Submitted by ऋन्मेऽऽष on 4 March, 2024 - 01:57
आधीचा धागा भरला म्हणून हा नवीन धागा.
नवीन प्रदर्शित होणार्या चित्रपटांच्या ट्रेलरवर चर्चा करायला हा धागा.
मराठी, हिंदी, ईंग्लिश तिन्ही भाषेतील चित्रपट याच धाग्यात चालतील.
चित्रपट प्रदर्शित झाल्यावर आणि बघितल्यावर मात्र चित्रपट कसा वाटला हा धागा वापरा
जुना धागा ईथे - https://www.maayboli.com/node/61689
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
शीर्षकातला प्रामाणिकपणा आवडला
शीर्षकातला प्रामाणिकपणा आवडला. एव्हढ्यासाठी बघायला हरकत नाही.
https://www.youtube.com/watch?v=BpY5X3xDj3Q
स्वप्निल जोशी आणि शिवानी
स्वप्निल जोशी आणि शिवानी सुर्वे बघून वाळवीचे वाईबस आले..
ऑफिस मीटिंगमध्ये असल्याने ट्रेलर म्यूट करून बघावा लागला पण थरारक आणि वेगवान दिसतोय
हो, पण नाव असलं ?
हो, पण नाव असलं ?
गुलाबजाम नावाचा एक सुंदर
गुलाबजाम नावाचा एक सुंदर मराठी चित्रपट होता.
जिलेबी सुद्धा लोकं तितकेच गोड मानून घेतील
आणि तसेही चित्रपट त्याच्या स्वताच्या नावावर नाही तर त्यातील कलाकारांच्या नावावर चालतो.
https://www.youtube.com/watch
https://www.youtube.com/watch?v=5K0Z2fC4wRQ
मु पो बोंबिलवाडी, नक्की बघणार.
(जिलेबी पाडली पेक्षा बोंबिल बरं आहे.)
कुणी पाहिला तर इथे (मायबोलीवर) लिहा.
प्रशांत दामलेचा नाटकात असतो
प्रशांत दामलेचा नाटकात असतो तसा रोल त्याला सिनेमात मिळत नाही.
सुरूवातीच्या काही सिनेमात त्याला वाया घालवले आहे. त्या वेळी लक्ष्मीकांत बेर्डे साठी जे रोल असायचे त्याच पद्धतीचे रोल विजय कदम, विजय चव्हाण, विजय पटवर्धन आणि प्रशांत दामले यांच्याही वाटेला यायचे.
बोंबिलवाडी नाटक पाहिलं होतं -
बोंबिलवाडी नाटक पाहिलं होतं - आवडलं होतं. हा सिनेमा चांगला असेल असं वाटतं आहे.
बोंबील या नावातच कोकणाचा
बोंबील या नावातच कोकणाचा गोडवा आहे. ज्या समोर हलवायाचे अख्खे दुकान फिके आहे. तिथे साधी जिलेबी कुठे तुलनेला घेता
मु पो बोबिलवाडीचा ट्रेलर
मु पो बोबिलवाडीचा ट्रेलर आवडला पण मराठी सिनेमाचे ट्रेलरच भारी आणी मुव्हि बघायला गेल्यावर फुस्स हे इतक्यातल्या इतक्यात भर्पुर अनुभवलय त्यामुळे हा तसा नसावा हिच इच्छा आहे...दामले आवडतातच!!
मस्त ट्रेलर आहे मुफासाचा .
मस्त ट्रेलर आहे मुफासाचा . शाहरुखचा आवाज सूट होतोय
.
A King's story in the King's voice - मुफासा !
टिझर खास वाटला नव्हता पण
सन्गित मानापमान टिझर खास वाटला नव्हता पण ट्रेलर चान्गला वाटतोय, तरी नेहमिप्रमाणे मराठी मुव्हिजचा प्रॉब्लेम ट्रेलर मधेच स्टोरी सान्गुन टाकलिये( अर्थात मानापमान ची स्टोरी सगळ्याना माहित आहे, पॉप्युलर नाटक आहे)
वैदेही गोड दिसलिये...
भव्य दिव्य म्हणजे भन्साळी स्टाइल एकसारख्या ड्रेस मधले नर्तक बाजुला हे समिकरण झालेल दिसतय..
बेला शेडे एका गाण्यात दिसली...छान दिसतिये.
एक दोन गाणी एकली आणी बघितली ती चान्गली वाटली...रुतु वसन्त चा ठेका छान आहे पण त्यात शन्कर महादेवन कट्यार च्या गेट अप मधेच आहेत.
सगळ्यात जास्त खटकतात ती म्हणजे सुभा आणी सुमित राघवन दोघाची वाढलेली वय अगदी निटच दिसुन येतायत...त्यातल्या त्यात सुमित राघवन तर जास्तच.
हो हल्ली सुमीत च्या eye bags
हो हल्ली सुमीत च्या eye bags मुळे त्याचा लूक विचित्र दिसतोय.
साराभाई मध्ये काय गोड दिसलाय
मानापमानचा ट्रेलर बघितला.
