भुभु आणि माऊ बाळांच्या गंमती जमती २

Submitted by आशुचँप on 14 August, 2022 - 16:47

https://www.maayboli.com/node/77227
पहिल्या धाग्याने २००० चा टप्पा गाठल्याने नवा धागा

==================================================================================

आपल्या बाळांच्या गमंती जमती, त्यांचे फोटो आणि किस्से मायबोलीकरांशी शेअर करण्यासाठी हा धागा. बाकीच्यांनी नुसता आनंद घ्यावा. तुम्हाला या बाळांचा त्रास झाला असेल, राग असेल तरी हरकत नाही पण तुम्ही तुमच्या तक्रारी वेगळ्या धाग्यावर टाकू शकता. ऑलरेडी तसा धागा आहे. इथे फक्त पॉझीटीव्ह गोष्टीच शेअर व्हाव्यात अशी इच्छा आहे.

हे वाचून कुणाला भूभू किंवा माऊ पालक व्हावेसे वाटले तर आनंदच आहे

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

दादू आणि ओडीनला वाढदिवसाच्या शुभेच्छा

अंजली, एका दिवसात दोघे नाही रुळणार. नविन बोक्याला वेगळ्या खोलीतच ठेवा. दोघांना दाराखालून एकमेकांचा वास घेऊ दे. दिवसा तुन दोनदा त्याला बाहेर काढून तिला आत सोडा.
आमचं नविन माऊ आणलं तेव्हा असंच टप्प्या टप्प्याने एकमेकांशी ओळख करुन दिली होती.

आमच्या मनूचा हट्ट सुरू झाला आहे की घरी मांजराचं पिल्लू आणायचं. कधीतरी फोनवर माऊच्या पिल्लांचे व्हिडिओज् बघते आणि परत तेच टुमणं सुरू.खूप दिवस टाळून झालंय पण आता माऊ घेऊन येणं मस्ट आहे.
आम्ही कधीच कुठलाही प्राणी पाळला नाहीये. त्यामुळे जमेल की नाही अशी धाकधूक वाटतेय. घरी आम्ही ३ माणसं. त्यात बाबा दिवसभर ऑफिसमध्ये, मनू अर्धा दिवस शाळेत. मी पूर्णवेळ असेनच घरी. पण कोणत्या प्रकारचं मांजर घ्यायचं? पर्शियन की देशी? काळजी कशी घ्यायची? आमच्या ओळखीत कुत्रे बऱ्याच जणांकडे आहेत पण मांजर कुणाकडे च नाही. व्हेट क्लिनिक जवळच आहे.
चिपळूणचं हवामान अगदीच विचित्र. सगळेच ऋतू एकदम कडक.ते पण मानवायला हवं त्याला. मला कदाचित जास्तच प्रश्न पडत असतील पण छानसं माऊ आणून त्याला छान सांभाळायची खूप इच्छा आहे.
कुणाला अनुभव असतील तर नक्की शेअर करा.

चिन्मयी, माऊ हे सगळ्यात लो मेंटेनन्स पेट. खाण्याच्या वेळा सांभाळल्या, लिटर ट्रे साफ ठेवला, दिवसातून १५/२० मिनीटे खेळलं की झालं. नक्की आणा., फक्त शक्यतो रेस्क्यू केलेलं आणा. ओळखीत कुठे माऊला पिल्लं झालेली असतील तर आणू शकता.
आणल्यावर डॉक्टरकडे न्या. ते पुढ्चं सांगतील. वॅक्सिनेशन वगैरे. पहील्या वर्षी ३ इंजेक्शन्स असतात दर महीन्याला एक असं. नंतर दर वर्षी एक. शिवाय २/३ महीन्यांनी डिवर्मींग. ते घरी करता येतं.
पुढे योग्य वयाचं झालं की ऑपरेशन करुन घ्यायचं.

घरी एक लिटर ट्रे, लिटर सँड, कोरडा आणि ओला खाऊ, ट्रीट्स ठेवायच्या. वर चिकन वगैरे काय खाईल ते.

ऊंचावर राहात असाल तर काळजी घ्यावी लागते. वाटलं तर नेट लाऊन घ्यायचं. आमचं पहीलं माऊ आणलं तेव्हा नेट वगैरे काही केलं नाही. दुसरं आणलं तेव्हा रेस्क्यू करणार्‍यानी नेट हवंच अशी अट घातली म्हणून आत्ता जाळी लाऊन घेतली आहे.

फक्त बाहेरगावी जायचं असेल तर काय हा प्रश्न पडतो. दिवसभर मांजरं आरामात राहतात. रात्रीचा प्रश्न येतो. आजवर कोणीना कोणी असल्याने होऊन गेलं , आता कॅट होम स्टेची सवय करणार आहोत.

नक्की आणा. फार गोड असतात माऊज.

