चिनीमातीची भांडी - क्रॉकरी

Submitted by ऋतुराज. on 10 January, 2025 - 10:57

आपल्याकडे चहाचे कप, बश्या, प्लेट, वाडगे, चटण्या-लोणच्याच्या बरण्या अशी मोजकी चिनीमातीची भांडी असतातच. पण त्यात खूप वैविध्य असते. काही जणांकडे तर खूप सुंदर कलेक्शन असते.
तर चिनीमातीची भांडी - क्रॉकरी या विषयावर चर्चा करण्यासाठी हा धागा. शीर्षक चिनीमातीची भांडी असे असले तरी इथे तुम्ही माती, चिनीमाती, काच, बोनचायना, क्रिस्टल, रंगीत क्रिस्टल अश्या क्रॉकरीची चर्चा करू शकता आणि तुमच्याकडे असणाऱ्या क्रॉकरीचे फोटो टाकू शकता.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

जहाँ से कहानी शुरू हुई, त्याच पोस्ट नी सुरुवात करतो.

सुनो मेरी एक राय है
इश्क़ से बेहतर चाय है

IMG_7782.jpeg

वय वर्षे ७ Happy
Kisses given/ taken = about 3000 ❤

ती कपबशी पाहूनच कलिजा खलास झाला. आतल्या पदार्थाने तर ब्रह्मानंदी टाळीच Happy
कुठून आणलात असा भन्नाट रंग? कपबशीचा आय मीन Happy

धागा काढण्यासाठी धन्यवाद.
माझ्या विनंतीमुळे धागा काढला आहे तर फोटो तो बनता है.
IMG-20250111-WA0000.jpg
अनिंद्य तुमच्या कपा इतका सुंदर नसला तरी मला सुंदर वाटलेला डी मार्ट चा कप आणि त्यातला चहा जो मी आता पितेय.
वय वर्षे ६महिने
Kisses givan/takan=about 180 Happy

@ सिमरन solid coloured cups have a charm of their own.

तुमच्या माझ्या फोटोत मी lefty आणि तुम्ही right hand user स्पष्ट दिसते आहे - कपाचा कान बघा Happy

@ rmd, थँक्यू ! हा सेट सिनियर आहे घरात. त्याचे भाऊबंद निवर्तले आहेत, आता हे दोन कपल्स फक्त उरलेत:-)

@ कुमार हे टेराकोटा, फार छान सुगंध येतो यात ठेवलेल्या पाण्याला, विशेषत: नवीन असतांना.

तुम्हाला झब्बू देईन नंतर Happy

IMG-20220524-WA0001.jpg
हा dinner set आहे
त्यातली एक dish
IMG-20240109-WA0001.jpg
काचेचा कप चालेल का?
Screenshot_20241028_103814_Gallery.jpg
कॉफी मग
IMG-20200204-WA0001.jpg
वरच्या set मधली छोटी dish
IMG-20240203-WA0001.jpg
चहा चा ग्लास

किल्ली,
नुसते क्रॉकरीचे फोटो टाकायचे ना?
आता भूक चाळवली 😋

काचेचा कप चालेल का? >>>>> पळेल

चिनी मातीच्या वस्तू, क्रोकरी हा माझा वीक पॉइंट आहे. वेगवेगळ्या आकाराच्या /घाटाच्या आणि रंगाच्या मातीच्या (टेराकोटा, पोर्सेलिन, स्टोनवेअर, बोन चायना, ब्लॅक पॉटरी, खुर्जा पॉटरी) वस्तू खूप आवडतात. घरात जागा नाही म्हणून विकत कमी घेतल्या जातात. मी कुणाच्याही नव्या घरी जाताना शक्यतो पॉटरी गिफ्ट देते.
नवर्‍याच्या कामाच्या ठिकाणाजवळच भारतातले सगळ्यात मोठे चिनी मातीच्या वस्तू बनवणारे शहर आहे - खुर्जा. मला तिथे जायला खूप आवडते. माझ्या घरातल्या बहूतांशी वस्तू तिथूनच आणलेल्या असतात. तिथल्या किंमती बाजारातल्या पेक्षा निम्म्या किंवा त्याहूनही कमी असल्याने कुठेही दुकानात आवडलेली वस्तू खुर्जाला केवढ्याला मिळेल असा विचार डोक्यात येवून मग घेणे रद्द होते.
गेल्या महिन्यातच औरंगाबाद आणि पुण्याहून दोन मैत्रिणी आमच्याकडे दिल्लीला आल्या होत्या. एक दिवस त्या मुद्दाम खुर्जाला जावून भरपूर खरेदी करून आल्या.
IMG_20150808_213734.jpg
खुर्जातून घेतलेलं हे आमच्या घरातले पहिले भांडे, २५ वर्ष झालीत याला. या कढईचा आता एक कान तुटल्याने वापरात उरली नाही. हिची रवानगी क्राफ्ट कपाटात झाली आहे सध्या.

