Submitted by ऋतुराज. on 10 January, 2025 - 10:57
![](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/article_images/2025/01/11/Screenshot_20250111_123755_Gallery_0.jpg)
आपल्याकडे चहाचे कप, बश्या, प्लेट, वाडगे, चटण्या-लोणच्याच्या बरण्या अशी मोजकी चिनीमातीची भांडी असतातच. पण त्यात खूप वैविध्य असते. काही जणांकडे तर खूप सुंदर कलेक्शन असते.
तर चिनीमातीची भांडी - क्रॉकरी या विषयावर चर्चा करण्यासाठी हा धागा. शीर्षक चिनीमातीची भांडी असे असले तरी इथे तुम्ही माती, चिनीमाती, सिरॅमिक, काच, बोनचायना, क्रिस्टल, रंगीत क्रिस्टल अश्या क्रॉकरीची चर्चा करू शकता आणि तुमच्याकडे असणाऱ्या क्रॉकरीचे फोटो टाकू शकता.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
हे सर्व कसे सुचते?
हे सर्व कसे सुचते?
इथल्या कंपनी चा असर, दुसरे काय ?![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
.. कप निळे बोल निळे प्लेटाही
.. कप निळे बोल निळे प्लेटाही निळ्या..
This is way better !!![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
नीले नीले माबोपर प्लेट जब आए,
नीले नीले माबोपर प्लेट जब आए,![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
फ्रुटस छलकाए, सबके मनको जलाए
ऐसी कोई प्लेट हो
ऐसा कोई कप हो
प्यास आंखकी बुझा जाए
>>>>>>>इथल्या कंपनी चा असर, दुसरे काय ? Lol![Wink](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/wink.gif)
आम्ही बी घडलो
तुम्ही बिघडा ना
नभ निळे रात निळी प्लेटाही
नभ निळे रात निळी प्लेटाही निळ्या
झुलतो बाई सिरॅमिकचा झुला
अरे धमाल
अरे धमाल![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
>>>>>>>>>>मला पहिल्यांदा
>>>>>>>झुलतो बाई सिरॅमिकचा झुला
क्या बात!!
माझ्याकडे निळ्या डिझाईनचा
माझ्याकडे निळ्या डिझाईनचा सर्विंग डिशेसचा एक सेट आहे. पण त्याचा एकही फोटो सापडला नाही. आता नुसता फोटो काढून इथे देते.![mug_0.jpg](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/u1347/mug_0.jpg)
तोपर्यंत या एका मग चा फोटो. यात आतल्या बाजूला अल्टो लिहिलेलं आहे. भाऊ मारुती मध्ये नोकरीला असताना १५+ वर्षांपूर्वी त्याने अशा चार मग्ज चा सेट दिला होता, कंपनीतून मिळालेला.
मला हा रंगिबेरंगी मग खूप आवडतो. पण आकार मोठा असल्याने चहा -कॉफी ला फारसा वापर होत नाही. शिवाय आत अल्टो लिहिलेलं असल्याने पाहूण्यांना काही द्यायला पण वापरला जात नाही हा मग. मी मसाला दुध प्यायला आणि घरातले बाकीचे रोज दुध पिणारे मेंबर अधून मधून दुध प्यायला वापरतात. हल्ली हल्ली ग्रीन टी किंवा तसलाच एखादा काढा प्यायला पण वापरते मी कधीतरी. यातला एक मग आता माझ्या टेबलावर रंगीत पेंसिली ठेवायला वापरात काढलाय आणि दोन मग कामवालीला मुलांना दुधासाठी दिलेत.
या हाताने रंगवलेल्या कोस्टर्स ची फोटोग्राफी करतानाचा फोटो आहे.
कप मस्तय, अल्पना. पण कोस्टर्स
कप मस्तय, अल्पना. पण कोस्टर्स जास्त आवडले![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
कप व कोस्टर्स मस्त. खालचं
कप व कोस्टर्स मस्त. खालचं टेबलही क्युट.
हे कोस्टर्स विकण्यासाठी बनवले
हे कोस्टर्स विकण्यासाठी बनवले होते. एका वर्षी मैत्रिणीबरोबर रंगवलेल्या पणत्या, कोस्टर्स, ट्रे, मेणबत्त्या ठेवायला रंगवलेले छोटे शॉट ग्लास आणि कटिंग चहा चे ग्लास, रंगवलेले फ्रीज मॅग्नेट असलं बरंच काय काय बनवून दिवाळीच्या आधी एक स्टॉल लावला होता. बाकी बर्याच वस्तू विकल्या गेल्या. २-३ कोस्टर्स सेट उरले म्हणून मग त्यांचे फोटो काढले होते ऑन्लाइन विकायला. तरी विकले गेले नाहीत. मग गिफ्ट दिले खूप जणांना.![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
अजून एक नीलपरी
अजून एक नीलपरी
अल्पना, मग कोस्टर्स फारच गोड
अल्पना.... मग, कोस्टर्स आणि ट्रे सर्व गोड आहेत. हँडमेड वस्तूंचा स्टॉल लावलास हे फारच भारी आहे. अर्थात तू कलाकार आहेस हे माहीत आहे.
