यंदा मत कोणाला द्यायचे?? की नोटाला वोटायचे??

Submitted by ऋन्मेऽऽष on 14 November, 2024 - 01:33

# राजकीय एक्स्पर्ट ऐवजी सामान्य लोकांची मते, विचार, भावना जाणून घ्यायच्या असल्याने आणि स्वताच्या व्यक्त करायच्या असल्याने धागा मुद्दाम ललित लेखनात काढला आहे
--------------------------------+

आज ऑफिस मधून घरी परत येताना रस्त्यात प्रचाराची मिरवणूक लागली. ट्रक टेम्पो, जीप कार, वाहनांचा ताफा होता. नेता सुद्धा तितकाच मोठा होता. पक्ष कुठला ते महत्त्वाचा नाही. हल्ली मला सगळे सारखेच वाटतात. एकाच माळेचे शिरोमणी.

मोठमोठाले स्पीकर ध्वनी प्रदुषण करत होते. रस्ताभर फटाक्यांचा धूर वायू प्रदूषण करत होता. एकंदरीत शक्ती प्रदर्शन चालू होते.

या सगळ्यात माझी रिक्षा अडकली होती. ती प्रचाराची नव्हती. तिचे मीटर जागच्या जागी पळत होते. ज्याचे पैसे मला भरायचे होते. त्यामुळे अजून चीडचीड होत होती.

रस्त्याने जाताना गणपतीच्या मिरवणुकीमुळे असे अडकलो तर चीड चीड होणे दूर, मस्तपैकी थांबून एन्जॉय करतो ते वातावरण. मी स्वतः नास्तिक असलो तरी लोकं मोठमोठ्याने गणपती बाप्पा मोरया आणि एक दोन तीन चार गणपतीचा जयजयकार अश्या घोषणा देतात त्या ऐकायला आवडतात. त्यांचा उत्साह आवडतो. पण इथे त्या अमुक तमुक नेत्याच्या नावाने घोषणा देणारे कार्यकर्ते बघून या मेल्यांना इतका काय याचा पुळका म्हणून त्यांचा राग येत होता. कारण आदर असा हल्ली कोणाबद्दलच वाटेनासा झाला आहे.

दिवाळीतल्या फटाक्यांचा आवाज सुद्धा सणाचे उत्सवाचे वातावरण म्हणून आवडतो, इंडिया क्रिकेट मॅच जिंकताच दूरहून कानावर पडणारा फटाक्यांचा आवाज सुखावतो. पण इथे फटाके लावलेले बघून तोंडात शिव्या येत होत्या.

या आधी मात्र असे नव्हते. निवडणूक जवळ आली की ते प्रचाराच्या रणधुमाळीचे वातावरण आवडायचे. टीव्ही वरच्या चर्चा आवडीनुसार झेपेल तितके ऐकल्या जायच्या. आपल्या कुवतीनुसार जवळच्या मित्रासोबत चर्चा केली जायची.

पण एकूणच गेले काही वर्षात महाराष्ट्राच्या राजकारणाचा दर्जा ईतका खालावला आहे की सारे सोडूनच दिले आहे. इच्छाच उरली नाही.

पण म्हणून काही मत देणे चुकले नाही. ते द्यायचे आहेच. द्यावे लागणारच.

मी काही कुठल्या राजकीय पक्षाचा समर्थक नाही. माझे मत कधीच कुठल्या पक्षाला फिक्स नसते. त्या त्या वेळेस निर्णय घेतो. आतापर्यंत पाच राजकीय पक्ष आणि एकदा अपक्ष असे त्या त्या वेळेस जो योग्य वाटेल त्या सर्वाँना संधी दिली आहे. पण यावेळेस खरेच काही सुचत नाहीये.

यंदा कोणाला मत द्यावे हा निर्णय का घेता येत नाही याची प्रामुख्याने दोन कारणे आहेत.

१) कोणाला मत द्यावे हा निर्णय घेण्यासाठी साधारण मी असे करतो - माहिती गोळा करतो आणि आपल्या कुवतीनुसार त्याचे विश्लेषण करतो. किंवा दोनचार ठिकाणचे एक्स्पर्ट विश्लेषण ऐकतो. आता ते एक्स्पर्ट हे रिपोर्टर, सेलिब्रिटी, माझे मित्र कोणीही असू शकतील.

सध्या प्रॉब्लेम असा झाला आहे की कोणीच एक्स्पर्ट निःपक्ष आणि प्रामाणिक वाटत नाही. सगळे पेड किंवा अजेंडा असलेले वाटतात. किंवा मित्रही स्वतःच गोंधळलेले वाटतात.

दुसरे म्हणजे माहितीचा सोर्स सुद्धा इंटरनेट वर काय खरा काय खोटा याची काहीच कल्पना नसते. म्हणजे हे मी केवळ व्हॉटसअप फॉरवर्ड बद्दल बोलत नाही, तर कुठलीही वेबसाईट हल्ली विश्वासार्ह वाटत नाही.

२) दुसरे कारण महाराष्ट्र स्पेशल आहे. इतके पक्ष आणि इतका गोंधळ झाला आहे. आणि निवडून आल्यावर हे लोकं आणखी काय गोंधळ घालणार आहेत याबाबत जराही सुस्पष्टता नाही. सोप्या भाषेत सांगायचे झाल्यास आपले मत अखेर कुठल्या पक्षासोबत किंवा गठबंधनासोबत जाईल याची काहीच खात्री नाही.

