चिनीमातीची भांडी - क्रॉकरी

Submitted by ऋतुराज. on 10 January, 2025 - 10:57

आपल्याकडे चहाचे कप, बश्या, प्लेट, वाडगे, चटण्या-लोणच्याच्या बरण्या अशी मोजकी चिनीमातीची भांडी असतातच. पण त्यात खूप वैविध्य असते. काही जणांकडे तर खूप सुंदर कलेक्शन असते.
तर चिनीमातीची भांडी - क्रॉकरी या विषयावर चर्चा करण्यासाठी हा धागा. शीर्षक चिनीमातीची भांडी असे असले तरी इथे तुम्ही माती, चिनीमाती, सिरॅमिक, काच, बोनचायना, क्रिस्टल, रंगीत क्रिस्टल अश्या क्रॉकरीची चर्चा करू शकता आणि तुमच्याकडे असणाऱ्या क्रॉकरीचे फोटो टाकू शकता.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

अरे यार काय सुंदर सुंदर वस्तू आहेत, मलापण टाकयचेत माझ्याकडचे फोटो पण समहाऊ जमतच नाहीये. मी जागूने सांगितलेल्या पद्धतीने फोटो अपलोड करायचे नेहमी, तसे केले तरी अपलोडच होत नाहीयेत Sad

वर्षा, मलाही माझे फोटो अपलोड करायला जमतच नव्हतं कारण फोटोची साईज खूप होती. मी हे एक https://www.image-size.com/ अ‍ॅप मोबल्यात डालो केलं. आपले काढलेले फोटो या चरकातून काढले की अपलोडचा गोड रस सिरॅमिकच्या मगात भरून पिता येतो.

>>आपले काढलेले फोटो या चरकातून काढले की अपलोडचा गोड रस सिरॅमिकच्या मगात भरून पिता येतो.

Lol
हे ट्राय करते.

मामी, उल्लू कसलं क्यूट आहे!! ताबडतोब ढापावंसं वाटतंय.

फोटो अपलोड करायला जमतच नव्हतं कारण फोटोची साईज खूप होती >>> मी स्क्रीनशॉट घेते आणि ते टाकते चक्क. जबरदस्त रिड्यूस होते साईज.

Happy फक्त पोस्ट करायच्या आधी अ‍ॅक्चुअल फोटो सोडून इतर स्क्रीनचा ऐवज आलेला असतो तो क्रॉप आऊट करायला विसरायचं नाही.

फोटोची size कमी करायला ते WhatsApp वर पाठवून मग तिथून डाउनलोड केले तरी जमते. Picture quality फारशी बिघडत नाही. असेच करतो.

कित्ती मस्त मस्त गोष्टी आहेत तुम्हा सगळ्यांकडे.
माझ्याकडे साधे चहाचे कप आहेत फक्त. काही वेगळे आहे का शोधते Sad

केक बहुदा पुढच्या रविवारी होईल. मग रेसिपी लिहिण्याचा प्रयत्न निश्चित करीन.

तोवर हा चहा घ्या - या फोटोत कुकीज़ नाहीत लक्ष divert करायला 😀

e879d0ab-4a5c-4214-8a54-13710337d5c0.jpeg

@ स्वस्ति, चहा चे कप खास नसतात का ? मला तर सर्वात जास्त रिस्पेक्ट त्यांच्याबद्दलच आहे. किती (चहा) करतात आपल्यासाठी Happy

… साय जमलेला चहा.…

फोटो काढण्याच्या नादात 😄

तरी बरे चहाकपात नाहीये; चहा कपात आहे

माझही लक्ष सायीमुळे divert झालंच Wink

चहाचे कप आहेत पण ते आपले सामान्य , विशेष नाहीत.
तरी टाकतेच काहीतरी आता.

मस्त सर्वांचे फोटो. माझ्याकडे पण बराच संग्रह आहे. पण कधी फोटो इथे टाकणे फार झाले नाहीये. प्रयत्न करून बघायला हवा.

