खाऊगल्ली - आजचा मेनू - (५)

Submitted by mrunali.samad on 11 September, 2022 - 12:05
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
५ मिनिटे
लागणारे जिन्नस: 

मोबाईल मधे खाऊचा फोटो आणि मायबोली.

क्रमवार पाककृती: 

● खाऊगल्ली धागा उघडावा.
● फोटो अपलोड करावा.

वाढणी/प्रमाण: 
फोटो टाकाल तितके
अधिक टिपा: 

आधीची खाऊगल्ली ऑलमोस्ट भरली.. येऊ द्या लज्जतदार, चटपटीत, चमचमीत, तिखट, गोड, डाएटवाले सगळेच खाऊचे प्रकार.

माहितीचा स्रोत: 
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Use group defaults

शेव लाडू छान. आमच्याकडे सासू बाई वरचेवर बनवतात. त्यांच्या हातचे फेमस आहेत शेव लाडू. दिवाळीचा फराळ असो किंवा कोणाला प्रवासाची शिदोरी द्यायची असो त्यात असतातच. रंगाने पिवळे असतात. छान असतात.

ऋतुराज, वीकेंडला विचारून सांगतो.
>>>>

खेकडे - श्रीराम बोर्डिंग हाऊस, गिरगाव - फेमस आहे. कदाचित माहीत असेल.
आमच्याजवळ भायखळा इथे सुद्धा त्यांची शाखा उघडली आहे.

या विकेंडला सुद्धा मी माहेरी आहे. काल दुपारी अंडा भुर्जी आणि रात्री सुरमई फ्रायचा एक राऊंड झाला. आज आईला आराम म्हणून वरचेच तयार खेकडे आणायचा प्लान होता. पण मुलांना चिकन आणि राईस खावेसे वाटले तर आमच्या माझगाव विभागातील फेमस चिकन केप्सा बिर्याणी ऑर्डर केली Happy

IMG-20250105-WA0055.jpg

धन्यवाद ऋणमेश

लालबाग एरियात श्री दत्त बोर्डिंग आहे त्यांचे जेवण छान असते .
हल्ली तिथे माजघर नावाचे रेस्टॉरंट् पण चालू आहे. ते ही नॉन व्हेज साठी प्रसिद्ध आहे

येस, दत्त बोर्डिंग सुद्धा छान असते.
मला पर्सनली आमच्या घरचे फार आवडत असल्याने मी या आधी मत्स्याहार बाहेर फार करायचो नाही. सध्या करतो. पण मोजक्याच जागा.

या दत्त बोर्डिंगची एक मजेशीर आठवण आहे. लग्नाआधी एका ऑनलाईन ऑर्कुट मैत्रीणीने मला डिनर डेटवर म्हणून इथे जेवायला नेलेले. खर्च अर्थात तिचा होता. मी नॉनव्हेज प्रेमी असल्याने तिथे खाऊन खुश/इंप्रेस होईल l अशी तिची अपेक्षा होती Happy

खर्च अर्थात तिचा होता. >>> भलतेच लक्की बुवा तुम्ही. सोताच खर्च करून वर तुम्हाला झेलणार्या कशा काय मिळतात Happy

ह्या विकांता ला मिस्सळ पाव बेत होता. फोटो राहिला Sad

खेकडे - श्रीराम बोर्डिंग हाऊस, गिरगाव - फेमस आहे.>>> धन्यवाद. ऐकून आहे याबद्दल.
लालबाग एरियात श्री दत्त बोर्डिंग आहे त्यांचे जेवण छान असते >>>> हो मस्त आहे.
लालबागमध्ये अशी बरीच आहेत.

सोताच खर्च करून वर तुम्हाला झेलणार्या कशा काय मिळतात Happy >> हो, कारण तसा बरा आहे मी प्रत्यक्ष आयुष्यात Happy
तसेही माझा शालेय जीवनापासून एक फंडा होता की त्याच मुलीशी नाते जोडावे जी फिरायला गेल्यावर पूर्ण किंवा अर्धा खर्च उचलायची तयारी दाखवेल. अन्यथा रेड फ्लॅग समजावा आणि मागे फिरावे Happy

मुंबईला गेले आणि शेवपुरी खाल्ली नाही असे होत नाही.
यावेळी त्या शेवपुरीवाल्याने मोठा गेम केला. नेहमीप्रमाणे एक शेवपुरी आणि एक भेळपुरी मिडीयम ऑर्डर केली होती तर एक शेवपुरी मुलीसाठी मिठी बनवायला सांगितले होती.
त्याने मिडीयमवाली वेगळ्या पिशवीत ठेवली आणि चुकून ती मला मिठी आहे असे सांगितले.
पहिली पुरी खाताच मुलीच्या डोळ्यातून जे गंगा जमुना आल्या ते घाबरून तिने मिठी शेवपुरी सुद्धा खाल्ली नाही. दोन्ही प्लेट मला एकट्याला खाव्या लागल्या प्लस अर्धी भेळपुरी आईची शेअर केली. एक दोन अडीच जणू जेवणच झाले. पण चव भारीच असते त्यामुळे आवडीने गेले Happy