मानापमानचा ट्रेलर बघितला. सुबोध आणि सुमीतऐवजी दुसरे कोणी जरा तरूण अभिनेते हवे होते. दोघेही त्या हिरॉइनचे बाप किंवा काका वाटतात
नाटकातील 'खरा तो प्रेमा' हे पद माझ्यामते सर्वात सुरेख आहे. ते चित्रपटात घ्यायला हवे होते. 'युवतीमना' ही वगळले आहे. मूळ नाटकाची कथा चित्रपटात बरीच बदललेली आहे. नव्या गाण्यांपैकी एकही पटकन लक्षात राहात नाही. त्यापेक्षा कट्यारची नवी गाणी खूपच सरस होती.
सुमीत राघवन किती वयस्कर
सुमीत राघवन किती वयस्कर दिसतोए...
सुबोध ते डोक्याला जे बांधलाय आणि दाढी यामुळे थोडा तरी कमी वयाचा वाटतोय सुमित पेक्षा
फसक्लास दाभाडे https://youtu
फसक्लास दाभाडे https://youtu.be/gFDkNtyMLc0?si=X9YQYiZgvuZ03pxP लेखक आणि दिग्दर्शक हेमंत ढोमे आहे.
प्रोमो इंटरेस्टिंग वाटतोय.
मलाहि आवडला ट्रेलर !
मलाहि आवडला ट्रेलर ! क्षितीची ठसकेबाज भुमिका मस्त वाटतेय.
SuperMan चा ट्रेलर पाहिला
SuperMan चा ट्रेलर पाहिला नसेल तर बिलकुल पाहू नका
फार बोर वाटला
https://www.youtube.com/watch
https://www.youtube.com/watch?v=hWBdGt_CaZM
बॅडअॅस रवीकुमार! २०२५ चा सर्वात भारी पिक्चर!
फा, कोई शक...
फा,
कोई शक...
मेरे संस्कारों में मुझे मरनेकी इजाजत है
डरनेकी नहीं...
तुम्हा दोघांच्या पोस्टी
तुम्हा दोघांच्या पोस्टी सिरियसली घेऊन मी लिंक क्लिक केली. करवत, आयाळ, लेदर लेवून हाही सॅवेजबिवेज झाला आहे.
अरे काय!!! डायरेक्ट हॅक सॉ….
अरे काय!!! डायरेक्ट हॅक सॉ….
खतरनाक आहे ट्रेलर. फा,
खतरनाक आहे ट्रेलर. फा, अस्मिता, पायस वगैरे मंडळी तयारीत रहा प्लीज.
हाही सॅवेजबिवेज झाला आहे
हाही सॅवेजबिवेज झाला आहे
>>
जुना टीझर
https://youtu.be/KauGU5HIm_I?feature=shared
बटरफ्लाय तितलिया
https://youtu.be/R8NH83jasqo?feature=shared
बॅडअॅस रवीकुमार! ->हा हा हा.
बॅडअॅस रवीकुमार! ->हा हा हा.... शोल्लिड्च आहे.
जिलबी-https://youtu.be/H
जिलबी-
https://youtu.be/H_x3iuXKcMw?si=LlldigmlzbAjLo_t
ट्रेलर एकदम सगळ्या थ्रिलर चे चेक्मार्क टिक करणारा दिसतोय. पण ऐतिहासिक, आधुनिक, पौराणिक काहीही सिनेमा असो स्वजो, सुभा, प्रसाद ओक ही तीच तीच माणसं सगळीकडे बघून फार कंटाळा येतो. मराठीत कोणी इतर चेहरे नाहीत का?
मराठीमध्ये कॉप universe आणणार
मराठीमध्ये कॉप universe आणणार आहेत म्हणे.. त्यातला दिसतोय
करवत, आयाळ, लेदर लेवून हाही
करवत, आयाळ, लेदर लेवून हाही सॅवेजबिवेज झाला आहे. >>> आयाळ
मेरे संस्कारों में मुझे मरनेकी इजाजत है
डरनेकी नहीं... >>> हो ऐकला हा डॉयलॉग. सलीम जावेदचा संवाद दिल चाहता है मधला सुबोध म्हणतोय असे वाटते ऐकताना. एक गरिबांचा हायझेनबर्गही दिसला ट्रेलरमधे.
"जिलबी" बद्दलः
ओह त्या पिक्चरचे नावच जिलबी आहे! आधी मला वाटले मैत्रेयी ने चित्रपटकर्त्यांनी नेहमीची एखादी ममव जिलबी टाकण्याबद्दल लिहीले आहे किंवा "गुलाबजाम"चा पुढचा भाग.
यात प्रसाद ओ, स्वप्नील जे, शिवानी एस अशी सगळे साउथ मधून आल्यासारखी नावे का दिली आहेत माहीत नाही. पण तरीही शिवानी सुर्वे असल्यामुळे पाहणार. वाळवीमधे मस्त होती ती
कंटाळा येतो. मराठीत कोणी इतर
कंटाळा येतो. मराठीत कोणी इतर चेहरे नाहीत का?>>> आदिनाथ कोठारे, महाजनी वगैरे आहेत पण अभिनय यथा तथा. स्वप्निल जोशी, सचिन ह्यांना बघण्यापेक्षा मग सुभा, प्रसाद ओक परवडले.
वैभव तत्ववादी चांगला अॅक्टर
वैभव तत्ववादी चांगला अॅक्टर आहे. पण दिसत नाही जास्त सिनेमांमधे.
Pages