क्रिकेट - ९

Submitted by ऋन्मेऽऽष on 3 January, 2025 - 02:37

२०००+ पोस्ट झाल्या म्हणून नवीन धागा

बॉर्डर गावस्कर ट्रॉफीचा निर्णायक धुमाकूळ इथे घालूया Happy

क्रिकेटचा मागचा धागा ईथे बघू शकता
https://www.maayboli.com/node/83589

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

राहुल कडून मला अश्या वेळी अपेक्षा कमीच असते. तो अन्डर प्रेशर कचखाऊ आहे.
यशस्वी गेला तो धक्का ठरेल. बोलंड बेकार आहे.
कोहलीने लगेच जाऊ नये. काही धावा करून जावे. खेळला आणि हिरो बनला तर उत्तमच.

>>ते नसतानाही सेहवाग तसाच खेळायचा. किंवा खेळला असता कारण. त्याचा गेमच तसा होता.
तुला मुद्दा समजला नसावा मित्रा..... त्याचा गेमच तसा होता हे जगन्मान्य आहे आणि त्याचे क्रेडीट काढून कुणीही द्रवीड, तेंडूलकरला देत नाहिये Wink पण बाकी लोक सातत्याने भरवश्याचा खेळ करत असतील तर एखादा बेदरकार खेळाडू परवडतो!! इथे सगळेच बेदरकार (किंबहुना बेजबाबदार) खेळत असताना पंतने नॅचरल खेळाची मोकळीक घेणे (विशेषत: चांगले जम बसऊन विकेट फेकणे) लोकांच्या डोळ्यावर येणारच असा अर्थ होता
सेहवागचे नशीब चांगले की त्याच्या आजूबाजूला भरवश्याचे प्लेयर्स होते असे प्लेयर्स येत्या काळात पंतच्या नशिबी यावेत अश्या शुभेच्छा!!

कोहली गेलाच.

शुभमन देखील खराब शॉट खेळला.

चौथ्या डावात पिच बॅटिंग साठी खराब होणार असा अंदाज असताना अन् ऑलामोस्ट अडीच दिवस खेळ बाकी असताना आज फारशा विकेट न घालवता जम बसवून घ्यायचं अन् उद्या जरा जलद धावा करून कांगारूंना साधारण 100 ओव्हर्स मधे 350 - 400 चं टार्गेट द्यायचं असा अप्रोच का नसावा??

विकेट गेल्या तर गेल्या, आजच जे काय होईल ते होईल या इराद्याने टी20 स्टाईल बॅटिंग करण्यात काय हशील???

सेहवाग बेदरकार ओपनिंग करायचा. जरी लवकर आऊट झाला तरी पुढे जवाबदारी नी खेळायला द्रविड सचिन लक्ष्मण दादा होते.
पंत ऑलरेडी किमान 3 विकेट गेल्यावर येतो. त्यावेळी परिस्थिती नुसार खेळ करण्याची अन् गरज असेल तर नॅचरल गेम ला मुरड घालून खेळायची अतिरिक्त जवांबदारी त्याच्यावर आहे (जी सेहवाग वर नव्हती). त्यामुळे पंत अन् सेहवाग ची तुलना होत नाही.

पँटची फटकेबाजी बघायला टीव्ही लावला, तर तो दिसतच नाहीए.

रोहितभाऊ चिडलेले दिसतात. मुलाखतीदरम्यान त्यांना चिथावलं जातंय हे उघड दिसत होतं. मी पुन्हा येईन असं त्यांनी म्हटल्यावर त्या दोघांनी खदाखदा हसून दाखवलं. आणि त्या क्लिप्स पुन्हा पुन्हा दाखवल्या जाताहेत.
दुसरीकडे पेपरात बातमी आहे की ऑस्ट्रेलिया दौर्‍यानंतर त्यांचा कसोटीसाठी विचार केला जाणार नाही.

“ आज फारशा विकेट न घालवता जम बसवून घ्यायचं” - जम बसवून खेळण्यासारखी विकेट वाटत नाहीये. स्पाँजी बाऊन्स, लॅटरल मूव्हमेंट, आजूबाजूला असलेलं भरपूर गवत - ज्यामुळे बॉल लवकर खराब होत नाही- अश्या परिस्थितीत कुठल्याही बॉलवर विकेट जाऊ शकत असल्यामुळे १७५-२०० च्या आसपास टारगेट सेट करून ऑस्ट्रेलियाला चॅलेंज करण्याचा प्लॅन असावा.

