# राजकीय एक्स्पर्ट ऐवजी सामान्य लोकांची मते, विचार, भावना जाणून घ्यायच्या असल्याने आणि स्वताच्या व्यक्त करायच्या असल्याने धागा मुद्दाम ललित लेखनात काढला आहे
--------------------------------+
आज ऑफिस मधून घरी परत येताना रस्त्यात प्रचाराची मिरवणूक लागली. ट्रक टेम्पो, जीप कार, वाहनांचा ताफा होता. नेता सुद्धा तितकाच मोठा होता. पक्ष कुठला ते महत्त्वाचा नाही. हल्ली मला सगळे सारखेच वाटतात. एकाच माळेचे शिरोमणी.
मोठमोठाले स्पीकर ध्वनी प्रदुषण करत होते. रस्ताभर फटाक्यांचा धूर वायू प्रदूषण करत होता. एकंदरीत शक्ती प्रदर्शन चालू होते.
या सगळ्यात माझी रिक्षा अडकली होती. ती प्रचाराची नव्हती. तिचे मीटर जागच्या जागी पळत होते. ज्याचे पैसे मला भरायचे होते. त्यामुळे अजून चीडचीड होत होती.
रस्त्याने जाताना गणपतीच्या मिरवणुकीमुळे असे अडकलो तर चीड चीड होणे दूर, मस्तपैकी थांबून एन्जॉय करतो ते वातावरण. मी स्वतः नास्तिक असलो तरी लोकं मोठमोठ्याने गणपती बाप्पा मोरया आणि एक दोन तीन चार गणपतीचा जयजयकार अश्या घोषणा देतात त्या ऐकायला आवडतात. त्यांचा उत्साह आवडतो. पण इथे त्या अमुक तमुक नेत्याच्या नावाने घोषणा देणारे कार्यकर्ते बघून या मेल्यांना इतका काय याचा पुळका म्हणून त्यांचा राग येत होता. कारण आदर असा हल्ली कोणाबद्दलच वाटेनासा झाला आहे.
दिवाळीतल्या फटाक्यांचा आवाज सुद्धा सणाचे उत्सवाचे वातावरण म्हणून आवडतो, इंडिया क्रिकेट मॅच जिंकताच दूरहून कानावर पडणारा फटाक्यांचा आवाज सुखावतो. पण इथे फटाके लावलेले बघून तोंडात शिव्या येत होत्या.
या आधी मात्र असे नव्हते. निवडणूक जवळ आली की ते प्रचाराच्या रणधुमाळीचे वातावरण आवडायचे. टीव्ही वरच्या चर्चा आवडीनुसार झेपेल तितके ऐकल्या जायच्या. आपल्या कुवतीनुसार जवळच्या मित्रासोबत चर्चा केली जायची.
पण एकूणच गेले काही वर्षात महाराष्ट्राच्या राजकारणाचा दर्जा ईतका खालावला आहे की सारे सोडूनच दिले आहे. इच्छाच उरली नाही.
पण म्हणून काही मत देणे चुकले नाही. ते द्यायचे आहेच. द्यावे लागणारच.
मी काही कुठल्या राजकीय पक्षाचा समर्थक नाही. माझे मत कधीच कुठल्या पक्षाला फिक्स नसते. त्या त्या वेळेस निर्णय घेतो. आतापर्यंत पाच राजकीय पक्ष आणि एकदा अपक्ष असे त्या त्या वेळेस जो योग्य वाटेल त्या सर्वाँना संधी दिली आहे. पण यावेळेस खरेच काही सुचत नाहीये.
यंदा कोणाला मत द्यावे हा निर्णय का घेता येत नाही याची प्रामुख्याने दोन कारणे आहेत.
१) कोणाला मत द्यावे हा निर्णय घेण्यासाठी साधारण मी असे करतो - माहिती गोळा करतो आणि आपल्या कुवतीनुसार त्याचे विश्लेषण करतो. किंवा दोनचार ठिकाणचे एक्स्पर्ट विश्लेषण ऐकतो. आता ते एक्स्पर्ट हे रिपोर्टर, सेलिब्रिटी, माझे मित्र कोणीही असू शकतील.
