Submitted by आशुचँप on 14 August, 2022 - 16:47
https://www.maayboli.com/node/77227
पहिल्या धाग्याने २००० चा टप्पा गाठल्याने नवा धागा
==================================================================================
आपल्या बाळांच्या गमंती जमती, त्यांचे फोटो आणि किस्से मायबोलीकरांशी शेअर करण्यासाठी हा धागा. बाकीच्यांनी नुसता आनंद घ्यावा. तुम्हाला या बाळांचा त्रास झाला असेल, राग असेल तरी हरकत नाही पण तुम्ही तुमच्या तक्रारी वेगळ्या धाग्यावर टाकू शकता. ऑलरेडी तसा धागा आहे. इथे फक्त पॉझीटीव्ह गोष्टीच शेअर व्हाव्यात अशी इच्छा आहे.
हे वाचून कुणाला भूभू किंवा माऊ पालक व्हावेसे वाटले तर आनंदच आहे
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
>>>>>ह्यावर दुमत नको हां सामो
>>>>>ह्यावर दुमत नको हां सामो.
कशाला होइल दुमत? आमीर खान कधीही आवडतोच
सिम्बा अगदी निरागस बाळ वाटतो,
सिम्बा अगदी निरागस बाळ वाटतो, मोठा झाला तरी
त्याला दंबीस पणा शिकवायला ओडिन सोबत ठेवा काही दिवस
त्याची लेटेस्ट मजा
ग्राउंडवर एक दाल्मेशियन आलेली एंजल म्हणून, नावाप्रमाणेच देखणी
ओडिन महाशय लगेच भाळले आणि लीश मधून सोड म्हणून मागे लागले
मी त्यांना विचारलं तर ठिके म्हणाले
तर मज्जा म्हणजे लीश मधून सोडताच ती भिंगरी सारखी पळाली
ओडिन फुल स्पीड ने तिच्या मागे
ती लांब चक्कर मारून आली आणि परत दुसऱ्या दिशेने सुसाट पळाली
दोनदा तिच्या स्पीडने धावून ऑड्या फाफलला, येऊन त्याने बसकण मारली मातीत
ती परत आल्यानंतर म्हणाला माझं काही वय राहिलं नाही तुझ्या मागे झाडातून धावायचं, तुला हवं असेल तर ये, आपण इथंच चक्कर मारू निवांत चालत वगैरे
पण ती कसली ऐकतीय, ती कानात वारू शिरल्यागत हुंदडत होती
ओड्याच्या लक्षात आलं हे आपल्याला झेपणारे प्रकरण नाही
त्यामुळे त्याने विषयच सोडून दिला तिचा
मलाच काही इंटरेस्ट नाहीये असं म्हणत दुर्लक्ष केलं
मी त्याला कितीही उसकावल तरी तिच्या मागे काय गेला नाही
हो हो. दुमत नाही. दोघांनाही
हो हो. दुमत नाही. दोघांनाही मम.
ओडिन डोळ्यासमोर आले अगदी.
ओडिन डोळ्यासमोर आले अगदी. जाउ द्या, शी इज आउट ऑफ माय लीग असे म्हणून नाद सोडला वाटते.
ह्यावेळी कुठे गेली ओडीनची
ह्यावेळी कुठे गेली ओडीनची स्क्रिनींग प्रोसेस? विचारायचं त्याला
ओडिन डोळ्यासमोर उभा राहिला
ओडिन डोळ्यासमोर उभा राहिला किस्सा!
ह्यावेळी कुठे गेली ओडीनची
ह्यावेळी कुठे गेली ओडीनची स्क्रिनींग प्रोसेस? विचारायचं त्याला >>>
तोच नापास झाला त्याच्याच प्रोसेस मध्ये
डालमेशीयन मुळातच काटक, तुडतुडीत आणि चपळ
त्यांच्या वेगाशी बरोबरी करणे आमच्या जाडु ला शक्यच नव्हतं
तरी त्याने एक दोनदा जीव तोडून धावून पाहिलं
तो इतका दमलेला की नंतर घरी येऊन झोपलाच
त्यामुळे ती आली की याला सांगतो जा तिला पकड, तर नकोच म्हणतो
ओडिन
ओडिन
बिचारा!
