क्रिकेट - ९

Submitted by ऋन्मेऽऽष on 3 January, 2025 - 02:37

२०००+ पोस्ट झाल्या म्हणून नवीन धागा

बॉर्डर गावस्कर ट्रॉफीचा निर्णायक धुमाकूळ इथे घालूया Happy

क्रिकेटचा मागचा धागा ईथे बघू शकता
https://www.maayboli.com/node/83589

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मी पैला.
आज ज्रिकेटच्या इतिहासात प्रथमच नॉन स्ट्रायकर एंडच्या फलंदाजाला सेंड ऑफ दिला गेला, (असे नेटवर वाचल)

निर्णायक सामन्यात पंत खेळतोच हा इतिहास आहे.
लो स्कोरिंग सामन्यात पंत सर्वाधिक धावा करतो हे सुद्धा वारंवार घडते.
पहिली कसोटी आपण १५० ला बाद होत जिंकली होती.
या कसोटीत सुद्धा ती संधी कायम आहे. उद्याचा दिवस ठरवेल कसोटी कुठे जातेय.

ही जी*उद्याचा दिवस ठरवेल कसोटी कुठे जातेय.* - हो, पण कुठे पोहचेल, हे मात्र उद्याच काय नंतरही सांगणं कठीण !! आपली पोरं शैलीदार, प्रतिभावान आहेत , अफलातून खेळ करू शकतात पण सातत्य व चिकाटी यात कमी पडतात. म्हणून जरा चिंता !

आपली बॅटिंग आली की खुशाल देवळात जावून देवासमोर बसा. पण, तिथून फोनवर सारखं मला " किती पडल्या ? " असं मात्र विचारत नाही राहायचं !!footbolar.jpg

भाऊ तुम्ही आपली पोर आपली पोर म्हणून सगळ्याना लाडावून ठेवले आहे.
मी ज्या कन्सल्टिंग कंपनीत कामाला होतो तिथे एक विनोद फार प्रसिद्ध होता/ आहे. पण तो अश्लील असल्याने इथे लिहिणार नाही. एव्हढेच लिहितो कि त्या पोरांच्या कानात गंभीरने सांगायला पाहिजे, "पोरांनो, तुम्हाला ऑस्ट्रेलियात सेरीज जिंकायला पाठवले आहे...."

*आपली पोर म्हणून सगळ्याना लाडावून ठेवले आहे.* - त्या पोरांना सतत धारेवर धरणारे अगणित आहेत, म्हणून मी जरा बॅलन्स करायचा प्रयत्न करतो इतकंच ! Wink
* पोरांच्या कानात गंभीरने सांगायला पाहिजे, * - आधी गंभीरच्याच कानात कुणीतरी ओरडून सांगायला पाहिजे "अरे, इतका चांगला संघ दिलाय तुला, जरा त्याला मोटिव्हेट कसं करायचं तें बघ किंवा विचार द्रविडसारख्या कुणाला तरी !"

भाऊ Lol

त्या पोरांना सतत धारेवर धरणारे अगणित आहेत
>>>>
माझ्यासारखे सांभाळून घेणारे सुद्धा काही आहेत.
आणि याची फार गरज वाटते मला आजच्या काळात..
का ते स्वतंत्र धाग्याचा विषय आहे.

एवढे सर्व सव्यापसव्य करण्यापेक्षा जय शाहंनी जातीने यात लक्ष घातले असते तर आपल्याला हवे ते घडून येणे कठीण होते का? त्यांच्या पिताश्रींचा देशात इतक्या निवडणुका घडवून आणतांना आलेल्या अनुभवाचा फायदा आपण नाही तर कुणी उचलायचा? लोकांना सामना झाला हे दिसणे महत्वाचे आहे मग ते क्रिकेट असूदेत की निवडणूका. कदाचित जय शाहंना टेस्ट क्रिकेटच्या इतक्या लोकप्रियतेची कल्पना नसावी.... WTC फायनल च्या दृष्टीने जनतेने पुरेसा रोष दाखवला तर या वेळी नाही तर २०२७ ला तरी जिंकूच, आता नियम तर आपल्याच हातात आहेत, हवे तसे वाकवू...हाकानाका... Rofl

