यंदा मत कोणाला द्यायचे?? की नोटाला वोटायचे??

Submitted by ऋन्मेऽऽष on 14 November, 2024 - 01:33

# राजकीय एक्स्पर्ट ऐवजी सामान्य लोकांची मते, विचार, भावना जाणून घ्यायच्या असल्याने आणि स्वताच्या व्यक्त करायच्या असल्याने धागा मुद्दाम ललित लेखनात काढला आहे
--------------------------------+

आज ऑफिस मधून घरी परत येताना रस्त्यात प्रचाराची मिरवणूक लागली. ट्रक टेम्पो, जीप कार, वाहनांचा ताफा होता. नेता सुद्धा तितकाच मोठा होता. पक्ष कुठला ते महत्त्वाचा नाही. हल्ली मला सगळे सारखेच वाटतात. एकाच माळेचे शिरोमणी.

मोठमोठाले स्पीकर ध्वनी प्रदुषण करत होते. रस्ताभर फटाक्यांचा धूर वायू प्रदूषण करत होता. एकंदरीत शक्ती प्रदर्शन चालू होते.

या सगळ्यात माझी रिक्षा अडकली होती. ती प्रचाराची नव्हती. तिचे मीटर जागच्या जागी पळत होते. ज्याचे पैसे मला भरायचे होते. त्यामुळे अजून चीडचीड होत होती.

रस्त्याने जाताना गणपतीच्या मिरवणुकीमुळे असे अडकलो तर चीड चीड होणे दूर, मस्तपैकी थांबून एन्जॉय करतो ते वातावरण. मी स्वतः नास्तिक असलो तरी लोकं मोठमोठ्याने गणपती बाप्पा मोरया आणि एक दोन तीन चार गणपतीचा जयजयकार अश्या घोषणा देतात त्या ऐकायला आवडतात. त्यांचा उत्साह आवडतो. पण इथे त्या अमुक तमुक नेत्याच्या नावाने घोषणा देणारे कार्यकर्ते बघून या मेल्यांना इतका काय याचा पुळका म्हणून त्यांचा राग येत होता. कारण आदर असा हल्ली कोणाबद्दलच वाटेनासा झाला आहे.

दिवाळीतल्या फटाक्यांचा आवाज सुद्धा सणाचे उत्सवाचे वातावरण म्हणून आवडतो, इंडिया क्रिकेट मॅच जिंकताच दूरहून कानावर पडणारा फटाक्यांचा आवाज सुखावतो. पण इथे फटाके लावलेले बघून तोंडात शिव्या येत होत्या.

या आधी मात्र असे नव्हते. निवडणूक जवळ आली की ते प्रचाराच्या रणधुमाळीचे वातावरण आवडायचे. टीव्ही वरच्या चर्चा आवडीनुसार झेपेल तितके ऐकल्या जायच्या. आपल्या कुवतीनुसार जवळच्या मित्रासोबत चर्चा केली जायची.

पण एकूणच गेले काही वर्षात महाराष्ट्राच्या राजकारणाचा दर्जा ईतका खालावला आहे की सारे सोडूनच दिले आहे. इच्छाच उरली नाही.

पण म्हणून काही मत देणे चुकले नाही. ते द्यायचे आहेच. द्यावे लागणारच.

मी काही कुठल्या राजकीय पक्षाचा समर्थक नाही. माझे मत कधीच कुठल्या पक्षाला फिक्स नसते. त्या त्या वेळेस निर्णय घेतो. आतापर्यंत पाच राजकीय पक्ष आणि एकदा अपक्ष असे त्या त्या वेळेस जो योग्य वाटेल त्या सर्वाँना संधी दिली आहे. पण यावेळेस खरेच काही सुचत नाहीये.

यंदा कोणाला मत द्यावे हा निर्णय का घेता येत नाही याची प्रामुख्याने दोन कारणे आहेत.

१) कोणाला मत द्यावे हा निर्णय घेण्यासाठी साधारण मी असे करतो - माहिती गोळा करतो आणि आपल्या कुवतीनुसार त्याचे विश्लेषण करतो. किंवा दोनचार ठिकाणचे एक्स्पर्ट विश्लेषण ऐकतो. आता ते एक्स्पर्ट हे रिपोर्टर, सेलिब्रिटी, माझे मित्र कोणीही असू शकतील.

