मराठी चित्रपट कसा वाटला? - 1

Submitted by मोक्षू on 16 May, 2020 - 05:23

चित्रपट कसा वाटला या विषयाचा चौथा धागा नुकताच सुरु झालाय.. म्हणून लगेच हा वेगळा धागा काढला... मराठी चित्रपट पाहायचा असला की नेहमीच्या धाग्यावर खूप शोधाशोध करावी लागते.. म्हणून सगळ्यांनी मराठी चित्रपटांबद्दल ह्या धाग्यावर चर्चा करावी ही विनंती...

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सामो , जरा बकरे फसू द्यायचे ना !
घरी पोहोचेपर्यंत खेळ खल्लास ..

इथे जर खरंच कुणी (राहुल देशपांडे प्रमाणे) आलेच तर लिहीणार्‍यांची काय प्रतिक्रिया होईल हे बघायचं होतं. Proud
माझ्याबाबतीत झालेलं आहे हे Lol

हो सामो, मला ही प्रतिसाद लिहिल्या नंतर समजलं.. - त्यामुळे मला थोडं लागलं मनाला.. ( आभासी जगात जास्त भावनाविवश राहू नये हा धडा मिळाला आज..) त्यांनी तिथे लिहिले असतं तर मी मजेत उत्तर दिलं असतं..

रूपाली, हलके घ्या ओ. तुम्ही फसाल असं वाटलं नव्हतं. Happy

साधा माणूस, अरे वा तुम्ही तर मंत्रच सांगितला कि. थँक्स.
आता तुमच्या सगळ्या आयड्यांना जोपर्यंत खर्‍या आयडीने असे धाडस करत नाहीत तोपर्यंत एकत्रच बोअर करता येईल. Lol

सामो, पूर्ण मायबोलीवर आपणच दोघी फसलो बघ..
ग्रह तपासून घे दोघींचे..
रआ , मीच बरी सापडले तुमच्या जाळ्यात बकरी बनायला...!.

तोतया रादे सर,
मी मराठी पिक्चर पहात नाही, पण इथे इतका गदारोळ पाहून (आणि फुकट आहे म्हणून) उगीच घटकाभर पाहिला. सुरवातीलाच तुम्ही एकाला शोपिन नाही शोपॉं, असं पुणेरी शुद्धभाषापोलिसाच्या थाटात सुनवता, पण शोपिनची म्हणून जी ट्यून वाजवली आहे, ती दुसऱ्याच माणसाची शोपिनच्या नावाखाली खपवलेली ट्यून आहे हे तुमच्या प्रोडक्शन टीममधल्या एकाच्याही ध्यानी येऊ नये? येडे कुठले...

मला अमलताश बद्दल सर्वांनी लिहिलेलं आवडलं, बाजूने असुदे, विरुद्ध असुदे. फारएन्ड यांनीही चांगलं लिहिलंय. स्मिता, साजीरा यांचंही आवडलं.

AVKMIA ??? >>> असा व्यासंग करायची माझी इच्छा आहे - या वाक्याची आद्याक्षरं >>> Lol मलाही ही फोड करता आली नाही.

"लाईक अ‍ॅण्ड सबस्क्राईब" - वरती काही पाने आधी कोणीतरी लिहीले आहेच. पण १००% रेको माझ्याकडून. अमेरिकेत प्राइमवर विकत घ्यावा लागला. भारतातले माहीत नाही. मस्त खिळवून ठेवणारा आहे. एकदम टाइट स्क्रिप्ट, फ्रेश चेहरे व चांगला अभिनय. पहिली दहा मिनीटे जरा नेटाने पाहावा लागेल पण मग पकड घेईल. लेखन, दिग्दर्शन व संवाद यात मराठीत सहज न आढळणारी सफाई आहे.

जुई भागवत, अमेय वाघ आणि अमृता खानविलकर हे मुख्य लीड्स. राजसी भावे चा रोलही बर्‍यापैकी लीड सारखाच आहे. आणखी ३-४ कलाकार बरेच फुटेज असलेल्या रोल्स मधे आहेत - श्रीकांत यादव व इतर एक दोन. कामे सर्वांचीच मस्त आहेत. विशेषतः अमेय वाघ. त्याची संवादफेक, अभिनय सगळेच भारी आहे. जुई भागवत व राजसी भावे यांच्यामुळे पिक्चरला एकदम "फ्रेश फेस" मिळतो. नाहीतर मराठीत तेच तेच लोक फार दिसतात. राजसी भावे तर मला एकदम क्रश लेव्हल आवडली Happy ती "घरत गणपती" मधेही होती. पण यात जास्त आवडली.

<<<लेखन, दिग्दर्शन व संवाद यात मराठीत सहज न आढळणारी सफाई आहे.>>>

फार भारी वाटले वाचुन. कारण तो लेखक दिग्दर्शक न्युज अमर आणि आउटसाईडर आहे. इथेच सिंगापूरला असतो. हा चित्रपट काढायचा हे त्यांचे स्वप्न होते, सहा वर्षे स्क्रिप्ट वर काम करत होता. आणि पैसा जमा करण्यासाठी सिंगापूर ला नोकरी करत होता. ह्या चित्रपटाचा प्रिमियर सिंगापूर ला झाला होता. आम्ही गेलो होतो. त्याला अक्षरशः भरुन आले होते बोलताना. एकदम साध्या कपड्यातला साधा मराठी माणूस. एखादा प्रेक्षक असेल असं वाटलं होतं मला आधी.
माझी पर्सनल ओळख नाही, पण कधी महाराष्ट्र मंडळाच्या कार्यक्रमात भेट झाली तर नक्की सांगिन त्याला.