किल्ली तुझ्या काचेच्या मग सारखे दोन मोठे मग आहेत माझ्याकडे, सूप साठी वापरते मी ते कधीतरी.
नुसते क्रोकरीचे फोटो टाकायचे असतील तर वेगळं फोटोसेशन करावे लागेल.
IMG_20200628_215506.jpg
हा मी स्वतः बनवलेला ट्रे / प्लॅटर (हँडबिल्ड पॉटरी). काही वर्षांपूर्वी औरंगाबादला एका स्टुडिओमध्ये १० -१२ दिवस पॉटरी शिकायला गेले होते. व्हिलवर तर फक्त १-२ पणत्या आणि छोटे छोटे पॉट (अगदी एक फुल ठेवता येतील इतके छोटे) केले. पण हँडबिल्ड मध्ये हा ट्रे, एक मोबाईल ठेवायचे स्टँड, ३-४ ट्रिंकेट डिशेस केल्या होत्या.

इथे फार सुंदर सुंदर कलेक्शन येईल अशी अपेक्षा. मला मात्र क्रोकरीजचे फार काही शौक नाही आहेत. जिस मे मिला वो ठिक. खाना अच्छा होना चाहिए.
पण मॅगी मला मुलांच्या प्लेटमधूनच खायला आवडते. त्यातली ही एक माझ्या आवडीची Happy

IMG-20250111-WA0005.jpg

अरे वा, खूप सुंदर धागा .. सिरॅमिक पॉटरीज प्रचंड आवडतात.

कालच एका मॉल मध्ये खूप क्यूट टी सेट विथ किटली सेलला बघितले. मोह आवरेना

IMG-20240616-WA0006.jpg
.
IMG-20240702-WA0004.jpg
.
IMG-20240701-WA0010.jpg
.
IMG-20241014-WA0007.jpg
.
IMG-20241018-WA0000.jpg
.
IMG-20240519-WA0003.jpg
.
IMG-20240510-WA0004.jpg
.
IMG-20240510-WA0001.jpg
टिळा वाला कप
.
IMG-20240507-WA0000.jpg
सौदामिनी कप
.
IMG-20240504-WA0001.jpg
.
IMG-20240505-WA0001.jpg
सगळे photos माबोवर कुठे ना कुठे आधी upload केले आहेत हे.
Mostly खाऊगल्ली किंवा वाडा येथे असतील हे सगळे photo
आता नविन upload काहीच केलं नाही Happy
माझा आवडता असणारे हा धागा.
खूप आवडतात ceramics आणि काचेच्या वस्तू.
पण लहान मुले असल्यामुळे जास्त वापरता येत नाही.
आता हळूच plates वगैरे त्यांना वापरायला देणारे.
Risk तो लेनी पडेगी

अल्पना,
मस्तच. तुमच्याकडचे कलेक्शन बघायला फार आवडेल.
खुर्जा पॉटरी बद्दल ऐकून आहे.
पॉटरी वर्कशॉप्स बद्दल पण लिहा.
ऋSSन्मेष, तुमच्या मुलांची प्लेट पण मस्त आहे आणि ते chopsticks (?) पण.
किल्ली, तुमच्याकडचे कलेक्शन पण पाहिले आहे आणि आवडले आहे.
सौदामिनी कप>>>>> 🤣

मस्त धागा. मलाही सिरॅमिकचं वेड आहे. सिरॅमिकच्या वस्तूंचा नाद फार छान येतो.

