Submitted by mrunali.samad on 5 July, 2024 - 10:53
चित्रपट कसा वाटला- ९ धागा २००० पार...
नवे,जुने,देशी,परदेशी सिनेमे कसे वाटले लिहिण्यासाठी नवा धागा तयार...
चित्रपट कसा वाटला - ९
https://www.maayboli.com/node/84513
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
हे तुझे फेवरेट आहे का ? डायनो
हे तुझे फेवरेट आहे का ? डायनो म्हणू नका, भुतं म्हणू नका.
<<<<< अतिशय! दूल्हे राजा मधला गोविंदा, कादर खान आणि जॉनी लिव्हर हे एक महाप्रचंड जमून आलेले कॉम्बो आहे.
हो, भुभू बाळाच्या गमतीजमतीच
हो, भुभू बाळाच्या गमतीजमतीच आहे हे. भुभू बाळ= कार्तिक आर्यन भुलभूलैय्यातले बिनडोक बाळ.
श्रद्धा, संदर्भ आता लक्षात आला. दुल्हेराजा बघितला आहे पण हे आठवले नव्हते.
भुभू बाळ= कार्तिक आर्यन >> ??
भुभू बाळ= कार्तिक आर्यन >> ??!!! ई ई नाही नाही! भुभू बाळांचा अपमान का म्हणून!
भुभू बाळांचा अपमान का म्हणून!
भुभू बाळांचा अपमान का म्हणून! >>>
पनपवायला >>> आख्खी पोस्ट कहर आहे अस्मिता!
टाईमपास म्हणून सिंघम अगेन
टाईमपास म्हणून सिंघम अगेन बघायला घेतला प्राइम वर आणि चक्क पूर्ण बघितला माझ्यापेक्षा घरच्यांना जास्त आवडला भुलभुलैया 3 पेक्षा हा थेटर ला बघायला हवा होतास असं त्यांचं मत.तद्दन मास मसाला पट. रामायण शी रिलेट करून कथा बांधलिय त्याने कौटूंबिक टॅग देखील लागू शकतो. मी प्रोमो पाहिलेला त्यामुळे सगळ्यांच्या धमाकेदार एन्टऱ्या परत बघितल्या .करीना सुरुवातीला जब वी मेट मोड मधून बाहेर पडली नाही असच वाटत पण पुढे ओव्हरकटिंग टाळलेय. रामायण सगळ्यांना माहितेय त्यामुळे इथे कोण काय आहे आणि कसं दाखवतायत हे बघायची उत्सुकता होती एकट्या टायगर श्रॉफ ने सिरियसली चांगले काम केलंय .दगड्या अर्जुन चा रावण फक्त शोभत नव्हता त्या जागी कोणीतरी टेरर वाटणारा ऍक्टर घ्यायला हवा होता एवढे हिरोज त्याला मारण्यासाठी खटपट करतायेत हे पटत नाही .रामायण खरंच झालं होतं का फिक्शन यात मी पडत नाही पण कुठे रामायण घडल्याचे दाखले देणारे नेपाळ,श्रीलंका या ठिकाणचे सीन बेमालूम पने घातलेत . त्यामुळे स्टोरीला उठाव येतो. बाकी रणवीर सिंग साक्षात हनुमानाच्या रोल मध्ये असल्याने माकडचाळे करतोय असही म्हणता येत नाहीये शेवटी अक्षय चा थोडा पांचाटपणा असलेला डायलॉग वाला भाग आहे पण रोहित शेट्टी चित्रपट असेच असतात पण स्टंट चांगले आहेत . फक्त एकच गोष्ट खटकली छातीवर गोळी लागलेली करीना दुसऱ्याच सीन ला साधं खरचटलं असल्यापेक्षाही ठणठणीत दाखवलीय अर्जुन तिला बोलतोही खूप स्ट्रॉंग आहेस म्हणून . सिंघम ,सिम्बा, सूर्यवंशी कोलॅबरेशन छान जमवून आणलयं पुढच्या भागात दबंग चा चुलबुल पांडे म्हणजेच सलमान ऍड होणार असल्याचं सूतोवाच असल्याने माझ्यासाठी सिंघम सिरीज शेवट हाच आहे .