सध्या प्रॉब्लेम असा झाला आहे की कोणीच एक्स्पर्ट निःपक्ष आणि प्रामाणिक वाटत नाही. सगळे पेड किंवा अजेंडा असलेले वाटतात. किंवा मित्रही स्वतःच गोंधळलेले वाटतात.
दुसरे म्हणजे माहितीचा सोर्स सुद्धा इंटरनेट वर काय खरा काय खोटा याची काहीच कल्पना नसते. म्हणजे हे मी केवळ व्हॉटसअप फॉरवर्ड बद्दल बोलत नाही, तर कुठलीही वेबसाईट हल्ली विश्वासार्ह वाटत नाही.
२) दुसरे कारण महाराष्ट्र स्पेशल आहे. इतके पक्ष आणि इतका गोंधळ झाला आहे. आणि निवडून आल्यावर हे लोकं आणखी काय गोंधळ घालणार आहेत याबाबत जराही सुस्पष्टता नाही. सोप्या भाषेत सांगायचे झाल्यास आपले मत अखेर कुठल्या पक्षासोबत किंवा गठबंधनासोबत जाईल याची काहीच खात्री नाही.
पक्ष बघून नाही तर उमेदवार बघून मत द्या हे तत्व नगरसेवक निवडणुकीत बरे वाटते आणि पाळता सुद्धा येते कारण साधारण त्या व्यक्तीची माहिती सुद्धा असते. इथे आपल्या विधानसभा विभागातील उमेदवारांची माहिती घेणे म्हणजे पुन्हा सोर्स कुठले हा प्रश्न आलाच. त्यापेक्षा पक्षांचीच माहिती घेणे सोयीचे पडते आणि योग्य ठरते.
असो,
नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत नोटा विचार डोक्यात घोळत होता. ऐन क्षणाला विचार बदलून एका पक्षाला मत देऊन आलो.
पण ती लोकसभा होती. डोक्यात तितका गोंधळ नव्हता. महाराष्ट्राच्या राजकारणाबाबत मात्र विचार करू तितके डोके भंजाळून जाईल अशी परिस्थिती आहे.
तर काय करावे..
नोटासाठी जावे का?
नोटा वापरू नका असेही काही म्हणतात.
गलिच्छ राजकारणाचा कितीही वीट आला तरी दगडापेक्षा वीट मऊ म्हणत कोणालातरी निवडावे.
पण जर कोण दगड आणि कोण वीट हा निर्णय सुद्धा घेता येत नसेल तर अटक मटक चवळी चटक न करता सरळ नोटा दाबावे का?
नोटा - NOTA - None of the above
पहिला प्रश्न - ललितलेखन कशाला
पहिला प्रश्न - ललितलेखन कशाला म्हणतात , सर?
>>>>>
भरत, आपला आक्षेप नेमका कश्याला आहे हे बिलकुल समजले नाही..
धागा ललित विभागात काढला म्हणून त्यात लिहिलेले मुद्दे बदलत नाहीत. त्यावर भाषा केल्यास आवडेल
या सगळ्यात माझी रिक्षा अडकली
या सगळ्यात माझी रिक्षा अडकली होती. ती प्रचाराची नव्हती. >> या भागात लोक प्रचाराच्या रिक्षातून फ्री ये जा करतात का ? आधी सांगितले असते तर इथे उमेदवारांना विचारले असते.
साधना, हो. नोटाने परिस्थितीत
साधना, हो. नोटाने परिस्थितीत काही फरक पडत नसेल सुद्धा. पण आपल्या मनाला समाधान नक्कीच मिळू शकते.
उद्या जर खूनी, एक बलात्कारी, एक आणखी कोणी गँगस्टर जर माझ्या विभागातून उभे राहत असतील आणि त्यांच्यातच खरी लढत असेल तर त्यातल्या त्यात बरा कोण त्याला मत द्यायला मी तासाभराचा प्रवास करून मत द्यायला जाणे क्लेशकारक आहे.
घर कायमचे बदलले तर एलेक्शन
घर कायमचे बदलले तर एलेक्शन वार्ड बदलुन घ्यायला हवा म्हणजे तासभर प्रवास करायला नको.
