चित्रपट कसा वाटला- भाग १०

Submitted by mrunali.samad on 5 July, 2024 - 10:53

चित्रपट कसा वाटला- ९ धागा २००० पार...
नवे,जुने,देशी,परदेशी सिनेमे कसे वाटले लिहिण्यासाठी नवा धागा तयार...

चित्रपट कसा वाटला - ९
https://www.maayboli.com/node/84513

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Use group defaults

मेरी - नावाचा सिनेमा नेफि वरती पाहीला. जिजझ च्या जन्माची ही कथा आहे. मेरीचे आयुष्य, आणि तेव्हाचा पॉलिटिकल पट दाखवला आहे. मला खूप आवडला.

अग्नि पाहिला.
वेगळ्या विषयावरचा उत्कृष्ट चित्रपट.
फायर ब्रिगेड वर आहे.
जास्त स्पॉईलर टाकत नाही.

सिकंदर का मुकद्दर
45 मिनिटांचा चित्रपट दोन तास . Chewing gum movie.
फॉरवर्ड चे बटन हाताशी ठेवावे.
पळवत पळवत बघितल्यास बरा वाटतो.
दुसरा भाग येऊ शकतो.
जिम्मी शेरगिल साठी बघावा

वजूद पाहिला. त्यात जॉनी लिवरचा एक सीन आहे शेवटचा.
त्याला थिएटरच्या बाहेर पहार्‍याला ठेवलेले असते. नाना पाटेकर मतीमंद मुलाच्या गेट अप मधे त्याच्याशी बोलून बाहेर पडतो. अंधारात दूर गेल्यावर त्याच्याकडे तो केसाचा विग फेकतो. तेव्हढ्यात वरीष्ठ पोलीस अधिकारी त्याला पाहिले का म्हणून विचारतात.
तर जॉनी लिव्हर उत्तरतो " आजही पकडा जाता लेकिन ( विग उचलत) बाल बाल बच गया "

या डायलॉगला फुटलोच. मायबोलीच्या शाब्दीक कोट्यांची आठवण झाली.

साऊथमधे प्रेक्षकांना रडवू शकतील असा अभिनय करणारे फक्त दोन अभिनेते आहेत ज्यू.एन टि आर आणि नानी..
बाकी महेशबाबू, रामचरण ठोकळे चेहरे असतात..अल्लू अर्जुन नाचतो भारी..अभिनय आहे ठिक..

रामचरण ठोकळे >>> खूप वेळ विचार केला कि हा कोण आणखी मराठी माणूस तिकडे जाऊन स्टार झालेला ?

सिकंदर का मुकद्दर इंटरेस्टिंग आहे. मला एंगेजिंग वाटला.

जिमी शेरगिल १५ वर्षांनंतरच्या भागात आधीपेक्षा जास्त तरूण दिसतो. बहुतेकांची कामे मस्त आहेत. मला तमन्ना एरव्ही आवडत नाही. इथे ती घरेलू रोल मधे बरी आहे.

पाणी - एक प्रेमकथा पाहिला.
छान वाटला. आवडला.
पाणी प्रश्न अस्वस्थ करून न जाता लव्ह स्टोरी गुदगुल्या करून जाते हे डोक्यात ठेवून त्या जोनरचा आहे समजून बघायला हरकत नाही.

सजिनि शिंदे का वायरल विडिओ पाहिला.

सुरुवात चांगली वाटली. पण मग नेहमीप्रमाणेच शेवटी माती खाल्ली. सर्वांचा अभिनय मस्त वाटला. सुभा आहे त्यात. त्यामुळे अगदीच बोर नक्कीच नाहीये. बरेच मराठी कलाकार आहेत.

पुष्पा २ चा "तो" नाच वर बरेच जण रील्स बनवून पैसे कमवु शकतात.

काय्च्या काय चा सर्वोच्च बिंदु आहे. अचाट स्टेप्स. उत्तेजितपणा, प्रक्षोभितपणा, विभित्सपणा म्हणजे सर्वच गुण आहेत.
आता सौदिईंडियन तेच करतात पण हे गाणं तर पहा आणि करा मज्जा.