सध्या प्रॉब्लेम असा झाला आहे की कोणीच एक्स्पर्ट निःपक्ष आणि प्रामाणिक वाटत नाही. सगळे पेड किंवा अजेंडा असलेले वाटतात. किंवा मित्रही स्वतःच गोंधळलेले वाटतात.

दुसरे म्हणजे माहितीचा सोर्स सुद्धा इंटरनेट वर काय खरा काय खोटा याची काहीच कल्पना नसते. म्हणजे हे मी केवळ व्हॉटसअप फॉरवर्ड बद्दल बोलत नाही, तर कुठलीही वेबसाईट हल्ली विश्वासार्ह वाटत नाही.

२) दुसरे कारण महाराष्ट्र स्पेशल आहे. इतके पक्ष आणि इतका गोंधळ झाला आहे. आणि निवडून आल्यावर हे लोकं आणखी काय गोंधळ घालणार आहेत याबाबत जराही सुस्पष्टता नाही. सोप्या भाषेत सांगायचे झाल्यास आपले मत अखेर कुठल्या पक्षासोबत किंवा गठबंधनासोबत जाईल याची काहीच खात्री नाही.

पक्ष बघून नाही तर उमेदवार बघून मत द्या हे तत्व नगरसेवक निवडणुकीत बरे वाटते आणि पाळता सुद्धा येते कारण साधारण त्या व्यक्तीची माहिती सुद्धा असते. इथे आपल्या विधानसभा विभागातील उमेदवारांची माहिती घेणे म्हणजे पुन्हा सोर्स कुठले हा प्रश्न आलाच. त्यापेक्षा पक्षांचीच माहिती घेणे सोयीचे पडते आणि योग्य ठरते.

असो,
नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत नोटा विचार डोक्यात घोळत होता. ऐन क्षणाला विचार बदलून एका पक्षाला मत देऊन आलो.

पण ती लोकसभा होती. डोक्यात तितका गोंधळ नव्हता. महाराष्ट्राच्या राजकारणाबाबत मात्र विचार करू तितके डोके भंजाळून जाईल अशी परिस्थिती आहे.

तर काय करावे..
नोटासाठी जावे का?

नोटा वापरू नका असेही काही म्हणतात.
गलिच्छ राजकारणाचा कितीही वीट आला तरी दगडापेक्षा वीट मऊ म्हणत कोणालातरी निवडावे.
पण जर कोण दगड आणि कोण वीट हा निर्णय सुद्धा घेता येत नसेल तर अटक मटक चवळी चटक न करता सरळ नोटा दाबावे का?

नोटा - NOTA - None of the above

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

रात्रीचे चांदणे, बरेच दिवसांनी आलात.
तुम्हांला एक प्रश्न विचारायचा होता. दुसर्‍या धाग्यावरचा मुद्दा इथे आणतोय. तेवढाच सरांच्या धाग्याचा टीआरपी वाढेल.
अखलाखच्या खुनाचा आरोप असलेल्या माणसाच्या मृतदेहाला तिरंगा गुंडाळणे चूक आहे, असं तुम्ही म्हणालात. पण बीफच्या संशयावरून किंवा कशावरूनही मुस्लिम माणसाला जिवे मारणे चूक आहे, असे तुम्ही म्हटलेले नाही. आता मी तसे सांगितल्यावर म्हणून उपयोग नाही बघा.

विदेशी जन्माचा मुद्दा तोंडदेखला होता. पक्षाध्यक्षपद मिळत नव्हतं हे खरं कारण होतं.

. पण बीफच्या संशयावरून किंवा कशावरूनही मुस्लिम माणसाला जिवे मारणे चूक आहे, असे तुम्ही म्हटलेले नाही
प्रत्येक वेळी म्हणायलाच पाहिजे का? एखाद्या माणसाला मारणे दूरच पण अन्नासाठी जनावरांना मरणेही ह्या बद्दलही वाईट वाटत म्हणून गेले वर्षभर तरी नॉनव्हेज खाल्ले नाही. हिंसेच माझ्यासारख्या सामान्य माणसाने तरी समर्थन करूच नये.