>>तुम्ही माझाच मुद्दा लिहिला आहे.
"ते नसतानाही सेहवाग तसाच खेळायचा. किंवा खेळला असता" या एका वाक्यामुळे सोललेल्या संत्र्याचे ज्यूस काढून द्यायला लागले

>>त्यामुळे पंत अन् सेहवाग ची तुलना होत नाही.
तशी डायरेक्ट तुलना वेगवेगळ्या काळात आणि वेगवेगळ्या परिस्थितीत खेळलेल्या कोणत्याच खेळाडूंमध्ये होऊ शकत नाही.... आणि इथेही कुणी केलेली नाही.... सहवागचे उदाहरण यासाठी की त्यालाही त्याचा नॅचरल गेम सोडून परिस्थितीनुरुप खेळायचे सल्ले मिळायचे.... तो या कानाने ऐकून त्या कानाने सोडून द्यायचा आणि मजेत शीळ घालत किंवा गाणे गुणगुणत बिनधास्त चेंडू भिरकावून द्यायचा!!
तसे करणे पंतला तेंव्हाच परवडेल जेंव्हा वरचे सातत्याने चांगला आणि भरवश्याचा खेळ खेळत धावांचा डोंगर उभारतील.... असो!!

सध्यातरी तो त्याच्या नॅचरल खेळाला मुरड घालताना दिसत नाही..... गंभीरने काय स्ट्रॅटेजी ठरवलीय काय माहित!!

या देशात ऋषभ पंत होणे अवघड आहे हेच खरे Happy

या कसोटीत पंतचे दोन्ही डावात मिळून शतक झाले Happy

बॉल सोडून जसा जुना केला जातो तसा तो फोडून सुद्धा जुना केला जातो Happy

निर्णायक सामना आणि चुम्मा हे एक डेडली कॉम्बिनेशन आहे Happy

माझी कालची पोस्ट बघा

मला खूप आतून असे वाटत आहे की मी अशाप्रकारे खेळू शकतो हे त्याने पहिल्या इनिंगला दाखवून दिले. पण दुसऱ्या इनिंगसाठी एक पंत स्पेशल इनिंग लोड होत आहे Happy
बोलो आमीन !
Submitted by ऋन्मेऽऽष on 3 January, 2025 - 21:56

पँटची फटकेबाजी बघायला टीव्ही लावला, तर तो दिसतच नाहीए.
>>>>

पंत माझा आवडता खेळाडू म्हणून मुद्दाम पँट लिहिले आहे का भरत ?
तसे नसल्यास संपादीत करू शकता..
असल्यास फार वाईट.. भारतासाठी जीव झोकून खेळणार्‍या एका खेळाडूला चिडवण्यात काय मजा नाही.

असो, आज हायलाईटस बघा.. धमाल ब्लॉक बस्टर मूवी मजा येईल.

१३७-६
आणि हे म्हणे २५० चं टार्गेट देणार !
तो हनुमा विहारी पण चांगला खेळला असता.

अप्रतिम चेंडूवर बाद झालेला एक ही भारतीय खेळाडू नाही दिसला मला तरी Sad

२५० टारगेट गरजेचे नाही. पहिल्या इनिंग १८५-१८० अश्याच आहेत इथे. ऑस्ट्रेलिया सुद्धा बाद झालीच आहे ना स्वस्तात.

बूमराह उद्या नसेल तर सोडा सामना..
पण तो असला तर १८० ला गेम फुल ऑन आहे.

पंतची उच्च दर्जाची प्रतिभा, जिगर, जिद्द याबद्दल दुमत नाही, त्याच्या भरीव कामगिरी व उपयुक्ततेबद्दलही शंका नाही. पण, तो संघातला टॉप स्कोरर असतो, त्याला आणखी सुधारण्याची गरजच नाही, असा सूर लावणं किंवा तसं सुचवण हे त्याचंच अहित करण्यासारखं आहे. Legend, GOAT होणं म्हणजेच सतत व दीर्घ काळ स्वतः त सुधारणा करत राहणंच. स्वतःच्या खेळाला कुठे व कधी मुरड घालायची हे उमजून तसा खेळ करणं ही एक त्या मार्गातली महत्त्वाची सुधारणा आहे, असं माझं मत.

