![](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/article_images/2024/10/05/Screenshot%20%2890%29.png)
भाग ३ :
https://www.maayboli.com/node/84791
* * * * * * * * * * * * *
तीन वर्षांपूर्वी चालू केलेला हा धागा आता चौथ्या भागात पदार्पण करतो आहे. त्यानिमित्त इथे चर्चेस नियमित येणाऱ्या सर्व माबो परिवाराचे मनापासून आभार !
विविध शब्दांची रोचक माहिती, व्युत्पत्ती आणि अर्थपूर्ण व मजेदार चर्चेमुळे शब्दांच्या विश्वातली ही सफर नक्कीच रंगतदार होते.
धागा संयोजनात एक सुसूत्रता असावी म्हणून पूर्वी केलेल्या काही सूचना पुन्हा एकदा :
१. हा मराठी भाषा विभागातील धागा असल्याने इथे फक्त मराठी शब्दच चर्चेला घ्यावेत. अर्थात अशा शब्दाच्या व्युत्पत्तीच्या चर्चेमध्ये आंतरभाषिकता येईलच; त्याचे स्वागत आहे.
( सर्व बिगर मराठी भाषांमधील शब्दचर्चेसाठी अन्य धागे उपलब्ध आहेत )
२. एखाद्या सभासदांनी नवा शब्द चर्चेस घेतल्यानंतर पुढील २० तास त्या शब्दासाठी राखून ठेवूयात. त्या दरम्यान पुढचा शब्द घेऊ नये. ही मुदत संपल्यानंतर त्यावर कोणतीही चर्चा झाली नसेल तरी नवा शब्द जरूर घ्यावा.
सहकार्याबद्दल धन्यवाद आणि चौथ्या भागात सहर्ष स्वागत . . .
तर्जनं यमदूतानां रामरामेति
तर्जनं यमदूतानां रामरामेति गर्जनम्
कल्पना नाही.
आर्ष /वि. >>>> कसे ठरवावे?
अधिक कल्पना नाही.
बघूया आपल्यातील कोणाला माहिती आहे का ते.
विदग्ध खब्द कृष्णाष्टकात
विदग्ध शब्द कृष्णाष्टकात ऐकलाय, म्हणजे लिटरली ऐकलाच आहे. पं. जसराजांनी “श्री कृष्ण अनुराग” म्हणून एक प्रोजेक्ट केलाय HMV साठी त्यात येतो विदग्ध :
विदग्धगोपिकामनोमनोज्ञतल्पशायिनं
नमामि कुंजकानने प्रव्रद्धवन्हिपायिनम् ।
काव्य आदि शंकराचार्यांचे (!) आहे बे एकं बे च्या चालीत गायले तरी गोडच वाटणार. इथे तर साक्षात संगीत मार्तंड जसराज आहेत !! जालावर असावे.
विदग्ध वाड्मय मात्र माहिती नव्हते.
आर्ष मला उत्कट सारखा वाटतोय.
आर्ष मला उत्कट सारखा वाटतोय. अर्थात गट फीलिंग. कदाचित कोणत्यातरी हिंदी कवितेतही वाचलेला असू शकतो मात्र माझ्या प्रायव्हेट ब्लॉगवरच्या हिंदी कविता चाळण्याकरता वेळ नाही. अभ्यास करायच आहे आज.
अनिंद्य विदग्ध म्हणजे शोकाकुल का मग? की विरहाने पोळलेल्या? कारण वरती विदग्ध म्हणजे अभिजात असे दिलेले आहे परंतु, अभिजात गोपिका असे नसेलच ना.
किती सुंदर नादमय लयबद्ध रचना
किती सुंदर नादमय लयबद्ध रचना आहेत ना त्यांच्या!
(इथे मनो'ज्ञ' (ज्ञा नव्हे) असावं असं वाटतंय - मीटरमध्ये नीट बसतंय तसं.)
'मनोज्ञ' च आहे, दुरुस्ती करतो
'मनोज्ञ' च आहे, दुरुस्ती करतो. सुचवणीबद्दल आभार.
इतक्या रसिक, हुशार आणि ज्ञानी तरी विनम्र लोकांसोबत इथे आपली उठबस आहे हे जाणवून मी फारच आनंदी होतो (उठबस जालीय का असेना)
आर्ष म्हणजे ऋषींशी संबंधित.