'विकी और विद्या का वो वाला व्हिडिओ' (नेटफ्लिक्सवर) पाहिला.‌ राजकुमार राव आणि तृप्ती दिमरी आहेत. आवडला नाही. काळ नव्वदीच्या दशकातील दाखवला आहे, तेव्हा हे कधी वाद झाले तर आपोआपच मिटावेत म्हणून 'सुहागरात' चा व्हिडिओ बनवतात. तो मेंदी आर्टिस्ट असतो आणि हिच्या सापुला येऊन पप्पी घेऊन जातो. शिवाय नवऱ्याऐवजी मेंदीने स्वतःचे नाव काढून ठेवतो, ते बघून लग्न मोडते.

नंतर हे स्वतःचा 'वो वाला' व्हिडिओ बनवतात. जास्त स्वप्नं बघू नका वरून पांघरूण घेतलेले आहे. Happy मग ह्यांच्या घरात चोरी होते. त्यात हे सगळेच चोरीला जाते. त्यात मल्लिका शेरावत विकीची बहिण आहे. तिला भरपूर फुटेज व पोलिसासोबत कुमार सानुच्या गाण्यावर नाचबिच आहे. तिला बघून प्रेक्षक सोडून बरेच जण भाळत असतात. तिच्या या फुटेज मुळे यात नक्की काय चाललंय हेच विसरून जायला होतं. यात रा रा आणि तृप्ती आहेत हेही आठवत नाही. मग मधेच त्यांचा गोंधळ सुरू होतो. गाणीही चांगली नाहीत. खूप लाऊड अभिनय आहे सगळ्यांचा. एंगेजिंग नाही. तृप्ती सुंदर दिसते पण बुलबुल आणि कला नंतर ती फक्त 'प्रिटी फेस' म्हणून उरली आहे. चार्म गेला आहे. शक्यतो बघू नका. मी अर्धा बघून सोडून दिला आहे.

विकी और विद्या >> ट्रेलर पाहूनच याच्या वाट्याला जायचे नाही असे ठरवले होते. तृप्ती दिमरीचे आता अजीर्ण झालेले आहे. ट्रेलर मध्ये तर तिच्यापेक्षा मल्लिका शेरावत चांगली दिसते. अस्मिता अजून सहन करू शकते असेल काही त्यामुळे तिला प्रणाम. त्यापेक्षा आपले ९० चे पिक्चर बरे Proud Proud

मला वाटत नाही मी सहन करू शकेन.‌ Happy
अजीर्ण+१
ती त्या 'बॅड न्यूज' पासून बोअर झाली आहे, तोही मी अर्धवट सोडून दिला

जास्त स्वप्नं बघू नका वरून पांघरूण घेतलेले आहे.
>>>>

वाह इथे पांघरूण..
नेपो किड vs आऊट साईडर..
हा भेदभाव कायम राहणार.

स्वतःचा 'वो वाला' व्हिडिओ बनवतात
>>>>
काल मी अर्धवट नाव वाचलेलं आणि नेमकी ही क्रुशल माहिती वाचली नाही. काय हौस असते एकेकाला. व्हिडीओ पळवणाऱ्याने निदान लग्नाचा व्हिडीओ तरी पळवायचा. बरेचदा तोच जास्त एम्बरॅसिंग असतो.

जिगरा - आलिया भट्ट. नेट्फ्लिक्क्स वर आल आहे. ट्रेलर वरुन खुप अपेक्षा होत्या पण सो ...सो आहे.

मुळात ती तृप्ती दिमरी इतकी फेमस का झाली तेच माहीत नाही. त्या क्लासिकल संगीतवाल्या पिक्चरमुळे का? तो पाहिलेला नाही. अ‍ॅनिमल मधे किरकोळ रोल आहे.

