मराठी चित्रपट कसा वाटला? - 1

Submitted by मोक्षू on 16 May, 2020 - 05:23

चित्रपट कसा वाटला या विषयाचा चौथा धागा नुकताच सुरु झालाय.. म्हणून लगेच हा वेगळा धागा काढला... मराठी चित्रपट पाहायचा असला की नेहमीच्या धाग्यावर खूप शोधाशोध करावी लागते.. म्हणून सगळ्यांनी मराठी चित्रपटांबद्दल ह्या धाग्यावर चर्चा करावी ही विनंती...

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

यु नेवर नो!
****स्पॉइलर*****
राहुल आणि कीर्ती एकत्र शेजार शेजारच्या खिडकीतून तोंड बाहेर काढून सकाळी ब्रश करतात. कुंडलकर ला दाखवा आमच्या पेठी हिरोंचा रोमांस! Lol बाकी इथे सकाळी एकत्र ब्रश केलं म्हणजे डंबॲस ( हे गुलाम, सोन्या, राजा... च पुणेरी मराठीच रूपांतर आहे ह का!) नी कालची रात जागलेली असे आता वाटे आहे.

आताच संपवला. मागे एकदा माबोवर एडक्यांचा विषय सुरू झाल्याने हातातील कामे टाकून गुगल वर एडक्यांचे प्रकार वाचून काढले होते. तेवढीच तातडीची निकड सगळे अमलताशच्या झाडाला लटकत राहिल्याने आजही वाटली. Happy

मला विशेष आवडला नाही. दीड तासात संपला म्हणून कंटाळा फार तीव्र आला नाही इतकेच. सतत गाणी आहेत, तीही कमीतकमी संगीत दिलेली, गुणगुणत गायल्यासारखी वाटतात. चित्रपट एंगेजिंग आहे पण कुठल्याही उंचीवर जात नाही, एक रटाळ रेंज पकडून गात गात संपतो. गाणीही खूप छान वगैरे वाटली नाहीत. एकदोन चांगली आहेत, बाकी साधारण वाटली. गाण्यांनी संवादांशिवाय कथा पुढे सरकते एवढ्यासाठीच गाणी घालून संवाद काढले असावेत असे वाटले. चित्रपटाला 'पीक' नाही, खोलीही नाही. मेलोड्रामाही नाही, हा पिक्चरच नाही.‌ काहीतरी वेगळा प्रकार आहे बहुतेक. Happy कामं चांगली आहेत पण कथेत दम नाही. ती ज्या वेगाने प्रेमात पडते, ते अचाट आहे. पण महिनाभरात त्याला मरायचे असते म्हणून घाई केली असेल.

तो स्थितप्रज्ञ असण्यापेक्षा सिनेमाची स्टोरी माहिती असलेल्या प्रेक्षकासारखा 'चिल' वाटला. गायचं, तुणंतुणं वाजवायचं, शेंगदाणे खायचे मग तर पिक्चर संपणारच आहे. फुलावर फूल आपटण्याऐवजी यात दोघांनी मिळून दात घासले आहेत. ही कीर्ती मूर्ख वाटली (sorry for strong words) , कुठलेही कॉन्ट्रासेप्टिव्ह न वापरता भारतात महिनाभरासाठी येऊन प्रेग्नंट होते. तेवढे उत्कट प्रेमही दिसले नाही. तिच्या बाबांचा सुरवातीचा एक फोन सोडल्यास पोरीला वाऱ्यावर सोडून दिले आहे असे वाटले. आजीलाही काही विशेष काळजी नव्हती, फारच कॅज्युअली बोलत होते. प्रगल्भ म्हणावे का बेदरकार काही कळत नाही. मला चित्रपटातून काहीही मिळाले नाही. पोचलाच नाही. एवढी सगळी 'चिल' माणसं हिमालयाच्या गुहेत शोभली असती. आज्जीचा जॉर्ज काय, शेंगदाणे काय, जॅमिंग काय, शेती काय, बंब काय, मग बोअर झाले म्हणून ट्यूमर काय. आणि असेच करत करत मेला काय... केहना क्या चाहते हो और क्यों...