मी अजुन बदललेला नाही, लोकसभेला गेले होते मुम्बैला पण आता जाणे शक्य नाही. पोस्टल वोटिंग सर्व जणांसाठी खुले करायला हवे. सध्या फक्त लिमिटेड लोकांसाठी आहे.
सर, हा धागा तुम्ही निवडणुकीत
सर, हा धागा तुम्ही निवडणुकीत मतदान करावे की नाही, कोणाला करावे याबद्दल काढला आहे . बरोबर ?
ही निवडणूक शाहरुख खान आणि रोहित शर्मा यां च्यापैकी कोणाचे फॅन अधिक पकाऊ असतात, यासाठी नाही तर आपले राज्यकर्ते निवडण्यासाठी आहे. बरोबर?
राज्यकर्ते म्हणजे जिल्हाधिकारी, तहसीलदार , पोलिस कमिशनर नाही तर मुख्यमंत्री, मंत्री . बरोबर?
हे निवडले जाणार आमदारांमधून. यांना राजकारणी म्हणतात, म्हणजेच धाग्याचा विषय राजकारण आहे. मायबोलीवर राजकार णाबाबत चर्चेसाठी वेगळा ग्रुप आहे. त्यात लिहिण्यासाठी राजकीय पक्षाचं सदस्य असायची गरज नाही किंवा कोण्या पक्षाचा पाठिराखा वा विरोधक असायचीही गरज नाही. त्यामुळे हा धागा राजकारण या ग्रुपात असावा, असं एक सामान्य मायबोलीकर म्हणून मला वाटतं.
तुम्ही मायबोलीवरचं एक स्टार व्यक्तिमत्व, लोकप्रिय आणि बहुप्रसव लेखक आणि प्रतिसादक आहात. त्यामुळे तुम्हांला असं वाटेल असंच नाही. शिवाय तुम्हांला लिखित / अलि खित नियम / संकेत पाळायचीही गरज नाही.
हा धागा राजकारण ग्रुपात न काढण्यामागे राजकारण घाण, राजकारणाबद्दल लिहिणारे गलिच्छ असं तुमचं मत असूच शकतं. मायबोलीवर आणि समाजातही तसं समजणारे अनेक लोक आहेत.
दुसरं ललितलेखन हा एक विशिष्ट साहित्यप्रकार आहे. जशा कथा, कविता, प्रवासवर्णन, विनोदी लेखन , तसं ललितलेखन. त्याबद्दलचे काही निकष आहेत. (हे मी ठरवलेलं नाही , तसंच हे फक्त मायबोलीला लागू नाही). अनिंद्य यांचे लेख हा ललितलेखनाचा उत्तम मासला आहे . ललित लेखनात काय प्रकारचं लेखन दिसावं याचे त्यामुळे माझ्या मनात काही ठोकताळे आहेत. . पण तुमचं तसं नाही सर. तुम्ही मराठी भाषेचे व्याकरण आणि शुद्धलेखनाचे नियमही मानत नाही. त्यामुळे तुम्ही ललित लेखन म्हणून काहीही लिहू शकताच. पण तरी एक सामान्य मायबोलीकर म्हणून मी माझी शंका विचारली आणि मत नोंदवले.
तिसरं, तुम्ही म्हणाल मग ललितलेखनात धागा काढला तर बिघडलं कुठे? तुमच्यामुळे कुठे काय बिघडतं सर? पण ललितलेखनच का? पाककृती आणि आहारशास्त्र किंवा क्रिकेट या ग्रुपात का नको? तुमच्याच शब्दांत सांगायचं, तर त्यामुळे त्यातले मुद्दे बदलत नाहीत.
तुम्हांला तुमच्या मनातलं सांगायचंय आणि आणि काही लोक सोडून इतरांचं ऐकायचं असेल तर कोणाशी तरी बोलायचं या ग ग्रुपमध्येही धागा काढता आला असता. शेवटी तुमची मर्जी सर.
ललित प्रभाकरला लेखनिक म्हणून
ललित प्रभाकर डोबब ला लेखनिक म्हणून कामाला ठेवले असेल.
>>>>>
>>>>>
हा धागा राजकारण ग्रुपात न काढण्यामागे राजकारण घाण, राजकारणाबद्दल लिहिणारे गलिच्छ असं तुमचं मत असूच शकतं.
