शब्दवेध व शब्दरंग (४)

Submitted by कुमार१ on 2 October, 2024 - 02:13

भाग ३ :
https://www.maayboli.com/node/84791
* * * * * * * * * * * * *

तीन वर्षांपूर्वी चालू केलेला हा धागा आता चौथ्या भागात पदार्पण करतो आहे. त्यानिमित्त इथे चर्चेस नियमित येणाऱ्या सर्व माबो परिवाराचे मनापासून आभार !

विविध शब्दांची रोचक माहिती, व्युत्पत्ती आणि अर्थपूर्ण व मजेदार चर्चेमुळे शब्दांच्या विश्वातली ही सफर नक्कीच रंगतदार होते.
धागा संयोजनात एक सुसूत्रता असावी म्हणून पूर्वी केलेल्या काही सूचना पुन्हा एकदा :

१. हा मराठी भाषा विभागातील धागा असल्याने इथे फक्त मराठी शब्दच चर्चेला घ्यावेत. अर्थात अशा शब्दाच्या व्युत्पत्तीच्या चर्चेमध्ये आंतरभाषिकता येईलच; त्याचे स्वागत आहे.
( सर्व बिगर मराठी भाषांमधील शब्दचर्चेसाठी अन्य धागे उपलब्ध आहेत )

२. एखाद्या सभासदांनी नवा शब्द चर्चेस घेतल्यानंतर पुढील २० तास त्या शब्दासाठी राखून ठेवूयात. त्या दरम्यान पुढचा शब्द घेऊ नये. ही मुदत संपल्यानंतर त्यावर कोणतीही चर्चा झाली नसेल तरी नवा शब्द जरूर घ्यावा.

सहकार्याबद्दल धन्यवाद आणि चौथ्या भागात सहर्ष स्वागत . . .
Happy

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

वरणी varaṇī f (वरण) Worship or service at a देवस्थान, or any अनुष्ठान or religious observance, that is conducted by several Bráhmans appointed to succeed in rotation. v दे, घे. 2 The period or term of each person so deputed or appointed. 3 Clothes worn by the bride on the wedding day. They are afterwards given, as his perquisite, to the उपाध्या or family priest.
मोल्सवर्थ शब्दकोश
2 The period or term of each person so deputed or appointed. हा अर्थ घेतला तर "वरणी लावणे(लागणे)" हे सहज जमून जाईल. मेरा नंबर लग गया!

* . हा अर्थ घेतला तर "वरणी लावणे >>> +११

" दरम्यान, रायगडच्या पालकमंत्री पदी तुमची वर्णी लागेल का? असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला. . .

https://www.loksatta.com/maharashtra/raigads-guardian-minister-post-rift...

आचार्य हेमचंद्र लिखीत "देशी नाम माला" वाचत असताना मला काही मराठी शब्दांची व्युत्पत्ति शोध लागला. पैकी एक रत्न "खोटे" म्हणजे असत्य. हा शब्द देशी भाषेतल्या "खोट्टी" वरून आला आहे. त्याचा खरा अर्थ आहे "दासी" असा आहे. ज्या महाभागाने (आचार्य हेमचंद्रजींनी नव्हे) पुस्तक लिहिले आहे त्याने स्पष्टीकरण दिले आहे कि असे नोकर चाकर अविश्वासू, लबाड आणि सर्रास खोटारडे बोलणारे असतात म्हणून
"खोट्टी" म्हणजे असत्य. खोट, खोटी, खोटा.
लेखक मराठी नाहीये हा.