त्यांचे रोमॅन्टिक सीन चांगले आहेत. तिच्या मांडीवर डोके ठेवून ज्या मिंग्रजी गप्पा मारतात ते बघायला आवडले कारण सेक्शुअल न वाटता कंफर्टेबल नात्यात येणारा मोकळेपणा येतो तो 'फॉर अ चेंज' चांगला वाटला. सखी आणि प्रेयसी असे दोन्ही एकत्र बघायला मिळत नाही सहसा, ते येथे दिसले. Such a tease though..! चित्रपट प्रसन्न आहे पण उत्कटच नाही. एवढी स्थितप्रज्ञता काय कामाची, संन्यास घ्या आणि आम्हाला मोकळे करा. सगळ्या भावना शेंगदाणे तोंडात टाकल्यासारख्या धीरोदात्त. ग्राफच नाही कसला.

सिनेमाचं नाव 'दाण्याचे लाडू' असतं तर कदाचित तुम्हाला आवडला असता.

हा पिक्चरच नाही.‌ काहीतरी वेगळा प्रकार आहे बहुतेक. >> बरोबर बोललीस. हे जाणवलं होतं.

<<<<आताच संपवला. मागे एकदा माबोवर एडक्यांचा विषय सुरू झाल्याने हातातील कामे टाकून गुगल वर एडक्यांचे प्रकार वाचून काढले होते. तेवढीच तातडीची निकड सगळे अमलताशच्या झाडाला लटकत राहिल्याने आजही वाटली. Happy>>>

अस्मिता शिर साष्टांग दंडवत!!!! इतकि हसले की काय सांगु. पिक्चर आवडण न आवडण हे सगळ रुटिन आहे. पण असे एडके मायबोलिवर चर्चिले जाणे त्यासाठी कुणितरी हातातली कामे टाकुन रिसर्च करणे आणि त्याचे आफ्टरमॅथ रेफरंसेस नंतर असे चर्चेत येणे ह्यामुळेच मायबोलि हि मायबोलि आहे आणि मायबोलिवर यावस वाटत :). माझ्या आठवणितली शेवटची अशि घमासान चर्चा फिल्टर कॉफी ची साधारण ९/१० वर्षं झाली असतील. त्यातुन कुणितरी स पे तल्या कॉफी फिल्टर मिळणार्‍या दुकानाचा पत्ता दिला. त्या फिल्टर्च्या शोधात दुकानाला भेट देणार्‍या मायबोलिकराला त्या दुकानदाराने आपला स पेठी हिसका दाखवला. फार भारी होति ती सगळीच चर्चा. ते स्पिरिट अजुनहि कायम आहे ह्याचा पुरावा दिलात _/\_ :).

पर्णिका Happy /\
अहो, अशा दोन्ही बाजू खणखणीत असल्या की मजा येते. तुम्हालाही प्रतिनमस्कार.

रमड Proud

अस्मिता Happy
त्यांच्यात शारीरिक जवळीक झाली असेल हे त्या दंतमंजन सीन नंतरही माझ्या डोक्यात शिरलं न्हवतं. कारण त्याच्या डोळ्यात काही पेटलेले जाणवलेच नाही. तो स्थितप्रज्ञ वगैरे आहे म्हणणे ही आपणच आपली केलेली फसवणूक आहे. त्याला काम करता येत नाही, आणि त्याचा निर्मिती इ. हात असल्याने आपल्या वकुबाला कथा पटकथा टेलर करता करता हे जे काय उरलं ती कथा. आता पुणे दाखवा, मंडई रात्रीची दाखवा, झेड ब्रीज दिवसाचा दाखवा, सपे पहाटेची दाखवा, उद्यान गणेश जवळ पक्षी उडवा आणि अशात वेळ मारून नेता येईल तितकी नेऊ असा शुद्ध व्यावसायिक विचार आहे.