>>>>>
@भरत
हा वरील पोस्ट मधील महत्त्वाचा मुद्दा.
उगाच का अंदाज बांधत आहात? उलट मी त्यांना एक्स्पर्ट म्हटले आहे. कोणाला मत द्यावे याचा निर्णय घेताना मी यांचेच वाचतो.
प्रश्न आहे तो त्यांच्या निःपक्ष असण्याचा. त्यांनी एका ठराविक पक्षाचा झेंडा हाती घेतला असतो आणि ते त्यांच्या बाजूनेच लिहीत असतात.
अर्थात यात काही गैर आहे असे नाही. पण ते मग माझ्या फायद्याचे नाही.
राजकारण विभागात अश्याच पक्षनिष्ट सभासदांमध्ये तुंबळ युद्ध चालू असते. त्यामुळे इतर सामान्य सभासद तिथे फिरकत नाहीत असा अनुभव आहे. त्यामुळे मला राजकारण बद्दल मन मोकळे करावेसे वाटले ते इथे केले.
बाकी माझे सुद्धा राजकारण विभागात धागे आहेतच. लिंक देतो नंतर शोधून..
घर कायमचे बदलले तर एलेक्शन
घर कायमचे बदलले तर एलेक्शन वार्ड बदलुन घ्यायला हवा म्हणजे तासभर प्रवास करायला नको.
>>>
हो, गेल्यावेळी हे काम झाले नाही माझे. आपल्याकडे अशी कामे किती लवकर होतील हा नशिबाचा भाग असतो.
यावेळी मग आळस केला.
पण मत द्यायला आळस करणार नाही.
बायकोचे तर आणखीनच वेगळे. ना
बायकोचे तर आणखीनच वेगळे. ना इकडे नाव ना तिकडे नाव.. तिला मतदानच करता आले नाही.
आमच ठरलयं!!
आमच ठरलयं!!
सर, तुम्ही सलमान खान धाग्यावर
सर, तुम्ही सलमान खान धाग्यावर लिहिले आहे - "तिथे तो भाजप इडी धागा वर आला आहे.
जर भाजप कुठल्या भ्रष्टाचारी नेत्याचे एन्काऊंटर न करता कायदेशीर मार्गाने ईडीचा वापर करून त्यांना शिक्षा देत असेल तर त्यात गैर काय आहे? ".
यावरून तुम्ही तिथे बहुधा मलाच अनेकदा ट्रोल केले आहे.
तर १. तो धागा तुम्ही वाचला का?
२. ईडीचा (जोडीला सीबीआय / आयटी / पोलिस ) यांचा वापर करून किती नेत्यांना शिक्षा झाली आहे?
२ अ. किती लोकांविरोधातल्या चौकश्या / केसेस बंद केल्या गेल्या आहेत?
२ आ. त्या बंद व्हाव्यात असं काय घडलं? पुरावे मिळाले नाहीत म्हणावं तर अभ्यासू फडणवीसांपासून ते विश्वगुरू आदर्णीय मोदीजींपर्यंत अनेकांनी त्याबाबत जाहीर आरोप केले आहेत.
२ इ. वानगीदाखल छगन भुजबळ यांचं नाव घेतो. त्यांची केस बंद करताना चौकशी यंत्रणेने काय कारण दिले ते तुम्हांला माहीत आहे का? त्यावर तुमचं मत तुम्ही इथे लिहू शकाल का?
रवी वायकर आणि सहकारी
रवी वायकर आणि सहकारी यांच्यावरील केस पण मागे घेतली.
पुरावे नाहीत अस कारण दिलंय यंत्रणेनं
<उगाच का अंदाज बांधत आहात?
<उगाच का अंदाज बांधत आहात? उलट मी त्यांना एक्स्पर्ट म्हटले आहे. कोणाला मत द्यावे याचा निर्णय घेताना मी यांचेच वाचतो.> धन्यवाद सर.