तिला बघून प्रेक्षक सोडून बरेच जण भाळत असतात >>> Lol

नेफिवर "सबसर्व्हियन्स" अर्धा पाहिला. घरी आणलेला एआय रोबो नंतर "अवेअर" होतो व स्वतःच्या मर्जीने वागू लागतो हाच फॉर्म्युला आहे. पुढे कसा आहे त्यावर काही वेगळे आहे का कळेल. मधे एक "M3GAN" नावाचा पिक्चर आला होता, साधारण तसाच दिसतोय.

पुष्पा-२ नाही पाहिला का कोणी अजून? फेबुवर एका थिएटर मधेच फटाके उडवल्याचे क्लिप पाहिले.

जे चित्रपट पाहू नका असे म्हटलेले आहे तेच पाहण्याची इच्छा होतेय.
( अपेक्षा नसतात. पूर्वी सिरीयस विषय असेल कि त्याचा पेपर देण्यासाठी सिरीयसली अभ्यास सुरू करायला पाहीजे असे म्हणत म्हणत त्याचा अभ्यास सुरू कधी करावा हाच मुहूर्त सापडायचा नाही, पण टाईमपास विषयाचा अभ्यास अगदी सहज एका बैठकीत व्हायचा.. तसंच होतंय ).

सत्तरच्या दशकातले बच्चनपट, त्या आधीचे धर्मेंद्रचे स्पायपट , जितेंद्रचे श्रीदेवीपट आणि मिठुनचे भाप्पीपट पाहताना डोताना फिलिंग असतं.

>>> जे चित्रपट पाहू नका असे म्हटलेले आहे तेच पाहण्याची इच्छा होते
आणि जे पहा म्हणून आग्रह केलेला असतो ते पाहात नाही कोणी!
(एग्झिबिट ए : "त्या क्लासिकल संगीतवाल्या पिक्चरमुळे का? तो पाहिलेला नाही."
एग्झिबिट बी : पीएस) Proud

अ‍ॅनिमल मधे किरकोळ रोल आहे. >> त्याच बघणेबल रोलमूळे फेमस झाली.

(एग्झिबिट ए : >> Lol फा ला बघणेबल असे रेटींग द्यावे लागते आजकाल असे ऐकलय

"एग्झिबिट ए : "त्या क्लासिकल संगीतवाल्या पिक्चरमुळे का? तो पाहिलेला नाही." - Lol

"फा ला बघणेबल असे रेटींग द्यावे लागते आजकाल असे ऐकलय" - Lol

Proud

तो 'कला' धागा मलाही आठवला होता, प्रत्येक दृष्याचे अती विश्लेषण करून इतरांना 'पिव्हळवले' होते आपण बहुतेक. Happy मी दोन्ही एक्झिबिटं बघून 'सेफ' झाले आहे आणि इतरांची फजिती बघायला आले आहे.

त्याच बघणेबल रोलमूळे फेमस झाली.>>> Lol

चित्रपट पाहू नका असे म्हटलेले आहे तेच पाहण्याची इच्छा होतेय. >>> Lol तुम्हाला फशी पाडण्यासाठीच असं लिहिलं आहे.

नेफिवर "सबसर्व्हियन्स" अर्धा पाहिला. >>> यात खरी मेगन आहे. मेगन फॉक्स. कालच बघितले ट्रेलर. तो मेगनही बघितला होता. तो आपल्या झपाटलेलाचे 'sci-fi gore version' वाटलेला.‌

व्हिडीओ पळवणाऱ्याने निदान लग्नाचा व्हिडीओ तरी पळवायचा. बरेचदा तोच जास्त एम्बरॅसिंग असतो.>>> Lol

Lol

यातले एग्झिबिट बी कधीतरी नक्कीच नीट पाहायचे आहे. एकदा प्रयत्न केलेला आहे. पण कॅरेक्टर्सचा डोक्यात गोंधळ झाला त्यामुळे सोडून दिले होते.

>>> तो 'कला' धागा मलाही आठवला होता, प्रत्येक दृष्याचे अती विश्लेषण करून इतरांना 'पिव्हळवले' होते आपण बहुतेक
Lol

Pages