मराठी चित्रपट कसा वाटला? - 1

Submitted by मोक्षू on 16 May, 2020 - 05:23

चित्रपट कसा वाटला या विषयाचा चौथा धागा नुकताच सुरु झालाय.. म्हणून लगेच हा वेगळा धागा काढला... मराठी चित्रपट पाहायचा असला की नेहमीच्या धाग्यावर खूप शोधाशोध करावी लागते.. म्हणून सगळ्यांनी मराठी चित्रपटांबद्दल ह्या धाग्यावर चर्चा करावी ही विनंती...

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

हळूवार फुलणारी प्रेमकथा (अगदीच मराठी पेपरची हेडलाईन झाली ही >>>
हे कॉम्प्लिमेंटच्या टोन मध्ये वाचू ना? >>>
'झोपणेबल' हे नवीन रेटिंग सुरू करता येईल आता. >>> Lol

अगं, झोप लागली स्वातीला. जास्तच हळुवार फुलली वाटते >>> Rofl

अमितच्या आठवणीही भारी. स्वर आले दुरूनी हे इतके शब्दशः होते हे माहीत नव्हते Happy उत्तरा केळकरची गाणी म्हणजे दूरदर्शनने कधीतरी एक कार्यक्रम सादर केला होता त्यातलीच का? यू ट्यूबवर भक्ती बर्वेच्या क्लिप्स दिसत आहेत त्याच असाव्यात.

संथ वाहते कृष्णामाई वरून आठवले. मी "सुधीर फडके" पिक्चर अगदी भारावून पाहिला. पण त्यातही हे खटकले होते. ते उत्तरेला बियास नदीच्या काठाने जाताना हे गाणे वाजते. बॅकग्राउण्डला "संथ वाहते" सुरू असताना प्रत्यक्षात पडद्यावर बियास नदी अगदी खळखळून वाहात असते. मनालीला बियास पाहिलेल्यांना किंवा इन जनरल त्या भागातील नद्या पाहिलेल्यांना सहज जाणवेल. Happy

Lol
घोरणेबल म्हणजे तुम्ही बघू नकाच, पण इतरांनाही बघू देऊ नका! Proud

*** स्पॉइलर ***
हळुवार कसली! दीड तासात ‘वी आर प्रेग्नन्ट’पर्यंत पोचले की! Proud

Lol
यांनाच चित्रपटाची 'बल' स्थाने मानावीत. Proud
उरलेली नावे अमलताश बघून ठेवेन, न बघता नावे ठेवण्याचा 'गिल्ट' यायला लागलाय.

बॅकग्राउण्डला "संथ वाहते" सुरू असताना प्रत्यक्षात पडद्यावर बियास नदी अगदी खळखळून वाहात असते. >>>> Lol अभिव्यक्ती स्वातंत्र्याला 'त्याच्या- त्याच्या' स्पीडने वाहू द्या.

उरलेली नावे अमलताश बघून ठेवेन >>> Lol नो वरीज. पिक्चर न बघताच न आवडण्याची, नावे ठेवण्याची माबोवर जुनी परंपरा आहे.

अमलताश न आवडण्याची लोकांची कारणे नक्की कोणती आहेत?
- पुस्तक वाचले आहे. ते मस्त आहे. पिक्चर जमला नाही.
- पुस्तकही वाचलेले नाही व पिक्चरही संथ आहे. काय चालले आहे कळत नाही. अमलताश म्हणजे दारू पिउन पत्ते खेळणे हे आम्ही समजत होतो.
- नव्व्दोत्तरी ब्राह्मणी पितृसत्ताक पांढरपेश्या ममव युवतीच्या व्हल्नरेबिलिटीज त्यात स्पष्टपणे उमटत नाहीत - अशा लेव्हलला आवडला नाही. म्हणजे ज्या लेव्हलला तुमचे ज्ञान संपते तेथे आमचे मतभेद सुरू होतात. आम्हाला का आवडला नाही याचे स्पष्टीकरणसुद्धा तुमच्या डोक्यावरून जाईल. तेव्हा जाऊ दे.
- आम्ही "त्यापेक्षा तुम्ही रोहित शेट्टीचे पिक्चर बघा" लेव्हलचे आहोत
- पिक्चर बघताना डुलकी लागल्याने आवडला नाही.

