Submitted by मोक्षू on 16 May, 2020 - 05:23
चित्रपट कसा वाटला या विषयाचा चौथा धागा नुकताच सुरु झालाय.. म्हणून लगेच हा वेगळा धागा काढला... मराठी चित्रपट पाहायचा असला की नेहमीच्या धाग्यावर खूप शोधाशोध करावी लागते.. म्हणून सगळ्यांनी मराठी चित्रपटांबद्दल ह्या धाग्यावर चर्चा करावी ही विनंती...
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
करा की वाटेल ते करा. मिसाजनी,
करा की वाटेल ते करा. मिसाजनी, ओबसेसिव्ह स्टॉकरगिरी, डोमेस्टिक व्हायोलांस चे ग्लोरिफिकेशन सगळं करा. अजिबात ना नाही. फक्त ते केलंय ते मान्य करा म्हणजे झालं. ॲनिमल मध्ये चालतं तर इथे का नाही म्हणू नका. ॲनिमल इतक्या पायऱ्या उतरायच्या तरी अजिबात ना नाही. प्रामाणिकपणे ताठ मानेने करा की झालं.
कालपासून आजपर्यंत ८०-८५ नवीन
कालपासून आजपर्यंत ८०-८५ नवीन पोस्टी! आता तर मी अमलताश बघून पाहणारच!
(हा चित्रपट कुंडलकर कॅटेगरीतला वाटतोय.)
मला कुणीही अनप्रोटेक्टेड
मला कुणीही अनप्रोटेक्टेड सेक्स केला तरी चालणार नाही. >>>>>>>>>>>>>>>
अगं तुझ्या चालण्यावर हिंदी मराठी सिनेमा चालत नस्तो गं दिवे घे प्लीज!
हो
हो
म्हणजे त्यांनी केले की मी इमानेइतबारे येथे नावे ठेवेन असा अर्थ घ्या.
ऑन ए सिरियस नोट:
ऑन ए सिरियस नोट:
अन प्रोटेक्टेड केला, गर्भ राहिला, तो ठेवायचा निर्णय घेतला, पार्टनर मेला, तरीही गर्भ ठेवला, बाळ झालं. . इथवर ही कथा घडू शकते. जबाबदारी कुठे येते? ते या नोटवर जर सिनेमा संपवायचा तर आपण हे बबली, गोंडस, अनुकरणीय, आनंदी दाखवतोय ते बरोबर आहे का हा विचार करण्यात न करण्यात!
टीन सिंगल मॉम इतकी तरल नाजूक हळुवार वगैरे नाही तर ते तसं दाखवणे बेजबाबदार पणाचे आहे. सिनेमा मागे घेऊन जातो हे त्याअर्थी क्रिमिनल आहे ला तर जोरदार अनुमोदन.
अमित, अस्मिता, मला नाही वाटलं
अमित, अस्मिता, मला नाही वाटलं तसं. मला स्टोरी तुला अंडरकरंट असा जाणवला:
किर्ती एका वेगळ्या पार्श्वभूमीवरुन आलीये. ती आणि तिची आजी साड्या आणि दागिने घेऊन बसल्या असतात तेव्हा तिची आजी म्हणते हे सगळे मी तुझ्या आईसाठी जपुन ठेवले होते पण ते कधीच वर्क आऊट झाले नाही. म्हणजे बहुतेक किर्ती ची आई आणि बाबांच्या रिलेशनशिप मधुन किर्ती चा जन्म झाला पण नात्याची परिणिती लग्न ही कमिटमेंट स्विकारण्यात झाली नाही. (बहुदा किर्ती ची आई भारतीय नाही असा माझा अंदाज.)
ह्या पार्श्वभूमीवर किर्तीला लग्न, कमिटमेंट किंवा त्याच्या आधीच पुढच्या स्टेप्स ह्याचा फारसा टॅबु नाही. हे सगळं पचवल्याने आजही किर्ती मराठी, पुण्यात वाढलेल्या, सिमिलर व्हॅल्यु सिस्टीम असणार्या मुलाच्या प्रेमात पडली म्हणून खुश आहे. पण तिला जेव्हा कळत की राहुल ची सर्जरी होऊ घातली आहे तेव्हा ती डगमगले. किर्ती ला इतक्या पटकन गुंतुन नकोस असं सांगते. कारण आजीच्या दृष्टीने उत्कटतेपेक्षा नात्यातील सुरक्षितता महत्त्वाची म्हणुन तिने स्वतःच्या आयुष्यात त्या अनुषंगाने निर्णय घेतला आणि आता किर्ती ला ही ती तेच सांगु पहातेय.