आर्ष म्हणजे ऋषींशी संबंधित.
पाणिनी ने अष्टाध्यायी लिहायच्या आधीच वेदांची रचना झाली होती. तरीही त्याने वेद आणि त्यावेळची संस्कृत भाषा ह्यांचा सखोल अभ्यास करून व्याकरण लिहिले. एव्हढे करूनही वेदात काही शब्दरूपे अशी आहेत कि जी व्याकरणाच्या नियमात बसत नाहीत. आता त्या महान ऋषींनी चूक केली असे आपण कसे म्हणायचे? म्हणून त्याला आर्ष असे गोंडस नाव दिले गेले.
हल्ली अर्थात आर्ष म्हणजे ऋषींनी रचना केलेले साहित्य असा केला जातो.
शाळेत जेव्हा आम्ही संस्कृतमध्ये चुका करत असू तेव्हा हे आर्ष रूप आहे असे सांगितल्यामुळे गुरुजींचे वाक्ताडन ऐकलेले आहे.
विदग्ध या शब्दाचे अनेक अर्थ आहेत.
होय केकू मी वरती जाउन वाचले
होय केकू मी वरती जाउन वाचले परत. गुगल केल्यास ऋषीनिर्मित हाच अर्थ आहे.
आर्ष हा शब्द आर्त सारखा वाटल्याने मला 'उत्कट' असा अर्थ वाटला होता, जो की चूकीचा आहे.
@ सामो,
@ सामो,
विदग्ध इथे शोकाकुल नसावे.
हे हिंदी भाषांतर :
चतुर गोपिकाओंके मनरूपी सुकोमल शय्यापर शयन करनेवाले तथा कुंजवनमें बढ़ती हुई दावाग्निको पान कर जानेवाले, किशोरावस्थाकी कान्तिसे सुशोभित अंजनयुक्त सुन्दर नेत्रोंवाले, गजेन्द्रको ग्राहसे मुक्त करनेवाले, श्रीजीके साथ विहार करनेवाले श्रीकृष्णचन्द्रको नमस्कार करता हूँ।
धन्यवाद.
धन्यवाद.
>>>>मनरूपी सुकोमल शय्यापर शयन करनेवाले
अहाहा!
बेशक मंदिर मस्जिद तोड़ो बुल्लेशाह ये कहता
पर प्यार भरा दिल कभी ना तोड़ो इस दिल में दिलबर रहता - (बॉबी)
ज्ञानवर्धक चर्चा धन्यवाद !
ज्ञानवर्धक चर्चा
धन्यवाद !
विदग्ध म्हणजे विरहात जळणारा
विदग्ध म्हणजे विरहात जळणारा/री ना?
मलाही माधव यांच्यासारखेच वाटत
मलाही माधव यांच्यासारखेच वाटत होते. वरची चर्चा अजून नीट वाचायची आहे.
विदग्ध वाड्मय
विदग्ध वाड्मय
ज्यावर पुन्हा पुन्हा, विशेष संस्कार केले आहेत असे.
शब्दश: अर्थ विशेष, नीट भाजलेले. पक्व.
ज्या वाड्मयावर कवीने संस्कार केले आहेत. त्यातील दोष काढून टाकले आहेत. उदा. छंद दोष, व्याकरण दोष काढून त्याला नियमांच्या चौकटीत बसवले आहे.
जाणकारांनी अधिक भर टाकावी.
हा अर्थ चपखल वाटतो आहे,
हा अर्थ चपखल वाटतो आहे, ऋतुराज. धन्यवाद!
केकू आणि ऋतुराज, छान
केकू आणि ऋतुराज, छान स्पष्टीकरण दिलं आहे.
ऋष चं संबंधी रूप करताना पहिल्या स्वराची वृद्धी होते. त्यात ऋ चा आर् होतो. जसा उ चा औ. पुरुष - पौरुष, तसं ऋष - आर्ष
छान चर्चा:
छान चर्चा:
केकू, ऋतुराज छान माहिती आणि शेवटी हपांचा षटकार.
ऋष चं संबंधी रूप करताना
ऋष चं संबंधी रूप करताना पहिल्या स्वराची वृद्धी होते.>>>>> दंडवत हर्पाणिनी _/\_
हपांचा षटकार !
हपांचा षटकार !
हर्पाणिनी !