मागे य वर्षांपूर्वी फळाफुलांचं प्रदर्शन VJTI मधे लागत असे. तिथे एक पॉटरीवाला होता. त्याच्याकडे ही देखणी प्लेट मिळाली. सिरॅमिकवर ग्लास ग्लेझिंग केलं आहे. वरची क्रोशेची फुलं मी केली आहेत. त्या फुलांच्या फोटोसेशन ही प्लेट प्रॉप म्हणून वापरली आहे. कमळाच्या पानावर ठेवलेली कमळं.

अजून दोन आहेत. एकत्रित फोटो नंतर टाकते. आत्ता न राहवून एक जुना फोटो टाकत आहे. कॉफी टेबलवर ठेवते या प्लेट्स आणि कोस्टर म्हणून वापरते.

20200228_093912.jpg

@ अल्पना,

.. मी स्वतः बनवलेला ट्रे / प्लॅटर (हँडबिल्ड पॉटरी) ❗️❗️❗️

Respect, with capital R.

तुम्ही खुर्जाला भेट देवून वस्तू घेवू शकता त्याचा हेवा वाटला. मी काही कुंड्या घेतल्या आहेत झाडांसाठी पिटुकल्या. खुर्जा मेड.

सुंदर कलेक्षन तयार होते आहे इथे !

… सिरॅमिकच्या वस्तूंचा नाद फार छान येतो.…

मामी, जियो ! फार कमीजण नोटिस करतात हे. You are precious !

यावरून पार्टी गेम्स मधे विचारलेल्या what is luxury life according to you?” या प्रश्नाला माझे उत्तर आठवले :

To live in a place where tinkle of champagne glasses is the loudest noice I hear.

ग्लासेस येतीलच इथेही, मग चियर्स करायला मी पुन्हा येईन.

किल्लीsssss...
हे सगळं बघून भूक लागली मला Angry

वाह हा धागा वेड लावणार आहे. निळ्या रंगाची कपबशी, टेराकोटाची भांडी!! अल्पना मेड भांडी. तिचा परिसर मला कायम जेलस फिल करवतो. Happy आता खुर्जात पण जीव अडकला.
किल्लीच्या घरी पण डल्ला मारायचा आहे. दरवेळी वेगळ्याच कपातून चा देते ती.
मला एकूणच चिनी मातीची भांडी आवडतात. टेराकोटा पण.

@अनिंद्य हो मी राईटी आहे ते कपाचं लेफ्ट राईट मी पण नोटीस केलेलं. आई लेफ्टी असल्यामुळे लेफ्टी गोष्टी बघायची सवय आहे त्यामुळे मी टाकलेल्या फोटो मध्येही लेफ्टी साइड दिसण्याची शक्यता आहे.
फक्त क्रॉकरी चे फोटो टाकायचे का?>>>>चालेल की पण जर का पदार्थासहीत असेल तर नजरेला मेजवानी.
ही अशी
आईस्क्रीम
IMG-20250111-WA0002.jpg
गुलाबजाम

IMG-20250111-WA0007.jpg
फ्रूट कस्टर्ड

IMG-20250111-WA0003.jpg
शिरखुर्मा

IMG-20250111-WA0006.jpg
फालुदा

IMG-20250111-WA0004.jpg

हा खालचा फोटो सेम दिसत असला तरी १२वर्षापूर्वीचा आहे आणि वरचा हल्लीचा ,फरक लक्षात येणं कठीण आहे पण काचेच्या क्रोकरी चं हेच वैशिष्ट्य आहे की ती कितीही जुनी असली तरी प्रत्येक वेळी नवीन वाटते.

IMG-20250111-WA0001.jpg

या धाग्यावर काचेची क्रोकरीच कशाला सुंदर दिसणारी मेलामाईन प्लास्टिक, सोन्या चांदी ची भांडी आली तरी चालतील.मस्त संग्रह होईल.

Pages

Back to top