चित्रपट कसा वाटला- भाग १०

Submitted by mrunali.samad on 5 July, 2024 - 10:53

चित्रपट कसा वाटला- ९ धागा २००० पार...
नवे,जुने,देशी,परदेशी सिनेमे कसे वाटले लिहिण्यासाठी नवा धागा तयार...

चित्रपट कसा वाटला - ९
https://www.maayboli.com/node/84513

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Use group defaults

असं कसं म्हणता बाई, सोशिकता हा मोठा गुण आहे. आपण लिहीले नाही तर तो वाचणाऱ्यांच्या अंगी येणार कसा. Proud

Lol

प्राइम वर अग्नी आलाय. प्रतिक गांधी, दिव्येन्दु आणि जितेन्द्र जोशी आहेत. पूर्ण कपड्यातली सई पण आहे. मुम्बई फायर ब्रिगेड च्या जवानानी विझवलेल्या आगीच्या मागच्या कॉन्स्पिरसी बद्द्ल आहे. एकदा पाहण्यासारखा आहे.

पूर्ण कपड्यातली सई >>> जवानानी विझवलेल्या आगीच्या >>> भलताच इंटरेस्टिंग दिसतोय सिनेमा.

व्हिडीओ पळवणाऱ्याने निदान लग्नाचा व्हिडीओ तरी पळवायचा. बरेचदा तोच जास्त एम्बरॅसिंग असतो. >>> माझेमन Lol

तो आपल्या झपाटलेलाचे 'sci-fi gore version' वाटलेला.‌ >> Lol मला इथे तो बाहुला दुसर्‍या गावाला जायला एसटीच्या मागच्या बाजूला शिडीवर चढून बसतो तो सीन आठवला Happy पाहायला हवा परत तो लक्ष्याचा पिक्चर. तात्या विंचू वगैरे. एखादी गोष्ट कार्टुनिश वाटली तरी सादरीकरणात धमाल असते तसे होते त्यात.

कला, पीएस - मी दोन्ही पाहिलेले नाहीत अजून...
मी इथे नियमित येण्यास पात्र आहे काय?
हॅशटॅग पॅकेज वगैरे Proud

प्रत्येक दृष्याचे अती विश्लेषण करून इतरांना 'पिव्हळवले' होते >>>> नाही गं. ते फार छान परीक्षण होते.

जवानानी विझवलेल्या आगीच्या >>> हे मी ‘जवानीच्या विझलेल्या आगीच्या’ असं वाचलं. ‘पूर्ण कपड्यातली सई’ वाचल्यामुळे असेल का?

हे मी ‘जवानीच्या विझलेल्या आगीच्या’ असं वाचलं. ‘पूर्ण कपड्यातली सई’ वाचल्यामुळे असेल का? >> मी पण मी पण !

मध्यंतरी 'कर्मा' पुन्हा एकदा पाहिला. (एका फेसबुक फ्रेन्डच्या पोस्टमध्ये त्यातल्या एका सीनचा इतका चपखल उल्लेख होता, की तोच ट्रिगर ठरला.)

काय तो अ आणि अ सिनेमा. शोलेची भ्रष्ट कॉपी आणि पूर्ण फसलेली. (तेव्हाही मला फारसा आवडला नव्हताच.)
दादा ठाकूर आणि तीन गुन्हेगार त्या खेड्यात जाऊन राहतात त्यानंतर त्यांच्या 'मिशन'च्या दृष्टीने काहीच घडत नाही.
त्यांच्या प्रेमप्रकरणांमध्ये सगळा वेळ घालवला आहे. ती प्रकरणं सुद्धा अगदीच बाळबोध टाइप किंवा पोरखेळ टाइप दाखवली आहेत. नसिरुद्दीन शाहची मेलेली प्रेयसी म्हणून किशोरी शहाणे आहे. (हे तेव्हा लक्षात आलं नव्हतं.)

सुरुवातीच्या डॉ डँगच्या अटकेच्या भडक आणि टिपिकल सीनमध्ये एका पॉइंटला दोघांच्या क्लोज-अपला दोघांच्या चेहर्‍यावरच्या रेषा कमाल बदलतात. (अ आणि अ सिनेमात असे क्षण वेचावे लागतात.)
अनिल कपूरचे (प्रि)तेजाब ट्रेट्स पावलोपावली दिसतात.