प्रत्येक वेळी? तुम्ही या गोष्टीला चूक म्हटल्याचं आठवत नाही. माझी स्मरणशक्ती दुर्बल झाली वाटतं.

तुमचा पॅटर्न लक्षात आला.
मागे हिंदुत्ववादी धार्मिक मिरवणुकीच्या नावाखाली मशिदीसमोर नाचगाणं करतात यावर बोलताना तुम्ही माझा मिरवणुकांनाच विरोध आहे, असं तुम्ही म्हणालात. आता माणसाला मारण्यावरून जनावरांना मारण्यावर पोचलात. तारेवरची कसरत यालाच म्हणतात का?

काय समजायचं ते समझा. मिरवणुकीना माझाच विरोध आहे. आपल्या बापाचा रस्ता असल्यासारखं रस्ता अडवून ठेवतात.

भाजपने सोशल मीडियावर मारा सुरू केल्यावर इतर पक्षांनी तिथे गप्प राहून फक्त पारंपरिक प्रचार आणि प्रसार माध्यमांचा उपयोग करत राहायला हवं होतं का?

शिवाय २०१४ पर्यंत सरकारवर खुशाल टीका करता यायची. त्यासाठी कोणी तुम्हांला लेबलं लावायचं नाही. आता सरकार आणि सत्ताधारी पक्षावर टीका केली की राइसबॅगवाले, वडापाववाले , तुम्हांला सोरोसचं फंडिंग आहे अशी काहीही लेबलं लागतात. >>>
आणखी एक निरीक्षण - मी कोणत्याही पक्षाचा समर्थक नाही किंवा सगळे पक्ष सारखेच असं म्हणणारे कायम विशिष्ट पक्षांच्याच विरोधात बोलताना दिसतात. आपण विशि ष्ट पक्षाचे समर्थक आहोत , हे कबूल करायला लाजत असावेत.>>> हे दोन्ही मुद्दे एकमेकांच्या विरोधात आहेत.

जे कुणी आपल्यासोबत नाहीत ते देशद्रोहीच्या चालीवर जे कुणी आमच्या सोबत नाहीत ते भाजपवाले हे एकाच पीआर कंपनीकडून लिहून घेतलेले टूलकीट वाटते.

मूळ मुद्दा एक नालायक आहे , त्याला विरोधासाठी कुणीच नसताना २००३ साली ओर्कुटवर एखादा शैलेंद्रसिंग राजपूत उगवतो, इथपर्यंत ठीक होतं. त्या वेळीही भाजपा सत्तेत होती. त्यामुळं २०१४ चं तुणतुणं नवीन नाही. शैलेंद्रसिंग व्हिसलब्लोअर होता. त्या वेळी त्याने शिव्याशाप खाल्ल्या. धम्मक्या सोसल्या.

मग त्याला साथ द्यायला अनेक लोक आले कारण तो झुंडशाहीच्या विरोधात उभा ठाकला होता म्हणून. या पक्षाच्या त्या पक्षाच्या समर्थनासाठी कुणीही आलेले नव्हते. तेव्हांच भाजपच्या सर्व मुद्द्यांची पोलखोल झाली होती. पण ~ओर्कुट ढेपाळलं. काही लोक तिकडेच राहीले. अगदीच बंद झाल्यावर फेसबुक. मायबोलीवर आले तर तिकडे पराभूत झालेल्यांनी नव्या माध्यमावर पुन्हा नवे दुकान टाकलेले. इथे जुन्या काहींचा उत्साह मावळलेला होता तर काही अगदीच उपरे वाटून घेत होते.

सरतेशेवटी, भाजप, संघ परिवार हा त्यांच्या ध्येयाबाबत क्लिअर आहे. त्यांचा द्वेष उघड आहे. काँग्रेसचे त से नाही. ते आव आणतात सत विरूद्ध असत च्या लढाईचा. लोक सत्याच्या बाजूने असणार्‍याला साथ देतात, त्याला फरफटत ते पक्षाकडे नेत राहतात.

