क्रिकेट - ९

Submitted by ऋन्मेऽऽष on 3 January, 2025 - 02:37

२०००+ पोस्ट झाल्या म्हणून नवीन धागा

बॉर्डर गावस्कर ट्रॉफीचा निर्णायक धुमाकूळ इथे घालूया Happy

क्रिकेटचा मागचा धागा ईथे बघू शकता
https://www.maayboli.com/node/83589

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सेंट्रल कॉन्ट्रॅक्ट मध्ये असणाऱ्या खेळाडूंना आयपीएल खेळण्यास सक्त मनाई असावी का? यांच्यापुढे पर्याय ठेवावा देश कि आयपीएल , हवेतर सेंट्रल कॉन्ट्रॅक्ट ची रक्कम वाढवून द्यावी . बिसिसिआय असे करण्याची हिम्मत दाखवू शकेल?

जे चांगले खेळणार नाहीत त्यांना काढून टाकायचं. बाकी कोणी कुठ खेलायच हे प्लेअर्स वरती ठेवायला पाहिजे.

मला वाटतं , ऑसीज फलंदाजीच्या शेपटासाठी त्यांचा नक्कीच उपयोग झाला असता. >> कळीछा प्रश्न ह्यातला कोणीही कोणाच्या जागी खेळला असता ? शमी नसणे हा बॉलिंङ्मधला कमकुवत दुवा झाला असे मला वाटते. तो असता तर बुमराचा लोड नक्की कमी झाला असता. (सिराज किंवा राणाअ एव्हढ्या मेंटल चूका त्याने त्याचा अनुभव बघता केल्या नसत्या असे धरतोय) स्पिनर म्हणून मला कुलदीपची कमी भासली पण परत प्रश्न तोच उभा राहतो कि ६-७ बॅटस्मन खेळवायचे म्हटल्यावर बाहेर कोण जाणार ?

मुळात टेस्ट-११ मधे एखाद्या खर्या-खुर्या ऑल-राऊंडरला स्थान आहे असं मला वाटतं. >> बरोबर फेफ. एक पांड्या वगळता (त्याच्याही टेस्ट क्रेडेंशियल वर खर तर मोठा प्रश्नच आहे पण बाकीच्या कोणाही पेस ऑल राऊंडर्स पेक्षा तो उजवा वाटतो. ) किमान १३०+ च्या पुढे बॉलिंग करू शकेल (किंवा हिट द डेक टाईप्स करू शकेल) नि बॅटींग करू शकेल असा कोण सुचत नाही.

सेंट्रल कॉन्ट्रॅक्ट मध्ये असणाऱ्या खेळाडूंना आयपीएल खेळण्यास सक्त मनाई असावी का? यांच्यापुढे पर्याय ठेवावा देश कि आयपीएल >> ह्या दोन विरुद्ध गोष्टी आहेत असे का धरता पण ? उणापुर्‍या वीस वर्षांच्या (तेही संधी, सातत्य नि नशिबाची साथ मिळाली तर) कारकिर्डीमधे आयुष्यभराची बेगमी करायची असेल तर खेळाडू आयपील चा पर्याय स्वीकारणार हे उघड आहे. त्यात त्यांना दोष देण्यात मला हशिल वाटत नाही. गरज हि आहे कि आयपील वरून टेस्ट मधे फास्ट ट्रॅक करणे थांबवायला हवे (सचिन एखादाच असतो). होतकरू खेळाडू सापडला तर त्याला टेस्ट मधे नेण्याआधी डोमेस्टीक चा किमान एक पूर्ण सीझन तरी खेळवला गेला पाहिजे . आयपील ते नॅशनल संघ हा फस्ट ट्रॅक पाथ लिमिटेड क्रिकेट्पुरताच ठेवणे जरुरी आहे.

India T20 squad vs England

Suryakumar Yadav (C)
Sanju Samson (wk),
Abhishek Sharma,
Tilak Varma,
Hardik Pandya,
Rinku Singh,
Nitish Kumar Reddy,
Axar Patel (vc),
Harshit Rana,
Arshdeep Singh,
Mohammad Shami,
Varun Chakravarthy,
Ravi Bishnoi,
Washington Sundar,
Dhruv Jurel (wk)

UPDATE ON JASPRIT BUMRAH: (Express Sports)

- He set to miss Champions Trophy group matches.
- He has back swelling
- He has asked to report to NCA
- Expected to be fully fit by first week of March
- Selectors add him in 15 member member squad
- Selectors closely monitored him

Most Hours batted in Test format!