त्याउलट किर्ती साठी उत्कटता महत्वाची. राहुल ची सर्जरी यशस्वी होऊ शकेल किंवा नाही पण होणार ह्या दोन्ही शक्यता तिला माहिती आहेत पण तिच्या दृष्टीने ती ऑलरेडी गुंतलेली आहे, नात्याला टॅग नसला तरी तिच्या मनात तो आहेच आणि तेवढं तिला पुरेसे आहे. थोडक्यात तिच्या विचारसरणीवर ती जिथे वाढली तिथला प्रभाव आहे. ते लॉजिकल वाटले मला.
टिन मॉम? रिअली?
टिन मॉम? रिअली?
रावल्याच मख्ख आहे. पण बॅट बॉल
रावल्याच मख्ख आहे. पण बॅट बॉल स्टंप सगळं त्याचं आहे. >>>>ROFL
रात जागलेली असे आता वाटे >>
रात जागलेली असे आता वाटे >> गुड वन.
सिंगल मॉम इतकी तरल नाजूक हळुवार वगैरे नाही तर ते तसं दाखवणे बेजबाबदार पणाचे आहे>>१००+++
अमलताशसाठी वेगळा धागा काढून तिकडे हलवावी का चर्चा?
सध्या बघण्यासाठी खूप मटेरिअल शिल्लक असल्याने अमलताशवर काट.
अरे! धमाल चालू आहे इथे
अरे! धमाल चालू आहे इथे
अमितव के रिव्यूज ने यहां पे बडा उलटफेर कर दिया है!
अमलताश बघू की नको ठरवणे आणखी अवघड झालं आहे आता,
इथल्या कमेंट्स आठवत बघायला मजा येईल, पण बॅट-बॉल-स्टंपवाल्याला तरीही सहन करावंच लागेल.
अमोलताश
धमाल चालली आहे. चित्रपट
धमाल चालली आहे. चित्रपट मनोरंजक किंवा विचारप्रवर्तक असो वा नसो, इथले प्रतिसाद दोन्हीची गँरटी देतात. परवा इथले प्रतिसाद वाचून , न राहवून या चित्रपटाबद्दल शोधलं. विकीपेज वाचलं. कथा, पटकथा , दिग्दर्शन एकाच इसमाचे आहे. संवादलेखकाचे नाव दिसले नाही.
साउंड ट्रॅक्स म्हणजे गाण्यांबद्दल वादकांची नावे त्यांनी काय वाजवलं त्यासकट आहेत. पण गायकाचं नाव नाही. सगळी गाणी राहुलबाबानेच गायलीत का?
<मला कुणीही अनप्रोटेक्टेड सेक्स केला तरी चालणार नाही > अस्मिता, तुम्ही शशी कपूर - शर्मिला टागोरचा आ गले लग जा बघाच. यात शत्रुघ्न सिन्हा डॉक्टर आहे.
अरे काय हहपुवा पोस्टी आहेत
अरे काय हहपुवा पोस्टी आहेत
मस्त करमणूक झाली.. पिक्चर बघेन का नाही माहित नाही
अस्मिता, तुम्ही शशी कपूर -
अस्मिता, तुम्ही शशी कपूर - शर्मिला टागोरचा आ गले लग जा बघाच. यात शत्रुघ्न सिन्हा डॉक्टर आहे>>>>>
अरे देवा.. काय आठवण आहे. यातला अ से म्हणजे कमालच आहे.. हिरोइनला वाचवण्यासाठी जे केले त्यातुन पुढिल अनर्थ… बरे जे केले ते कसे केले हिरोच जाणे.. ती तर बेशुद्ध होती… की नेमकी आयत्या वेळेस शुद्धीवर आली पण दु द ने आमच्या (तेव्हाच्या) बालमनाला घाव बसतील म्हणुन सेंसॉरची कात्री चालवली देव जाणे!!!!!
हायपोथर्मियाचा असा(ही) वापर
हायपोथर्मियाचा असा(ही) वापर होऊ शकतो हे दाखवण्यासाठीच शर्मिलाला मेडीकल स्टुडंट केलं होतं. नंतर तिलाही विसर पडला असावा की ती डॉ. होणार होती.
होते होते डोक्टर… नेमकं तिचं
होते होते डोक्टर… नेमकं तिचं पोरगंच पेशंट होतं ना …
बघायला हवा परत.. शशी कपुरसाठी मी काहीही सहन करु शकते. यातले स्केटिंग त्याने स्वत; केलेय. तो एक्स्पर्ट होता स्केटिंगमध्ये.
अस्मिता, तुम्ही शशी कपूर -
अस्मिता, तुम्ही शशी कपूर - शर्मिला टागोरचा आ गले लग जा बघाच >>>
त्यानंतर अजय देवगण, महिमा चौधरी, काजोलचा `दिल क्या करे’ बघा. यात तर ट्रेन, गुंड, 'बचा...ओ' आणि मग अ.से. आहे.