एक-दोन ठिकाणी सांगून ठेवलंय. दोन्ही प्रकारचे माऊ मिळायचे चान्सेस आहेत. बघते कोणतं येतंय ते. मिळाल्यावर अजून शंका घेऊन येईनच. Happy

eecea86e-6641-47c4-913f-5ded740db425.jpeg

सिंबा आणी मस्ती मुड

त्याचे फेवरीट टॅाय आहे, बनीचे मागचे पाय चावून चिंध्या झाल्यात पण ते काही सोडायचे नाही. रात्री झोपतांना जवळ घेऊन झोपतो

काय चाललंय? हरितात्या सोडता कुणी इतक्यात फोटो टाकले नाहीत इथे.
इथे सध्य प्रचंड थंडी आहे. शून्याच्या खाली टेम्परेचर आहे बरेच दिवस. स्नो होऊन गेला तो वितळलेला नाही. माउई ला काही दिवसापूर्वी मी स्नो शूज आणले. ( डोन्ट नो व्हॉट आय वॉज थिंकिंग!!) त्यासोबत इन्स्ट्रक्शन मधे लिहिले होते, आधी नुसते तुमच्या डॉग ला त्याच्याशी खेळु द्या. वास घेऊ द्या. मग नुसते ५ मिनिट घालून बघा . असे टप्प्या टप्प्याने इन्ट्रोड्यूस करायचे होते. तसे सग्गळे केले . माउई ने वास घेऊन झाला, थोडे चावून बघितले. मग पायात घात्ले. पण कसले काय! ते पायात घातल्यावर पुतळा झाला त्याचा !! हलायला तयार नाही Happy
मग ट्रिट्स थोड्या थोड्या अंतरावर ठेवल्या. तेवढ्यापुरता विचित्र पाय उचलत सरकत जाऊन त्या ट्रीट तेव्ढ्या खाऊन घेतल्या. पुढे काय? पुढे पुन्हा आपला शुंभासारखा उभा !! मग काय?! सो आता सध्या बूट नुसते पडून आहेत. पुन्हा पेशन्स वाढवून ट्राय करणार आहे.
shoes.jpeg
हा बघा शुंभ बाळ Lol

होना फोटो नाही टाकले खरंच बरेच दिवस. माऊई आणि बुट दोन्ही गोंड्स...
सॅमीला असं स्वेटर घातलं की व्हायचं उलटं उलटं चालायची आणि तिला आणलेला साईझ जरा लहान पण झाला होता तर सगळीकडून भसाभस फर बाहेर येत होती.

ही बघा नवीन गादी आणि आवडतं स्टुल.

IMG_6064.jpg36908ceb-65cf-42b9-a3a8-f7b01163da4e.JPG

कसलेचे भाव आहेत माउई … जसं काही कुणी ऐलीयन पाहिला Happy

ईकडेपण निगेटीव तापमान आहे तरीपण सिंबा मस्त सोफ्यावर बाहेर बसून असतो, ऊद्या बर्फ पडणार आहे तेव्हा बाहेर नुसता धुडगूस असणार हे नक्की

बाकी मंडळी तुमची बाळं कशी आहेत

मै Lol माऊईच्या चेहर्‍यावर कसले गोंधळलेले भाव आहेत. म्हणजे आता हे पायात तर घातलं, पण आता नेमकं काय करायचंय?

सॅमी एकदम मऊ मऊ गुंडा आहे Happy

मैत्रेयी,
चालायला लागला की सुरवातीला विचीत्र चालतात मग चालतात नीट. मागच्या वर्षी कोकोला असे शूज घालून सबवे मधून सगळं न्यूयॉर्क फिरवलं होतं. सुरवातीला वैतागली होती, शूज काढायचा प्रयत्न करत होती पण नंतर चालायला लागली.
IMG-20240505-WA0000_0.jpg

कसला क्युट आहे माऊइ
मी पण आणून ठेवले आहेत शुज . पण चिखल असेल तर ते शुज घालून फक्त paw वाचणार पण बाकी सगळीकडे घाण होणारच म्हणून अजून तरी वापरले नाहीयेत
सिम्बा चा फोटो काय मस्त पकडला आहे
कोको एकदम स्मार्ट दिसते आहे

ac6b16f9-1c63-4086-9f27-33e016fe064f.jpeg

नक्की बर्फ कुठून पडतोय याचा अंदाज घेण्याचा प्रयत्न

आज सकाळ पासून बर्फात नुसता धूडगूस घातलाय, घरात यायचे नावच घेत नाहीये … मलापण बाहेरच बस म्हणतोय …

मृणाल, हरितात्या- काय सुंदर फोटो आहेत.
सगळेच फोटो सुंदर. शूजचे किस्सेही वाचले. आम्ही थंडीमुळे घरातच सॉक्स पळवून खेळत आहोत.
IMG-20241206-WA0004.jpg

अस्मिता, ख्रिसमस ट्री साधारण कोणत्या मुहुर्तावर गंडाळुन ठेवता तुम्ही ? Proud
बाकी कोकोनट क्यूट अ‍ॅज युज्वल! हरितात्या आणि मृणाल ने टाकलेले फोटो पण मस्त!

गुंडाळून ठेवला दोन जानेवारीला. हा ज्या दिवशी उभा केला त्या दिवशीचा फोटो आहे. अर्थात कोकोनटच्या देखरेखीखाली झालं सगळं. Wink

Pages