भुभु आणि माऊ बाळांच्या गंमती जमती २

Submitted by आशुचँप on 14 August, 2022 - 16:47

https://www.maayboli.com/node/77227
पहिल्या धाग्याने २००० चा टप्पा गाठल्याने नवा धागा

==================================================================================

आपल्या बाळांच्या गमंती जमती, त्यांचे फोटो आणि किस्से मायबोलीकरांशी शेअर करण्यासाठी हा धागा. बाकीच्यांनी नुसता आनंद घ्यावा. तुम्हाला या बाळांचा त्रास झाला असेल, राग असेल तरी हरकत नाही पण तुम्ही तुमच्या तक्रारी वेगळ्या धाग्यावर टाकू शकता. ऑलरेडी तसा धागा आहे. इथे फक्त पॉझीटीव्ह गोष्टीच शेअर व्हाव्यात अशी इच्छा आहे.

हे वाचून कुणाला भूभू किंवा माऊ पालक व्हावेसे वाटले तर आनंदच आहे

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

हा फोटो बघून मी भाळले होते.>>>कित्ती गोड फोटो आहे हा, नो वण्डर तु प्रेमात पडली.
बर्थडे जोरात झाला की

Happy थॅंक्यू थॅंक्यू सर्वांना. हो, ती पप कूकीच आहे. त्याच Dog bakery - Barkery मधून आणली. तिथले फोटो आणले तुम्हाला दाखवण्यासाठी -
IMG-20241115-WA0003.jpg
केक -

IMG-20241115-WA0004.jpg

हॅप्पी बर्थडे कोकोनट

जोरदार झालाय की वाढदिवस

लहानपणीचा फोटो अगदीच गोंडस आहे

ओडीन महाशय ५ वर्षे पूर्ण करते झाले तर दादूने १८ व्या वर्षात पदार्पण केले. पण दोघे
ही अजून आहेत तसेच आहेत. नेहमीसारखाच केक, तसाच दंगा.

ओड्या पळून बाहेर हिंडल्याचा धसका घेऊन मी तातडीने त्याला डॉग टॅग ऑर्डर केलाय, एक बाजूला त्याचे नाव आणि दुसरीकडे माझा फोन नंबर. आता समजा पळालाच तर निदान कुणीतरी नंबर बघून फोन करेल अशी आशा.

ग्राऊंडवर च्यईंग स्टीक घेऊन गेलेलो त्याच्या मित्रांना द्यायला. रियोच्या बाबाकडे वळून सांगत होतो फोटो काढू यांचा, आणि माझं लक्ष डायव्हरट होताच रिओने एक हातातून ट्रीट पळवली ओड्याने दुसऱ्या आणि क्षणार्धात गट्टम पण केली. कसला फोटो आणि काय. मग त्या एंजलला पण दिली, तीला सवय नव्हती हे खायची, त्यामुळे नुसतीच चिरुटासारखी तोंडात घेऊन फिरत होती.

बाकी नेहमीप्रमाणे व्हेट चक्कर झाली, त्यांनी सांगतिले चिकन कमी करा त्याचे, वजन परत वाढायला लागलं आहे.

20241208_203521~2_0.jpg
आज एक भूभू रिक्षातून उतरला त्याच्या ताईच्या कडेवर बसून. त्याचे शूज गोड वाटले फार म्हणून परवानगी घेऊन फोटो काढला.

ओडीनला वादिहाशु!

माझ्या एका मैत्रिणीला काही दिवसांसाठी पेटसिटर हवी होती तिच्या बोक्यासाठी. मी माझ्या मुलीचं नाव सुचवलं म्हटलं ती घेऊ शकेल काळजी पण माझ्या घरी सोडलं तर. ती म्हटली सॅमीबरोबर ओळख करून द्यायला आणू का.. एक दिवस ठेवून बघते. म्हटलं बघ मी गॅरंटी देऊ शकत नाही सॅमी कशी वागेल. मंकी गेल्यावर दुसरं पेट आणलं नाहीये आम्ही. आधी शक्यतो लांब लांबच ठेवू.
तर काल ती तिच्या बोक्याला घेऊन आली. आधी त्याच्या बॅगेत बसूनच हाय हॅलो करवलं. सॅमी चांगलीच गुरगुरत होती, हिस्स करत होती. मागे तिचा एक विडीओ दाखवला होता ना तस्संच. त्याला खालच्या रूममधे ठेवलं मग रात्रभर त्याचं पाणी, खाणं, लिटर सगळं तिकडेच दिलं म्हटलं सकाळी बघू. सकाळी दार उघडून ठेवलं की हा येईल वर. आला पण सॅमीने त्याला परत खाली हुसकावलं गुरर्र गुरर करून. आता तो तिकडेच बसलाय बिचारा कधीचा, ही बया खाली जाऊन त्याला धमकावून येतेय वाटतं की वर येऊ नकोस असं काही. पाठवते झालं परत, तो काही जास्त खात पित पण नाहीये. की अजून १ दिवस वेळ द्यावा?

हो काल संध्याकाळी मी थोडा वेळ बसले होते त्याच्याशेजारी जाऊन. शांत वाटला. अजून एक माबोकर मैत्रिणीने पण सांगितले की त्यांना त्यांचा असा वेळ लागतोच अ‍ॅडजस्ट व्हायला आणि आमच्याकडे थोडा वेळ कमी आहे आत्ता. त्याच्या फॅमिलीला १ आठवड्याने बाहेरगावी जायचेच आहे. आम्ही थोडं आधी भेटायला हवं होतं. पण असो.
मग शेवटी सर्वानुमते असं ठरलं की त्यांच्या घरी जाऊनच माझी मुलगी टेक केअर करेल दर १ दिवसाने. खाणं ठेवणं, पाणी बदलणं, थोडा वेळ खेळणं वगैरे. बेस्ट ऑफ बोथ वर्ल्ड.

छानच.पण तो एकटा त्याच्या घरी राहील त्यावेळी ओरडत बसेल बिचारा.

नाही तशी आहे सवय त्याला २-३ दिवस राहतो. अगदीच वेळ पडली तर घरी आणू आमच्याकडे पण वेगळ्या खोलीत ठेवू.

Pages