736 hrs - Rahul Dravid
688 hrs - Sachin Tendulkar
640 hrs - Jacques Kallis
629 hrs - S Chanderpaul
622 hrs - Alastair Cook
594 hrs - Allan Border
557 hrs - Joe Root
540 hrs - K Sangakkara
536 hrs - Ricky Ponting

Be lated Happy Birthday Rahul Dravid
11 Jan

ऋन्मेषच्या स्टॅटिस्टिक्सवर आणखी एकः Happy

5000+ Balls Faced - 222 players
10000+ Balls Faced - 86 players
15000+ Balls Faced - 39 players
20000+ Balls Faced - 13 players
25000+ Balls Faced - 6 players
30000+ Balls Faced - Rahul Dravid

Happy birthday Rahul Dravid

हे सुद्धा बघण्यात आलेले. पण फोटो होता. टेक्स्ट असते तर कॉपी पेस्ट केले असते.

द्रविड आणि धोनी दोघांच्या १००००+ एकदिवसीय धावा थक्क करतात.
धोनी टॉप ऑर्डर फलंदाज नसल्याने..
आणि द्रविड तर एकदिवसीय फलंदाजच नाही असा शिक्का त्यावर असल्याने..

काल मुलीच्या मैत्रिणींच्या गप्पा चालू होत्या त्यात एकीच्या तोंडून ऐकले की भारताच्या कुठल्या तरी कोचचा आज बर्थ डे आहे म्हणून..
मोह आवरला त्यांना द्रविड कोण होता किंबहुना आहे हे सविस्तर समजवायचा. त्या आधी थोडे क्रिकेट अजून समजू दे म्हटले Happy

आजोबा, आता इंग्लंडचा दौरा आहे का ? तुमच्या माबोवर हल्ली इंग्लिशमध्येच क्रिकेटच्या पोस्ट दिसतात , म्हणून विचारतोय !!
20181230_224844.jpg

*आणि द्रविड तर एकदिवसीय फलंदाजच नाही असा शिक्का त्यावर असल्याने..* +१ !
असले ' शिक्का ' मारण्याचं व्यसनच जणू जडलंय आपल्या क्रिकेट पंडितांना ! सेहवाग एक जेमतेम अठवणारा मिडल ऑर्डर फलंदाज झाला असता, रोहित शर्मा एक साधारणसा ऑफ स्पिनर म्हणूनच विस्मरणात गेला असता ह्या व्यसनापायी !! द्रविड समायोचित खेळण्यात वाकबगार होता म्हणून त्याच्यावर संथ खेळायची पाळी यायची, तर त्याच्यावर हा शिक्का मारून हे मोकळे !!

टी २० ची टीम बहून ब-याच दिवसांनी टीम बद्दल जरा आश्वासक वाटल. काहितरी करतील बाबा. नाहीतर गेले ३-४ महिने विश्वास जरा ढळलेला होता.
तरी मयांक यादव आणि उम्रान मलिक अजूनही जखमीच का?. का?.

पंत बुवांना शिक्षा दिली आहे की विश्रांती?

भाउ आता लेग स्लीप, फाइन लेग, कव्हर, स्वीप(झाडू), सिली मिड ऑन ,मिड ऑफ असल्या गोष्टींना काय म्हणणार. या धाग्यात अपवाद म्हणून जाउ दे. भापो म्हणजे झाले.
तिने लांब पायावरून पळत येउन सुंदर पायावर झेल घेतला किंवा तो उडत झोपेत उभा होता असे काही तरी होईल Happy

विक्रमसिंहजी, तुम्ही म्हणता त्यातला एकही शब्द मला वरच्या इंग्लिश पोस्टमध्ये दिसत नाहीं ! मराठीत लिहिलेल्या पोस्टमध्ये इंग्लिश शब्द येणे व अख्खी पोस्टच अकारण इंग्लिशमध्ये असणं यात फरक तर आहेच ना !(माझ्या ह्या पोस्टमध्येचपोस्ट शब्द 5 वेळा आलाच ना !! ). शिवाय, माझा आक्षेप नक्कीच नाही नोंदवलाय, जरा गंमत म्हणून गोष्ट लक्षात आणून दिली, इतकंच !! Wink

बीसीसीआय ने चाबूक फटकावायला सुरूवात केई आहे. खेळाडूंचा फॅमिली टाईम, परस्नल ट्रेनर, बॉडीगार्ड वगैरे वर लिमिट आणणे इत्यादी. गंभीरला टीम मधे डीसीप्लीन आणायचा आहे नि बाँडींग तयार करायचे आहे म्हणे.