ये कौनसा हमारी तरफ है?
ये कौनसा हमारी तरफ है?
फेस उनकी तरफ है, पैर आपही की तरफ है.
हे तुझे फेवरेट आहे का ? <<
हे मूळ जाॅनी लिव्हर, कादरखानचं आहे. तो चित्रपटही धमाल होता.
गोविंदा, कादर खान आणि जॉनी
गोविंदा, कादर खान आणि जॉनी लिव्हर हे एक महाप्रचंड जमून आलेले कॉम्बो आहे.
>>
नंगा नहाएगा क्या और निचोड़ेगा क्या
डायनो म्हणू नका, भुतं म्हणू
डायनो म्हणू नका, भुतं म्हणू नका. >>>
फेस उनकी तरफ है, पैर आपही की तरफ है... >>> हे मीम्स मधे बघितले आहे. हे दुल्हे राजातले आहे का? मी तो पिक्चर पाहिला आहे पण हा सीन्/संवाद अजिबात आठवत नाही. पुन्हा बघायला पाहिजे.
नंगा नहाएगा क्या और निचोड़ेगा
नंगा नहाएगा क्या और निचोड़ेगा क्या >> यावरून माझ्या चुकीच्या ऐकू आलेल्या यूही चला चल राही गाण्यात कैलाश खेरच्या तोंडी आणि मकरंद देशपांडेच्या चेहरी आलेल्या कडव्याच्या ओळीत असलेलं "जैसे बरसो में कोई नंगा नहाए" हे आठवलं.
हपा
हपा
गुरुकुलात प्यार 'पनपवायला' हातभार लावायचे >>> यातल्या पनपवायला चे संत्रे सोलायला वेळ लागला.
जैसे बरसो में कोई नंगा नहाए"
जैसे बरसो में कोई नंगा नहाए" हे आठवलं. -
"जैसे बरसो में कोई नंगा नहाए"
"जैसे बरसो में कोई नंगा नहाए" हे आठवलं.
<<<<<<
मोहन भार्गवच्या caravan मधली सुसज्ज बाथरूम पाहून त्याला कित्येक वर्षांनी अंघोळ करायची इच्छा होणे अगदीच अशक्य नाही.
"जैसे बरसो में कोई नंगा नहाए"
"जैसे बरसो में कोई नंगा नहाए" हे आठवलं.
>>>
मेलारामला कॅरावॅन मधे जास्त इंटरेस्ट होता, मकरंद देशपांडेला वाटला नाही कधी. तो मोहन भार्गवने दिलेल्या पाण्याच्या बाटलीकडे सुद्धा 'मी याचे काय करू' असे बघतो.
श्रद्धा
श्रद्धा
अस्मिता, अचूक निरीक्षण.
मकरंद देशपांडेला वाटला नाही
मकरंद देशपांडेला वाटला नाही कधी. तो मोहन भार्गवने दिलेल्या पाण्याच्या बाटलीकडे सुद्धा 'मी याचे काय करू' असे बघतो
>>
अन् फायर डोअर मधून टपावर जाऊन बसतो
हे दुल्हे राजातले आहे का? मी
हे दुल्हे राजातले आहे का? मी तो पिक्चर पाहिला आहे पण हा सीन्/संवाद अजिबात आठवत नाही.
>>> सेम!
भरत
पायल कपाडिया पोस्ट शेअर
पायल कपाडिया पोस्ट शेअर केल्याबद्दल थ्यांकू. नक्की बघणार.