विधानसभा निवडणुकींच्या धाग्यावर कोणीतरी अशा चर्चेची तुलना कॉलरा, मलेरिया सारख्या आजारांशी केली आहे. आता अशी चर्चा तर आपण क्रिकेट आणि चित्रपटांबद्दल सुद्धा करतो. आपल्या चर्चेने यातलं काहीही बदलणार नसतं. फक्त राजकारण तेवढं बदनाम होतं, याचं वाईट वाटतं.
धन्यवाद भरत
धन्यवाद भरत
तुमची ईडी पोस्ट माझाच मुद्दा सिद्ध करत आहे.
मुद्दा असा की सत्ताधारी आणि पॉवरफुल माणसे कायद्याचा वापर हवा तसा करतात.
सलमान सुद्धा अश्याच प्रकारे सुटला. म्हणून कोणी उद्वेगाने त्याच्या सुपारीला गोड बातमी म्हटले तर त्याला लगेच कायद्याची चाड नाही असा निष्कर्ष काढायची घाई करायची गरज नव्हती.
जर ईडी धाग्यावरची माझी मते पाहिली तर समजेल मी देखील ईडीच्या गैरवापराबद्दल ताशेरेच ओढले आहेत. त्यामुळे तुमची वरची पोस्ट बाद झाली आहे.
हे बघा,
धागा --- विरोधकांना नेस्तनाबूत करण्यासाठी ED-CBI चा वापर होत आहे का?
माझी पोस्ट --- धाग्याच्या शीर्षकातील
प्रश्नचिन्ह हटवता येईल का?
म्हणजे तिथे आपण दोघे एकाच मताचे आहोत.
फक्त फरक असा आहे,
की माझे मत नेहमीच कायम राहते..
आणि तुमचे मत पक्ष बघून बदलते
तुमच्या आवडत्या नेत्यांनी जो आजवर भ्रष्टाचार घातला आहे त्याबद्दल तुम्ही चकार बोलणार नाही कारण तुम्ही त्यांचा झेंडा हाती घेतला आहे. तुम्हाला त्याची परवानगी नाही.
यात काही गैर आहे असे नाही.
पण मला एक सामान्य मतदार म्हणून त्या एका बाजूला झुकलेल्या मतांचा फायदा नाही.
समजेल आता असे अजून एक उदाहरण देतो,
मी शाहरुखचा चाहता आहे. हे सगळ्या मायबोलीला ठाउक आहे. तर उद्या मी शाहरुखच्या एका चित्रपटाबद्दल रिव्ह्यू लिहिला आणि त्यात त्या चित्रपटाचे कौतुक केले तर कोणी ते वाचून तो चित्रपट बघायला जाईल का? नाही जाणार ना.. तसेच आहे हे. आणि मी हे स्वीकारले आहे. तुम्हीही स्विकारावे
तर उद्या मी शाहरुखच्या एका
तर उद्या मी शाहरुखच्या एका चित्रपटाबद्दल रिव्ह्यू लिहिला आणि त्यात त्या चित्रपटाचे कौतुक केले तर कोणी ते वाचून तो चित्रपट बघायला जाईल का?
या बद्दल मी सरांशी सहमत आहे.
सर, तुम्ही माझ्या प्रश्नाचं
सर, तुम्ही माझ्या प्रश्नाचं उत्तर दिलं नाही.
तुम्ही म्हणताय - तिथे तो भाजप इडी धागा वर आला आहे. जर भाजप कुठल्या भ्रष्टाचारी नेत्याचे एन्काऊंटर न करता कायदेशीर मार्गाने ईडीचा वापर करून त्यांना शिक्षा देत असेल तर त्यात गैर काय आहे? ".
माझा प्रश्न - ईडीचा (जोडीला सीबीआय / आयटी / पोलिस ) यांचा वापर करून किती नेत्यांना शिक्षा झाली आहे?
आधी याचं उत्तर द्या. मग पुढच्या प्रश्नांकडे वळू.
त्या धाग्यावरच्या माझ्या
त्या धाग्यावरच्या माझ्या पहिल्या प्रतिसादातलं पहिलं वाक्य -भ्रष्टाचाऱ्यांवर कारवाईची स्वागत आहे.