बिचारा!
ओडिन म्हणजे एकदम फनी … जास्त
ओडिन म्हणजे एकदम फनी … जास्त पळापळी आवडत नाही वाटतं त्याला. सध्या पोहणे बंद का?
पाळापली आवडते त्याला, रिओ
पाळापली आवडते त्याला, रिओ सोबत मस्ती पण करतो
पण एंजल च्या स्पीड ने पळून जीव अर्धा झाला त्याचा
आणि त्याचा इगो पण हर्ट झाला
पोहणं सध्या बंद, कॅनाल चे काम सुरू असलयाने पाणीच नाहीये
एक डॉग स्विमिंग पूल आहे पण ते फक्त अर्ध्या तासासाठी 200 रु घेतात
बर तोही इतका टीचका आहे पूल की ऑड्या बोर होतो
त्याला वाहत्या पाण्यात लांबवर पोहण्याची सवय
तोच नापास झाला त्याच्याच
तोच नापास झाला त्याच्याच प्रोसेस मध्ये
ओड्या
ओड्या
ऑड्या चे दिवाळीतले उद्योग
ऑड्या चे दिवाळीतले उद्योग
घरी सगळे नातेवाईक आल्यामुळे खुशीत होता, भरपूर लोकं खेळायला म्हणून. सतत कुणीतरी जात येत असल्याने मेन गेट उघडं राहिलं. एरवी तो जात नाही असा पण त्या दिवशी कोण दिसलं काय झालं महिती नाही किंवा एखादी भुभी गेली असेल पण हा मुलगा पसार झाला. मी कामाला म्हणून बाहेर गेलेलो, आई बाबा नातेवाईकांच्या गराड्यात त्यामुळे त्यांनाही कळलं नाही.
दादूच्या एक मित्राने त्याला पाहिलं त्याला शंका आली म्हणून त्याने फोटो काढून त्याला पाठवला की हा ओडिन च आहे ना
दादूची पळापळ झाली, तेव्हा कळलं की महाशय घरात नाहीयेत
तो घरापासून बऱ्यापैकी लांब, सिंहगड रोड वर मोकाट फिरत होता
दादू गाडी घेऊन गेला आणि मग त्याला बघताच खुशीत येऊन लगेच गाडीवर बसून घरी आला.
आई बाबा फुल टेन्शनमध्ये तोवर आणि मी पण टेन्शन घेईन म्हणून मला कळवलं नाही, घरी आल्यावर सांगितलं
दादू म्हणाला त्याला लांब गेल्यावर बहुदा घरी यायचं कसं हे आठवत नव्हतं मला बघून त्याला इतका आनंद झाला की अक्षरशः पळत पळत आला माझ्याकडे
आई म्हणे त्या मित्राने पाहिलं नसतं तर काय केलं असतं याने
म्हणलं काय सांगणार, तिथंच फिरत राहिला असता कदाचित किंवा वासावरून आलाही असता
पण डोक्याला शॉट दिला इतकं खरं
दुसरं म्हणजे पणती चा वास घ्यायला गेला, ती मेणवाली पणती होती आणि गरम मेण चिकटले नाकाला, चांगला फोड आला, आणि घासून घासून काढला आणि स्किन सोलवटून घेतली. बरं इतक्याने शहाणा होईल ना, तर नंतर परत एकदा पणतीला नाक लावताना पाहिलं, म्हणलं काय करतोय हा म्हणून लांबूनच बघितलं.
तर बहुदा त्याला राग आला असावा किंवा हे डेंजरस आहे प्रकरण म्हणून तो कठड्यावर ठेवलेल्या पणत्या नाकाने खाली ढकलून द्यायला बघत होता.
