Submitted by बस्के on 31 January, 2010 - 22:59
ग्रीन टी बद्दल कोणाला काही माहीती आहे का? कोणी मायबोलीकर घेतात का? - म्हणजे ग्रीन टीबद्दल विचारतीय मी..
नेटवर वाचल्यावर अगदी सोन्याची खाण सापडल्यासारखे वाटतेय. अॅन्टीऑक्सिडंट, मेटॅबॉलिझम सुधारते, चेहरा क्लीन होतो, स्लिम वगैरे होतो. कॅन्सर अन अल्झायमर आणि काय ते वेगळंच!
हे सगळं खरंच होतं की फॅड आहे !?
(फॅड नसावं असं जॅपनीज व चायनीज मुलींकडे पाहून वाटते. )
(मी वाचलेल्या काही लिंक्स.. )
http://chinesefood.about.com/library/weekly/aa011400a.htm
http://www.umm.edu/altmed/articles/green-tea-000255.htm
http://www.greenweightlosstea.com/
http://www.webmd.com/food-recipes/features/health-benefits-of-green-tea
इत्यादी....
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मी भरपुर आणला आणि सुरवातीला
मी भरपुर आणला आणि सुरवातीला बरेच दिवस प्ययला पण मग मधेच खधीतरी नेहमीचाच चहा प्यायले आणि ग्रीन टी पुर्णपणे विसरुनच्ज गेले.
आता पुन्हा सुरु करणारे
हे सगळं वाचून मी पण कालपासूनच
हे सगळं वाचून मी पण कालपासूनच टेटली चा हिरवा चहा घ्यायला सुरुवात केली आहे. काल पानं जरा जास्त घेतली त्यामुळे जरा कडू टेस्ट आली होती, सो आज जरा कमी पानं टाकली, मग कालच्या इतकं नाही जाणवलं. आता बघूयात पुढे काय होतय ते.
इतक्या जणांनी हिरवा चहा आणून
इतक्या जणांनी हिरवा चहा आणून प्यायलाही सुरुवात केली का? मीही आणते आता.
बाँबे स्टोअरमधला जस्मिन, टेटली किंवा गिरनार. तिन्ही ब्रॅंडची सँपल साई़झ मिळाली तर बरं होईल, मग आवडेल तो आणता येईल.
बस्कू, तुला खरंच हाणायला हवं!
फारच छान माहिति
फारच छान माहिति
किती जणांनी सुरू केला आणि
किती जणांनी सुरू केला आणि ठेवलाय ग्रीन टी?
बरं माझा एक प्रश्न. हा धागा काढला तेव्हा विकत आणलेला ग्रीन लुज लिव्ह्ज टी अजुन आहे माझ्याकडे. तर तो आता घेतलेला चालेल का? पानं दिसायला आधी होती तशीच दिसत आहेत.
बस्के काही होत नाही त्याला.
बस्के काही होत नाही त्याला. जरूर घे.
एक ग्रीन टी कल्ट स्थापन करा.
एक ग्रीन टी कल्ट स्थापन करा.
ग्रीन टी नियमित पिणार्यांनी
ग्रीन टी नियमित पिणार्यांनी कृपया आपले अनुभव लिहावेत.
<<मी भरपुर आणला आणि सुरवातीला
<<मी भरपुर आणला आणि सुरवातीला बरेच दिवस प्ययला पण मग मधेच खधीतरी नेहमीचाच चहा प्यायले आणि ग्रीन टी पुर्णपणे विसरुनच गेले>> माझं पण अगदी अस्सच झालंहोतं. काल पासून पुन्हा सुरू केलाय. प्रयत्न करणार आहे साधा चहा न प्यायचा. मला तरी आवडतो ग्रीन टी. जस्मिन किंवा मिण्ट असेल तर जास्तच आवडतो.
उरोन्ग / उरोन टी लीव्हज कुठे मिळतील. जरा कॉम्प्लेक्षन सुधारेन म्हणते. अगदी चायनिज जापनिज मुलींइतकं नाही जमलं तरी थोडं तरी सुधारेलच ना?
माझ्या एका बालीश प्रश्नाच
माझ्या एका बालीश प्रश्नाच प्लीज उत्तर द्या.
