Submitted by श्यामली on 24 December, 2009 - 23:33
ही कुठली शुभंकर वेळा; हा ऋतू कोणता आला?
कुणी देहावर पांघरला जणू हळवा चांदणशेला
ही नवीन वळणे आतूर.. गात्रांतून उठली थरथर
हे बावरलेले लाघव..त्या डोळ्यांमधुनी आर्जव
मौनाने पसरून बाहु टिपले हे हसरे मार्दव
आकाशी आनंदाने गहिवरला चांदणशेला
ही निशा जरी सरलेली.. ती नशा न ओसरलेली
हा भासांचा नाही घोळ.. वा स्वप्नांचाही खेळ
वचने वा आणा-भाका.. तुटणारच रेशिमधागा
ही सुंदर गंधीत ठेव.. हिरमुसला चांदणशेला
~श्यामली
गुलमोहर:
शेअर करा
अप्रतिम......
अप्रतिम......
इंदिरा संतांच्या कवितेची
इंदिरा संतांच्या कवितेची आठ्वण झाली.
वाह काय सुंदर
वाह काय सुंदर शब्द-चांदणशेला!!
श्यामले खल्लास! काय शब्द
श्यामले खल्लास! काय शब्द वापरलेस!
मस्तच ग!!
मस्तच ग!!
सुरेख!! प्रत्येक ओळ खास!
सुरेख!!
प्रत्येक ओळ खास!
फारच छान ...'चांदणशेला' शब्द
फारच छान ...'चांदणशेला' शब्द तर खासच !
छान कविता..!!
छान कविता..!!
अप्रतिम!
अप्रतिम!
वा! सुंदर!!
वा! सुंदर!!
मस्तच... खुप छान...
मस्तच...
खुप छान...
ही निशा जरी सरलेलेली नशा न
ही निशा जरी सरलेलेली नशा न ओसरलेली
हा भासांचा नव्हता घोळ वा स्वप्नांचाही खेळ
वचने वा आणा-भाका तुटणारच रेशिमधागा
ही सुंदर गंधीत ठेव, हिरमुसला चांदणशेला
छान.
सरलेलेली- येथे एक 'ले' जास्त झालाय बहुधा.
चिन्नु,अलकाताई धन्यवाद बदल
चिन्नु,अलकाताई धन्यवाद बदल केला आहे
अभिप्रायाबद्दल मनःपूर्वक धन्यवाद मंडळी
चांदणशेला हा शब्द प्रा.लक्ष्मीकांत तांबोळी यांच्या गोकुळवाटामध्ये ऐकला, वाचला तेव्हापासून त्रास देत होता तेव्हा या शब्दाचं श्रेय सरांकडे जातं.
मस्त ! वचने वा आणा-भाका
मस्त !
वचने वा आणा-भाका तुटणारच रेशिमधागा
ही सुंदर गंधीत ठेव, हिरमुसला चांदणशेला ......... क्या बात है...!!!!
श्यामले , तूने तो एकदम मार
श्यामले , तूने तो एकदम मार डाला ! जियो .
तेव्हापासून त्रास देत होता
तेव्हापासून त्रास देत होता >>>> श्यामले, तुला असे त्रास वारंवार होवोत!
ओह्हो... क्या बात है! सुरेखच
ओह्हो... क्या बात है!
सुरेखच आहे, आवडली
मस्त
मस्त
श्यामली, काय शब्द!
श्यामली, काय शब्द! चांदण्यांसारखेच! अप्रतिम!
सुरेख ,सुरेख . चांदणशेला हा
सुरेख ,सुरेख . चांदणशेला हा किती मस्त शब्द वापरलायस तु. अख्खी कविताच सुरेख.
सु रे ख
सु रे ख
उत्तम कविता...चांदणशेला
उत्तम कविता...चांदणशेला शब्दासाठी hats off! लगेच पेटंट करुन टाक त्याचा
खूप सुंदर श्यामले. चांदणशेला
खूप सुंदर श्यामले. चांदणशेला शब्दही फार आवडला.
व्वा! बापू
व्वा!
बापू
खूप छान, सुरेख कविता. 'ही
खूप छान, सुरेख कविता.
'ही निशा जरी सरलेली नशा न ओसरलेली' ही ओळ 'ही निशा जरी सरलेली तरि नशा न ओसरलेली' अशी वाचायला (आणि गायलासुद्धा) चांगली वाटेल.
क्षमस्व.
खूप सुंदर श्यामले. चांदणशेला
खूप सुंदर श्यामले. चांदणशेला शब्द अप्रतिम..!!!
त्रास देणारेच शब्द आहेत ते
त्रास देणारेच शब्द आहेत ते श्यामली...
हे अस काही ईतक सुंदर उतरणार असेल तर तूला अश्या त्रास देणार्या शब्दांचं अख्ख पुस्तकच मिळो.
श्यामले, तुला असे त्रास
श्यामले, तुला असे त्रास वारंवार होवोत >>>
बाप रे!
कर्णिककाका क्षमस्व कशाला? बदल चांगला आहे की, फक्त जरासा वेगळा केलाय मी , धन्यवाद,
हे अस काही ईतक सुंदर उतरणार असेल तर तूला अश्या त्रास देणार्या शब्दांचं अख्ख पुस्तकच मिळो.>>> !!!!
सगळ्यांचे पुन्हा एकदा मनापासून आभार
क्या बात है | मस्त वाटल
क्या बात है | मस्त वाटल वाचून.
श्यामले,एकदम सुंदर कविता
श्यामले,एकदम सुंदर कविता आहे... चांदणशेला हा शब्दही खूप आवडला... तुझ्या इतर कवितांपेक्षा एकदम वेगळी कविता आहे ही ... हा फॉर्म असाच टिकु देत...
Pages