मग आम्ही त्याच्या रेंजमध्ये येणार नाहीत अशा उंचीवर ठेऊन दिल्या सगळ्या
बाकी समस्त भुभु लपून बसली असताना ओडिन महाशय फटाके एन्जॉय करत होते, मोठा आवाज आला की दचकायचा पण घाबरला एकदाही नाई
आम्ही कैक वर्षे फटाके आणणे बंद च केलं आहे पण शेजारी फुलझाड/अनार लावत होते ते त्याला जाम आवडायचं, संपलं की परत लावा म्हणून भुंकायचा. ते बघून मलाही एक पाकीट आणायचा मोह झाला पण म्हणलं हा दिवाळी संपली तरी रोज आणा म्हणेल, भरोसा नाही त्याचा
एकदरित दिवाळीत "दिवे" लावले
एकदरित दिवाळीत "दिवे" लावले ओडिनने!
म्हणलं हा दिवाळी संपली तरी रोज आणा म्हणेल, भरोसा नाही त्याचा >> ओडिनचा धाक!
अरे बाप रे मोठा पराक्रम झाला
अरे बाप रे मोठा पराक्रम झाला की! कुत्रा हरवणे हे म्हणजे फार मोठे नाइटमेअर आहे डॉग पेरेन्ट्स साठी. बरे झाले सुखरूप सापडला लगेच!
होना... ईमॅजिनच करु शकत नाही,
होना... ईमॅजिनच करु शकत नाही, असे काही झाले तर काय होईल.. लक्ष्य ठेवा त्याच्यावर.
उद्योगी कार्टं झालं होतं
उद्योगी कार्टं झालं होतं म्हणजे ओडिनचं
फटाक्यांच्या बाबतीत तुम्हाला धाकात ठेवतोय म्हणजे प्रगती आहे
GPS काॅलरचा अनुभव आहे का
GPS काॅलरचा अनुभव आहे का कोणास?
ही फरवाली पोरं दिसेनात म्हटल्यावर मी तर प्रचंड घाबरते
कालच रात्री मिनी, आमचे शेंडेफळ शेजार्यांच्या घरी जाऊन बसलेली. ती कधीच अशी जात नाही. इकडे मी हैराण.
सगळे डॉवर कपाटे बाथरूम परत परत उघडून बघितले. खाऊचा डबा वाजवला. तरी काहीच पत्ता नाही
हाका मारल्यावर शेजारच्या मुलीने सांगितले की तुमचे मांजर आमच्याकडे आहे. हुश्श झाले एकदम.
आमच्या टाउन मधे एक बीगल बाळ
आमच्या टाउन मधे एक बीगल बाळ गेल्या महिन्यात हरवलं, रोज कुठे ना कुठे दिसल्याचे मेसेज असायचे कुणा कुणाच्या रिंग कॅमेर्यावर . पण तो बिथरलेला, घाबरलेला होता, कुणी हाक मारायचा प्रयत्न केला तर तो पळून जायचा. शून्य डीग्री थंडी सुरु होण्यापूर्वी तो सापडावा, सगळा आजू बाजूला जंगल एरिया असल्यामुळे कायोटी , कोल्हे वगैरेच्या तावडीत सापडू नये म्हणून पेरेन्ट्स काळजीत होते. रिंग कॅमेर्याचे नेटवर्क भारी असते. सगळे अॅलर्ट जवळपास्च्या सगळ्या रिंग कॅमेरावाल्यांना जातात. रोज ते बघून चुटपुट लागायची, मला तर स्वप्नात पण तो बीगल आला एक दोनदा मग लोकांनी बॅकयार्डात फूड, पाणी वगैरे ठेवायला सुरुवात केली, ट्रॅप वगैरे सेट अप केले. तो दिसला की ताबडतोब त्याच्या पेरेन्ट्स ना टेक्स्ट करणे इतपत सपोर्ट तयार झाला. आणि जवळपास १ महिन्यानंतर परवा सापडला की तो!! अगदी बारीक झाला होता पण हॅप्पी फेस एकदम!मलाच इतके मस्त वाटले तो अपडेट बघून!!