मी अजून पाहिलेला नाही, त्यामुळे माझी कॅटेगरी अजून माहीत नाही. ट्रेलर आवडला होता.

Lol
पिक्चर न बघता नावडत्या आयडीला आवडला म्हणून नावडणारे सिग्नेचर माबोकर आहेतच. पण पिक्चर न बघता आवडणारे, आणि त्यावर बाष्पगग्दित लेख लिहिणारे, आणि तो लेख स्पर्धेत देणारे ही आहेत ना माबोवर. Lol (घे सगळे नको असले तरी ऑक्सफर्ड कॉमा दिलेत! ) Wink

"संथ गातसे कृष्णाबाई". >> Happy

बॅकग्राउण्डला "संथ वाहते" सुरू असताना प्रत्यक्षात पडद्यावर बियास नदी अगदी खळखळून वाहात असते. >>>> Lol
भारी निरीक्षण आहे हे. Proud

अमल-ताश नावावरून पत्त्याचा काही तरी खेळ असावा असे वाटले. पण हा तर चक्क मराठी सिनेमा निघाला.
रच्याकने पठाण न पाहतच त्याचं परीक्षण लिहीलं होतं. प्रोमोशिवाय आणखी असतं काय पिक्चर मधे ?

मला अमलताश बद्दल च्या प्रतिक्रिया वाचून खुप आश्चर्य वाटले कारण मला खुपच आवडला. अनेक वर्षांनी सलग बसुन एखादा पिक्चर पाहिला म्हणुन असेल, अतिरेकी नाट्यमयता नसल्याने असेल किंवा मधे काही वर्षे पुण्यात रहात होते त्यामुळे प्रत्यक्ष पाहिलेल्या जागा, मध्यमवर्गीय जीवनशैली त्यातील स्तर कॅमेरा ने अचुक पडलेत, संवादांविना ह्यामुळेही असु शकेल.एरवी मला चित्रपटाच्या तांत्रिक आणि कलात्मक बाबींची शुन्य समज आहे. शुन्य मेकप, नॉन ग्लॅमरस अगदी अस्सल वाटणारी पात्रे ह्या आणखी काही जमेच्या बाजू.

अमलताश म्हणजे बहावा. अतिशय देखणे झाड फक्त १ महिनाच फुलते. पण फुलले की आजुबाजुचा परिसर अशक्य सुंदर करुन टाकते. पुण्यात ठिकठिकाणी बहाव्याची झाडे आहेत. एकदा खरंच पुण्यात चक्कर टाका बहाव्याच्या सिझन मध्ये. विशेषतः जंगली महाराज रोड वरुन प्रभात रोड ला लागायला मध्ये एका छोट्या गल्लीतुन जावे लागते ती गल्ली.

तर हा बहावा एक महिनाभरच फुलतो तशी एक महिनाभर आजीकडे रहायला आलेली नायिका राहुलच्या आयुष्यात आली आहे असं प्रथमदर्शनी आपल्याला वाटते. राहुल आठ वर्षांपुर्वी ब्रेन ट्युमर मुळे मृत्युच्या अगदी समीप जाऊन परत आलाय. त्यामुळे त्याला एक स्थितप्रज्ञता आलेली आहे जीवनाविषयी. लाडकी बहिण, भाची आणि जीवाभावाचे चार मित्र ह्यांच्या बरोबर ८ वर्षे अधिक मिळाली ह्यात तो समाधानी आहे. संगीत क्षेत्रात अतिशय टॅलेन्टेड असुनही तो लोकप्रिय नाही ह्याबद्दल त्याला खंत नाही. ह्या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत असं तो अतिशय सहजपणे नायिकेला सांगतो. मेकॅनिकल इंजिनिअर असुनही निव्वळ संगीता विषयी मनस्वी ओढ असल्याने त्याने आर्थिक प्राप्ती कमी असली तरीही वाद्ये दुरुस्तीचा व्यवसाय निवडला आहे. थोडक्यात काय तर नायक अतिशय सॉर्टेड आहे.