हे सगळे ठीक आहे पण ह्याने मूळ प्रॉब्लेम कसा सॉल्व्ह होणार आहे नक्की हे कळत नाही. ऑस्ट्रेलियामधे आपण हरण्याची तीन मुख्य कारणे
१. रोहित, कोहलीचा ढसाळलेला खेळ (कारणे बाजूला ठेवा
२. त्यामूळे कमकुवत झालेली बॅटींग सांभाळायला आणलेली ऑल रांडर्स ची फौज ( परत त्या ऑल राऊंडरर्सचा बॉलर म्हणून पुरेसा वापर केला नाही हा भाग अलहिदा)
३. ४-५ प्रॉपर बॉलर्स घेण्याऐवजी अडीच बॉलर्स घेऊन पाच टेस्ट खेळणे( त्याधीचा भारतातला लोड मी धरत नाहिये) ज्यामूळे बुमरा इंजर्ड होणे.

ते बाँडींग वगैरे करायचे असेल तर सर्फराज ने गंभीरच्या कानपिचक्या रीलीज केल्या हि लीक किंवा रोहित ने पाचव्या टेस्ट मधेच प्रेस काँफरन्स घेणे वगैरे प्रकार बाँडींग ला पोषक वाटत नाहीत.

सितांषू कोटक ची बॅटींग कोच म्हणून निवड हा त्यातल्या त्यात एकमेव संबंधित उपाय दिसतो आहे.

डोमेस्टिक क्रिकेट नेट सेशनमध्ये सहभाग सुद्धा सुरू झालाय काहींचा..
काहीतरी करतोय असे दाखवावे लागणार आता..
आयपीएल येइपर्यंत कमीत कमी शिव्या पडतील हे बघायचे आहे. एकदा आयपीएल सुरू झाली की तिथे मग सर्वाँना हिरो बनवले जाणार आणि जनता विसरून जाते सारे. Happy

*हे सगळे ठीक आहे पण ह्याने मूळ प्रॉब्लेम कसा सॉल्व्ह होणार आहे नक्की हे कळत नाही. * - 100% सहमत.
विराट सारख्या प्रचंड मेहनती, अनुभवी व जागतिक दर्जाच्या फलंदाजाच्या एका प्राथमिक चूकीमुळे वारंवार बाद होण्याला सपोर्ट स्टाफला जबाबदार धरणं कितपत योग्य आहे ? कुटुंबाला दौऱ्यावर नेण्याचा व असल्या प्रचंड अपयशाचा खरंच कांहीं तडक संबंध असतो ? ..वगैरे, वगैरे !

आपलं क्रिकेट अति होतंय का, संघ निवडीचे आपले निकष व पद्धत यात दोष आहे का, विपुल प्रतिभा उपलब्ध असणं ही आपली समस्या ठरते आहे का, प्रभावी फिरकी गोलंदाजीचा अभाव व फास्ट गोलंदाजीवर पूर्ण विसंबून राहणं, जागतिक दर्जाच्या ऑल राऊंडरसचा अभाव असूनही त्यावर दिलेला भर इ. इ. प्रश्न वास्तविक खरे महत्त्वाचे असावेत.

सगळाच "आग सोमेश्वरी, बंब रामेश्वरी" प्रकार सुरू आहे.

आता डोमेस्टिक टूर्नामेंट मधे खेळचे पाहिजे हि दिक्कत लावली आहे. ती चांगली आहे हे नक्की पण तो आग्रह किती धेडगुजरी आहे. जेंव्हा आंतरराष्ट्रीय दौरे नसतील तेंव्हा हे असेच मधे अव्हेलेबल होणार नि खेळणार. रणजी संघाचा बॅलॅन्स घालवला जाऊ शकतो ह्याचे का ? रोहित अजिंक्यच्या हाताखाली असणार का ? रोहितच्या करंट फॉर्म वरून त्याला न सिलेक्ट करायचे स्वातंत्र्य अजिंक्यला असेल का ? समजा बुमरा फिट असता किंवा से आकश दीप जो निगल मधून जस्ट बाहेर निघाला आहे त्यांनी पण खेळायचे का ? सिराज सलग पाच टेस्ट खेळला आहे. तो इण्जर्ड झाला नाही हे नशिब पण त्याच्या वर्कलोअड च काय ? ते हैद्राबाद रणजी संघाने मॅनेज करायचे का ? पंत सलग पाच टेस्ट कीपिंग करत होता त्याने रणजी मधे पण करायचे का ?