सुंदर विमर्ष
सर्वांना जोरदार +११२२
सर्वांना जोरदार +११२२
धन्यवाद !
हर्पाणिनी >> इथे मला डोक्यावर
हर्पाणिनी >> इथे डोक्यावर हात मारणारी बाहुली हवी आहे
खरेच, अगदी सुंदर चर्चा.
खरेच, अगदी सुंदर चर्चा.
मलाही अनिंद्य यांच्या सारखे म्हणावेसे वाटते, की इतक्या व्यासंगी, जाणकार लोकांमधे (इन्क्लुडींग अनिंद्य!
) आपली उठबस आहे याचा फार आनंद वाटतो.
आपण वाचत असलेले साहित्य आर्ष आहे का विदग्ध...
असे मला वाटते!
स्वाती,
विदग्ध चा अर्थ जर अभिजात असा होत असेल , आणि आर्ष म्हणजे जर ऋषीं संबंधी अथवा ऋषींनी लिहीलेले......तर आपणच ठरवायचे ना काय वाचतो आहे त्यावर!!
सर
सर
नवीन विषय विचारार्थ घेऊ का?
घ्या की स्वागतच आहे
घ्या की![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
स्वागतच आहे
आज मी मिपा वर एक लेख वाचला.
आज मी मिपा वर एक लेख वाचला. "काही चुका, काही विसं..." त्यातून
"आता आपल्या व्यवहारात आपल्यातलेच अनेक लोक करत असलेल्या बारीक बारीक चुका.. अहल्या हा योग्य उच्चार असताना आपण सर्रास अहिल्या म्हणतो. अनसूया हा योग्य उच्चार पण आपण अनुसया म्हणतो. सीमान्तपूजनाचं आपण श्रीमंतपूजन करतो. प्रश्न असं लिहितो पण बोलताना प्रश्ण असं म्हणतो. पुराणातली वानगी पुराणात न म्हणता पुराणातली वांगी पुराणात म्हणतो. "
इतर शब्द सध्या सोडून देऊया. मी "पुराणातली वांगी पुराणात " वर लक्ष केंद्रित केले.
पुराण n A Pura'n or sacred and poetical work. पु?B सोडणें-लावणें To begin a long and tiresome story. पुराणांतली वांगी पुराणांत राहिलीं Said of one mighty in talk, slack in act.
वझे शब्दकोश
किंवा
......पुराणांतलीं वांगीं पुराणांत राहिलीं Said when a person does not observe his own prescriptions,--of one mighty in talk, slack and lagging in act.
मोल्सवर्थ शब्दकोश
हे दोघेही मान्यवर "वांगी" असेच लिहित आहेत.
आता ही वांगी = बृन्जाल भाजी का वानगी= उदाहरणार्थ , वानगी दाखल ह्यातली?
माझा गोंधळ झाला आहे.
*
*
“यातला मूळ शब्द ‘वानगी’ म्हणजे नमुना हा असावा, ज्याचा नंतर ‘वांगी’ हा अपभ्रंश झाला, असे काही भाषातज्ज्ञांचे मत आहे”.
https://www.loksatta.com/vishesh/scientific-research-in-indian-mythology...
https://www.loksatta.com/navneet/bhashasutra-words-expressions-wrong-bec...
भाषासूत्र हे सदर मराठीतील नामवंत प्राध्यापक/ संपादक अशा मंडळींनी तेव्हा चालवलेले होते
(https://www.maayboli.com/node/78349)
अरेरे. "भाषा : अपभ्रंश, बदल,
अरेरे. "भाषा : अपभ्रंश, बदल, मतांतरे इ." हा धागा मी कसा मिसला.
आभार सर.
तो प्रस्तुत मालिकेतील आद्य
तो प्रस्तुत मालिकेतील आद्य धागा आहे![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
भाग दोन पासून आपण त्याचे शब्दवेध व शब्दरंग असे नामांतर केले
ओके.
ओके.
पण असे दिसतंय कि "वांगी" (भाजी) हा शब्द ह्या म्हणीत पुरातन आहे. मला कुठे संदर्भ मिळाला तर इथेच लिहीन.
वर्णी लागणे हा वाक्प्रचार
वर्णी लागणे हा वाक्प्रचार ओळखीचा आहे परंतु
नाम म्हणून वर्णीचा अर्थ ब्रह्मचारी हा आहे.
दाते शब्दकोश
Pages