अस्मिता, तुम्ही शशी कपूर -
डबल पोस्ट
पुण्यात ठिकठिकाणी बहाव्याची
पुण्यात ठिकठिकाणी बहाव्याची झाडे आहेत. एकदा खरंच पुण्यात चक्कर टाका बहाव्याच्या सिझन मध्ये-> +१ अभिमान श्री सोसायटी ची लेन पण मस्त दिसते.
मायबोलीवर चर्चा व्हावी ही
मायबोलीवर चर्चा व्हावी ही अमलताशची पब्लिसिटी आयडिया होती असं कळेल नंतर कुठूनतरी.
मी पण पाहिला. सुरुवात ठीकठाक आहे. नंतर नंतर कंटाळा येत गेला. त्यात ती गाणी पण झोप येतील अशी आहेत. अपवाद एक - पहिलं गाणं... ते थेट रॉक ऑन सिनेमातून सिंदबाद द सेलर की तत्सम गाण्यावरून उचलल्यासारखं वाटलं. तिथे रादे भावगीत म्हटल्यासारखं रॉक गातो आहे.
ह्यात त्या हिरॉईनचा कनेडियन accent बरोबर जमला आहे का हे ट्रॉनो वगैरे स्थित इथले कनेडियन लोक सांगतीलच. ती गाते फार छान. तिने आमची माती गाताना जी माती खाल्ली त्यावरून वाटलं नव्हतं की ती पुढे इतकी चांगली गाणार असेल. हा अभिनय असेल तर तिला तो फार भारी जमलाय.
पंजाबी शायरी करणाऱ्या दाढीवाल्याचे पंजाबी उच्चार धन्यवाद आहेत. बाकी ह्यातले जॅमिंग सेशन्स हे बंदिश बँडीट्स सीझन २ मधल्या जॅमिंगपेक्षा फार जास्त ऑरगॅनिक आहेत. पण रादे एरवी एकटा गाताना दाखवलाय तेव्हा तो त्याचा वैयक्तिक युट्यूब पॉडकास्टच तिथे रिपीट करतो आहे असं वाटलं. अगदी भावगीत अंगाने इंग्रजी गाणं एक्सप्लोर केलं आहे.
रादे अभिनय फारसा खटकला नाही. आजी मध्ये मध्ये उगाच इंग्रजी बोलतात असं मलाही वाटलं. एका सेशनमध्ये हिरोईन म्हणते की मला हे अगदी माझ्या फार्म सारखं वाटतं आहे, तिथे एक दाढीवाला बकरीचा आवाज काढतो, ते आवडलं.
मला सिनेमा फारसा न आवडून सुद्धा वरती मी नेमक्या जमेच्याच बाजू सांगत गेलो. पण म्हणून काही तो बघणेबल आहे असं अजिबात म्हणायचं नाही मला. फार बोर होतो. जिवाला घोर होतो. बघणारा ढोर होतो. झोपेला जोर येतो. हिरोईनला पोर होतं... जाऊ दे. अती होतंय.
ह्यात रादे अमलताश असेल तर अमोल हा बहाद्दूरखान कोकलताश आहे (हे उगाच. तसा काही संबंध नाही. असल्यास तो निव्वळ योगायोग समजावा.)
अमलताश पाहिला. आवडला. ऐकावे
अमलताश पाहिला. आवडला. ऐकावे जनाचे ..करावे मनाचे या उक्तीच अर्थ परत कळाला
अमाल्ताश ची ताश पिसून पिसून
अमाल्ताश ची ताश पिसून पिसून पिसं काढलीत. रच्याकने राहूल देशपांडे ड्यु आय डी ने असतील का मायबोलीवर
फार ओळख नाही, प्रेमही नाही,
फार ओळख नाही, प्रेमही नाही, सेक्सही अनप्रोटेक्टेड, मरणाच्या दाढेत प्रियकर. >> मला हे खटकले नसते जर का बाकी वातावरण त्याच्याशी सुसंगत असते तर. पण इथे तसे होत नाही. पात्रांच्या इतर वावराशी ते विसंगत वाटते. किर्तीच्या आयुष्यात आई नाही फक्त वडीलच आहेत तरीही तिचा बाकी वावर बघता हे सगळे विसंगत वाटत, आणि राहूलचा, त्याच्या कुटुंबाचा बाकी मम वावर बघता तर अजूनच.
इथे अमेरीकेतही तुम्ही बॉयफ्रेंड्/गर्लफ्रेंडच्या नातवाईकांकडे रहायला गेलात तर वेगळ्या रुम्स हा संकेत आहे, आणि इथे चक्क वाड्यात काकू कॅटेगरी बहीण, त्यात ती डिंपल असताना एकदम एकत्र रात्रच!