त्याला आणखी सुधारण्याची गरजच नाही, असा सूर लावणं किंवा तसं सुचवण हे त्याचंच अहित करण्यासारखं आहे.
>>>>>

सुधारणेची गरज जर कोहलीसारख्या फलंदाजाला कारकिर्दीच्या या टप्प्यावर भासत असेल तर एखाद्या ऋषभ पंतला नाही असे म्हणने मुर्खपणाचे ठरेल. किंबहुना मीच बरेचदा तो त्याच्या प्रतिभेला न्याय देणारे खेळला नाही तर वैतागून त्याने अमुक तमुक करायला हवे असे सुचवत राहतो. जसे याच मालिकेत त्याचा स्टुपिड शॉट, किंवा पहिल्या कसोटीत दुसर्‍या इनिंगला गेम आता जिंकलोच आहोत असे समजून लायनला सुरुवातीलाच पुढे सरसावत विकेट फेकणे, तिसर्‍या कसोटीतच एक सेशन ईतके छान खेळून काढल्यावर गाफील होत आपल्या विकेटवरचा प्राईज टॅग काढून फेकणे..

पण या कसोटीत मात्र तो कमाल खेळला. आज त्याच्या कॅलक्युलेट फटक्यांचीच हवा होती. ईरफान पठाण आणि ईतर कॉमेंटेटरच नाही तर गावस्कर सुद्धा कौतुक करताना थकत नव्हता.

बाकी आपल्या कॉमेंट काय त्याचे हितअहित करणार. तो पंत आहे. जेव्हा तो गेम स्वता रीड करून आपल्या मनाने खेळतो तेव्हा तो नेहमीच बेस्ट खेळतो.:)

*..तर एखाद्या ऋषभ पंतला नाही असे म्हणने मुर्खपणाचे ठरेल.* -
तो कमाल खेळाडूच आहे, हे नाकारणे हा माझाही मूर्खपणाच ठरेल ! Wink

पूर्ण भारतीय संघाच्या खेळाचे अवलोकन करताना, जर पंतला त्याची खेळी सुधारण्याची गरज आहे या मागणीबद्दल आपण एवढे आक्रमक असू तर इतर ८ ( बुम्हरा आणि जयस्वाल वगळून) खेळाडूंना संघाच्या बाहेरचा रस्ता दाखविण्याच्या मागणीबद्दल ही आपण तितकेच आक्रमकपणे, वारंवार, आणि अधिक प्राधान्याने बोलले पाहिजे असे माझे मत आहे, पण निरीक्षण दुर्दैवाने याच्या अगदी उलट आहे आणि माझा आक्षेप त्याला आहे. Angry

*दुर्दैवाने याच्या अगदी उलट आहे आणि माझा आक्षेप त्याला आहे.* - अपेक्षाभंगाच्या दुःखातून येणारा राग ज्याच्याकडून अपेक्षा असतात त्याचाच येतो!!

भाऊ
अगदी खर सांगा. उद्या काय होईल? काय अंदाज आहे आपला. भल्या पहाटे उठावे काय?

राग ज्याच्याकडून अपेक्षा असतात त्याचाच येतो!!
+७८६

गावस्कर त्या दिवशी stupid shot बोलत त्याच्यावर चढलेला. जे योग्यच होते. सर्वांच्याच भावना होत्या त्या. पण आज त्याचे कौतुक करताना थकत नव्हता. त्याने कशी calculated risk घेऊन शॉट मारले म्हणत त्याच्या एकूण एक शॉटचे विश्लेषण करत होता.