त्याच्या पेक्षा पुर्णपणे वेगळी असणारी नायिका. ती प्रत्येक नवीन अनुभव घ्यायला उत्सुक आहे. शेती, पाश्चिमात्य संगीत अशा वेगवेगळ्या क्षेत्रात मुशाफिरी करते. पण स्वतःला झोकून देऊन नाही, आवडेल तोपर्यंत करणार आणि आवडेल, सहज जमेल तितपतच करणार. म्हणून संगितात गती असली तरीही त्याची तिला असोशी नाही.

तर असे हे दोघे अगदी अचानक योगायोगाने एकमेकांच्या संपर्कात येतात आणि एकमेकांचा अभिनिवेश विरहीत दृष्टिकोन आवडल्याने एकमेकांच्या प्रेमात पडतात. त्यांच्या प्रेमात पडल्यावर त्यांच्या अवतीभवती असलेले त्यांचे सहृद आपापल्या स्वभावाप्रमाणे प्रतिक्रिया देत त्यांच्या नात्याला अगदी सहज स्विकारतात. अशा कथेला क्लायमॅक्स मध्ये कलाटणी देणे खरेतर रिस्की असते कारण क्लायमॅक्स मध्ये नाट्यमयता ओघाने येणारच. पण इथे ती अजीबात न येऊ देता क्लायमॅक्स आलाय आणि तरीही तितकाच परिणाम कारक आहे. त्या क्लायमॅक्स मधून आपल्याला कळते की नायिका नाही तर नायक अमलताश आहे तिच्या आयुष्यात आलेला. त्याच्या येण्याने तिचं आयुष्य अधिक सुंदर झालं. आता ती त्याच्यासारखी स्थितप्रज्ञ आहे, जे निसटून गेले त्याचि खंत न करता जे जवळ आहे त्याबद्दल कृतज्ञ!

जाता जाता उल्लेख केलाच पाहिजे अशी दोन पात्रे म्हणजे नायिकेची आजी आणि नायकाची बहिण. ह्या दोघिंच्या वाट्याला फार तर तीन-चार सीन्स असतील प्रत्येकी पण तेवढ्यात त्यांचं नायक नायिकेच्या पेक्षा असणार वेगळेपण अगदी नेमकं ठसत. त्या दोघीही चाकोरी आणि त्यामधुन मिळणार्या सुरक्षिततेला जीवापाड जपतात, ती जाईल अशी शंका आली की अस्वस्थ होतात आणि त्यासाठी काही अस्सल अनुभव त्यागावे लागलेत तर त्यांची हरकत नाही. आपापल्या मायेच्या माणसांनाही असे सुरक्षित ठेवण्यासाठी त्यांची धडपड चाललेली असते. थोडक्यात 'बिकटवाट वहिवाट नसावी, धोपट मार्ग सोडु नको ' हे धोरण.

माझ्या दृष्टीने एकुण भट्टी एकदम मस्त जमली आहे.

इंटरेस्टिंग, पर्णीका! स्वतः बघितल्याशिवाय अंदाज येणार नाही नक्की आवडेल का ते.

अमलताश = बहावा हे माबोवरच कोठेतरी चर्चेत आले होते त्यामुळे लक्षात आहे. पुण्यात तो तू म्हणतेस तसा बहरलेलाही पाहिला आहे.

बाय द वे जंगली महाराज रोड ते प्रभात रोड ही गल्ली कोणती? Happy डेक्कन पोस्ट ऑफिसच्या मागून डेक्कन जिमखाना मैदानाच्या बाजूने जाणारी का?