खर्या अर्थाने दिवे लावले की
खर्या अर्थाने दिवे लावले की ओड्याने, दिवाळी जोरदार झाली की तुमची.
सिंबा काही घाबरत नाही फटाक्यांना …
मै, मध्यंतरी इथे न्यूजर्सीतून
मै, मध्यंतरी इथे न्यूजर्सीतून एक कुत्रा हरवला होता. त्याच्या काही मेडिकल नीड्सही होत्या. काही महिने तरी मी सोशल मिडीयावर त्याचे फोटो बघत होते. मिळाला की नाही कोण जाणे.
बर्याच केसेस होतात गं पण
बर्याच केसेस होतात गं पण मोस्टली हॅपी एंडिंग कमीच असतात
आमच्या नेक्स्ट डोर नेबर अॅप
आमच्या नेक्स्ट डोर नेबर अॅप वर पण सारखं येत असत काही ना काही. बरेच परत येतात ... अस वाटत तरी आहे. माहीत नाही
ओडीन अरे बाप्रे ! त्याच्या
ओडीन अरे बाप्रे ! त्याच्या गळ्यात कॉलर असते ना नेहेमी. एक जीपीएस ट्रॅ़कर पण बसवा त्यात. नेहेमी जात नसेल पण आपलाच जीव टांगणीला असं कधी झालं तर म्हणून फु.स.
मैत्रेयी बरं झालं सापडलं बिगल! हुश्श वाटलं
सॅमीने खूप दिवसांनी उपद्व्याप केला. घरातल्या जिन्याजवळ अनेक बारकी बारकी पिसं आणि कापसासारखे पुंजके विखुरले होते. तेव्हाच अंदाज आला ताईंनी दिवाळी साजरी केली वाटतं. जिन्याजवळच बसून होती . शंका येऊन वाकून बघितलं तर बारकंसं चिमणीचं पिल्लू जिन्याखालच्या कोपर्यात निपचित पडलेलं,,, एक दोन थेंब पाणी टाकून पाहिलं चोचीवर पण नो हालचाल. मर्डर सीन एकदम. पण आमचा गुन्हेगार तिथेच बसून राहिलेला.
वाईट वाटतं त्या पिल्लांसाठी. आम्हीच गाफील राहिलो आज जाळीचं दार नेहेमी लावलेलं असतं ती डायरेक्ट घरात येऊ नये म्हणून , आधी तिच्या तोंडात काही नाहीये ना बघूनच आत घेतो. तिने आधी असं २-३ वेळा केलंय. ती बाहेर असते तेव्हा लक्ष ठेवतो कोणत्या पक्ष्याला पकडत नाही ना पण दर वेळी शक्य होतं असं नाही.
काय करावं या मांजरांचं?
काय करावं या मांजरांचं?.....
काय करावं या मांजरांचं?..... काही करू नये.नैसर्गिक अंत:प्रेरणा असते त्यांची.
मांजरं निसर्गता शिकारी असतात,
मांजरं निसर्गता शिकारी असतात, त्यामुळे तुम्ही काहीच करू शकतं नाही .
बापरे ओडिन ...काय हालत झाली
बापरे ओडिन ...काय हालत झाली असेल तुमची
काल कोकोनटचा दुसरा वाढदिवस
काल कोकोनटचा दुसरा वाढदिवस झाला.
हा फोटो बघून मी भाळले होते.
पपकेक, पंजा व वर स्प्रिंकल्स.
लहानपणी ओल्या नारळासारखाच होता, आता सुके खोबरे झाले आहे. सणावाराला किंवा गंमत म्हणून त्याला टाय घालून बसवतो. कालचा फोटो.
हॅपी बड्डे!! देखणा दिसत आहे
हॅपी बड्डे!! देखणा दिसत आहे कोकोनट!
Pages