पंतचा केविलवाणा खेळ बघून त्याच्याशी परत "हॉनेस्ट टॉक" करायची गरज गंभीरला भासली पाहिजे. तुमच्याकडे एक प्लेयर आहे जो गेम ओपोझिशन बॉलरस कडे नेऊ शकतो. त्यांछ्यावर प्रेशर आणू शकतो त्याला त्याचा नॅचरल खेळ एव्हढा बदलायला सांगणे कितपत योग्य आहे ? ह्या पिचवर नुसते डीफेन्स केल्याने कधी ना कधी विकेट जाणार हे उघड नव्हते का ? बुमरानि प्रसिद्ध ने थोड्या काळाअवधीसाठी पट्टा फिरवल्यावर फिल्ड्स सेटींग पटकन बदलली गेली ना ?

*...गेम ओपोझिशन बॉलरस कडे नेऊ शकतो. त्यांछ्यावर प्रेशर आणू शकतो त्याला त्याचा नॅचरल खेळ एव्हढा बदलायला सांगणे कितपत योग्य आहे ? * - असमिजी, पण याला दुसरी बाजूही आहेच ना - 50- 4 स्कोअर जर नॅचरल खेळ केल्याने 50-६ झाला तर नंतरचे फलंदाज त्या दबावाखालीच पटापट बाद होतील ना . (बुमराह व प्रदिद्धने त्यांच्या क्रमांकावर फटकेबाजी करणं व पंतने त्यावेळी तसं करणं यात फरक आहेच ना ). मला वाटतं कसोटीमध्ये स्वतःच्या स्वाभाविक खेळाला प्रसंगोचीत थोडी तरी मुरड घालता येणं अत्यावश्यक असावं. धावसंख्या फार वाईट नसेल, तर मात्र प्रत्येकाने स्वाभाविक खेळच खेळावा, याच्याशी पूर्ण सहमत.

पंत नैसर्गिक खेळत होता तेव्हा सिच्युएशन नुसार गेम बदलणे यालाच टेस्ट क्रिकेट म्हणतात अशी चर्चा होती.

आज त्याने ७२-चार विकेट पडलेल्या असताना संघाचा विचार करून पुजारा सारखे खेळून दाखवले तर नैसर्गिक खेळ का नाही खेळला म्हणून ओरडा.

नंतर थोडे हात खोलू लागला एक सिक्स सुद्धा मारला. एक फटका जो वेडावाकडा नव्हता पण मिस हिट होऊन झेलबाद झाला, तर त्याने पुन्हा विकेट फेकली असा ओरडा सुरू झाला..

या सगळ्यात आपण एक विसरतो की तो एक विकेटकीपर आहे आणि कसोटी क्रिकेटमध्ये आजपर्यंत भारतात कुठल्याही विकेटकीपरने फलंदाजीत त्याच्या इतका इम्पॅक्ट दाखवला नाही.

म्हणून मी सकाळी म्हणालो होतो.. या देशात तसेही लोकप्रिय क्रिकेटर होणे अवघड आहे.. त्यात ऋषभ पंत होणे अजून अवघड. त्याला अशा कॉमेंट आयुष्यभर झेलाव्याच लागणार Happy

उद्या जर आपण त्यांना लवकर गुंडाळले तर त्याच्या खेळीची किंमत जाणवेल.. तसे न झाल्यास तरीही त्याच्या जिगरबाज वृत्तीचे आज मला कौतुक आहे.
मला खूप आतून असे वाटत आहे की मी अशाप्रकारे खेळू शकतो हे त्याने पहिल्या इनिंगला दाखवून दिले. पण दुसऱ्या इनिंगसाठी एक पंत स्पेशल इनिंग लोड होत आहे Happy

बोलो आमीन !

*भारतात कुठल्याही विकेटकीपरने फलंदाजीत त्याच्या इतका इम्पॅक्ट दाखवला नाही.* - फारुख इंजिनियर, किरमानी, किरण मोरे, द्रविड, धोनी !!

"फारुख इंजिनियर, किरमानी, किरण मोरे, द्रविड, धोनी !!" - अरे, मला वाटलं होतं कि बुधी कुंदरन चं नाव पण ह्या लिस्ट मधे असेल.