फ्रेंड्स मधे 'वन विथ द रेड स्वेटर' हे जसे जमून गेले तसेच इथे हे अजिबातच जमून येत नाही!
महिन्याभरासाठी आलेली सुखाची झुळूक -बहावा- तर तो अनुभव तितका ताकदीचा, तरल हवा , हे ना घर का ना घाट का !
अमलताशवर विश्वास किंवा
अमलताशवर विश्वास किंवा अविश्वासदर्शक ठरावावर चर्चा चालू आहे, असं वाटतंय
या गोष्टीला नावच नाही पाहिला.
या गोष्टीला नावच नाही पाहिला.
अत्यंत सुरेख चित्रपट. सगळे नवीन कलाकार आहेत आणि काम छान आहेत. अजिबात लाऊड नाही. पुण्यात The box ला आहे. सगळ्यांनी आवर्जून बघा.
या गोष्टीला नावच नाही पाहिला.
या गोष्टीला नावच नाही पाहिला.
अत्यंत सुरेख चित्रपट. सगळे नवीन कलाकार आहेत आणि काम छान आहेत. अजिबात लाऊड नाही. पुण्यात The box ला आहे. सगळ्यांनी आवर्जून बघा.
या गोष्टीला नावच नाही पाहिला.
या गोष्टीला नावच नाही पाहिला.
अत्यंत सुरेख चित्रपट. सगळे नवीन कलाकार आहेत आणि काम छान आहेत. अजिबात लाऊड नाही. पुण्यात The box ला आहे. सगळ्यांनी आवर्जून बघा.
अस्मिता मस्तच.
अस्मिता मस्तच.
इथे अमलताशची चर्चा सुरु झालेली युट्युबला कळलं बहुतेक. मला सारखा समोर अमलताश दाखवतोय तरी मी युट्युबवर साईन इन नाहीये पी सी वर. मी स्थितप्रज्ञ राहून बघायचा टाळला, ते उत्तम केलं असं वाटू लागलं. ट्रेलर बघायला मिळेल का, ते बघेन.
अन्जूताई , अवल, पर्णिका, अमित
अन्जूताई , अवल, पर्णिका, अमित, केया, ललिता प्रीती आणि सगळेच.
स्वाती ताई, होय. अनुमोदन. सगळेच खटकणारे आहे.
पर्णिका, अंडरकरंट बाबत - तिची आई जिवंत नाही असे वाटले मला. ह्या गृहितकाला कसलाच आधार निदान त्यांच्या संवादातून तरी मला वाटला नाही. शिवाय बाबा तर जिवंत होताच की त्याने काय मोठे तीर मारले.
हर्पा, कॅनेडियन ॲक्सेंट जमला नाही. लेक म्हणाली 'मी कुठे असे बोलते, आई.' घ्या.
अर्धे लोक अमलताश या झाडाचे सिंचनबिंचन करत आहेत, उरलेले त्याच्या 'मुळावर' उठलेत. आपापला गट बघा. लवकरच नवे झाड मिळू दे , देवा. /\
भरत, साधना - 'आ गले लग जा' पाहिलाय खूप वर्षांपूर्वी. त्यात अलिबाबा टाईप कपडे घालून स्केटिंग केले आहे शर्मिला काकूंनी. मी हल्लीच 'गंगा जमुना सरस्वती' बघितला. त्यातही मिनाक्षीला ( ती मूर्खासारखी त्याला मिठी मारायला पळत येताना बर्फाच्या तळ्यात पडते) अमिताभ हायपोथर्मिया पासून वाचवण्यासाठी 'बदन की गर्मी' देतो. एक जीव वाचवण्याच्या नादात अजून एक जीव निर्माण होतो. मग जे फरफट नायिकेची आणि प्रेक्षकांची.... काही विचारू नका. त्यापेक्षा तिलाच मरू दिले असते तर किमान प्रेक्षकांची फरफट वाचली असती.
पीनी, पोस्टची नोंद घेतली आहे. धन्यवाद.
अंजू टाळू अजिबात नका.
अंजू टाळू अजिबात नका.
तितका वाईट असता तर मी आणि खूप जणांनी बेकार आहे टाकाऊ आहे म्हटलं असतं. चर्चा, घमासान चर्चा करावीशी वाटणे ...थोडक्यात त्या स्केल मध्ये 'चर्चेबल ' ऍड करा... ती सुद्धा साधारण इतकी पोटतिडकीने करणे यात तो बघणेबल तरी असू शकेल.
तेव्हा वेळ मिळाला तर जरूर बघा असेच सांगेन. आधी पाणी बघा मग हा बघा.
अमलताश बघितला. Flaws असले तरी
अमलताश बघितला. Flaws असले तरी आवडला.
Pages