अमलताश च्या निमित्ताने मस्त चर्चा झाली आणि कधी नव्हे ते मी रिअल टाइम मध्ये तिथे होते त्यामुळे खुप एंजॉय केली. थॅंक्यु लोक्स.

अमलताशची चर्चा छान रन्गली तरीही बघण शक्य नाही, रादे गायक म्हणूनच आवडत नाही त्यामूळे हिरो म्हणून अजिबातच आवडणार नाही.

रादे गायक म्हणुन का आवडत नसावा??? मला वसंतराव खुप म्हणजे खुपच आवडतात. त्यामुळे मी रादेकडे वेगळा स्वतंत्र गायक म्हणुन बघु शकत नाही. मी त्याच्यात वसंतरावांना पाहते, त्यांना जे तेव्हा मिळाले नाही ते याच्या रुपात थोडेफार मिळाले असे मला वाटते.

विशेषतः अमेय वाघ. त्याची संवादफेक, अभिनय सगळेच भारी आहे >>>
मी मागे मुरांबाच्या चर्चेच्या वेळी लिहिलं होतं- अमेय वाघ बिग स्क्रीन के लिए बना है, त्याने सीरीज, नाटकं वगैरेच्या फंदात पडू नये, जरी तो नाटकांमधूनच पुढे आलेला असला तरी.

रादे फारच नाकात गातो. वसंतराव पण नेझल होतेच, पण हा जास्तच आहे. वसंतरावांची स्वतंत्र शैली होती. ह्याची नाही, त्यामुळे नाविन्य वाटत नाही, मग नेझल आवाजाकडे जास्त लक्ष जातं.

ती पु गा नाहीत टे रघू आचार्य आहेत, मी कालच पहिली पोस्ट आलेली तेव्हा ओळखलं होत मला वाटलं कुणी फसणार नाही. काय गं रुपाली

वसंतरावांची स्वतंत्र शैली होती. ह्याची नाही, त्यामुळे नाविन्य वाटत नाही, >>> अगदी! तो स्वत:चं वेगळं काही करतच नाही, आजोबांसारखं गात राहतो असंच वाटतं कायम

Lol तो वेगळं शोधायचा प्रयत्न करत असतो असं मला वाटतं. कॉर्ड लावून लताची गाणी रसभंग करत असली तरी तो वेगळं करत असतो. कधी जमतं कधी नाही. मला त्याचा ओपननेस ( तसा असेल तर) आवडतो. Happy आणि न घाबरता पोस्ट करणे हे ही आवडतं. जेन्युअन वाटतं.
बाकी नेझल कडे लक्ष जाऊन खटकतंला +१

किल्ली, झाला गं थोडासा माझा गैरसमज.. आता काळजी घेईन पुढे.. आधी कुठलाही प्रतिसाद नीट वाचायचा .. profile चेक करायची आणि मगच उत्तर द्यायचं.. कुणालाही तिरीमिरीत पटकन् उत्तर द्यायचं नाही..

हपा +१
याच कारणासाठी महेश काळे पण नकोच वाटतो, तो रादेपेक्षाही जास्त नेसल गातो...माझ्या वडिलाना सुधिर फडके आणी वसन्तरावाची गाणी खुप आवडायची, घरी प्लेयर आल्यावर आवर्जुन त्याच्या कॅसेट आणल्या होत्या...त्यामुळेच वसतराव एकलेले आहेत. मी काही खुप जाणकार नाही पण हा एकायला बरा वाटतो तो नाही इतकच!!
मधे मधे काळे बुआनी हिन्दी गाण्याचा चुथडा केला होता..तेव्हा पासून ते नकोच वाटतात.

अमित +१ राहुल देशपांडे प्रयोग करतो हे आवडतं. काही प्रयोग आवडतात, काही नाही आवडत. एकंदरीत तो गायक म्हणून आवडतो पण.

बाप्रे! महेश काळे कधीकधी एकदम आतडी ( त्याची ) उलटून पडतील असा आवाज लावतो. मला अरूणी किरणी नंतर काही अपील झालं नाही त्याचं.

मक्यापेक्शा रादे बराच बरा म्हणायला पाहिजे

रादे मेटॅलिक प्लस अनुनासिक आहे. आज्ज्याचा मुलायम रेशमी क्लासिक बाज मिसिन्ग आहे. पण ठीकच आहे. आज्ज्याचं निसर्गदत्त होतं तसं याचंही

मका मात्र मला अगदीच टाकाऊ मटेरियल वाटतो. नुसतीच हवा.
+११
मला वाटलेलं लोक इतकी hype करतात त्याचे कार्यक्रम होत असतात आणि काय काय येत असतं media वर, मलाच चुकीचं वाटतं की काय.
मका not my type अजिबात ऐकू शकत नाही.
अरुण किराणी अपवाद

लाईक आणि सबस्क्राईब --- इथल्या माहितीमुळे पाहिला (prime वर). उत्तम सिनेमा. नवीन चेहरे एकदम सहज वावरतात. अमेय वाघ पण उत्तम. अमृता खानविलकर पण छान. सकस कथा आणि बांधेसूद मांडणी. मराठी चित्रपटात अशी सफाईदार हाताळणी क्वचितच पाहायला मिळते.

take care good night कोणी पाहिलाय का? मला फेबुने जरा दाखवला, बरा वाटला पण ओटीटी वर नाही.

Pages