आता राम लखन बघावा काय? Wink

नेफिवरचा, 'मदर ऑफ द ब्राईड' सिनेमा अगदी लाईट आहे. शेवट सुद्धा फसलेला नाही. कारण तीच भीती असते, सिनेमा आवडु लागतो न लागतो तो शेवट मात्र फसलेला असतो. ज्या अ‍ॅक्टरने 'मदर ऑफ द ब्राईड' चे काम केले आहे ती फार आवडली म्हणजे तिचा अभिनय. स्टोरी फारशी नाही पण छान फुलवली आहे. पूरक प्रसंग व 'पॅरलल' थ्रेडस छान आहेत.
ब्रुक शिल्डने काम केलेले दिसते आहे. छान केलय काम. दिसतेही किती छान.

राम लखन>> क्या पिक्चर याद दिला दिया. मला आवडतो तो. एकदम सगळं हिंदी पिक्चर मटेरियल आहे. गाणी, प्रेम, बदला, ग्रे नायक, रामासारखा सज्जन नायक, माधुरी, भरपूर खलनायक, मस्त गाणी.

‘अग्नी’ पाहिला. विषय चांगला आहे, पण मांडणीत डेप्थ नाहीये. त्यामुळे शेवटी चांगल्या विषयाला न्याय न मिळाल्याची खंत वाटत राहते.

>> ‘अग्नी’ पाहिला. विषय चांगला आहे, पण मांडणीत डेप्थ नाहीये. त्यामुळे शेवटी चांगल्या विषयाला न्याय न मिळाल्याची खंत वाटत राहत

अनुमोदन... आगीचे सीन मात्र बर्‍यापैकी खरे वाटतात. काही एमोशनल सीन्स चांगले आहेत पण कुठेतरी काहीतरी राहून जाते. एकदा पहायला ठीक आहे.

अग्नी’ पाहिला. विषय चांगला आहे, पण मांडणीत डेप्थ नाहीये. त्यामुळे शेवटी चांगल्या विषयाला न्याय न मिळाल्याची खंत वाटत राहते.>>+१००

प्राईमवर “ब्लॅक” पाहिला. विषय नवा नाही पण यांनी आपल्या डोक्याला फार त्रास दिला नाहीये. गुंतागुंतीच्या विषयाची साधी सरळ मांडणी आहे. मला तरी आवडला.

आक्रोश (२०१०) ची क्लायमॅक्स ची १८.१६ मिनिटांची क्लिप पाहिली. यात अजय देवगण आणि अक्षय खन्ना परेश रावल, पंकज तिवारी, जयदीप अहलावत आणि अन्य राजकारणी गुंडांवर खूपच अन्याय करतात. रक्तपात, आणि हिंसा करतात. शेवट झाल्यावर आता या गुंडांनी या हिरोंचा सुरूवातीला घेतलेला बदला बघावा लागेल असं वाटलं.

मवा चा नवा सिनेमा - डिस्पॅच पाहिलाय का कुणी ? #झी५
इथे लिहील्यावर तासभर पाहिला. उतकंठावर्धक आहे. मारधाड नाही. अ अ सीन्स नाहीत.
क्राईम रिपोर्टरचं क्राईम इन्व्हेस्टीगेशन हा विषय आहे. एका शेट्टीचा मर्डर होतो. त्याची माहिती काढता काढता आणखी एक स्टोरी हाती लागते. ही जास्त मोठी असते. २ जी स्कॅम. फाईल्स आणि क्लाऊड डेटा नष्ट केलेला असतो. याशिवाय मवा ज्या पेपरमधे काम करतो त्याचीही समांतर स्टोरी असा मिश्र पटकथांचा गुंता तयार केला आहे. इथपर्यंत तरी उत्कंठावर्धक आहे.

न्यूजपेपरशी संबंधित म्हटल्यावर न्यू दिल्ली टाईम्सची आठवण होते. पण त्या अपेक्षेने बघू नये.

जिगरा पाहिला नेटफ्लिक्सवर...
ठिकठाक वाटला...हॉलिवूड स्टाईल ने आलिया भट ला फुल्ल ऐक्शन सीन्स देऊन काढता आला असता तर बरं झालं असतं वाटलं..

आभला चांगल्या ॲक्शन सिक्वेन्स मध्ये बघायचे असेल तर Heart of Stone बघा. ऐन्ˈटैगनिस्‍ट्‌ पात्र आहे. सोबतीला वंडर वुमन गल गडोट.
आभचा हॉलिवुड डेबु.

डिस्पॅच शेवटचा दीड तास आर्ट फिल्म बनवायची कि वेबसिरीज कि फिल्म यात गंडला आहे. मवाचे इंडिमेट सीन्स अनावश्यक आहेत.
संवाद ऐकू येत नाहीत हेडफोन शिवाय. माहिती काढण्याची पद्धत कै च्या कैच. एण्ड पण कै च्या कै.

Pages