काँग्रेस मुद्दे तोंडी लावण्यापुरतेच वापरते हे आता इतक्या दीर्घ काळ सोशल मीडीयात वावरलेल्याला सांगायला नको.
निर्भया आंदोलन आणि अण्णा आंदोलनात भ्रष्टाचार हे मुद्दे भाजपने तोंडी लावण्यापुरते वापरले. आता त्यांना हाथरस किंवा कुस्ती महासंघ किंवा अन्य प्रकरणातलं महिला function at() { [native code] }याचार प्रकरण यावर तोंड उघडावंसं वाटत नाही.

तेच काँग्रेसचं.
जज्ज लोयावर इतकं ज्ञान पाजळलं. शोधपत्रकारिता झाली. मग अडीच वर्षे सत्ता आल्यावर किमान एसआयटी चौकशी नको ?
भीमा कोरेगावचा पुणे पोलिसांचा अहवाल सदोष होता तर त्याच टीमच्या प्रमुखाला मुंबईच्या कमिशनरपदी बसवण्याची शिक्षा दिली का ? आणि राज्याला स्वतंत्र चौकशी नेमता येत नाही का ?
शिवाय तो तपास केंद्र सरकारच्या एन आय ए कडे दिला, याच संस्थेच्या विरोधात थयथयाट केला होता.

मग साथ देणारे वेड्यात निघत नाहीत का ?
किती दिवस सरसकटीकरण करत तुम्ही आमच्याशी सहमत नाही म्हणजे भाजपचे आहात हे बडबडगाणे वाजवायचे ?

माझा प्रश्न - ईडीचा (जोडीला सीबीआय / आयटी / पोलिस ) यांचा वापर करून किती नेत्यांना शिक्षा झाली आहे?

आधी याचं उत्तर द्या. मग पुढच्या प्रश्नांकडे वळू.

Submitted by भरत. on 17 November, 2024 - 19:43

>>>

मला नाही माहीत याचे उत्तर.
पण ज्याना शिक्षा मिळते ते सारे गुन्हेगार आणि ज्याना मिळत नाही ते सारे निर्दोष यावर माझा विश्वास नाही.

गंमत बघा,
भाजप पक्ष काय करतो तर सेना काँग्रेस राष्ट्रवादी यांच्या भ्रष्ट नेत्यांवर ईडीचा बांबू लावते. मग त्यातले काही घाबरून त्यांना जाऊन मिळतात.
म्हणजे भ्रष्ट नेते जे आधी काँग्रेस सेना मध्ये असताना त्यांना गोड वाटत होते ते आता भाजप मध्ये गेल्यावर यांना गोड वाटू लागले. आधी तिकडचे शिव्या घालत होते त्यांना आता इकडचे घालू लागतात.

मला या सर्वात वाईट एकनिष्ठ पक्ष समर्थकांचे वाटते. त्यांना बिचारायाना नेत्यांमुळे नाहक कोलांट्या उड्या माराव्या लागतात.

तुम्ही सुद्धा इतर धाग्यांवर फार छान विचार मांडता. मला सारे पटतील असे नाही पण ते तुमच्या मतांशी प्रामाणिक असतात.

राजकारणावर लिहिताना मात्र तुम्हाला काय कोणत्याच निष्ठावान समर्थकाला प्रामाणिक लिहिणे शक्यच नाही.

<ईडीचा (जोडीला सीबीआय / आयटी / पोलिस ) यांचा वापर करून किती नेत्यांना शिक्षा झाली आहे? - मला नाही माहीत याचे उत्तर.>
सर , मग हे "जर भाजप कुठल्या भ्रष्टाचारी नेत्याचे एन्काऊंटर न करता कायदेशीर मार्गाने ईडीचा वापर करून त्यांना शिक्षा देत असेल तर त्यात गैर काय आहे? " हे वाक्य तुम्ही कोणत्या आधारे लिहिलंत?

तुम्ही तो धागा वचलाय म्हणता. तिथले प्रतिसादही वाचले असते, तर उत्तर मिळालं असतं.

<आधी तिकडचे शिव्या घालत होते त्यांना आता इकडचे घालू लागतात.> सर, तुम्ही तुमचा अर्थ काढून मोकळे होताय. आमचं म्हणणं आदर्णीय
मोदीं , अभ्यासू फडणवीस ते किरीट सोमैया असे भाजप नेते यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करतात, मग त्यांना आपल्या पक्षात किंवा युतीत घेतात आणि त्यांच्यावरच्या केसेस मागे घेतात.

