळे नैराश्याबद्दल सजगता नसावीच. सगळे सुट्टीसाठी हिल स्टेशनला जातात व काय काय घडत जाते हे थोडे त्याच्या व थोडे इतरांच्या दृष्टिकोनाने दाखवले आहे. चित्रपटाला कथा फारशी नाही, एक उदासवाणी छटा आहे. चित्रिकरण उत्तम, प्रकाशयोजना सुंदर. पण चित्रपट डिप्रेसिंग आहे, फार काही हाती लागत नाही.
चित्रपटाला कथा फारशी नाही, एक
चित्रपटाला कथा फारशी नाही, एक उदासवाणी छटा आहे.
चित्रपट डिप्रेसिंग आहे, फार काही हाती लागत नाही.
>>
हो - हा पाहिल्याचं आठवतंय.
हो - हा पाहिल्याचं आठवतंय. आज्जीलाच एक काय ती काळजी वाटत असते ना?
कामं मस्त होती सगळ्यांची.
सॉरी, मी शर्मिला टागोर म्हटलं, पण तू तनुजा लिहिलंयस.
गुलशन देवैया होता यात? हायला! अजिबातच आठवत नाही - तेव्हा नोटिस नव्हता झाला बहुधा. 'दहाड'मुळे ओळखायला लागले त्याला.
स्वाती, दहाड मधे विजय वर्मा
स्वाती, 'दहाड' मधे विजय वर्मा होता. गुलशन देवैय्या 'मेट्रो'त होता बघ. शर्मिला नव्हे तनुजाच. यात गुलशन देवैय्या सकट सर्वांची कामं भारी आहेत. वरवर सगळे नॉर्मल पण त्याखाली एक डार्क वाईब येतात. पण हा चित्रपट विक्रांतचाच आहे. बरीचशी पार्श्वभूमी आणि मूळ कथा बंगाली आहे. बहुतेक कोंकणाच्या बाबांची आहे.
अगं गुलशन देवैया होता ना
अगं गुलशन देवैया होता ना इन्स्पेक्टर! सोनाक्षीचा बॉस.
अरे हां, आज आपलं दोघींचंही
अरे हां, आज आपलं दोघींचंही थोडं थोडं चुकतंय. होता, होता. मला लेटेस्ट बघितलेला मेट्रो आधी आठवला. 'दहाड' म्हटलं की वि व.
तनुजा बहुतेक मावशी होती, कारण गुलशन त्याची ओळख कझिन अशी करून देतो. रणवीर शौरी बुलींग करतो. नात्यातील लोक त्याला छोटी छोटी कामं सांगत राहतात, रागवत असतात. कल्की त्याचा सेक्शुअली- वापर करून घेते. कुणालाच त्याच्याबद्दल माया नसते. दबून वावरणं चांगलं दाखवलंय त्यानं.
>>> पण हा चित्रपट विक्रांतचाच
>>> पण हा चित्रपट विक्रांतचाच आहे
हो. मी रणवीर शौरीचं काम बघूनही इम्प्रेस झाल्याचं आठवतंय - काही कलाकार कसे त्या रोलमध्ये ट्रान्सफॉर्म होतात! लुक्सच नव्हे, मॅनरिझम्स, बॉडी लॅन्ग्वेजही बदलून जाते! त्याला सहसा 'मीक' कॅरेक्टर्सच करताना पाहिल्यामुळे ते एकदम जाणवलं होतं.
रणवीर शौरी उत्तम काम करतो.
रणवीर शौरी उत्तम काम करतो. 'आजा नचले' मधे त्याची छोटीशीच भूमिका मला फार आवडली होती. अपयशी प्रियकर पण अजूनही कुठेतरी फिलिंग्ज आहेत व सपोर्ट करण्याची इच्छा आहे. आणि ती- माधुरी मनस्वी कलाकार त्यामुळे तिच्या 'ऑरा' खाली राहण्याचे दडपणही आहे.
आज ऐश्वर्या चा उमराव जान
आज ऐश्वर्या चा उमराव जान पाहीला. खूप आवडला. खूप नाट्यमय आहे. प्रतिक्षण काहीतरी होतं. (प्राइ म)
पण सारखी माधुरी आठवत राहीली. माधुरीने जास्त छान काम केलं असतं - हेमावैम
अ ति रडी भूमिका आहे मात्र. शेवटी त्या नालायक दिलवरला भिकारी दाखवलय ते आवडले.
Look into My Eyes (एच बी ओ)
Look into My Eyes (एच बी ओ)
मला आवडणार्या सिनेमांपैकी एक. स्लो-मेडिटेटिव्ह.
न्यु यॉर्कमधील सायकिक्स, त्यांचे क्लायंट यांचे कँडिड संवाद. कोणाला काय दु:ख असतं तर कोणाला काय. प्रत्येकाचे आपले भावविश्व असते.
A group of New York City psychics conducts deeply intimate readings for their clients, revealing a kaleidoscope of loneliness, connection and healing.
गंमत म्हणजे या सायकिक लोकांनासुद्धा माहीत नाही की ते जे बोलतायत ते खरच आहे की त्यांचे प्रोजेक्शन आहे ते.
रणवीर शौरी उत्तम काम करतो.
