चांदणशेला

Submitted by श्यामली on 24 December, 2009 - 23:33

ही कुठली शुभंकर वेळा; हा ऋतू कोणता आला?
कुणी देहावर पांघरला जणू हळवा चांदणशेला

ही नवीन वळणे आतूर.. गात्रांतून उठली थरथर
हे बावरलेले लाघव..त्या डोळ्यांमधुनी आर्जव
मौनाने पसरून बाहु टिपले हे हसरे मार्दव
आकाशी आनंदाने गहिवरला चांदणशेला

ही निशा जरी सरलेली.. ती नशा न ओसरलेली
हा भासांचा नाही घोळ.. वा स्वप्नांचाही खेळ
वचने वा आणा-भाका.. तुटणारच रेशिमधागा
ही सुंदर गंधीत ठेव.. हिरमुसला चांदणशेला

~श्यामली

गुलमोहर: 

ही निशा जरी सरलेलेली नशा न ओसरलेली
हा भासांचा नव्हता घोळ वा स्वप्नांचाही खेळ
वचने वा आणा-भाका तुटणारच रेशिमधागा
ही सुंदर गंधीत ठेव, हिरमुसला चांदणशेला

छान.
सरलेलेली- येथे एक 'ले' जास्त झालाय बहुधा.

चिन्नु,अलकाताई धन्यवाद Happy बदल केला आहे

अभिप्रायाबद्दल मनःपूर्वक धन्यवाद मंडळी Happy
चांदणशेला हा शब्द प्रा.लक्ष्मीकांत तांबोळी यांच्या गोकुळवाटामध्ये ऐकला, वाचला तेव्हापासून त्रास देत होता Happy तेव्हा या शब्दाचं श्रेय सरांकडे जातं.

मस्त !
वचने वा आणा-भाका तुटणारच रेशिमधागा
ही सुंदर गंधीत ठेव, हिरमुसला चांदणशेला ......... क्या बात है...!!!!

खूप छान, सुरेख कविता.

'ही निशा जरी सरलेली नशा न ओसरलेली' ही ओळ 'ही निशा जरी सरलेली तरि नशा न ओसरलेली' अशी वाचायला (आणि गायलासुद्धा) चांगली वाटेल.
क्षमस्व.

त्रास देणारेच शब्द आहेत ते श्यामली... Happy
हे अस काही ईतक सुंदर उतरणार असेल तर तूला अश्या त्रास देणार्‍या शब्दांचं अख्ख पुस्तकच मिळो. Happy

श्यामले, तुला असे त्रास वारंवार होवोत >>>
बाप रे! Happy
कर्णिककाका क्षमस्व कशाला? बदल चांगला आहे की, फक्त जरासा वेगळा केलाय मी , धन्यवाद, Happy

हे अस काही ईतक सुंदर उतरणार असेल तर तूला अश्या त्रास देणार्‍या शब्दांचं अख्ख पुस्तकच मिळो.>>> !!!!

सगळ्यांचे पुन्हा एकदा मनापासून आभार Happy

श्यामले,एकदम सुंदर कविता आहे... चांदणशेला हा शब्दही खूप आवडला... तुझ्या इतर कवितांपेक्षा एकदम वेगळी कविता आहे ही ... हा फॉर्म असाच टिकु देत... Happy

Pages