खाऊगल्ली - आजचा मेनू - (५)

Submitted by mrunali.samad on 11 September, 2022 - 12:05
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
५ मिनिटे
लागणारे जिन्नस: 

मोबाईल मधे खाऊचा फोटो आणि मायबोली.

क्रमवार पाककृती: 

● खाऊगल्ली धागा उघडावा.
● फोटो अपलोड करावा.

वाढणी/प्रमाण: 
फोटो टाकाल तितके
अधिक टिपा: 

आधीची खाऊगल्ली ऑलमोस्ट भरली.. येऊ द्या लज्जतदार, चटपटीत, चमचमीत, तिखट, गोड, डाएटवाले सगळेच खाऊचे प्रकार.

माहितीचा स्रोत: 
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Use group defaults

सुनो मेरी एक राय है
इश्क़ से बेहतर चाय है
>>>
मस्त लाईन आहे!

@ किल्ली
आपल्याला जे खायला हवं असतं ते स्वतः बनवून खाता येणं is a life skill!
>>>>
येस, स्वतः बनवून खाणे आणि आपल्याला बापाला सुद्धा बनवून खाऊ घालणे हे स्किल मुलीच्या जातीला असलेच पाहिजे.

जसे की हे,
विकेंड नाईट मेनू - मूवी टाईम स्नॅक्स by परी

IMG-20250111-WA0002.jpg
.
IMG-20250111-WA0003.jpg

येस, स्वतः बनवून खाणे आणि आपल्याला बापाला सुद्धा बनवून खाऊ घालणे हे स्किल मुलीच्या जातीला असलेच पाहिजे.>>>>

मुलगे जेवत नाहीत का?? बापाला सोडा, स्वतःला खाऊ घालणे ही जबाबदारी त्याण्ची नाहीच का?? गंमत करतेय, भार घेऊ नका. तुमचा मुलगाही करत असेल किंवा तुम्ही शिकवत असाल.

अस्मिता, काय मस्त दिसतंय सगळं.... 😋
ऋन्मेSSष,
तुमची कन्या लवकरच इथे पाकृ धाग्यावर दिसणार. नक्की.
छान करते पदार्थ. तिची आवड जोपासा.

साधना, काहीच लोड नाही. मुळात मीच ते गमतीने म्हटले होते. जे मला ओळखतात त्यांना हे ठाउक आहे Happy

ऋतुराज हो, पुढच्या गणपतीला मी पाककृती उपक्रमात भाग घेतो आणि तिच्याकडूनच काहीतरी करून घेतो Happy

परी छान छान.
अस्मिता मस्तच. पुलिओथराई भात रेसिपी प्लीज.

फोटो टाकण्याइतके प्रेझेन्टेबल माझे कधी होत नाही म्हणुन फोटो नाही.
पण , आज लाल भोपळ्याचे तिखट पराठे केलेले. तीळ व बेसन घातल्याने मस्त खुसखुशीत झाले.

रेसिपी काहीच नाही साज. पुलिओथराई मसाला मिळतो विकतचा. तो फोडणीत घालून, शेंगदाणे व कढिपत्ता घालून परतले, झालं एवढंच. पुलिओग्रेचा भाऊ आहे. Happy

थॅंक्यू सर्वांना. Happy

मस्त gourmet मेन्यू पण ते फर्स्ट फोटोत काय आहे ? 2 सुशी आहे का!
हा आजचा घरचा मेन्यू बांगडा फ्राय आणि कोळंबी मसाला आणि कालवण
IMG_20250112_183004.jpg

अनिंद्य,
gourmet मस्त.
कमळ काकडी फ्राय?

सिमरन, कोळंबी मसाला मस्त.

Lotus stem / lotus roots stir fried in Hunan sauce असे मेन्यूत लिवले व्हते.

कश्मीरी नदरू / हिंदीत कमल ककडी म्हणतात. मराठीत काय म्हणतात ते नै म्हैत.

दुसरे asparagus dumplings हायेत.

सिमरन, कोळंबी मसाला मस्त......+१.

मराठीत काय म्हणतात ते नै म्हैत....... मी कमळाचे देठ असं ऐकले होते.पण आम्हाला त्याचे काय करायचे माहीत नसल्याने कधी घेतले नाहीत.भोपळ्याच्या कळ्या आणि देठ विकायला असत.

घरी नाही कधी आणले
+ १

असले exotic प्रकार घरी करू नयेत. Professional chef लोकांना पगार मिळावा ही आपली पण जबाबदारी आहे 😄

…भोपळ्याच्या कळ्या आणि देठ ….
यांची भाजी आणि भजी करतात. दोन्ही नाही आवडत.

क्रिस्पी फ्राईड लोटस स्टेम ही आवडती डिश आहे. करायलाही सोपी आहे. कमळाच्या देठाची नद्रु याखनी ही काश्मिरी स्टाईल भाजी पण छान बनते फक्त देठ कोवळे पाहिजेत.
ऋन्मेष ताट मस्त..
सिमरन कोळंबी छान आहे.

.. नदरू याखनी …

My fav too. काश्मीरी गुश्ताबा चे व्हेज वर्जन असते एक, ते ही.

पण घरी केली-करणार नाही Happy

आज आमच्याकडे रणवीर ब्रारच्या रेसिपीने पुरानी दिल्ली स्टाईल चिकन कोरमा बनवला होता. सोप्पी आणि चवदार रेसिपी. पार्टीसाठी हिट ठरेल.

@ अस्मिता,
तुमच्याकडे पुलिओथराई आणि पुलिओगरे राईसमधे काय फरक ?

करणारी अंयंगार मामी आणि आंबटपणासाठी चिंचेऐवजी कोकम यापलिकडे काही अजून फरक आहे का? Genuinely विचारतो आहे.

अनिंद्य,
पुलिओथराई मला जास्त आंबट वाटला. पुलिओग्रेमधे डाळं आणि शेंगदाणे जास्त वाटतात. एकंदरीत पुलिओग्रे जास्त खमंग आहे. दोन्ही विकतची पाकिटे आणते, त्यामुळे तपशील फारसे माहीत नाहीत.

Good to know.

पुढच्यावेळी जमल्यास दोनही पाकिटातले ingredients चेक कराल का प्लीज ?

Will be useful for me as Iyyangar food is my special interest.

Thanks in advance.

Pages