मी ज्या पक्षाचं समर्थन करतो, त्याने त्यांच्या नेत्यावर भ्रष्टाचाराचा आरोप झाल्यावर त्यांना राजीनामा द्यायला लावला. चौकश्या केल्या. तुरुंगातही टाकले. ए राजा. कनिमोळी, सुरेश कलमाडी हे लोक तुरुंगात होते. अशोक चव्हाण, अजित पवार यांनी राजीनामा दिला. इतरही अनेक उदाहरणे आहेत.
बलात्कारी आणि खुन्यांना
बलात्कारी आणि खुन्यांना ओवाळले जाते. त्यापुढे उमेदवारांना ओवाळणे म्हणजे काहीच नाही.
नोटाला मत देणं म्हणजे सध्या
नोटाला मत देणं म्हणजे सध्या तरी मत वाया घालवणे आहे.
सहाच्या सहा पक्षातून गुन्हेगार उभे आहेत. एका पक्षातला गुन्हेगार दुसरीकडे गेला कि आधीचा पक्ष त्याच्या गुन्ह्यांची यादी वाचतो आणि त्यावरून त्याच्या नव्या पक्षाला जाब विचारतो. म्हणजे आधी हा पक्षात असताना बाब्या होता आणि गेला कि कार्ट झाला. इतके दिवस पक्षप्रमुख भांग, अफू, चरस, गांजा असलं काय काय मारून बसलेले असतात का ?
अजित पवार ७०००० कोटींचा घोटाळा करून भाजपात गेले. ते जोपर्यंत राष्ट्रवादीत होते तोपर्यंत भाजपवाले कंठशोष करून ओरडत होते. एकदाचे ते भाजपात गेले कि राष्ट्रवादी शप गटाला कंठ फुटला. आता भाजपवाले गप्प बसले.
गंमत म्हणजे सोशल मीडीयात स्वतःला सभ्य समजणारे या खेळाचा भाग आहेत. यांचा समज असतो कि हे फारच धुतल्या तांदळासारखे आहेत. पण गुन्हेगार तुमच्या पक्षात असताना किंवा आल्यावर तुम्ही मौन पाळता हे जग बघत असतं ना ? मांजर डोळे मिटून दूध पिते यातला प्रकार.
राजकीय धागे यामुळे नको वाटतात.
जे सामान्य आहेत ते अशा भूमिका घेऊन का लढत बसतात ?
मला व्यक्तिशः भाजप, संघपरीवार अजिबात पसंत नाही. ही मंडळी लोकशाहीचा फायदा घेऊन लोकशाहीचा गळा घोटण्याचा विचार करतात. पण किमान यांच्याकडे गुन्हेगार उमेदवार सापडत नाहीत. ते नक्की भ्रष्टाचार करतात. पण घरंं भरणारे मोजके लोक आहेत. २०१४ नंतर मोदींनी त्यांना घरी बसवलं. आता भ्रष्टाचार हा मुद्दा गौण झाला. भाजपला विरोध हा मुद्दा शीर्षस्थानी झाला तर काँग्रेस आणि राष्ट्रवादीतून भाजपला १९९८ पासून रसद पुरवली जाते.
पुरोगामी काकांनी परदेशात बसून अपक्षांची रसद पुरवल्याने भाजप सेनेचं सरकार पहिल्यांदा महाराष्ट्रात आलं. हे पाप काकांचं.
नंतर काही वर्षांनी बाळासाहेब ठाकरेंच्या पंचाहत्तरीच्या वेळी पुरोगामी काका आणि ठाकरे हे खूप जुने म्हणजे शिवसेनेच्या आधीपासून मित्र असल्याचे खुलासे झाले. तर मग ही गोष्ट लपवून ठेवणे मतदारांची फसवणूक नाही का ? मतभेद असावेत पण मनभेद असावेत वगैरे तात्विक गोष्टी तेव्हांच स्विकारल्या जाऊ शकतात जेव्हां तुम्ही लपवाछपवी करत नाहीत.
बाळासाहेब ठाकरेंशी असलेली मैत्री लप्वाविशी का वाटली ? तर मग त्या काळात मैद्याचं पोतं, अफजलखान हा सगळा मूर्खात काढण्याचा प्रकार होता का ?
