Submitted by जोतिराम on 20 November, 2024 - 13:55
काचेची सुंदर खिडकी
भिंतीला लटकत आहे
देह सोडून गेला माझा
पण आत्मा इथेच आहे
छोटीशी चिऊ बागडते
ती बड-बड ऐकत हसतो
ती खांदे उडवत हसूनी
जणू मलाच गिरवत आहे
देह सोडून गेला माझा....
हे प्रवास जीवन माझे
जणू आठवणींचा ढीग
तुटलेल्या स्वप्नांसोबत
आनंद ओंजळीत आहे
देह सोडून गेला माझा....
मज नकोच होती शांती
की नकोच कर्कश नाद
मायेने घर भरण्यात
ते प्रेमळ संगीत आहे
देह सोडून गेला माझा....
तुम्हा कळले कारे होती
माझी शेवटची इच्छा
सुखसोयी वैभव नाही
ती तुमची फसगत आहे
देह सोडून गेला माझा....
समजून स्वतःला सांगा
अपराध कुणाचा नाही
मग पुढे सुखाने नांदा
प्रस्तावच ठेवत आहे
देह सोडून गेला माझा
पण आत्मा इथेच आहे
पण आत्मा इथेच आहे
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
एकदम पटली. मस्त आहे.
एकदम पटली. मस्त आहे.
एकदम पटली. मस्त आहे.+1
एकदम पटली. मस्त आहे.+1
धन्यवाद.
धन्यवाद.
वेगळीच आहे. आवडली.
वेगळीच आहे. आवडली.