मामी, तुझ्याकडच्या या सगळ्या
मामी, तुझ्याकडच्या या सगळ्या सुंदर वस्तू पळवणार आहे मी![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
वस्तूंबरोबर मी असं पॅकेज डील
वस्तूंबरोबर मी असं पॅकेज डील आहे. चालेल का?
वस्तूंबरोबर मी असं पॅकेज डील
वस्तूंबरोबर मी असं पॅकेज डील आहे. चालेल का? >>> धावेल!![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
नीलपरी सुंदर !
नीलपरी सुंदर !
कशासाठी वापरता ?
कशासाठी वापरता ? >>> नेहमी
कशासाठी वापरता ? >>> नेहमी नाही वापरत पण कोणी जेवायला येणार असेल तर चपात्या यात ठेवते.
पण रस्सा भाजी इ देखील सर्व करता येईल.
काही सिरॅमिक मग्ज.
textured सिरॅमिक मग्ज
![IMG_20250201_090158_(1080_x_1080_pixel).jpg](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/u30013/IMG_20250201_090158_%281080_x_1080_pixel%29.jpg)
![IMG_20250201_090213_(1080_x_1080_pixel).jpg](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/u30013/IMG_20250201_090213_%281080_x_1080_pixel%29.jpg)
carved सिरॅमिक मग्ज
मस्त कोस्टर आवडले
मस्त कोस्टर आवडले
मामी मग सुंदर आहेत सगळ्यांचे टेक्श्चर आणि इंग्लिश कलर आवडले.
मग्ज छान. सुंदर ग्लेझ.
मग्ज छान. सुंदर ग्लेझ.
प्रत्येकाला अशा वेगवेगळ्या डिज़ाइनच्या कप्समधे काही सर्व केले तर माझ्या घरात किती दांगडो होईल ह्याचा विचार करूनच घाबरलो![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
मी mami's ceramic showroom /
मी mami's ceramic showroom / gallery असं गुगलून पाहिलं. नाही सापडलं.
अफलातून कलेक्शन आहे, मामी. हे आधी दाखवलं असतं तर "तर तो/ती कुठलं गाणं म्हणेल" च्या जुन्या सिझन्समध्ये योग्य बक्षिसं मागितली असती आम्ही. (आता हल्ली बरोबर उत्तराला बक्षिस देत नाही कुणी)
दांगडो >>> @अनिंद्य, कुठल्या
दांगडो >>> @अनिंद्य, कुठल्या भाषेतला शब्द आहे? मस्त आहे.
प्रत्येकाला अशा वेगवेगळ्या
प्रत्येकाला अशा वेगवेगळ्या डिज़ाइनच्या कप्समधे काही सर्व केले![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
मामी तुमचं घर कुठेय
आलेच चहा ला
धन्यवाद सिमरन, अनिंद्य, माधव
धन्यवाद सिमरन, अनिंद्य, माधव.
प्रत्येकाला अशा वेगवेगळ्या डिज़ाइनच्या कप्समधे काही सर्व केले तर माझ्या घरात किती दांगडो होईल ह्याचा विचार करूनच घाबरलो >>> : हाहा: पण असे एक घाट - वेगळे रंग, एक रंग - विविध टेक्श्चर्स एकत्र छान वाटतील. घेऊन, वापरून बघा.
मी mami's ceramic showroom / gallery असं गुगलून पाहिलं. >>>>. माधव ....
असा धागा काढला म्हणून माझ्याही लक्षात आलं की बरंच सिरॅमिक गोळा केलंय.
दांगडो गुजराथी शब्द वाटतोय.
दांगडो गुजराथी शब्द वाटतोय. खानदेशी असू शकतो.
हौशी आहेस.
---------
मामी मस्त कप्स गं. असं सुंदर असलं की चहा/कॉफी जास्त लज्जतदार बनते. मामी इज लिव्हिंग हर ड्रीम लाइफ
.. मी mami's ceramic showroom
.. मी mami's ceramic showroom / gallery असं गुगलून पाहिलं.…![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
दांगडो / दांगडू
दांगडो / दांगडू
कसा तोंडी बसला नाही माहित. आज दोनदा वापरला.
मराठवाडा / विदर्भ / जडगाव भागात लेकरं धिंगाणा- कल्ला करू लागली की आजी लोकं “दांगडो बंद करा“ असे ओरडत.
मराठीच असावा.
नीलकुमार, नीलवंती, नीलातै
नीलकुमार, नीलवंती, नीलातै येइनात कुणाच्याच ?
निळ्या आकाशातून जरा जमिनीवर
निळ्या आकाशातून जरा जमिनीवर येऊयात.....
![IMG_20250201_210250_(1080_x_1080_pixel).jpg](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/u30013/IMG_20250201_210250_%281080_x_1080_pixel%29.jpg)
![IMG_20250201_210257_(1080_x_1080_pixel).jpg](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/u30013/IMG_20250201_210257_%281080_x_1080_pixel%29.jpg)
फॅबइंडियातून घेतलेला केक स्टँड
दांगाडो खांदेशी शब्द आहे.
दांगाडो खांदेशी शब्द आहे.
Pages