मराठी चित्रपट कसा वाटला? - 1

Submitted by मोक्षू on 16 May, 2020 - 05:23

चित्रपट कसा वाटला या विषयाचा चौथा धागा नुकताच सुरु झालाय.. म्हणून लगेच हा वेगळा धागा काढला... मराठी चित्रपट पाहायचा असला की नेहमीच्या धाग्यावर खूप शोधाशोध करावी लागते.. म्हणून सगळ्यांनी मराठी चित्रपटांबद्दल ह्या धाग्यावर चर्चा करावी ही विनंती...

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

नाही त्या पळून गेलेल्या भावाची कवितांची वही सापडते बहुतेक. वाडा चिरेबंदीमधला फोटो कपाटात सापडतो मृ.कु.चा.

कोण जाणे! इतकं आठवत नाही आणि परत पहायची तयारी नाही Happy व्हेगली तो सीन आठवतोय - वाड्यात कवडसे येत असतात आणि एका कवडश्यात 'वाडा चिरेबंदी' दिसतं - असा. या सीन मधे ज्योती सुभाष आहे.

मृणाल रमा माधव मध्ये आवडलेली, तेव्हा १६ का १८ ची होती. नंतर लग्न, मुल वगैरे झाल्यावर टिवीवरच्यस एका हिंदी कथेत पहिल्यांदा पाहिली. दोन जोडपी एकमेकांना कंटाळतात, क्रॉस अफेअर्स सुरु होते आणि दोघेही टायटॅनिक बघायला येतात व दारातच यांचे टायटॅनिक फुटते अशी कथा गंमतीदार रंगात रंगवलेली होती. त्यातही मला खुप आवडलेली. तोवर ती सोज्वळ, साधी पण सुंदर अशी होती दिसायला. त्यानंतर तिचा मेकओवर झाला आणि ती वलयांकित झाली. मग आवडेनाशीच झाली.

नाही त्या पळून गेलेल्या भावाची कवितांची वही सापडते बहुतेक. वाडा चिरेबंदीमधला फोटो कपाटात सापडतो मृ.कु.चा.>>>>>> बरोबर, दागिने घातलेल्या वहिनीच्या भूमिकेतील

वेशभूषा खटकतेच. मुख्यत्वे ऐतिहासिक चित्रपटात उगीच जरीपटका, वेलवेट यांचा वापर. कपड्यावरच्या इस्त्रीच्या घड्या पण दिसतात. काही ठिकाणी साड्यांना पिन केलेली असते ते सुद्धा त्या काळानुसार पटत नाही. उपरणी सुद्धा लेस लावलेली अत्याधुनिक वाटतात. हे सगळं फुलवंती मध्ये दिसून येईल.

मराठी सिनेमाचं काय घेऊन बसलात, लगान मधे ही पाऊस नसताना होतेच की लोकांचे डाग विरहित कपडे (तिथे रंग च मळखाऊ वापरल्यामुळे पटकन नोटीस करणं अवघड होतं) अन् गुळगुळीत दाढ्या...

मृणाल रमा माधव मध्ये आवडलेली, तेव्हा १६ का १८ ची होती
>>> १००+
रमा माधव अलीकडची. तुम्ही म्हणताय ती 'स्वामी' गजानन जागीरदारांची.

सैराट मधले सगळ अस्सल वाटते..
कपडे, नाच, अभिनय..

पण कदाचित म्हणूनच मला तो पुन्हा पुन्हा बघावासा वाटत नाही. एकदाच पाहिला आहे.

माम बरोबर.

सोशल सिनेमात कपडेपट सांभाळला गेला नाही तरी कळत नाही. सैराट मध्ये एका गाण्यात आर्चीने घातलेला ड्रेस वाशीच्या मॉलमध्ये मी पाहिला होता.

लगानची वेषभुषा भानू अथैय्या यांनी सांभाळलेली त्यामुळे कपडेपट कालसुसंगत होता. रंगभुषा कोणी सांभाळली माहित नाही पण त्यात फार काही चुकीचे नसावे. कपडेपटाची अचुकता कुठल्या प्रकारचे कापड त्या काळी सामान्य व श्रीमंत समाजात वापरात होते ह्याची माहिती घेऊन सांभाळता येते. हल्ली वापरात असलेले काही प्रकारचे कापड गेल्या ५० वर्षात शोधले गेलेय. चेहर्‍यावरची दाढी सफाई करणारे न्हावी समाजाचा एक भाग आहेत. त्यांचा उपयोग लगानच्या वेळेसही होत असावा.

भंसालीने त्याच्या देवदासात पारो व चंद्रमुखीला एकत्र नाचवले आणि ‘दोन उत्तम नर्तकींना एकत्र नाचताना पाहायची संधी प्रेक्षकांना मिळावी’ (आणि मला ते कॅश करता यावे) हे उदात्त कारण दिले. अशी विचारसरणी असलेल्या दिग्दर्शकाला बाजीरावाच्या काळात वेल्वेट ब्लाऊज घालणारी स्त्री दाखवायला काही वाटणार नाही.

मानापमानचे १-२ रिव्ह्यु सिनेमागली वर वाचले...लोकानी निगेटिव्ह लिहल्यावर त्याना मराठी चित्रपट द्रोही ठरवण वैगरे मजेशिर प्रकार चालु आहेत..हे सेम प्रकार त्या शाहिरच्या वेळेस पण त्या ग्रुपवर झाले होते.
एका रिव्ह्युत सुभा-सुमितच्या वयावर लिहल तर लोक म्हणे ६०चा टॉम क्रुझ हिरो म्हणुन चालतो ...आता टॉम क्रुझ आणि सुभा याची काही तुलना आहे का?