मामी, घुबड भारी आहे.
अनिंद्य, बशी आवडली.
स्वस्ति, टाका फोटो, चहाच्या कप बशीत सुद्धा खूप व्हरायटी असते.

अनिंद्य,
किस किस का किस काउन्ट रखते हो? Light 1 Lol

बघा ना, आताचे टीन्स बॉडी काउन्ट सांगतात आणि मी कप बश्यांचे किस काउन्ट मोजतोय !

किस्मत की बातां रैती 🤣

अनिंद्य तुमच्या कपाला हा माझ्या कपाचा झब्बू याची बशी फुटलीय.

IMG_20250208_042930.jpg

पण खरंच क्लासिक कपबशी ला तोड नाही पूर्वी घराघरातून अशीच कपबशी असायची माझ्या गावी पण असेच छोटीशी पण जाड कित्येकदा हाताळलेली कपबशी होती म्हणजे सेट होता. घरचे बाहेरचे मिळून हजारों पटीत किसेस झाले असतील विशेष म्हणजे आमच्या घरात आजी जरी जुन्या विचाराची असली तरी आजोबा शिक्षक असल्यामुळे इतरांच्या घरी असलेला वेगळा कप आमच्या घरी नव्हता सगळं गाव मग तोकुठल्याही जातीधर्माचा असो (आमच्या गावात मुस्लिम धर्मीय लक्षणीय आहेत आणि त्यांचा आमच्या कडे राबता असायचा ते वेगळ्याच मराठीतून बोलायचे ऐकायला मजा यायची)सर्वांना त्याच कपातून चहा दिला जायचा. त्यात कोणताही भेदभाव नसायचा .
एकदम लहान असताना आमाला फुलपात्रातून( पेला)चहा दिला जायचा कप फोडतील म्हणून ,मला आठवतंय जेव्हा पावण्यांच्या घरी जेव्हा अश्या पांढऱ्या कपबशीतून चहा दिला जायचा तेव्हा बशीमधून फुंकर मारून पिताना त्यांच्या बद्दलचा आदर आणखी वाढायचा नसला तरी Lol

जेव्हा पावण्यांच्या घरी जेव्हा अश्या पांढऱ्या कपबशीतून चहा दिला जायचा तेव्हा बशीमधून फुंकर मारून पिताना त्यांच्या बद्दलचा आदर आणखी वाढायचा >>>>>> अगदी अगदी.

आधी असेल नक्षीचे कप बशा नसायचे. ते येवले चहा वाले देतात तसल्या घाटाचे. पण त्यातल्या त्यात जर त्याला सोनेरी कडा असली तर मग भाव वाढायचा.
अजून एक, त्या वेळी काही टिपिकल पणाफुलांच्या नक्ष्या, रंगसंगती असे. कालांतराने चहापावडर वर कप मोफत मिळू लागले.

बरोबर, चीनीमातीच्या कपबशीला बराच विरोध होता आधी. लोक धातूची भांडीच वापरायचे चहासाठी.

आज आपण वापरतो ते चहाचे कप आधी मुस्लिम घरांमधे आणि गोरे साहेबलोकांकडे आले. पुढे हिंदू श्रीमंत आणि मग सामान्य जनता असा त्यांचा प्रवास झाला आहे.

विशिष्ट जातींसाठी घरात सेपरेट कपबशी हे वास्तव माझ्या घरात नसले तरी भोवताली होते. टपरी-हॉटेल्समधेही. आमच्या उत्तरेतल्या नातेवाईकांकडे “ते” कप वापरकर्त्यांनीच स्वत: धुवून पुसून ठेवावे असा नियम होता.

उत्तर भारतात आजही मातीचे कुल्हड़ जास्त वापरतात त्याचा उगम आणि लोकप्रियता deep rooted जातीवादात आहे. स्वच्छतेचा मुद्दा, eco-friendly, दुसऱ्याने वापरलेला कप नको ही फक्त सांगायची कारणं Happy

सिमरन, त्या कपचा शेप छान आहे.

Pages

नवीन प्रतिसाद लिहा