सेक्युलर, पुरोगामी, हिंदुत्व , मराठी हा सगळा उल्लू बनवण्याचा प्रकार श्रीकृष्ण आयोगाच्या रिपोर्टमुळे चव्हाट्यावर आला. हा रिपोर्ट हे पूर्वीचे दोन नंतरचे चार आणि आताचे सहा पक्ष का टेबलवर ठेवत नाहीत ?
सामान्यांना भ्रष्टाला भ्रष्ट म्हणायला काय अडचण आहे.
सोशल मीडीयात येऊन सामान्य मतदार सुद्धा जणू काही पक्ष कार्यकर्ता असल्यासारखा कधी मौनात कधी जोमात असं वागायला शिकला आहे.
हे इतर विषयात पण होतं का ?
राजकारणात न्युट्रल कुणी नसतं. पण सामान्य मतदार आणि धूर्त कार्यकर्ता यातला फरक पुसट होताना दिसतोय. पूर्वी फक्त भाजपचे मतदार हेच मतदार कम कार्यकर्ते असत. आता सगळ्ञाच पक्षांना ही लागण झाली आहे.
पूर्वी जात, धर्म, पंथ, प्रांत याने झालेली विभागणी आता प्रत्येक विभागात पक्षनिहाय झाली आहे.
यात सामान्य मतदाराचा फायदा काय ?
अजित पवार सेक्युलर भाजपासोबत जाऊन बसले. मूर्खात निघालेल्या मतदाराला लगेचच टूलकीट आलेले कार्यकर्ते मसाला पुरवतात आणि तो ही वेड्यात निघून उपहासाचा आधार घेत स्वतःचे फसवे मनोरंजन करून घेत राहतो.
हे उबगवाणे आहे.
जम्मू काश्मीर मधे कथुआ चे
जम्मू काश्मीर मधे कथुआ चे प्रकरण गाजले. मायबोलीच काय सोशल मीडीयात त्यावर हिरीरीने तात्विक पोष्टी टाकल्या गेल्या. ते प्रकरण गंभीरच होते. त्यामुळे नैतिकतेच्या आधारावर पक्ष, नेते यांना झोडपणे हे मान्यच होते. असिफा नावाच्या त्या बालिकेला न्याय मिळावा म्हणून जनमत प्रक्षुब्ध होताना दिसत होते. तिला न्याय मिळण्याऐवजी आरोपीच्या समर्थनार्थ भाजपच्या एका तत्कालीन आमदाराने म्हणजे चौधरी लालसिंग याने तिरंगा रॅली काढली.
या रॅलीवरून भाजपला झोडपले गेले. चिमटे काढले गेले.
पण गेल्या महीन्यात पार पडलेल्या काश्मीरच्या निवडणुकीत याच लालसिंगला काँग्रेसने उमेदवारी दिली. त्यावरून ज्यांनी ज्यांनी डोकं आपटून घेतलं होतं त्यांना प्रश्न विचारले तर ते "हमको सुनाई नही देता, दिखता नही है, गुंगे है हम" या पवित्र्यात होते.
मग यांना सर्वात जास्त जोड्याने हाणायला नको का ? असल्या भंपक नैतिकतेच्या या तात्विक वाचाळांचा कुठल्या भाषेत सत्कार केला पाहीजे ?
भानावर यायची वेळ केव्हांच गेली आहे.
< पण किमान यांच्याकडे
< पण किमान यांच्याकडे गुन्हेगार उमेदवार सापडत नाहीत. ते नक्की भ्रष्टाचार करतात. पण घरंं भरणारे मोजके लोक आहेत. > भाजपने भ्रष्टाचार सेंट्रलाइज केला. निवडणूक रोखे हा भ्रष्टाचार कायदेशीर करण्याचा प्रकार होता.
<पण सामान्य मतदार आणि धूर्त कार्यकर्ता यातला फरक पुसट होताना दिसतोय. पूर्वी फक्त भाजपचे मतदार हेच मतदार कम कार्यकर्ते असत. आता सग ळ्याच पक्षांना ही लागण झाली आहे.> याला राजकीय प्रचारासाठी सोशल मीडियाचा वाढलेला वापर हे कारण आहे. हे पहिल्यांदा अण्णा आंदोलनाच्या वेळी झालं. मायबोलीवर दिसलंच आहे. मग आधी आप आणि मग भाजपने व्हॉट्स अॅप व इतर मी डियातून प्रचार करायला सुरुवात केला. इतर पक्ष - म्हणजे तेव्हा तरी काँग्रेसच यात स्वतः उतरायच्या आधी त्या पक्षांच्या समर्थकांनी पक्षाची बाजू सोशल मीडियावर मांडायला सुरुवात केली. आता सगळ्याच पक्षांचे आय टी सेल असतात.