मी कोलांट्या उड्या मारत नाही. तुमच्याकडून शिकता येईल, पण इच्छा नाही.

आता तुम्ही बघा रोहित शर्माच्या अगदी गलिच्छ शिव्या देण्याचंही कौतुक करता, त्याच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने रेकॉर्ड ब्रेक खराब कामगिरी केली तर त्याकडे दुर्लक्ष करा म्हणता. तेव्हा आपल्याला जो आवडतो, पटतो त्याच्याबद्दल बहुतेक लोक असेच पार्शल असतात.
मीही आधी असेन. पण हे बरोबर नाही हे लक्षात आल्यापासून माझ्या आवड त्या पक्षाचं जे आवडत नाही, त्याबद्दल तसं लिहीत आलो आहे. समर्थन करत नाही.

प्रामाणिक हा शब्द तुमच्या कडून आल्याची गंमत वाटली.

आता पुढचा मुद्दा घेऊ
<सध्या प्रॉब्लेम असा झाला आहे की कोणीच एक्स्पर्ट निःपक्ष आणि प्रामाणिक वाटत नाही. सगळे पेड किंवा अजेंडा असलेले वाटतात. किंवा मित्रही स्वतःच गोंधळलेले वाटतात.

दुसरे म्हणजे माहितीचा सोर्स सुद्धा इंटरनेट वर काय खरा काय खोटा याची काहीच कल्पना नसते. म्हणजे हे मी केवळ व्हॉटसअप फॉरवर्ड बद्दल बोलत नाही, तर कुठलीही वेबसाईट हल्ली विश्वासार्ह वाटत नाही. >

सर, एखाद्या सामन्यात रोहित शर्माने किती वेळा नाक खाजवलं आणि त्यात कसा रेकॉर्ड केला हे मोजायला आणि पन्नास ठिकाणी टाकायला तुम्हांला वेळ असतो. तेव्हा किमान नागरिक /मतदार म्हणून आपले काही कर्तव्य आहे, असं वाटत असेल, तर त्याबद्दल माहिती शोधायला वेळ आणि प्रयत्न खर्च करणं तुम्हांला अजिबात अशक्य नाही.

तुम्हीच आधी लिहिलंय की मी एखाद्या विषयावर धागा काढतो , पण तिथे राजकीय मारामारी सुरू झाली की तो सोडून देतो. तुमचा धागा काढण्याचा उद्देश एखाद्या मुद्द्यावर सांगोपांग चर्चा व्हावी, माहिती मिळावी हा नसून तुम्हांला असलेली प्रतिसादांची खाज हा आहे, असा माझा आरोप आहे. ताजं उदाहरण - मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळताच तुम्ही त्यावर धागा काढलात. ना तुम्हांला मराठीबद्दल प्रेम, ना मराठी साहित्याबद्दल. नाहीतर ललितलेखनात असला कचरा केला नसतात. हे काहीतरी भरपूर प्रतिसाद मिळेल असं दिसतंय म्हणून त भरकन धागा काढलात. तुमच्यात आणि टीआरपीसाठी हपापलेल्या आणि अर्धवट आणि खळबळजनक बातमी देणार्‍या न्युज चॅनेल्स मध्ये काही फरक नाही.

दुष्यंत कुमार यांचा प्रसिद्ध शेर आहे.-
“सिर्फ हंगामा खड़ा करना मेरा मकसद नहीं,
मेरी कोशिश है कि ये सूरत बदलनी चाहिए।

मेरे सीने में नहीं तो तेरे सीने में सही,
हो कहीं भी आग, लेकिन आग जलनी चाहिए।”

तुमचा उद्देश मात्र कायम हंगामा खडा करना एवढाच असतो.

बाकी तुमच्यासारखे लोक मतदान न करण्यासाठी पटेल असं कारण शोधत असतात. त्यातलाच प्रकार हा लेख आहे.

