Submitted by दत्तात्रय साळुंके on 17 December, 2024 - 03:37
उन्हाळ्यात पार आटलेला
पांढ-याफट्ट चेह-याचा ओढा
शेतावर रुसल्यागत
हूप्प बसतो खरा
पण स्वत:वरच रागावतो
फणफणतो, काढतो राग
वाळू, दगड, गोटे तापवून
काठावरची झाडंही खंततात
याच्या काळजीनं, हा काही बोलत नाही म्हणून
एरवी पावसाळ्यात किती खळखळाट
आता कंठ रुध्द झालाय त्याचा
पाणथळीतल्या पाखरांच्या गाण्यावाचून
गाईम्हशीच्या न्हाण्यावाचून
डोहात अर्धवट सोडलेल्या नाजूक पायावाचून
बैल पाण्यावर आल्यावर ऐकलेल्या गोड शीळेवाचून
झुकलेलं निळं आभाळही
कुठंच दिसत नाही
© दत्तात्रय साळुंके
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
व्वा
व्वा
(याच्या काळजीनं, येथे एक स्पेस दिली तर अधिक सुलभ होईल अर्थ समजून घ्यायला)
मस्तच लिहिलेत
बेफी अनेकानेक धन्यवाद...
बेफी अनेकानेक धन्यवाद... दुरुस्ती सुचवल्याबद्ल आभार.
ओढा असाही असू शकतो?!
ओढा असाही असू शकतो?!
आंबिल ओढ्याकाठी आयुष्य गेले, त्यामुळे ओढा याचा अर्थ मोठे गटार एवढाच!
आवडलाच!
मस्तच लिहिले आहे.
मस्तच लिहिले आहे.
पोचली.
पोचली.