सुभा-सुमितच्या वयावर लिहल तर लोक म्हणे ६०चा टॉम क्रुझ हिरो म्हणुन चालतो .>>> वेमा, प्लीज कपाळात हात मारून घेणारी बाहुली द्या आता. फार पंचाईत व्हायला लागली आहे Lol

आता टॉम क्रुझ आणि सुभा याची काही तुलना आहे का? >>> Happy येऊ द्या आता ममव 'टॉप गन' , जेनिफर कॉनली ऐवजी मृकुला घ्या. तिलाही जिजाऊ रोलमधून बाहेर येऊन मोटर सायकलवर बसता येईल.

मी मराठी म्हणुन चित्रपटाच्या नावाखाली पाच तास आणि ५००
रु देऊन थेटरात जाऊन यांचा रटाळ चित्रपट पाहात झोपु काय??? अपेक्षांचा बार पाताळलोकाच्याही खाली रुतत चाललाय…

पाच तासात प्रवासाचे पण धरलेत.

सुभा-सुमितच्या वयावर लिहल तर लोक म्हणे ६०चा टॉम क्रुझ हिरो म्हणुन चालतो .>> ज्यांनी वयावर लिहिले त्यांना साठीचा टॉम क्रूझ चालतोच हे कशावरून ठरवले?
चालत असेल हे पुढचं पाऊल.
किमान 72 चा रजनीकांत तरी म्हणायचं Happy

एका रिव्ह्युत सुभा-सुमितच्या वयावर लिहल तर लोक म्हणे ६०चा टॉम क्रुझ हिरो म्हणुन चालतो >> चालतो म्हणजे, आमच्या बापाचं टाप हाय का त्याला विचारायचं का करतो म्हणून? त्याचं अधिकार आहे ते! त्याच्यासारखं एक हेलिकॉप्टरला लटकून दाखवा, मूळव्याध होतो की नाय बगा. उगीच उंटाच्या शेपटीच्या बुडख्याचा मुका घेतो म्हटलं.. येत नाही तर हुंबपणा कशाला.

सुभा एका सिनेमात हॉट दिसला आहे. पोस्टकार्ड नाव होतं सिनेमाचं. एरवी गोड दिसतो, हॉट नाही. गोड, गुळमुळीत आणि शुद्धजीवी 'पर्सोना' सोडून जिमला जावे त्याने, उंची व बांधा चांगला आहे त्याचा. जास्त मस्क्युलिन + कमी ममव रोल करावेत. टॉम क्रूज साठीचा आहे, सुभा चाळीशीत आहे. त्याचा सॉल्ट पेपर लूक भारी होता. कलाकारांनी रिईन्वेंट करत रहायला हवे म्हणजे लोक कंटाळत नाहीत.

पोस्टकार्ड सिनेमा चांगला होता. तीन वेगवेगळी कथानके होती.

मी टायपेपर्यंत हर्पांनी रावसाहेब व राभुनी रजनीकांत आणला. Happy

वेमा, प्लीज कपाळात हात मारून घेणारी बाहुली द्या आता. फार पंचाईत व्हायला लागली आहे >>>>>> 🤣
कलाकारांनी रिईन्वेंट करत रहायला हवे म्हणजे लोक कंटाळत नाहीत.>>>>>> बरोबर.
हर्पा>>>>> 🤣

Happy का गं, पन्नाशीत गेला की काय मला न कळताच. बघितले होते तुपारे, भूमिकाच लेम असली तर तो तरी कसा हॉट दिसणार. मराठीतला हिरो जितका हॉट 'कोमट' दिसेल तेवढे तरी प्रयत्न करावेत.

माझ्या मते तरी सुभाने माझी बॅट तर मीच बॅटीन्ग करणार अ‍ॅटीट्युड सोडुन फक्त डायरेक्शन केल असत आणी रोल कुणा यन्गस्टरला दिला असता..वैभव्,गश्मिर,भुषण वैगरे.
सुभा हॉट कधिच दिसत नाही तो वरणभात लुकच कॅरी करतो..त्याचा रेस्टिन्ग फेस तणावातला वाटतो...एरवीही मुलाखतित सतत मला सगळ्यातल सगळच कळत अ‍ॅटीट्ञुड... सुभाचा कट्यार आवडला होता पण त्यातही सगळा भाव महागुरु आणी गाण्यानीच खाल्ला होता.

कोमट Lol
एकदम कोविड चे दिवस आडवले.
माझ्या मते तरी सुभाने माझी बॅट तर मीच बॅटीन्ग करणार हिंदीत पण हेच चालतं. फक्त लोकांना चालेल का याचा विचार करून बॅटींग करावी. लोकांना जनरली घेणंदेणं नसतं. टीका करणारे पण पिक्चर चांगला असेल तर सर्वात आधी पळतात बुकींग ला. Lol

चांगला पिक्चर हे पण खरं नाही. पिअर प्रेशर पिक्चर Happy

कोमट >>> Lol

तुपारे मध्ये होता सॉल्ट अँड पेपर लूक. पण मला काही तो भारी वगैरे वाटला नाही. सुभा चिडकाच दिसतो सारखा. लूक नो बार. एज नो बार Proud

Pages