एका चालत्या एक्स्प्रेस ट्रेनमध्ये रेल्वे पोलिसांतील एका हवालदाराने वेगवेगळ्या डब्यांतील तीन मुस्लिम व्यक्तींना एका डब्यात आणून गोळ्या घालून मारलं. त्यावेळी बाकीचे प्रवासी काय गंमत चालली आहे, असे बघत होते. कारण त्या पोलिसाकडून आपल्याला धोका नाही, हे त्यांना माहीत होते. त्या मेलेल्या माणसांशी त्यांना काही देणंघेणं नव्हतं पांढरपेशा मध्यमवर्गीय मतदार या इतर प्रवाशांसारखा आहे. सरकार कोणतंही येवो, आपल्याला कुठे काय फरक पडतो? मग कशाला मत द्या? याच लोकांना हलवायला भाजप गझवा ए हिंद, एक है तो सेफ है सारखं फिअर माँगरिंग करतो आहे.
त्या पोलिसाने मुडदे पाडल्यावर तिथे एक भाषणही केलं. पुढल्या वेळी असा प्रकार होईल तेव्हा हे प्रवासी भाषणावर टाळ्या वाजवतील.

भरत,
वरचा प्रतिसाद.. : +११११११११

भरत भाई.
नाही पटला प्रतिसाद. जरुरी पेक्षा जास्त कठोर झाला आहे. प्रतिवाद करायची इच्छा नाही. फक्त नमूद करायचे होते. शेवटी "शेठजी, जिसकी जैसी सोच."

अवांतर पण उत्तर देणे जरुरी पोस्ट -

काही लोक म्हणतात की मी अटेंशन आणि प्रतिसाद मिळवायला धागे काढतो.

माझे निरीक्षण आहे की ते लोकं अटेंशन मिळवायला माझ्यावर लिहितात Happy

अन्यथा, एखाद्या सभासदाचे धागे शोधून शोधून, त्यातले प्रतिसाद वाचून वाचून, जुने कुठे काय लिहिले आहे ते सारे लक्षात ठेवून, सतत एखाद्या बद्दल इतके कोण कसे लिहू शकते??

आणि गंमत इथेच संपत नाही..
तीच लोक पुन्हा म्हणतात की आम्ही याचे प्रतिसाद इग्नोर करतो आणि धागे वाचतच नाही Happy

प्रत्यक्षात हे लोक माझे धागे, प्रतिसाद, मायबोलीवर लिहिला जाणारा माझा एकूण एक शब्द वाचत असतात.
इतकेच नाही तर माझ्या बद्दल इतरांनी लिहिलेले सुद्धा तितक्याच शिद्दतने वाचत राहतात Happy

एखाद्याची इतकी बित्तंबातमी ठेवणे, हे मी फक्त जिच्या प्रेमात पडलो आहे अश्या मुलीबाबत करू शकतो Happy

कम ऑन गाईज.. गेट ए लाईफ!
ऋन्मेऽऽष पलीकडे सुद्धा आयुष्य आहे.. आणि ते सुद्धा फार सुंदर आहे Happy

सर, स्वतःचा उल्लेख नाव घेऊन , तृतीयपुरुषी करणारे एक आदर्णीय मोदीजी आणि दुसरे तुम्ही!
तुम्हा दोघांत इतके गुण सारखे आहेत ! आदर्णीय मोदीजींनंतर कोण हा प्रश्न सुटला.

आजपासून मी तुम्हांला आदर्णीय सर म्हणणार.

पूनम पांडे स्वतःच्या मृत्यूच्या बातमी देण्याने ट्रोल झाली होती तेव्हांची वक्तव्ये आठवली. अशाच पद्धतीची राखी सावंत आणि गौतमी पाटीलची वक्तव्ये विस्मरणात गेली आहेत. काय काय म्हणून लक्षात ठेवायचं ?

ऋन्मेऽऽष पलीकडे सुद्धा आयुष्य आहे >>>> माफ करा, पण तुमचं जे काही लिखाण वाचलय त्यातून ज्याप्रकारे एखाद्याच्या आत्ममग्नतेचा आणि आत्ममुग्धतेचा वाक्या-वाक्यागणिक प्रत्यय येतो, त्यावरून नक्कीच हे बोल तुमचे स्वानुभवाचे नसून कुठल्या तरी पुस्तकात वाचलेले, व या प्रसंगी उत्तरादाखल बरे वाटतील म्हणून डकवलेले आहेत, हे इथला आयडी अन आयडी मान्य करेल इतपत परिस्थिती आहे. असो व्यक्ती तितक्या प्रकृती....चालायचे.

https://youtu.be/raFp3-Cu39A
वरील व्हिडीओमधे खालील गोष्टी मिळतील. त्यावरून कोणाला मत द्यायचे हे ठरवता येऊ शकेल.