संपूर्ण फॅमिली, प्रायव्हेट गार्ड वगैरे बद्दलचा मजकूर कोहली नि रोहित ला उद्देशून आहे हे उघड आहे. तसे असेल तर सरळ ते पुढच्या प्लॅन मधे कसे इंवॉल्व्ह्ड आहेत ह्याबद्दल का सुतोवाच करत नाही. किती दिवस फॅमिली न्या वगैरे मधे शिरण्यापेक्षा सगळ्या टीम अ‍ॅक्टिविटीज मधे १००% सहभाग पाहिजे असे साधी सोपी अट का घालत नाहीत ? फॅमिली असेल तरी टीम हॉटेल मधेच असू द्यावी असे बंधन घातले तर ते जास्त योग्य नाही का ?

ऑल्मोस्ट वर्ल्डकप ची च टीम चँपियन्स ट्रॉफी साठी निवडलीय. फक्त बुमराह, शामी, कुलदीप फिट नसतील तर अर्शदीप, पंड्या, जडेजा, अक्षर, सुंदर/राणा असा बॉलिंग अ‍ॅटॅक असेल.

वर्ल्ड कप फायनल वगळता सारे सामने जिंकलेले. त्यात ज्यांनी ज्यांनी योगदान दिले त्यांना कसे काय वगळणार? आणि कुठल्या आधारावर? कारण मधल्या काळात वन डे आपण फार खेळलोच नाहीत.

तुम्ही तसे म्हटलेय असे मी तरी कुठे म्हटलेय Happy
मला आधीच अंदाज होता की अशीच टीम असणार इतकेच म्हणायचे होते. कारण निवडकर्त्यांची विचार करायची पद्धत किंवा प्रोसेस अशीच असणार होती की हा आपला वर्ल्ड कपचा संघ होता आणि आता यात काय बदल करणे गरजेचे आहेत ते करूया.

आता त्यात सूर्या जाणारच होता तो गेला.
२०-२० चमकलेला आर्शदीप येणारच होता तो आला.
आणि ऋषभ पंत ची ब्रँड व्हॅल्यू पाहता तो सुद्धा थेट सिलेक्शन होता.

आणि ऋषभ पंत ची ब्रँड व्हॅल्यू पाहता तो सुद्धा थेट सिलेक्शन होता.>>>कायच्या काही. ब्रँड व्हॅल्यू आणि ICC CT चा काय संबध? मग सरळ शाखा आणि सलमानलाच घ्यायचे ना!

आर्थिक गणिते असतात केशवकूल.. नाहीतर विराट कोहली जसे गेले पाच वर्षे खेळत आहे निदान एक मालिकेसाठी किंवा एक सामन्यासाठी तरी कसोटी संघाबाहेर असता.
नुसते पूर्व पुण्याईवर कोणी पाच वर्षे टिकू शकत नाही.
रोहीत शर्माचा फॉर्म देखील गंडलेला असून तो संघात असणार हे उघड होते.
ऋषभ पंत देखील अपघातातून येऊन थेट 20-20 वर्ल्डकप याच आधारावर खेळला की त्याची कसोटीमुळे ब्रँड व्हॅल्यु भारी झाली आहे. ती कॅश केली जाते.
शुभमन गिल प्लेअर वाईट नाही पण त्याची ब्रँड व्हॅल्यू वाढावी यासाठी सुद्धा प्रयत्न चालू दिसतात. कारण शर्मा कोहली नंतर तशीच नावे हवीत. यशस्वी जयस्वालने ते नाव आता कमावले आहे. अर्थात वरचे देखील काही वशिल्याचे खेळाडू नाहीत. ते तसेच खेळले आहेत म्हणून त्यांचे तसे नाव झाले आहे. पण खेळायचे बंद झाले तरी त्यांना हलवता येत नाही अशी गोची झाली आहे.

Pages