शब्दवेध व शब्दरंग (४)

Submitted by कुमार१ on 2 October, 2024 - 02:13

भाग ३ :
https://www.maayboli.com/node/84791
* * * * * * * * * * * * *

तीन वर्षांपूर्वी चालू केलेला हा धागा आता चौथ्या भागात पदार्पण करतो आहे. त्यानिमित्त इथे चर्चेस नियमित येणाऱ्या सर्व माबो परिवाराचे मनापासून आभार !

विविध शब्दांची रोचक माहिती, व्युत्पत्ती आणि अर्थपूर्ण व मजेदार चर्चेमुळे शब्दांच्या विश्वातली ही सफर नक्कीच रंगतदार होते.
धागा संयोजनात एक सुसूत्रता असावी म्हणून पूर्वी केलेल्या काही सूचना पुन्हा एकदा :

१. हा मराठी भाषा विभागातील धागा असल्याने इथे फक्त मराठी शब्दच चर्चेला घ्यावेत. अर्थात अशा शब्दाच्या व्युत्पत्तीच्या चर्चेमध्ये आंतरभाषिकता येईलच; त्याचे स्वागत आहे.
( सर्व बिगर मराठी भाषांमधील शब्दचर्चेसाठी अन्य धागे उपलब्ध आहेत )

२. एखाद्या सभासदांनी नवा शब्द चर्चेस घेतल्यानंतर पुढील २० तास त्या शब्दासाठी राखून ठेवूयात. त्या दरम्यान पुढचा शब्द घेऊ नये. ही मुदत संपल्यानंतर त्यावर कोणतीही चर्चा झाली नसेल तरी नवा शब्द जरूर घ्यावा.

सहकार्याबद्दल धन्यवाद आणि चौथ्या भागात सहर्ष स्वागत . . .
Happy

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

पंचानन ^१ वि॰ [सं॰ पञ्चानन] जिसके पाँच मुँह हों । पंचमुखी । पंचानन ^२ संज्ञा पुं॰
१. शिव ।
२. सिंह । उ॰—सबै सेन अवसान मुक्कि लग्यो बर तामस । तब पंचानन हक्कि धक्कि चहुआना पामिस । —पृ॰ रा॰ १७ । ८ । विशेष—(१) सिंह को पंचानन कहने का कारण लोग दो प्रकार से बतलाने हैं । कुछ लोग तो पाँच शब्द का अर्थ विस्तृत करके पंचानन का अर्थ 'चौड़े मुँहवाला' (पंचं विस्तृतं आननं यस्य) करते हैं । कुछ लोग चारों पंजों को जोड़कर पाँच मुँह गिना देते हैं । (२) विषय और अध्ययन की दृष्टि से सर्वोच्चता एवं गुरुत्व तथा श्रेष्ठता का बोध कराने के लिये इस शब्द का प्रयोग नाम आदि के साथ भी होता है । जैसे, न्यायपंचानन, तर्कपंचानन ।
३. संगीत में स्वरसाधन की एक प्रणाली । आरोही—सा रे ग म प । रे ग म प ध । ग म प ध नि म प ध नि सा । अवरोही—सा नि ध प म । नि ध प म ग । ध प म ग रे । प म ग रे सा ।
४. ज्योतिष में सिंह राशि (को॰) ।
५. वह रुद्राक्ष जिसमें पाँच रेखाएँ हों (को॰) ।
पंचानन ^१ वि॰ [सं॰ पञ्चानन] जिसके पाँच मुँह हों । पंचमुखी ।

धन्यवाद. Happy
बोरकरांच्या ‘तव नयनांचे दल हलले गं’मध्ये ‘दिग्गज पंचाननसे वळले’ अशी ओळ आहे. आता सिंह > सिंहावलोकन > दिक्-गजांनी उलट वळून पाहणं हा सगळा उलगडा यावरून झाला. Happy

शंकर म्हणजे पंचानन हे माहीत होते.

दशशीर्षसमायुक्ता पञ्चविंशतिशीर्षवान् ।
अष्टादशभुजायुक्ता पञ्चाशत्करमण्डितः ॥ २३॥

यात २५ डोक्यांचे असे वर्णन का आहे शंकरांचे? - पञ्चविंशतिशीर्षवान्

पञ्च - पसरणे, आ वासणे. >> अच्छा. हे माहीत नव्हतं. धन्यवाद. ह्याचाच आनन शब्दाशी समास करून पञ्चानन तयार होईल. आता मलाही सिंहाला तो शब्द का वापरतात याचा उलगडा झाला. अनेक वर्षं ही शंका होती डोक्यात.

२५ डोक्यांचे असे वर्णन का आहे शंकरांचे?>>>>> २५ डोकी असलेला शिव म्हणजे महासदाशिव. ५ डोक्याचा सदाशिव.
सामो, तुम्ही लिहिलेला श्लोक कोणत्या स्त्रोतातील आहे?

>>>>>>>>>>सामो, तुम्ही लिहिलेला श्लोक कोणत्या स्त्रोतातील आहे?
अर्धनारीश्वर स्तोत्र - स्कंद पुराण.

>>>>>>२५ डोकी असलेला शिव म्हणजे महासदाशिव. ५ डोक्याचा सदाशिव.
अ मेजर वॉव!! सदाशिव हे रुपच सौम्य व मंगल आहे. त्यात महासदाशिव म्हणजे तर ...