धन्यवाद फारेंड, तु म्हणतो आहेस तीच गल्ली. ह्या गल्लीत ओळीने बहाव्याची झाडे आहेत दुतर्फा. इन मीन शंभर पावले चालुन होतील न होतील एवढीच लांबी पण बहावा फुलला की इतकी अशक्य सुंदर दिसते. एकदम आर्बोरेटम इफेक्ट.

पर्णिका काय अचूक लिहीलं आहेस. अमलताश ही 'ती' नसून 'तो' आहे हे फारच उच्च निरीक्षण आहे..

अमलताश मी थिएटरमधे जाऊन पाहिला होता. मी इथे तेव्हा (बहुतेक) लिहीलं होतं. अतिशय सहज आणि आपल्या आजूबाजूला घडणारी गोष्ट असू शकते ही. नायिका मला आवडली होती.

झोपणेबल Lol
मला अ‍ॅक्टर राहुल देशपांडे फारसा आवडत नाही, तरी यूट्यूबवर आहे म्हणून बघावा काय?

अमितव, मस्त पोस्ट.

सिनेमॅटिक लिबर्टीवाली कृष्णामाई सुद्धा भारीये Lol

धन्यवाद मामी, मला अमलताश कधी रिलिज झाला वगैरे काहीच माहिती नव्हती, एकदम रॅंडम युट्यूब फीड मध्ये सजेशन म्हणून आला आणि बघितला. त्याबद्दल इथे लिहायला आले तर बाकीच्या प्रतिक्रिया बघितल्या. तु कधी लिहिले होतेस साधारण ते सांगशील का? म्हणजे जाऊन वाचते मागे.

बाकी इथे सिंगापूरात मराठी चित्रपट (बव्हंशी हिंदी पण) थिएटरच काय नेटफ्लिक्स किंवा एमेझॉन प्राईम वर ही बघायला मिळत नाहीत त्यामुळे चित्रपट कसा वाटला किंवा तत्सम धागे मी वाचतच नाही. एकदम "कोतबो" "किंवा"करा लेको चैन, मटार उसळ खा, शिकरण खा" टाईप फिलिंग येते :).

धन्यवाद मामी, मला अमलताश कधी रिलिज झाला वगैरे काहीच माहिती नव्हती, एकदम रॅंडम युट्यूब फीड मध्ये सजेशन म्हणून आला आणि बघितला. त्याबद्दल इथे लिहायला आले तर बाकीच्या प्रतिक्रिया बघितल्या. तु कधी लिहिले होतेस साधारण ते सांगशील का? म्हणजे जाऊन वाचते मागे. >>>> मी चुकून हिंदी चिकवावर लिहिलं होतं असं दिसतंय. हे बघ : https://www.maayboli.com/node/84513?page=27#comment-4985172

सुरेख लिहिले आहेस मामी, विशेषतः ते घराचं व्यक्तिमत्त्व एकदम चपखल.

@ ऋतुराज, हा सिनेमा पुस्तकावर आधारीत नाही. अमलताश ह्याच नावाचे डॉ सुप्रिया दिक्षित (प्रकाश नारायण संत ह्यांच्या पत्नी) ह्यांचे आत्मचरित्र आहे. पण त्याचा चित्रपटाशी काही संबंध नाही.

पर्णीका छान लिहिलंय. पिक्चर बघेन की नाही माहिती नाही पण परिचय आवडला.

मामीने लिहिलेलंही वाचेन आता.

अमलताश पुस्तक वाचलंय पण सिनेमा त्यावर नसावा हे वाटलंच होतं.