अस्मिता मस्त, बॅलन्स्ड लिहिलय. प्रत्येक मुद्दा नीटच विशद केलायस.
मी वैतागून भडास काढलेली. मेबी जास्त अपेक्षा ठेवून चित्रपट बघितला अन हाती काहीच पडलं नाही म्हणून असेल.
मला तर राहुलच्या 4-6 मित्रमैफिलींचं शूट केलेलच तर ते वाया जाऊ नये म्हणून कथा 'बनवून' उरलेलं शूट केल्यासारखं वाटलं. मग अगदीच फसवणुकीचा फिल आला, अन वैतागवाडी झाली.

सिनेमापेक्षा इथली चर्चा नक्कीच जास्त करमणूक करते आहे.

मला रादेचं मराठी बोलणं पण जरा अवघडल्यासारखं वाटलं. आजी उगाचच इंग्रजी वाक्यं पेरतेय असं वाटलं. बाकीचं उरलेला सिनेमा पाहून व्यक्त करते.

अगं अस्मिता चिल! बहुतेक तुझ्या आधी सगळ्यांनी पाहिला म्हणून तुला कुल नाही वाटला का? पहिला रिव्ह्यु तू लिहिला असतास तर इतरांचा नजरिया बदलला असतास.... असो Wink

मला अमलताश आवडलेला आहे हे परत एकदा नमुद करते Wink

ती ज्या वेगाने प्रेमात पडते, ते अचाट आहे.>>>>> कबीर सिंग मधे तरी काय लॉजिकने हिरवीण त्याच्या प्रेमात पडली होती?
प्रेमात कुठे लॉजिक वगैरे शोधता राव? कमॉन

'प्रेमात'चा अस्मिताच्या पोस्ट मधला स्वच्छ अर्थ अन प्रोटेक्टेड सेक्स करण्यात असा असावा. किंवा मी तरी तसा लावला. आणि ते अगदीच खरं आहे.
ते पार मूर्खपणा मलाही वाटलं होतं. पण मग धन्यवाद माबो कारण मला मर्म सापडलं. बहावा एकदाच फुलतो ते बरोबर आहे. पण हे एकदाच ... दरवर्षी एकदाच असते. मग मी त्या कीर्ती तर्फे ( आणि अमोल तर्फे ही) सुटकेचा निःश्वास सोडला. अजून जीव आहे ...

बाकी कबीर सिंगला स्पर्धेत ओढलात तर हा एकदम हिरो आहे याबाबत अजिबात दुमत नाही.
बाकी कबीर सिंगला चर्चेत ओढून आता रूनम्या येणार. त्या पापत तुम्ही वाटेकरी आहात आता. Wink Proud

अंजली, नाही नाही. Happy
मी कबीर सिंग बघितला नाही. हा सिनेमा असता तर लॉजिक न शोधणं शक्य होते. Happy मी सगळ्यात पहिल्यांदा पाहिला असता तरी मला हा अगदी असाच वाटला असता. मी इतरांच्या दृष्टिकोनाने माझा दृष्टिकोन कधीही पसरट करून घेत नाही.

फार ओळख नाही, प्रेमही नाही, सेक्सही अनप्रोटेक्टेड, मरणाच्या दाढेत प्रियकर. फारच डिल्युजनल वाटली कीर्ती. अनप्रोटेक्टेड सेक्स हा अतिशय मोठा मूर्खपणा आहे. आजीने कानाखाली वाजवली असती तर मला बरं वाटलं असतं पण आजीही समजूतदार - अलिप्त निघाली. अलिप्त आहेत सगळेच. ही अलिप्तता स्थितप्रज्ञता नाही.