सध्या फक्त हॉटस्टारचे पैसे भरलेत (क्रिकेटसाठी), पण तिथले सिनेमे कोणकोणते आहेत वगैरे मी काही मुद्दाम जाऊन पाहिलं नसतं.
हे दुल्हे राजातले आहे का? मी
हे दुल्हे राजातले आहे का? मी तो पिक्चर पाहिला आहे पण हा सीन्/संवाद अजिबात आठवत नाही.
>>
हा संवाद बरेचदा येतो सिनेमात
काल विकी विद्या का वोह वाला
काल विकी विद्या का वोह वाला व्हिडिओ पाहिला. पण आपल्याला दाखवलाच नाही.
तृप्ती दिमरी असून दाखवला नाही हे विशेष. तिने ॲनिमल मध्ये बेड सीन देऊन आपली इमेज वेगळीच करून ठेवली आहे. भूलभुलैया आणि यात दोन्ही चित्रपटात एक्सपोज न करताही छान दिसते आणि सुसह्य अभिनय करते.
पिक्चरची सुरुवात छान झाली. RR ने SRK सारखी एन्ट्री मारली. पुढे चटपटीत संवादात तीच एनर्जी तोच उत्साह दाखवला. कपिल शर्मा शो मध्ये तो म्हणाला होता की शाहरूख त्याचा आदर्श आहे ते पटते. पण नंतर मात्र चित्रपट एका लेव्हल पुढे गेला नाही. शेवट तर अगदीच सपक केला. पण ठिक आहे. अगदीच टाकाऊ नाही.
मालिका शेरावतला मी बरेच दिवसांनी पाहिली. तिच्या काळात हा पिक्चर असता तर ती मेन लीड असती आणि ओपोजिट इमरान हाशमी असता आणि कदाचित व्हिडिओ दाखवला असता.
असो, यात तनू मनू मधील कंगनासारखा रोल होता तिचा. ठिकठाक वाटला.
विजय राज नेहमीच्या शैलीत येतो पण कव्वा बिर्याणीची उंची गाठत नाही.
शेवटी सामाजिक संदेश दाखवायच्या भानगडीत न पडता काहीतरी वेगवान ट्विस्ट टर्न फार्सिकल शेवट करायला हवा होता.
एकंदरीत मुले काल लवकर झोपली म्हणून बघायला घेतला पण त्यांच्यापासून लपवावे असे विशेष काही नव्हते.
“ भूलभुलैया आणि यात दोन्ही
“ भूलभुलैया आणि यात दोन्ही चित्रपटात एक्सपोज न करताही” - भूलभुलैय्या ची पायरेटेड कॉपी बघितलीस का?
भूल भुलैया मध्ये केले आहे?
भूल भुलैया मध्ये केले आहे?
मी फास्ट फोर्वरड केलेल्या गाण्यात होते की मी घाबरून डोळे बंद केले तेव्हाच हे झाले?
प्लीज सांगा मी पुन्हा बघेन, आमच्याकडे Netflix subscription आयुष्यभराचे आहे.
भूल भुलैया मध्ये केले आहे?>>>
भूल भुलैया मध्ये केले आहे?>>> मला पण दिसलं नाही. ओरिजनल कॉपी कुठे मिळेल? तरी मी हा भयाण पिक्चर केवळ तिच्यासाठी पाहिला.
डिस्क्लेमर : मी अॅनिमल
डिस्क्लेमर : मी अॅनिमल बघितलेला नाही त्यामुळे फ्रेम ऑफ रेफरन्स नाहीये (आणि भूभु अगदीच पुढच्या रांगेतून पाहिलाय)
फेरफटका तुम्ही शाळेत सुद्धा
फेरफटका तुम्ही शाळेत सुद्धा पहिल्याच बेंचवर बसत असावात, त्यामुळे याबाबतीत तुमचा बेंचमार्क वेगळा असावा
पुढच्या रांगेत बसणाऱ्यांना
पुढच्या रांगेत बसणाऱ्यांना स्पेशल क्ष-किरण चष्मे वगैरे देतात की काय? आणि मी समजत होतो सगळया रांगांना एकच पिक्चर दाखवतात. छ्या: आता पुन्हा थेटरात जाऊन पहायला हवा
परवा दृश्यम २ परत बघितला.