मी आजिबात चहा पीत नाही. आम्ही खानदानी कॉफीवाले! तर, हा तयार ग्रीन टी तो असतो, त्यात चहा असतो का? की आपला गवती चहा असतो? गवती चहा, तुळस, पुदीना, आले इत्यादी पदार्थ उकळल्यास त्या प्रकाराला ग्रीन टी म्हणता येईल का? धन्यवाद!
तयार ग्रीन टी चहा असतो का?>>>
तयार ग्रीन टी चहा असतो का?>>> हो.
गवती चहा, तुळस, पुदीना, आले इत्यादी पदार्थ उकळल्यास त्या प्रकाराला ग्रीन टी म्हणता येईल का?>>> बहुतेक नाही, तो 'तुळशीचा चहा' (पुदीना बहुतेक नसतो) निसर्गोपचार केंद्रात चहा म्हणून देतात पण तो असतो काढा.
प्रेग्नंट असताना / लो बीपी चा
प्रेग्नंट असताना / लो बीपी चा त्रास असताना पितात का?
माझी मैत्रीण पिते रोज सकाळी
माझी मैत्रीण पिते रोज सकाळी हा ग्रीन टी. त्वचा छान दिसते तिची आता. पण चव मात्र डेव्हलप करायला लागते ब्वॉ..
फायदे मात्र अनंत आहेत याचे. माझ्या माहितीनुसार एक मोठ्ठा मग भरुन गरम पाण्यात हा करुन ठेवायचा आणि दिवसभर प्याला तरी चालतो.( मग दिवसभर छळवाद!)एका टी बॅगचा एकच कपभर करायला गेलो तर जाम कडवट होतो. मग त्यात लिंबू पिळले तरी तोंड वाकडे करतच प्यावा लागतो. त्यापेक्षा दोन कपात ते बरे पडेल असे माझे मत.
मी पिते ग्रीन टी. आणि मला तो
मी पिते ग्रीन टी. आणि मला तो खूप आवडतो. लाईट करायचा तो चहा, सा़खर घातली नाही तरी चांगला लागतो.
थोड लिंबू पिळून आणि मध घालून मला सर्वात आवडतो. दूध घालू नये यात कधीही. बाकी व्हेरीएशन आपल्या आवडीप्रमाणे करु शकता.
सस्मित, प्रेग्नंट असताना पिऊ
सस्मित, प्रेग्नंट असताना पिऊ नये असे मी वाचले होते. कारण कॅफिन जास्त आहेत्यात. मी घेत नव्हते.
लो बीपीचे काही माहीत नाही.
बस्के अजुन ग्रीन टी घेतेस का?
बस्के अजुन ग्रीन टी घेतेस का? कोणत्या कंपनीचा?
ट्रेडर जो मधला योगी ग्रीन टी आणि ऑरगॅनिक ग्रीन टी असे दोन आणले आहेत.
योगी मध्ये जेष्ठमधाचा गोडसर पणा जास्ती वाटतो आहे.
अगं नाही घेत मी सध्या ग्रीन
अगं नाही घेत मी सध्या ग्रीन टी. ब्लॅक टी दुध साखर घालूनच बरा..
हा धागा वाचते म्हणजे परत चालू करायला मोटिवेशन मिळेल.
मी १ म हीन्या पासु न
मी १ म हीन्या पासु न ग्रीन टी घेतोय ................ पहाटे १दा ........... व ४.०० पी.एम. वाजता १ दा ................. छा न वाट तेय ...
मागच्या ५ वर्षां पासून रोज एक
मागच्या ५ वर्षां पासून रोज एक मग ग्रीन टी घेतो उत्तम रिजल्ट्स असतात माझे वजन खुप कंट्रोल्ड आहे त्यामुळे , हा चहा रेगुलर चहा सारखा उकळुन घेतला तर महाकडु लागतो ह्याला ब्रू करायची पद्धत किचकट नाही सोपी असते फार सुटा सुद्धा मिळू शकतो ₹१२००/किलो वगैरे पर्यंत अतिशय उत्तम क्वालिटी चा मिळेल
सोहण्याबाहापु त्यो ब्रु कसा
सोहण्याबाहापु त्यो ब्रु कसा करायचे सांगा ना
मायला मला वाटले १४०+
मायला मला वाटले १४०+ प्रतिसादांची बूंदी पडली आहे त्यात एक हे बी पडले असेल! म्हणुन थांबलो!! असो
ब्रू करणे महासोपे ते सांगतो
एक मग (कपभर ग्रीन टी नसतात पित मग्गा भरला की फर्मास मजा येती) तर.....