बोलंड ची लेन्थ predictable होती तर त्याला पुढे येऊन मारत होता. तो त्यांचा आजचा मेन बॉलर असल्याने त्याची लेंथ बिघडवणे गरजेचे होते. तेच कमिन्स आणि वेबस्टर यांना जागेवरून खेळत होता. स्टार्कच्या अँगलचा फायदा उचलत त्याला लेगला सिक्स मारले जी त्याची स्ट्रेंथ आहे.
एक किस्सा स्टम्प माईक मध्ये रेकॉर्ड झाला तो असा की त्याने जडेजाला विचारले की बॉल कुठल्या स्टम्पवर येत आहे. जडेजाने इशार्याने दाखवले आणि त्याने पुढच्याच बॉलला कटचा फटका मारला. मग त्याच लेंथचा बॉल बॉलवर येत लेगला पुल मारला. मग आता बॉल पुढे येणार याचा अंदाज बांधून स्टेप आऊट करत कवर मधून चौका मारत फोरची हट्रिक केली.. कमाल मेथड फटकेबाजी होती.
आऊट झाला तो बॉल सुद्धा कटचा होता. शॉट चुकला नव्हता. पण एक्झिक्युशन झाले नाही. जे होणे सोपे नव्हतेच. कारण या खेळपट्टीवर दोन्हीकडच्या फलंदाजांना फटके मारणे आणि उभे राहणे दोन्ही अवघड जात होते. याने दोन्ही इनींगला दोन्ही करून दाखवले.

पंत खेळतो ६०=७० धावा करतो. क्वचित केव्हातरी शतकही ठोकतो.
हे पाहून माझा देवावरचा विश्वास वाढला.

अपेक्षाभंगाच्या दुःखातून येणारा राग ज्याच्याकडून अपेक्षा असतात त्याचाच येतो!!>>>>अपेक्षा ठेवणे चुकीचे नाही आणि अपेक्षाभंगाने दुःख होणे ही स्वाभाविक आहे पण ज्याने त्यातल्यात्यात बरी कामगिरी केली त्याच्यावरच अपेक्षाभंगाचा राग काढणे हे चुकीचेच आहे. एका कडूनच सर्व अपेक्षा ठेवून, अपेक्षाभंग झाल्यावर त्याला बोल लावायचे आणि इतर उंडग्यांना मोकळे रान द्यायचे, हे जो बऱ्यापैकी आऊटपुट देतो त्याच्यावर अन्याय करणारे नाही का?? आणि असे वर्तन, अपेक्षा ठेवणाऱ्यांच्या एकूण मानसिकते बद्दल काय सांगते?
पंतला त्याच्या एकूण सुमार कामगिरीबद्दल संघाबाहेर काढले तरी मी त्याचे स्वागतच करेन पण त्याच्या आधी इतर बऱ्याच खेळाडूंच्या कामगिरीचेही याथायोग्य पोस्टमॉर्टेम व्हायला हवे हे ही तेवढेच नक्की.

*अगदी खर सांगा. उद्या काय होईल? काय अंदाज आहे आपला. भल्या पहाटे उठावे काय?* - मी हल्ली आपल्या शेपटाबद्दलच अधिक आशावादी आहे; उद्या सामना रंगतदार होईल ही रास्त अपेक्षा व आपण सरस ठरू हा वाजवी आशावाद ! पहाटे उठण तर आलंच !! ( ऑसिजच्या पहिल्या डावात विकेटमागचे झेल आपण ज्या तडफेने घेतले, ते बघून आशावाद अधिकच बळावला आहे !)

खरं बोलायला सांगावं लागतंय तुम्हाला, हे लक्षात येतंय ना तुमच्या ! उद्या कामवाल्या बाई येणार नाहीत म्हणून सकाळी लवकर उठणार आहात, हे सांगा
त्यांना !!
IMG_20250104_103150_0.jpg

गावस्कर त्या दिवशी stupid shot बोलत त्याच्यावर चढलेला. जे योग्यच होते.>>>> ही गिऱ्हाईक पाहून पुड्या बांधणारी जमात आहे....आणि हेच कशाला जवळजवळ सर्वच जण खेळाडूंनी आधी केलेल्या विक्रमांचे गाठोड्यांचे वजन घेवून त्याच्या वर्तमानातील कामगिरीचे विश्लेषण आणि त्यावर भाष्य करणार, त्यामुळेच मला ऑस्ट्रेलियन क्रिकेट याबाबतीत नेहमी उजवे वाटत आले आहे, त्यांच्यात हाडामासाच्या माणसाला देवत्व बहाल करुन ध्रूवपद देण्याची चढाओढ लागलेली नसते... आज परफॉर्मन्स द्या उद्या साठी स्थान पक्के करा असा सरळ हिशेब.

भाऊ! Lol
फार्स विथ द डिफरंस
त्यांच्यात हाडामासाच्या माणसाला देवत्व बहाल करुन ध्रूवपद देण्याची चढाओढ लागलेली नसते>>>अगदी अगदी.

Pages