परवा दृश्यम २ परत बघितला. चित्रपट छानच आहे पण कुटुंबाला वाचवण्यासाठी तो ज्या थराला जाउन आटापिटा करतो ते अचाट वाटतं. मुळात त्या मुलाच्या हत्येचा संशय कुटुंबावर असतोच त्यामुळे इतकी वर्षं ते कमालीच्या तणावाखाली जगत असतात. केवळ पुरावा नाही म्हणून त्यांना अटक झाली नसते. पण ती मोठी मुलगीही प्रचंड मानसि़क ताणाखाली असते. त्यापेक्षा सरळ सुरवातीलाच मुलाचा मृत्यु झाल्यावर ते कन्फेस करून मोकळे झाले असते तर मुलाच्या video blackmailingमुळे उलट त्यांनाच सहानुभुती मिळाली असती आणि अनवधानाने किंवा self defence साठी हे घडलं असं मानून त्यांना शिक्षेतून सूटही मिळाली असती. हे उलट जास्तीच तणावाचं आयुष्य त्यांनी विनाकारण ओढवून घेतलंय असं वाटतं.
self defence साठी हे घडलं असं
self defence साठी हे घडलं असं मानून त्यांना शिक्षेतून सूटही मिळाली असती.
>>>>
पटतंय हे पण एका मोठ्या पोलीस पदाधिकाऱ्यांचा मुलगा मारला तर याची खात्री नसणार त्यांना..
“त्यापेक्षा सरळ सुरवातीलाच
“त्यापेक्षा सरळ सुरवातीलाच मुलाचा मृत्यु झाल्यावर ते कन्फेस करून मोकळे झाले असते तर” - सिनेमाच झाला नसता
आता सिंघम बघतोय.
आता सिंघम बघतोय.
जेव्हा सिंघमचा ट्रेलर आला होता तेव्हा त्यावर एक मीम फिरत होते. रणवीर सिंग, अक्षय कुमार, टायगर श्रॉफ, लेडी सिंघम दीपिका असा सगळा फौजफाटा घेऊन अजय देवगन कोणाला मारायला गेला आहे तर अर्जुन कपूरला म्हणत त्याची खिल्ली उडविली होती..
पण अर्जुन कपूर बॉस.. काय भारी वाटला आहे यात. सगळ्यांना खाऊन टाकला आहे. अजय देवगनला भारी दाखवायला कॅमेरा क्लोजअप ठेवतात, बॅकग्राउंड म्युझिक मारतात, त्याला हीमॅन सारखा उभा करून मागून फ्लॅश लाईट सोडतात.. पण अर्जुन कपूर फक्त काळया रंगाची पठाणी घालून येतो आणि हातात कोयता घेत एकेकाला सपासप कापत सुटतो. खरोखर अक्राळ विक्राळ रावण वाटतो.
पण आता व्हीलन आहे आणि रामायणाची स्टोरी लाईन आहे, तर बिचाऱ्याला शेवटी मरावे लागेल. तो रणवीर सिंग तर त्यासमोर लंगूर वाटत होता तरी आता त्याची लंका जाळून येताना दाखवतील..
मी अॅनिमल बघितलेला नाही, पण
मी अॅनिमल बघितलेला नाही, पण भुभू मध्ये दिमरीला किती लो कट कपडे दिलेत. म्हणजे काहीही गरज नसताना फक्त अंग प्रदर्शनाला असे कपडे दिलेले आहेत. नाहीतर गावातली मुलगी असे कपडे घालून फिरणार नाही. शहरातली असली तरी गावात जाऊन नक्कीच असे कपडे घालणार नाही.
Pages