एक मग पाणी ८०°सेल्सियस पर्यंत तापवावे (उकळले तरी चालेल) उकळले की त्यात दीड टी स्पून ग्रीन टी टाकावा झाकुन २ ते अडीच मिनट्स ठेवावे गाळुन प्यावे फ्रेश व्हावे म्हणे
कडू जहर लागते त्याले काय
कडू जहर लागते त्याले काय करायचे म्हणे ?
कडू जहर लागते त्याले काय
कडू जहर लागते त्याले काय करायचे म्हणे ?
<<
हुडोबा,
आपल्याकडे चहा 'शिजवायची' पद्धत आहे.
मुळात जगात कुठेच विकत नाहीत तो चहा आपल्याकडे विकला जातो. अन शिजवत नाहीत तसा दूध साखर घालून शिजवला जातो.
उत्तम चहाची पानं गाळणीत ठेवून त्यावर गरम पाणी ओतले की जे मिळते, तो खरा कोरा चहा. अत्यंत लाईट गोल्डन कलरचा असतो.
त्यात थोडा मध घाला, अन हवी असेल तर दालचिनी प्लस जायफळ 'जायफळाच्या किसणी'ने किसून.
मग प्या अन मला कडू चवीबद्दल सांगा.
असा लाइट गोल्डन चहा खरं तर
असा लाइट गोल्डन चहा खरं तर नुसताच छान लागतो. चहाची खरी चव चाखायला मिळते.
रॉबिनहुड साहेब, पाण्यात घालुन
रॉबिनहुड साहेब,
पाण्यात घालुन चहा उकळु नका, पाणी उकळुन गॅस बंद करा अन मग पत्ती टाकून झाकुन ठेवा काही वेळ (एखाद मिनट) नाय लागणार कडु अजिबात!!!
८० डीग्री ई. मोजतात की काय
८० डीग्री ई. मोजतात की काय लोक..
अंदाजेच पाणि गरम करणार ना?
८० डीग्री ई. मोजतात की काय
८० डीग्री ई. मोजतात की काय लोक..
अंदाजेच पाणि गरम करणार ना?>>>>>> पाण्याला प्रथम लहान बुडबुडे येतात,त्यानंतर मोठे बुडबुडे येतात.शेवटी उकळी फुटते.जेव्हा ल.बु.येतात,त्यावेळी गॅस बंद करून १ चमचा(सपाट) ग्रीन टी घालायचा,झाकण लावून २ मिनिटे मुरवायचा,गाळून पिणे.
१२००/किलो वगैरे पर्यंत अतिशय उत्तम क्वालिटी चा मिळेल>>>>>> आसाम आणि दार्जिलिंग या चहात फरक आहे.आसाम हिरवा चहा,७००/-पासून मिळतो आणि दार्जिलिंग १८-१९०० किलो पासून चालू होतो.(हे चेंबूरच्या चहाच्या दुकानदाराचे रेट आहेत.)
काल काय वाट्लं ठाउक
काल काय वाट्लं ठाउक नाही,जस्मिन फ्लेवर घेऊन आले.हॉरिबल लागतो,पूर्वी "जय" साबण मिळायचा,त्याचेच पाणी पाणी करून प्यायलासारखा वाटला.आपला लेमन फ्लेवर झिंदाबाद!
फक्त सायकलचे फायदे या
फक्त सायकलचे फायदे या विषयावरील व्हिडिओज पाहिले तर अशा जाहिराती येऊ लागल्या आहेत. ग्रीन टी चा धागा वाचला तर पुन्हा बालपण येईल का?
जॅस्मिन टी आवडतो. ग्रीन टी
जॅस्मिन टी आवडतो. ग्रीन टी प्याल्यावर मळमळत.
Pages