खोट्टी" >> रोचक.
* * * * * *
नुकतीच ‘विदग्ध ‘ या शब्दावर अर्थपूर्ण दीर्घ चर्चा व्हावी आणि आज अचानक हा शब्द सध्याच्या लेखनातून वाचनात यावा हा एक योगायोग :

“. . . संस्कृत भाषेतील विदग्ध रसवृत्ती आणि शाहिरी काव्यातला थेटपणा यांचा संगम वसंत बापट यांच्या काव्यवृत्तीत होता”.

https://www.weeklysadhana.in/view_article/Usha-Mehata-Kolaj-Marathi-Book

>>>>>नुकतीच ‘विदग्ध ‘ या शब्दावर अर्थपूर्ण दीर्घ चर्चा व्हावी आणि आज अचानक हा शब्द सध्याच्या लेखनातून वाचनात यावा हा एक योगायोग :
केकूंचा एक लेख आहे सिंक्रोनिसिटीवरती. माझ्या निवडक १० मध्ये आहे.

भाषा विज्ञानावर विपुल ग्रंथलेखन करणाऱ्या प्रा. डॉ. द दि पुंडे यांना नुकताच साहित्यिक प्रतिष्ठानतर्फे जीवनगौरव पुरस्कार देण्यात आला. त्याप्रसंगीच्या त्यांच्या भाषणात त्यांनी सांगितलेली एक रोचक गोष्ट लिहितो :

" मराठी वाङ्मयाच्या संदर्भात सन 1855मध्ये कराचीमध्ये लिहिलेली एक पोथी सापडली आहे ; यावरून मराठीची जागतिक पाळेमुळे लक्षात येतात".

(छापील मटा : 20 जानेवारी)

देशीनाममाला मध्ये मिळालेले अजून काही शब्द.
पोट्टं (पोट), झूठ्ठं (झूट!!!), उडीद, गोफण,
अजून मिळताहेत का बघतो आहे.

… यावरून मराठीची जागतिक पाळेमुळे लक्षात येतात"…

1855 मधे कराची अविभक्त भारताचाच एक भाग असेल ना ? मुंबईला अगदी जवळ ? मग ते “जागतिक” कसे ?

बरोबर.
ते प्राध्यापक भाषणाच्या ओघात तसे म्हणून गेले असावेत, असा अंदाज.

कंपू हा शब्द इंग्रजी कॅम्प (camp) वरून आला आहे. आणि साबण हा शब्द अरबी साबून वरून आले आहेत. हे व असे काही शब्द शिव कालीन मराठीतील आहेत, म्हणजे तेव्हापासून मराठीत प्रचलीत झाले.

Marathi goes international.
इस्राएल ह्या राष्ट्राची निर्मिती झाल्यावर जगातून तेथे स्थानिक होण्यासाठी ज्यू धर्मियांचा ओघ सुरु झाला. आपल्या महाराष्ट्रातून मराठी बोलणारे बरेच ज्यू तेथे विसावले. भारतात ज्यू लोक जवळ जवळ २००० वर्षांपूर्वी आले. आणि रायगड, ठाणे जिल्ह्यात ,पनवेल जवळ स्थायिक झाले. त्यांनी काही मराठी संस्कार आणि मुख्यत्वे मराठी भाषा आपलीशी केली. आता त्यातले काही जण इस्राएल मध्ये गेले आहेत.
त्यांनी मराठी सोडली नाही.
ह्या समाजाची रोचक माहिती येथे वाचा.
https://timesofindia.indiatimes.com/city/pune/at-home-in-israel-with-the...
मजेची गोष्ट अशी कि त्यांनी तेथे "मायबोली" नावाचे नियतकालिक सुरु केले आहे!!

1855 मधे कराची अविभक्त भारताचाच एक भाग असेल ना ? मुंबईला अगदी जवळ ? मग ते “जागतिक” कसे ?>>> बरोबर...आमच्या सोसायटीतही एक कांबळी म्हणून होते मालवणचे त्यांच्या आजोबा-पणजोबांचे कराचीत घर होते, मुंबईत नव्हते.....फाळणीनंतर रहाते घरदार सोडून मुंबईत यावे लागले नंतर मुंबईत घर घेतले त्यांनी.