इथे वाचुन पाणी बघितला. खुप सुंदर चित्रपट.. आदिनाथ मस्तच.. गावचं सगळं वातावरण मस्त दाखवलं आहे.. इस्त्री चे कपडे घातलेले गावकरी नाहीत. खरेखुरे गावकरी वाटतात.
बेशुद्ध पडलेल्या/ मेलेल्या बाईच्या घागरीतले पाणी ओतुन घेणे, पुढार्याने जोरात चुळ भरणे ..जास्त पीळ डायलॉग न वापरता परीस्थिती काय आहे ते एका सीन मधे कळतंच...
हनुमंत एकदम मस्त स्मार्ट युक्त्या वापरतो ते आवडलं.. टँकर आणुन गावकर्‍यांना ग्रामसभेला एकत्र आणणे, पुढार्‍याला शाल श्रीफळ मजा आली त्या प्रसंगात...नायिका पण गोड एकदम...

अमलताश बघितला.
पॉइंट मला ही समजला नाही. बघत होतो बघत होतो आणि दाण्यांचा अतिरेक चालू झाला आणि मला येड लागल्यागत हसू येऊ लागलं. तो दाणे पार्ट, अनादि भुकेला मित्र, दाणे तोंडात फेकणारी कन्या आणि बाप, आणि मग पहिल्या फ्रेम मध्ये राहुललां चहा बरोबर दाण्याच्या लाडवाचा आग्रह.. जिगसॉ जुळलच, एक वर्तुळ पूर्ण झालं. कुणी म्हणतात आठ पोती आहेत कुणी म्हणतात दोन.. खारा... घ्या.. इथे खरा लिहायच्या ऐवजी गूगल पण खारे दाणे करतोय... तर खरा आकडा कोणालाच माहीत नाही. दीप्ती ताई दाण्याच्या लाडवाचे बरणे पोचते करत आहेत. खारे दाणे विका चे जोक करत आहेत. मला हा सगळा कॉमेडी, भारी म्हणायचं तर डार्क कॉमेडी काही वाटू लागला. दाण्याचं रूपक अजून सापडलेलं नाही ते एक राहुद्या. पण चक्रम सारखं हसत बसलो आहे आत्ता.

मुखी कुणाच्या पडते भेंडी कुणामुखी लाडू.... आठवा तो फोन वरचा मजनू भेंडीची भाजी खातो, पण आई डबा संपलाय का बघायला वाजवून बघते तर खडकम खडकम खडकम... लाडू वाजतो. आले परत दाणे. परत म्हणजे शाळेतून परत घरी आले दाणे. आणखी एक पझल पीस लावा.
बंद शटर बाहेर खुर्ची टाकून पेपर वाचणारे काका शेवटी उभे राहिले म्हटल्यावर मला समजलं आता पिक्चर संपणार बहुतेक. तसच झालं. कोण जाणे. त्या काकांना इतके वेळा दाखवलंय काहीतरी दाण्याचा रेफरंस पेरलाच असणार. किमान त्या शटरवर दाण्याची जाहिरात, खुर्ची खाली लाडवांची वाटी. परत पाहिला पाहिजे.
शोपीन ऐकणाऱ्या वाण्याच्या दुकानाच्या पाटीत ही दाणे मार्ट होतं का? का मला भास होऊ लागले आहेत?

शेवटी ब्रेन ट्युमरचे ऑपरेशन आहे हे मी काही काळ विसरून गेलो. त्याचा चेस्ट एक्सरे, तो ही माझ्या सारख्या ले मन ला स्पॉटी/ ब्लरी दिसू लागला. फुफ्फुसाचा आजार होता का काय शंका येऊ लागली. मग पोटाची अल्ट्रा साऊंड. का??? आणि मग बाबुमोशाय लिंफो सर्कोमा ऑफ इंटस्टाईन बघताहेत... बोलतो कॅन्सर. फोकस!!! बाबांनो वायटल ठीक आहेत बघून सर्जरी करतात हे सगळं ठीक आहे पण चित्रपट आहे का. इथे ब्रेन ट्युमर काढायला... म्हणजे काढून टाकायला... छातीचा एक्सरे काढताना दाखवणे, तो एक्सरे डेव्हलप करून दाखवणे यात वेळ दवडून काय केलं? बरं, चेष्ट एक्सरे म्हणजे अंगप्रदर्शन करण्याची अनोखी संधी असलं काही थिल्लर आमच्या उच्च अभिरूचीला शक्यच नाही.
तेच ती बया संडासला जाते त्या संडास चे पॉट क्लोजअप. मग हार्पिक आणि मग फ्लशचा आवाज आणि मग ताई बाहेर येऊन निःश्वास सोडताना दिसतात ते दाखवण्याचं प्रयोजन काय! तरी तिला पीनट ॲलर्जी आहे. त्यामुळे तिने दाणे खाल्ले हे शक्य नाही. Ohh .... तो मॉर्निंग सिकनेस न्हवता दाखवायचा ना!!!! देवा प्लीज नसुदे!!! प्लीजच!!