काल पंत ने खूप संयम दाखवला. त्याबद्दल त्याचं कौतुक आहे. मला वाटतं असामी चा मुद्दा त्याच्या परिस्थितीनुरूप खेळण्याविषयी नसून, शेल मधे गेल्याबद्दल किंवा अततिबचावात्मक खेळण्याविषयी आहे. वेडं वाकडं न खेळणं आणि रन्स च न काढणं, खराब बॉलला सुद्धा तटवणं ह्यात फरक आहे. वेबस्टर सारखे बॉलर्स रणजीत खोर्याने आहेत (१२५ च्या स्पीड ने, लाईन-लेंग्थ पकडून टाकणारे), पण त्याला पहिल्या १० ओव्हर्स मधे अगदी १ -१.२५ च्या रनरेट ने खेळण्याइतका त्याची बॉलिंग भेदक नक्कीच नव्हती.

इथे, किंवा जैस्वाल, गिल, रेड्डी ह्यांच्या ऑन द मूव्ह आऊट होण्यामधे माझ्या मते कोचिंग चा मुद्दा येतो. ह्या गोष्टी ड्रेसिंग रूममधून प्लॅन होऊन आल्यासारख्या वाटतात (रेड्डी पहिल्याच बॉलला बॉलरकडे चालत होता).

*.?परिस्थितीनुरूप खेळण्याविषयी नसून, शेल मधे गेल्याबद्दल किंवा अततिबचावात्मक खेळण्याविषयी आहे. *- मान्य.
*बुधी कुंदरन चं नाव पण ह्या लिस्ट मधे असेल.* नक्कीच ! अतिशय आक्रमक फलंदाज ( दोन शतकं !). एक विश्वासार्ह किस्सा - बहुतेक मद्रास ( चेन्नई ) येथल्या वे.इंडिज विरुद्धच्या कसोटीत सोबर्सने स्लीपमध्ये टप्पा पडलेला झेल घेतला व अपील केल्यावर अंपायरने कुंदरनला बाद ठरवलं . परत जाताना सोबर्स जवळ आल्यावर तो मोठ्याने पुटपुटला, " ब्लडी कॉल युवरसेल्फ ए स्पोर्ट्समन" ! सोबर्सला तें इतकं झोंबलं की त्याने अपील मागे घेवून त्याला परत बोलावलं.

द्रविड कसोटीत कीपर म्हणून खेळला नाही.. मला तरी आठवत नाही.
धोनी सारखा खेळाडू क्रिकेटच्या इतिहासात विरळाच.. पण कसोटी फलंदाज म्हणून पंत हा धोनीपेक्षा वरचढ आहे. मी धोनीचा चाहता आहे. भक्त नाही. जे फॅक्ट आहे ते आहे.

किरमानी, किरण मोरे, यात नयन मोंगिया सुद्धा घ्या, हे काही इतके भारी फलंदाज नव्हते.

फारुख इंजिनियर.. येस.. यांना नक्कीच आपण या पंक्तीत घेऊ शकतो जेवढे मी त्यांच्या बद्दल ऐकले आहे. पण त्यांना कधी खेळताना पाहिले नाही. त्यांच्या किपींग स्किल बद्दल सुद्धा कल्पना नाही.

पण आजच्या तारखेला हा दौरा सोडा पण पंत निव्वळ आपल्या फलंदाजीवर सुद्धा भारतीय कसोटी संघात स्थान मिळवू शकतो असे मला वाटते.

मला वाटतं असामी चा मुद्दा त्याच्या परिस्थितीनुरूप खेळण्याविषयी नसून, शेल मधे गेल्याबद्दल किंवा अततिबचावात्मक खेळण्याविषयी आहे. वेडं वाकडं न खेळणं आणि रन्स च न काढणं, खराब बॉलला सुद्धा तटवणं ह्यात फरक आहे. >> +१. मला वाटले माझा मुद्दा गंभीर नि इतरांनी पंत वर ठपका ठेवण्याबद्द्ल नि त्याचा परीणाम त्याच्या बॅटींग अ‍ॅप्रोच मधे दिसण्यावर होता.

गेला लाबोशान.. बूम
एनर्जी लेव्हल हाय आहे.. फुल सलेजिंग चालू आहे.. मजा येतेय बघायला

घेतली विकेट
३५-३
पोरगा गेला

हेड आला..
हा एकतर लगेच जातो..
नाहीतर मारून जातो..