IMG-20250107-WA0004.jpg

आवरा!! हे भेळपुरीचे फोटो टाकून छळु नका.
अर्थात घरच्या घरी भेळ खूपदा होते. पण फोटोमुळे, छळ होतोच. तो काही थांबत नाही.

घरची सुकी भेळ हा तर रात्रीचा वरचेवर खाल्ला जाणारा खुराक आहे.
शेव कुरमुरे स्टॉक असतो घरात नेहमी. कारण पोहे उपमा यावर सुद्धा ती बारीक पिवळी शेव लागते नेहमी.
तर त्यात फरसाण (जे उपलब्ध असेल ते), चणे शेंगदाणे, खारीचा शिल्लक चुरा, चितळे बाकरवडीचा शिल्लक चुरा.. अश्या गोष्टी उपलब्धतेनुसार एका टोपात मिक्स करायच्या.
बारीक चिरलेला कांदा, टमाटर, मिरची आणि उकडलेला बटाटा हे सुद्धा नेहमी फ्रिज मध्ये असतेच. ते त्यात मिसळून वरतून मस्त लिंबू पिळायचा.. सोबत वाईच कपभर कॉफी घ्यायची.
मध्यरात्री उशीरा खाल्ले तरी फार अनहेल्दी खातोय असे वाटत नाही, आणि अरबट चरबट खाल्याचा आनंद सुद्धा मिळतो Happy

Screenshot_2025-01-07-09-53-29-36_92460851df6f172a4592fca41cc2d2e6.jpg
उपम्याला पर्याय, म्हणजे किंवा किन्वा उपमा.
आज हळद घसतल्याने असा रंग दिसतोय अन्यथा पांढुरका दिसतो.

पोरगी सध्या फॉर्मला आहे.
गार्लीक ब्रेड
क्रमवार पाकृ जमल्यास नंतर लिहितो. पण हे भारी बनवते. आवडीने बनवते त्यामुळे हाताची चव उतरत असावी.

IMG-20250108-WA0016.jpg

Wow यम्मी झालेत की ब्रेड
बरंय आवड आहे परीला
आपल्याला जे खायला हवं असतं ते स्वतः बनवून खाता येणं is a life skill!
.
कचोरी मस्त आणि kinva उपमा ही छान.
हापिसात कधी कधी किनवा खिचडी असते, चवीला बरी नही लागत पण exotic dish म्हणून खाते.

कपबशी wow आहे, पाठवून द्या इकडे.
.
Caption सुद्धा भारी आहे.
हे लिहायचं राहिलं.
.
हे बोलण्याने impression मस्त होईल Happy

कपबश्या + काचेचे ग्लास + चीनी मातीच्या वस्तू are my happy indulgence

थँक्यू !

@ Caption - मी दहा वर्षांपूर्वी फेबूवर लिहिले होते ते २००+ लोकांनी कॉपी केले Happy

कपबश्या + काचेचे ग्लास + चीनी मातीच्या वस्तू are my happy indulgence>> सेम पिंच. सिंगापूर ला ज्या इवल्याश्या टायनी चीनीमाती वस्तू मिळतात. चटणी, सॉस, वासाबी पेस्ट असा काही बाही ठेवायला. आम्ही इतके सॉस वापरत नसून ती भांडी घ्याविशी वाटतात. छोटे ट्रे पण ती लहान सॉसपॅन्स ठेवायला. काळी, मोरपंखी छटा असलेली विशेष आवडते.

कपबश्या + काचेचे ग्लास + चीनी मातीच्या वस्तू are my happy indulgence>>>>> छान अनिंद्य.
मलाही आवडतात. पण घरी नाही.
You have nice collection.

कपबश्या + काचेचे ग्लास + चीनी मातीच्या वस्तू >>>>> यावर काही धागा आहे का?

सुंदर कपबशी तिचा रंग आणि कॅप्शन +1
यावर काही धागा आहे का? >>>>शोध मध्ये शोधलं असा नेमका धागा नाहीये पॉटरी चा आहे . असा एखादा क्रॉकरीचा धागा असायला हवा
तुम्हीच काढा अनिंद्य . तुमचं कलेक्शन बघायला आवडेल.

Pages