प्रा द दि पुंडे यांचं "भ यंकरसुं दरम राठी भाषा - भयंकर सुंदर मराठी भाषा" हे पुस्तक अतिशय आवडतं आहे.
यातील भयंकर आणि सुंदर ह्या परस्परविरोधी शब्दांचा संबंध बंगाली भाषेतील ‘भीषण भालो’ सारखा आहे असे कुठेतरी वाचल्याचे स्मरते.

* बेने इसराएली समाज
>>> +१
यांच्याबद्दल पूर्वी अन्यत्र देखील काही लेख वाचले आहेत.
तिथल्या मोजेस बोरगावकर यांच्यासंबंधी मी कुठल्यातरी धाग्यावर पूर्वी लिहिलंय.

अशीच काहीशी कथा कोकणातून फसवून बोटीवरून मॉरिशसला नेलेल्या लोकांची आहे. त्यांनी देखील तिथे मराठीचे चांगले जतन केलेले आहे.

ई सकाळच्या मुक्तपीठ सदराखाली ज्या प्रतिक्रिया येत त्यात यार्देना सासोनकर इस्राईल अश्या नावाच्या आयडीच्या नियमित येत. ज्यांनी मुक्तपीठचा सुवर्णकाळ बघितला आहे त्यांना कदाचित आठवेल.

चोखाळला / चोखाळणे

त्यानी अमुक मार्ग “चोखाळला” असे आपण वाचतो. यात “चोखाळ” म्हणजे निवडणे / selection असावे असे वाटत असे. खात्री नव्हती. आज उलगडा झाला :

चोखाळ = चिकित्सा करून जेवणारा; खाण्याच्या बाबतींत सूक्ष्म आवडीनिवडी असणारा. खाण्यापिण्याच्या बाबतीत चोखंदळ

यालाच एक रांगडा पर्यायवाची शब्द दिलाय : जीभशिंदळ Lol

पूर्वी जांगडगुत्ता या शब्दावर इथे ( https://www.maayboli.com/node/78349?page=23) ओझरती चर्चा झाली होती. अलीकडे ‘पाणीपुरी’ या चित्रपटातील खालील संवादात हा शब्द ऐकण्यात आला :

“आम्ही जे घटस्फोटासाठी अर्ज दाखल केले आहेत त्याचा अजून जांगडगुत्ता काही झालेला नाही”.

लागेबांधे या शब्दातील लाग चा अर्थ पायवाट आहे असे कळले.
म्हणजे दोन व्यक्तींमधील लाग- वाट- अंतर मिटून जे स्नेहाचे बंध तयार होतात ते लागेबांधे!
खरंय का हे?

लाग म्हणजे वाट हा अर्थ नवीन आहे माझ्यासाठी.
मला वाटायचं लागे म्हणजे नातेवाईक आणि बांधे म्हणजे त्याव्यतिरिक्त जोडलेले बंध.

पण एखादं प्रकरण 'लागी लागलं' असा एक शब्दप्रयोग ऐकला आहे. 'मार्गी लागलं' अशा अर्थी - त्यामुळे वाट बरोबर असावं.

चोखाळ, मस्त आहे.
लागी - 'भेटी लागी जीवा लागलेसी आस.' यातही वाट बघणे हाच अर्थ असावा.
भेटीलागीं जीवा लागलीसे आस ।
पाहे रात्रीं दिवस वाट तुझी ॥१॥

शोधून आले. मेक्स सेन्स.

जांगडगुत्ताही मस्त आहे.

>>> भेटी लागी जीवा लागलेसी आस.' यातही वाट बघणे हाच अर्थ असावा
नाही, ते भेटी'साठी' या अर्थी आहे.

धन्यवाद, भरत.

इथे लाग या शब्दाचे कितीतरी अर्थ दिले आहेत! एवढे अर्थ असतील असे वाटले नव्हते.

त्यात एक अर्थ संबंध आणि लागाबांधा असाही दिला आहे.

Pages