फोर..

आणि गेला
राडा सुरू

“माझा मुद्दा गंभीर नि इतरांनी पंत वर ठपका ठेवण्याबद्द्ल नि त्याचा परीणाम त्याच्या बॅटींग अ‍ॅप्रोच मधे दिसण्यावर होता.” - सहमत. मी माझ्याही पोस्टमधे कोचिंगविषयी लिहिलं होतं. अश्या प्लेयर्स ना खूप टॅक्टफुली हँडल करावं लागतं. त्यांच्या डिस्ट्रॅक्शन्सना कंट्रोल करताना, त्यांच्या स्ट्रेंग्थ्स ना बाधा येणार नाही हा बॅलन्स डेलिकेट असतो.

आज औसिज विकेट गेल्या तरीही शेलमध्ये न जाता नॉर्मल खेळत होते. ( 90 धांवा झाल्या त्यात 10 चौकार होते ) पण सर्व फटके प्रचलित, तंत्रशुद्ध होते हे विशेष. पंतबद्दल आक्षेप हा असावा की संघाची कठीण अवस्था असताना तो unorthodox, unsafe फटके खेळतो व बाद होतो ! त्याने शेलमधे जावे अशी अपेक्षा नसावी . मी चुकतही असेन पण त्यात कांहिंस तरी तथ्य असावं.

नवीन लोकांना परफॉर्म करायला प्लॅटफॉर्म द्यायची परंपरा आपण कायम राखतो आहे
वेबस्टर ची डेब्यू वर 50

कोहली स्टँड इन कॅप्टन म्हणून काम बघतो आहे
शेपूट लवकरात लवकर गुंडाळतात का ते बघायचं. सुंदर ला अजून बोलिंग च दिली नाहीये...

आजुबाजुला द्रवीड, लक्ष्मण, तेंडूलकर होते म्हणून सेहवाग सातत्याने सेहवागसारखा खेळू शकत होता.... त्याला तसे खेळायचे लायसन्स देणे म्हणूनच परवडायचे;. पंत ला पंत सारखे खेळता यावे यासाठी आजूबाजूला तसा भक्कम आधार हवा ना!!

“ आजुबाजुला द्रवीड, लक्ष्मण, तेंडूलकर होते म्हणून सेहवाग सातत्याने सेहवागसारखा खेळू शकत होता” - हे बर्याच अंशी खरंय. अर्थात बॅटिंग पोझिशन ने फरक पडतो.

आज बुमराह ला इंज्युरी होणं भारतासाठी मोठा धक्का आहे. त्यातही ब्लेसिंग इन अ डिसगाईज म्हणजे कोहली नेतृत्वपदी आला. तो असल्या परिस्थितीत खुलतो. पण चौथ्या इनिंगला बुमराह हवाय इंडियाला.

चार रन चा का असेना
पण लीड मिळाला आहे...

खूप मोठं मेंटल बूस्ट ठरू शकतं...

आजुबाजुला द्रवीड, लक्ष्मण, तेंडूलकर होते म्हणून सेहवाग सातत्याने सेहवागसारखा खेळू शकत होता....
>>>>>
ते नसतानाही सेहवाग तसाच खेळायचा. किंवा खेळला असता कारण. त्याचा गेमच तसा होता. त्यापेक्षा असे म्हणू शकतो की त्यामुळे तो अपयशी ठरल्यावर होते त्या टिकेपासून वाचला. कारण जेव्हा फलंदाजी युनिट एकत्रितपणे अपयशी ठरते तेव्हा असे खेळाडू पहिले टारगेट होतात.

आता गिल ने सुद्धा ४ इनिंग मध्ये ८० धावा केल्या आहेत आणि जवळपास प्रत्येक वेळी सुरुवात मिळून नंतर विकेट टाकली आहे. पण अजून टिकेपासून वाचला आहे.
पण तेच पंत काय यशस्वी जयस्वाल जो आपला सर्वात यशस्वी फलंदाज आहे त्याला बसवायच्या पर्यायावर सुद्धा इथे चर्चा करून झाली आहे Happy

Pages