… केश कलाप वरूनच कलप लावणे आले असेल का?……
हे नाही सांगता यायचे.

“कळप”चा संबध मात्र उघड दिसतोय. कलाप = समूह आणि कळप म्हणजेही समूह.

कलप = पांढरे केस रंगीत दिसावेत म्हणून लावतात तो रंग ; खळ <<<<<< [अर. कलफ][सं. कल्क]

कलाप = गुच्छ (A herd or a flock). <<< (संस्कृत)

यावरून दोन्ही शब्द भिन्न जातकुळीतील दिसताहेत.

कलप हे कल्प (आयुर्वेदिक) पासून आले असावे असा माझा कयास.
अच्छा, [अर. कलफ][सं. कल्क]>>>>> हे वाचलं. नवी माहिती.

कलाप शब्द हा प्राण्यांच्या समुहासाठी नाही वापरत…

बरोबर. वर मी लिहिलेल्या ४-५ शब्दांव्यतिरिक्त “कलाप” इतर कुठे नाही दिसला.

कलाप NOUN

कातंत्र व्याकरण, जिसके विषय में कहा जाता है कि इसे कार्तिकेय ने शर्ववर्मन को पढ़ाया था ।
अर्धचंद्राकार गहना । चंदन ।
आभरण । जेवर । भूषण ।
एक सकर रागिनी जो बिलावल, मल्लार, कान्हाड़ और नट रागों को मिलाकरबनाई जाती है ।
एक अर्थ चंद्राकार अस्त्र का नाम ।
वेद की एक शाखा ।
एक प्राचीन गाँव जहाँ भागवत के अनुसार देवर्षि और सुदर्शन तप करते हैं । इन्हीं दोनों राजर्षियों से युगांतर में सोमवंशी और सूर्यवंशी क्षत्रियों की उत्पत्ति होगी ।
वह ऋण जो मयूर के नाचने पर अर्थात वर्षा में चुकाया जाय ।
व्यपार ।
व्यथा । दुःख । क्लेश ।
कलावा ।
चंद्रमा ।
कमरबंद । पेटी ७. करधनी ।
तूण । तरकाश ।
बाण ।
पूला । मुट्ठा ।
मोर की पूँछ ।
समूह । झुंड । जैसे,—क्रियाकलाप ।

कलाप
A Sanskrit English Dictionary | Sanskrit English | |

कला°प m. am. (कला-प, fr. √ आप्) ‘that which holds single parts together’, a bundle, band (cf.जटा-क्°, मुक्ता-क्°, रशना-क्°), [MBh.] ; [Kum.] &c.
a bundle of arrows, a quiver with arrows, quiver, [MBh.] ; [R.] &c.
n. (once n., iii, 11454">[MBh. iii, 11454] )
a peacock's tail, [MBh.] ; [Pañcat.] &c.
an ornament in general, [Mālav.]
a zone, a string of bells (worn by women round the waist), [L.]
the rope round an elephant's neck, [L.]
क्रिया-क्° totality, whole body or collection of a number of separate things (esp.end of a compound.*">ifc.; cf., &c.)

गारूड म्हणजे काय नक्की?
मी जादू, मोहित करणे असे समजत होते.
पण गुगल a liquid against snake venom असे दाखवत आहे.

जाणकार सांगतीलच, पण
गारुड म्हणजे सर्पाच्या विषावरील उताराचा मंत्र.

ते करणारा तो गारुडी.

दुसरा अर्थ जादू, नज़रबंदी जो जास्त वापरात आहे.

सौध, सौधव
= राजवाडा, चुनेगच्चीचा मोठा वाडा; चुनेगच्ची भव्य मंदीर. [सं.]
दाते शब्दकोश
...
" एक जुनेच घर. . . त्याला शोभेशी वळणदारच कवाडे, दारे, सौंध आणि पायऱ्या. . . "
('तें' च्या लेखातून )

वरील वाक्यात मात्र सौंध हा अनुस्वारीत शब्द आहे. परंतु शब्दकोशात वर दिल्याप्रमाणे आहे.
अपभ्रंश ?

अगदी बरोबर. आणि नंतर बेळगावमध्ये त्यांनी जे बांधलं ते
सुवर्ण विधान सौधा !

@ चिडकू

शक्य आहे. आभार. इथे पान ९ वर माझा प्रश्न होता त्या बद्दल.

"मम्मी" हा शब्द देशी भाषेची देणगी आहे.
पुढे मामी आणि मामा ह्यात परिवर्तीत झाला.
म्हणजे ह्याचे मूळ अस्सल देशी आहे, इंग्रजी नव्हे,
असे अनेक आश्चर्यकारक शब्द आचार्य हेमचंद्र यांनी लिहिलेल्या "देसीनामबोध" ग्रंथात आहेत. वाचतो आहे.

* "मम्मी" हा शब्द देशी भाषेची देणगी आहे.>>>
इथे (https://www.etymonline.com/word/mammy) त्याचे एक स्पष्टीकरण आहे :

*ma- that is nearly universal among the Indo-European languages
(ग्रीक, लॅटिन, रशियन, जर्मन, इ. )

Pages