भाजपने सोशल मीडियावर मारा सुरू केल्यावर इतर पक्षांनी तिथे गप्प राहून फक्त पारंपरिक प्रचार आणि प्रसार माध्यमांचा उपयोग करत राहायला हवं होतं का?
शिवाय २०१४ पर्यंत सरकारवर खुशाल टीका करता यायची. त्यासाठी कोणी तुम्हांला लेबलं लावायचं नाही. आता सरकार आणि सत्ताधारी पक्षावर टीका केली की राइसबॅगवाले, वडापाववाले , तुम्हांला सोरोसचं फंडिंग आहे अशी काहीही लेबलं लागतात.
आणखी एक निरीक्षण - मी
आणखी एक निरीक्षण - मी कोणत्याही पक्षाचा समर्थक नाही किंवा सगळे पक्ष सारखेच असं म्हणणारे कायम विशिष्ट पक्षांच्याच विरोधात बोलताना दिसतात. आपण विशि ष्ट पक्षाचे समर्थक आहोत , हे कबूल करायला लाजत असावेत.
पुन्हा तेच.
पुन्हा तेच.
असिफा ला न्याय हा मुद्दा होता
असिफा ला न्याय हा मुद्दा होता तर पक्ष बदलला कि तोंडात मिठाची गुळणी घेऊन बसणारे *रामी नाहीत का?
फुल्यांच्या भाषेपेक्षा या असल्या दलिंदर लोकांना पायातले काढून हाणले पाहिजे.
मतदार आणि समर्थक यात फरक असतो
मतदार आणि समर्थक यात फरक असतो. वर्षानुवर्षे काहीही झाले तरी विशिष्ट पक्षाला मत देणाऱ्या पेक्षा या पक्षाला काहीही झाले तरी मत द्या असा प्रचार करणारे जास्त विकृत असतात. त्याहीपेक्षा गैरसोयीचे मुद्दे आले कि समूहाने दुर्लक्ष आणि आपल्या विरोधात असला कि झुंडीने ट्रोलिंग करणारे हे त्यापेक्षाही जास्त विकृत.
मिठाची गुळणी? लिहिलंय की
मिठाची गुळणी? लिहिलंय की त्याच वेळी. आणि मी लिहिलेलं वाचूनच तुम्ही अन्यत्र तो मुद्दा उचललात ना?
भरत यांना तारेवरची कसरत करावी
भरत यांना तारेवरची कसरत करावी लागतेय, एकाच मुद्द्यासाठी भाजपावर टीका तर त्याच मुद्यासाठी काँग्रेस कडे डोळेझाक किंवा समर्थन.
29 14 च काय त्यानंतरही भाजपला
29 14 च काय त्यानंतरही भाजपला झोडपले आहे. पण विकृतांना स्पष्टीकरणे द्यायला बांधील नाही. त्यांची ती लायकी नाही.
कॉंग्रेस ने लालसिंह ला उमेदवारी दिली यावर गपगार पडणाऱ्यांना उद्देशून लिहिले आहे. ज्यांना लागू नाही ते का फडफड करतात?
हे एक उदाहरण झाले. अशा घटनांची जंत्री देण्याची गरज नाही.
अशा घटनात भाजपचे समर्थक गप्प बसतात कारण त्यांना ती विशिष्ट धर्माची असल्याने कॉंग्रेसने लालसिंह ला उमेदवारी दिली तर आनंदच आहे.
असिफा ला न्याय मिळतच नाही.
विदेशी जन्माच्या मुद्द्यावर
विदेशी जन्माच्या मुद्द्यावर राष्ट्रवादीचा जन्म झाला होता. विसर पडू नये.
सर
सर
"If Voting Made a Difference, They Wouldn't Let Us Do It'
Fools vote and smart people rule!
Pages