00:00 Intro
02:01 २०३५ सालचा महाराष्ट्र कसा असेल?
08:02 वाढवण बंदर महत्त्वाचे का आहे?
12:22 महाराष्ट्राची ओळख काय असावी, असं वाटतं?
15:57 विकासाचं मार्केटिंग करायला कमी पडलात का?
20:07 राज्यासमोरील रोजगार, जाती-धर्माच्या समस्या कशा सुटतील?
23:04 विविध योजनांतून थेट बँक खात्यात पैसे देणं म्हणजे वरवरची मलमपट्टी आहे?
23:52 थेट बँक खात्यात पैसे देणाऱ्या योजनांवर मध्यमवर्ग नाराज आहे?
25:13 विकासाच्या मुद्द्यावरून निवडणुक जिंकता येते?
28:18 १९९० ते २०२४ या काळांत महाराष्ट्रात काय बदललं?
30:30 शहरी आणि ग्रामीण भागांतील विकासाबद्दल तुमची दृष्टी काय?
37:44 महाराष्ट्राचं राजकारण संक्रमणाच्या टप्प्यात आहे?
38:49 भाजप पुन्हा सत्तेत येईल का? सत्तेत आल्यावरचा ड्रीम प्रोजेक्ट कोणता असेल?

शाम भागवत, धन्यवाद ऐकतो.. वरवर चेक केले. घरी जाऊन ऐकतो.
निदान विकासाच्या मुद्द्यावर परत फिरून आले आहेत हेच खूप आहे.
अन्यथा जातीधर्म सेक्यूलरिजमचे राजकारण करा किंवा एकमेकांची उणी दूनी काढा हेच चालू असते.

उणी दूणी नाहीयेत.
निरनिराळ्या मुलाखतीत हे मुद्दे स्वतंत्रपणे येऊन गेलेले आहेत.
मुख्य म्हणजे बऱ्याच गोष्टी तपासून बघता येऊ शकतात. डॉक्युमेंटरी इव्हीडन्स मिळू शकतो.

भरत +१
मतदानात कुणाला मत द्यायचं? इतका सरळ राजकारणातील प्रश्न राजकारण विभागात न लिहिता ललित विभागात! ललितात लिहायचंच आहे तर किमान शर्करावगुंठित करायचे तरी कष्ट घ्या. बाकीच्या पोस्ट्स शी ही सहमत. अभ्यासपूर्ण उघडं पाडणारा प्रतिसाद आहे. बाकी बोलण्यात अर्थ नाही, पण काळ सोकावू नये म्हणून प्रतिसाद.

Admin यांना वाटले हा धागा राजकारण विभागातच हवा होता तर ते हलवतील आणि माझी त्यावर काही तक्रार नसेल.

किंबहुना कोणी तशी admin यांना विनंती केली आणि त्यांनतर admin यांनी ती कारवाई केली तरी माझा त्या आयडीवर काही राग लोभ नसेल.

पण यावर इतके समरसून चर्चा करण्यासारखे काय आहे हे अजूनही समजले नाही.

मायबोलीवर दर तिसऱ्या धाग्यावर इतक्या अवांतर चर्चा चालतात आणि वर असलेले सारेच आयडी त्या चर्चात सक्रिय सहभाग नोंदवतात. कोणाला आपलेच वागणे वावगे वाटत नाही.
पण आज अचानक हा धागा ललित लेखनातच का हा ईतका ज्वलंत प्रश्न व्हावा Happy

असो, ज्याची त्याची आवड आणि ज्याची त्याची प्राथमिकता..

या विषयावर हे मा शे पो
एन्जॉय गाईज,
शुभरात्री Happy

मतदार म्हणून सध्याच्या राजकीय परिस्थितीमुळे आलेली आजच्याइतकी हतबुद्धता कधीच आली नव्हती
- अतुल कुलकर्णी

________&_________

वेडी आशा - अतुल कुलकर्णी यांची सोशल मीडिया वर वायरल झालेली कविता.

२० तारखेला मतदानाला जाण्यासाठी धीर गोळा करतो आहे!

