झरे

Submitted by गणेश कुलकर्णी on 21 November, 2024 - 10:14

झब्याने मारलेला
पुरातन काळा दगड
लागावा आपल्या
पाषाण हृदयी
सनातन काळजाला!
आणि
आतून फुटावेत झरे
प्रज्ञा, शील, करूणेचे
द्वेषा ऐवजी!

कवी: गणेश कुलकर्णी (#समीप)
तारीख : 28 मार्च 2023

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

क्षमा करा, मी असहमत असेल.
मुळात, पाषाण हृदय हा शब्द बोचला,
नुसतं सनातन काळजाला ठीक होते.
जसे तुकाराम सांगतात, "भले तरि देऊं कासेची लंगोटि"
प्रज्ञा, शील, करूणेचे झरे आहेतच, पण उत्तर मात्र "देव्हाऱ्यावरी विंचू आला । देवपूजा नावडे त्याला । तेथें पैजारेचें काम । अधमासी तों अधम"
हेच असावं असं वाटलं तर काय चूक आहे?