रणवीर शौरी उत्तम काम करतो.
>>
गेल्या वर्षी त्याला स्टेज वर रजत कपूर नी डिरेक्ट केलेल्या What's Done Is Done मधे Macbeth चा रोल करताना बघितलं होतं. फारच मस्त काम केलं. विनय पाठक सूत्रधार होता. जिम स्राभ दुसरा सूत्रधार अन् कल्की केक्ला Lady Macbeth असणं expected होतं, पण हेल्थ इश्यू मुळे नव्हते.
शो नंतर तिघांना ही भेटलो होतो...
नंतर विनय पाठक चं एकपात्री Nothing Like Lear pan पाहिलं होतं
ते ही जबरी आहे...
भारीच, अँकी!
भारीच, अँकी!
सहीच!
सहीच!
अरे वाह मस्त..
अरे वाह मस्त..
मस्तच ॲन्की. ते तिघेही मस्त
मस्तच ॲन्की. ते तिघेही मस्त आहेत. जिम सर्भ या सिनेमातही होता.
प्राईमवर ब्ल्यु व्हॅलेंटाईन
प्राईमवर ब्ल्यु व्हॅलेंटाईन बघितला. रायन गोसलिंग आवडतो म्हणून त्याच्यासाठी. पण ठीकठीक वाटला. या सिनेमाला ऑस्कर नॉमिनेशन का मिळालंय कळलं नाही.
रायनचं काम आवडलं. तो एकदम मस्त मौला टाईप्स असतो सुरवातीपासूनच, कधी मुव्हर्स पॅकर्सचं काम करतो, कधी घरं रंगवायची कामं घेत असतो फारसा काही आयुष्यात फोकस, अँबिशन नसलेला, हायस्कुल ड्रॉपाअऊट चाईल्डीश पण बायको मुलीला जीव लावणारा.
त्याचे तरी गोल सुरूवातीपासून क्लिअर असतात की मी लग्न करणार नव्हतो, मुलंही नको होती पण ती एका परिस्थितीत सापडली असताना तिला सपोर्ट करतो केवळ प्रेमापोटी आणि बायोलॉजिकल बाप नसतानाही तिच्या होणार्या बाळाला अॅक्सेप्ट करतो.
त्याच्या बायकोला त्याचं हे असं बेदरकार वागणं लग्नानंतर खूप इरिटेट होत राहतं त्यातून कायम कोल्ड वॉर, धुसफुस चालू असते. त्याचं तिच्यावर प्रेम असतं आणि तो सगळं नीट करायला जुळवायला बघत असतो पण दर वेळी काही तरी बिनसत जातं आणि शेवट ओपन एंडेड !!
वि़ंटरेस्टिंग वाटतोय. बघतो.
वि़ंटरेस्टिंग वाटतोय. बघतो.
अँकी नं १?, अभिनंदन तुमचं.
अँकी नं १?, अभिनंदन तुमचं.
मॅक्बेथ, कलाकारांना भेटलात. ग्रेटच.
रणवीर शौरी उत्तम काम करतो.
रणवीर शौरी उत्तम काम करतो.
>> त्याचा अभिनय कधीच साचेबद्ध (ठोकळेबाज) वाटत नाही. चॅनेल व्ही वर असल्यापासून ते दोघे आवडतात.
यूट्यूबवर आल्फ्रेड हिचकॉकचा
यूट्यूबवर आल्फ्रेड हिचकॉकचा The lady vanishes हा चित्रपट बघितला! एकदम भारी आहे. खास हिचकॉक. मायकेल रेडग्रेव्ह आणि मार्गारेट लॉकवूड हे मुख्य कलाकार आहेत.
यूट्यूबवर आल्फ्रेड हिचकॉकचा
यूट्यूबवर आल्फ्रेड हिचकॉकचा The lady vanishes हा चित्रपट बघितला! एकदम भारी आहे. खास हिचकॉक. मायकेल रेडग्रेव्ह आणि मार्गारेट लॉकवूड हे मुख्य कलाकार आहेत.
The lady vanishes हा चित्रपट
The lady vanishes हा चित्रपट बघितला! एकदम भारी आहे >>> +१
अस्मिताच्या एका कमेंटमुळे
अस्मिताच्या एका कमेंटमुळे 'आजा नच ले' सिनेमा परत आणि मनापासून पाहीला. फार आवडला. मला ते 'मोहनचे' इमोशनल व एकतर्फी प्रेम करणारे, भावुक पात्र फार आवडले.
रणवीर शौरी उत्तम काम करतो. >>
रणवीर शौरी उत्तम काम करतो. >>> याचा 'मिथ्या' पाहिला आहे का? नसला तर जरूर पहा.
मधे रणवीर शौरी आणि विनय पाठक
मधे रणवीर शौरी आणि विनय पाठक अनेक पिक्चर्स मधे एकत्र काम करत. त्यातले खोसला का घोसला आणि भेजा फ्राय हे दोन्ही फार मस्त आहेत. त्यातले दोघांचे रोल्स वेगळे आहेत पण दोन्ही छान आहेत. भेजा फ्राय मधले दोघांचे क्रिकेट व पाक बद्दलचे बॅण्टर धमाल आहे.
Pages