गेली ४ दशकं राजकारण जवळून पाहणाऱ्या

पण आजच्या इतकी हतबुद्धता कधीही न आलेल्या

मनाला समजावतो आहे!

शकलं करून टाकलेल्या

राजकारणानं भांबावलो आहे.

आणि त्यात रयतेची खांडोळी

होण्याच्या शक्यतांनी हादरलो आहे!

राजकारणाचं जे झालंय, केलं गेलंय;

त्याला त्यांच्याइतकेच

जनता म्हणून आपणही जबाबदार आहोत

याची खूप खंत आहे.

आणि सार्वजनिक अधमतेची जी पातळी

आपण सगळ्यांनी मिळून गाठली आहे,

गाठू दिली आहे;

त्याचं अतीव दु:ख आहे!

आपली सामूहिक असाहाय्यता पाहून

होणारी तडफड आहे!

नेत्यांच्या वक्तव्यांची नीचतम पातळी बघून

वाटणारं आश्चर्य आहे.

आणि ती वक्तव्यं

आधी जिभल्या चाटत पचवणाऱ्या

आणि मग उलटी काढून ती पसरवणाऱ्या

आपल्या सगळ्यांची वाटणारी कीव आहे!

माझा डेटा चोरून, माझी परवानगी न घेता,

‘एआय’ चा वापर करून, चक्क माझं नाव घेत

मला रेकॅार्डेड कॉल करून

माझं मत मागणाऱ्या व्यवस्थेबद्दल संताप आहे.

आणि मतदार म्हणून असलेलं स्वातंत्र्य गहाण टाकून

एखाद्या व्यवस्थेच्या दावणीला बांधल्या गेलेल्या

आमची चीड पण आहे!

निकाल कसे लागतील

याचं कुतूहल आहे.

पण दिलेला ‘कौल’

किती दिवस ‘दिला होता तिथेच’ राहील

याचा संभ्रम आहे!

चाळिसातली बहुतेक वर्षं

मतदान केंद्राकडे पावलं आपसूक वळत होती याचा आनंद आहे.

पण आता त्यांना फरफटत न्यावं लागतानाचा आक्रोश

काळजाला रक्तबंबाळ करतो आहे !

पण चला,

मलमपट्टी करायला हवी.

बोटाला शाई दाखवायला हवी.

वेडी आशा शहाणी करायला हवी!

- अतुल कुलकर्णी

ही कविता आहे ?

मग डीडीज कॉमेडी शो मधले ल्ल ल्ल ल्ल ल्ल ल्ल ल्ल ल्ल ल्ल ल्ल ल्ल ल्ल ल्ल ल्ल हे शास्त्रीय गाणे आहे.

ती कविता आहे का? किंवा मी जे लिहिले ते ललित आहेत का? इतकी साहित्याची जाण नाही मला..

जे विचार मनात येतात ते मांडतो.
वर अतुल कुलकर्णी यांनी गद्य असो पद्य जे काही लिहिले आहे त्यातील विचार माझ्या विचारांशी मेळ खाणारे वाटले म्हणून इथे शेअर केले. इतके सिंपल आहे हे... का जटिल करून ठेवायचे.

अमितव म्हणतात ललितात लिहायचंच आहे तर किमान शर्करावगुंठित करायचे तरी कष्ट घ्या...
पण त्याने काय साध्य होणार? विचार जसे आहेत तसे व्यक्त करणे जास्त महत्वाचे नाही का?
आणि ते म्हणतात तसे शर्करावगुंठित केल्यानंतरही ज्यांना टिकाच करायची आहे ते हात थांबणार आहेत का?

तेच तर म्हणतोय.
डीडी कॉमेडी शो मधले ल्लल्लल्लल्ल शास्त्रीय गायन आहे.. सिंपलच आहे ना? कशाला चिडचिड उगाच?

सर, तुमच्या मनाची तगमग समजू शकतो.

र.आ.
ते ल्लल्लल्लल्ल ऐवजी प्लल्लप्लल्लप्लल्लल्ल असे हवे. प्लल्ल नसल्यामुळेच ते शास्त्रीय संगीत होत नाही, असा माझा अंदाज आहे. चू.भू.दे.घे.

Pages