तर राहुल आणि कीर्ती ला एकमेकांबद्दल काही तरी वाटतं म्हणे. पण ते का हे मला जाणवलच नाही. ती किती छान गाते, तिच्या आवाजाचा पोत किती छान आहे रे. बास!!! राहुल फार कॅजुअली वागताना दिसतो. प्रेम, आकर्षण, ओढ, हुरहूर त्याच्या चेहऱ्यावर जरा मागमूस म्हणूनही दाखवायचा प्रयत्न करत नाही. सेम विथ कीर्ती. बोलून नका रे दाखवू. चेहऱ्यातून दाखवा की. त्यांच्यात काहीही केमिस्ट्री दिसत नाही.
राहुल चे दुसरे आणि नंतरची एकदोन गाणी आवडली. बाकी ह्यांचा बँड होता, ज्याम करतात आणि ड्रम तर सोडाच एक परकशन वाद्य...गेला बाजार डफली, खंजिरी ही न दाखवता मिळेल त्या पृष्ठभागावर ताल देणे यात नक्की काय साधलं?

शेवटी राहुलला ढगात पाठवणार हे तर नक्की होतं, मग सिंगल मॉम बनाण्याशिवाय दुसरा काहीच शेवट सुचेना? आम्ही चालवू हा पुढे वारसा ..
शेती करणे तर चार कुंड्यात रोपं लावणे. बासच! कॅनेडियन तो ही जेन झी एस्किमो ही रेशियली चार्जड, डरोगेटरी शब्द कदापि वापरणार नाही. इन्यूइट म्हणेल. ते एक असो..
तर दाण्याच्या लाडवांची रेसिपी येऊ द्या. मला एकदम खावेसे वाटू लागले आहेत.

अमित जिओ Wink
मलाही अजिबातच आवडला नाही. उगा आर्ट फिल्म, फिल गुड फिल्म खाली काहीही भरलय.
मधेच ते मोदकही येतात. निमित्त, कारण काहीच नाही.
अन चार व्यवसाय कढून बुडित असताना ब्रेन ऑपरेशनचा खर्च कसा काय बुवा जमला? बरं पियानो आख्या पुण्यात किती असतील? त्यांची दुरुस्ती किती असेल अन त्यातून पैका किती मिळेल? सगळा हिशोब काही जुळला नाही. अन तसच त्या दोघांचं नातं कोणत्या आधारावर जुळलं काय की.
दोघंही मख्खच वाटले मला. साधं सरळ म्हणजे विदाऊट एक्सप्रेशन असतं असं आहे का? की आर्ट फिल्म म्हणून नो मेकअप तसं नो एक्सप्रेशनस?
बहिणीला तर काडीचं काम नाही. आजी अती कृत्रिम वाटली. मेहुणा तर नुसतं गाण्याला माना डोलवण्यासाठी.
मुळात एकही व्यक्तिरेखा धड उभीच केली नाही. अन गोष्ट तर पहिल्या पाच मिनिटात कळून जाते. अतिशय प्रेडिक्टेबल.
किमान एकदा अमलताश दाखवायचचा तरी, तितकच नयनसुख :फिदीफिदी:

Pages