मग मी त्या कीर्ती तर्फे ( आणि अमोल तर्फे ही) सुटकेचा निःश्वास सोडला.>>>> Lol पुन्हा दिसलाच नाही अमोल, मला त्याला ऑस्कर द्यायचे होते. Happy

त्यांच्यात शारीरिक जवळीक झाली असेल हे त्या दंतमंजन सीन नंतरही माझ्या डोक्यात शिरलं न्हवतं.>>>> ज्या अर्थी ती सकाळी त्याला खेटून दात घासते आहे, त्या अर्थी रात्र तिने तिथेच काढली हे स्पष्ट आहे. ते पेटले नाहीत कारण ते 'स्थितप्रज्ञ' आहेत. Wink

>>> एक रटाळ रेंज पकडून गात गात संपतो.
Lol

शिरीष कणेकर (बहुधा) रवी शास्त्रीबद्दल म्हणाले होते तसॅ - २२० मिनिटे खेळून शून्यावर नाबाद! Proud

माबोवर येऊन सिनेमा विषयीचा दृष्टीकोनच पार बदलून गेला आहे >>> लोक पैशांचा चुराडा करून जड होण्यासाठी (पिसं काढण्यासाठी) सिनेमे काढतात.

रच्याकने : एकंदर अमलताशची कल्पना आली. या चित्रपटाचं मार्केटिंग पठाणच्या पद्धतीने केलं असतं , म्हणजे हिरोची हिरवी चड्डी आणि हिरविनीची भगवी बिकिनी तारेवर वाळतानाचे पोस्टर, त्यावर वाद, मग दोन्हीकडचे मोर्चे, बॅन करण्याची मागणी असं सगळं केलं असतं तर हा चित्रपट शंभर कोटीचा धंदा करू शकला असता का ? राहुल देशपांडेनी यावर विचार करावा आणि मराठी चित्रपटसृष्टीसाठी प्रयोग म्हणून सिनेमा रि-रिलीज करताना हे फंडे वापरून बघावेत. हिट झाला तर स्वप्नील जोशीचा आगामी सु (शिला,जीत) हा सिनेमा सुद्धा हीट होईल.

फार ओळख नाही, प्रेमही नाही, सेक्सही अनप्रोटेक्टेड, मरणाच्या दाढेत प्रियकर. फारच डिल्युजनल वाटली कीर्ती. अनप्रोटेक्टेड सेक्स हा अतिशय मोठा मूर्खपणा आहे>>>>>>> प्रेम व्हायला फार ओळख लागत नाही Wink पुढचं सगळं जाऊदे आता Wink फार लिहित नाही

माबोवरचा अमित चित्रपटातील अमोलवर किती वैतागलाय हे मात्र कसल्याही कथे पटकथे संवाद संगिताशिवाय लख्ख समजते Happy

नई नई. अमोल बेस्ट आहे. रावल्याच मख्ख आहे. पण बॅट बॉल स्टंप सगळं त्याचं आहे.

पापात वाटेकरी झाले तरी चालेल Happy हिंदितल्या हिरो हिरवीणिने काहीही केले की चालते तुम्हाला पण ममव ने नाही! बहुत नाईन्साफी Lol

रादे प्रेमप्रसंगात कमी पडत असेल तर तेव्हढे सीन्स स्वजो ने केले तरी चालतील.
मालिकेत जशी पट्टी येते कि इथून पुढे अवंतिकेचं काम अमूक तमूक करणार आहे तसं एव्हढ्या सीन मधे अमोलचं काम स्वप्नील जोशी करणार आहे अशी पट्टी दाखवायची ( समांतर मधला अनुभव दांडगा आहे त्याचा).

मला कुणीही अनप्रोटेक्टेड सेक्स केला तरी चालणार नाही. हिंदीत असो मराठीत असो. 'प्यार की निशानी' वगैरे रिअली ??? कुठल्या काळात राहतात हे. कशाचा बहावा आणि कशाचं काय.‌ मला ते अजिबात झेपले नाही. पन्नास वर्षे मागे गेला सिनेमा. शिकलीसवरलेली तरूण मुलंमुली, कॅनेडियन वगैरे. आणि 'मैं तुम्हारे बच्चे की माँ बनने वाली हुं'..... शिवाय STDs चे काय.

Pages