पक्ष बघून नाही तर उमेदवार बघून मत द्या हे तत्व नगरसेवक निवडणुकीत बरे वाटते आणि पाळता सुद्धा येते कारण साधारण त्या व्यक्तीची माहिती सुद्धा असते. इथे आपल्या विधानसभा विभागातील उमेदवारांची माहिती घेणे म्हणजे पुन्हा सोर्स कुठले हा प्रश्न आलाच. त्यापेक्षा पक्षांचीच माहिती घेणे सोयीचे पडते आणि योग्य ठरते.

असो,
नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत नोटा विचार डोक्यात घोळत होता. ऐन क्षणाला विचार बदलून एका पक्षाला मत देऊन आलो.

पण ती लोकसभा होती. डोक्यात तितका गोंधळ नव्हता. महाराष्ट्राच्या राजकारणाबाबत मात्र विचार करू तितके डोके भंजाळून जाईल अशी परिस्थिती आहे.

तर काय करावे..
नोटासाठी जावे का?

नोटा वापरू नका असेही काही म्हणतात.
गलिच्छ राजकारणाचा कितीही वीट आला तरी दगडापेक्षा वीट मऊ म्हणत कोणालातरी निवडावे.
पण जर कोण दगड आणि कोण वीट हा निर्णय सुद्धा घेता येत नसेल तर अटक मटक चवळी चटक न करता सरळ नोटा दाबावे का?

नोटा - NOTA - None of the above

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

<पण यावर इतके समरसून चर्चा करण्यासारखे काय आहे हे अजूनही समजले नाही.> तुमचं मराठी भाषेवर आणि मराठी साहित्यावर प्रेम नाही ना? त्यामुळे हे तुम्हांला समजणार नाही. नका त्रास करून घेऊ. रोहितला मुलगा झाला म्हणून पेढे वाटा.

आदर्णीय सर , तुमचे धागे आणि प्रतिसाद वाचायचं मी थांबवलंच होतं. पण ईडी धाग्यावरून तुम्ही मला ट्रोल केलंत आणि जे तारे तोडलेत, त्यामुळे मी प्रोव्होक झालो. तुमचा उद्देश सफल झाला.

Lol
आज मी बुलेट ट्रेन वरून 25 किमी प्रवास केला. पूर्ण अंतर मोठ्या गिअरमध्ये पायडल मारत चालवल्याने बॅटरी अजून अर्ध्याच्या वर शिल्लक आहे.
तरी पण रिस्क नको म्हणून ट्रेन उचलून बिल्डिंग मध्ये आणली आणि चार्जिंग ला लावली आहे.

पण ईडी धाग्यावरून तुम्ही मला ट्रोल केलंत
>>>>

हे कधी झाले संदर्भ द्या.
नेमकी कुठली पोस्ट जी तुम्हाला ट्रोळ करून गेली

अरे कसला खेळ..
खेळ तर तुम्ही खेळता..
मला तुम्ही माझे वाचता, वाचत नाही याच्याशी काही घेणे देणे नाही. तुम्हीच ते आपले मानभावीपणे सांगत असता.
मी ईडी विरोधात लिहिणार्यावर लिहिले. त्यात तुम्ही सुद्धा एक आला असाल तर ते वैयक्तिक तुम्हाला ट्रोल कसे झाले.
तुम्ही काय आहात, कोण आहात, काय करता याच्याशी मला काही घेणे देणे नाही.
तुम्हीच काय कोणाशीही मला घेणे देणे नसते. मी माझ्या आवडीचे वाचतो. पटते तिथे +७८६ देतो आणि नाही पटत ते मुद्दे खोडतो.
आयडी कोण आहे लिहिणारा कोण याच्याशी मला काही घेणे देणे नसते.
माझे कोण वाचते कोण नाही याच्याशी सुद्धा मला काही घेणे देणे नसते. शंभर प्रतिसाद झाले की मला काही पैसे मिळत नाहीत.
येस आनंद मिळतो, पण तो तर मला लिहितानाच फार मिळतो. डोक्यातले विचार कागदावर उतरवून प्रकाशित करणे यासारखा दुसरा आनंद नाही. इथे कोणी वाचले नाही तर मी दुसरे संकेत स्थळ शोधेल. इतके सोपे आहे हे.
आणि कोणाचे अटेंशन.. तुमचे??.. काय संबंध.. इथे वर ज्या पोस्ट आल्यात त्यातील काहींनी आपले खरे नाव लिहिले नाही तर कोणी आपला खरा फोटो टाकला नाही.. टाकला तरी ती व्यक्ती प्रत्यक्ष आयुष्यात काय कशी आहे हे मला बिलकुल माहीत नाही तर कोणाचे अटेंशन मिळवायला जाऊ मी.. आता मी जे जसे लिहितो त्यात बाय डिफॉल्ट मला काही अटेंशन मिळत असेल तर तो काही माझा प्रॉब्लेम नाही. फार तर एवढी मोठी पोस्ट मन लाऊन वाचली याबद्दल मी तुमचे आभार मानू शकतो.

पण थांबा.. पोस्ट अजून संपली नाही. वर गरज नसताना तुम्ही रोहीत शर्मा वगैरे उल्लेख करणे हसावे की रडावे समजत नाही.
हो माझा आवडता खेळाडू आहे तो.. क्रिकेट माझे पहिले प्रेम आहे. इथल्या तिथल्या मिळून हजार पोस्ट मी क्रिकेटवर लिहितो. त्यातल्या शंभर रोहितच्या कौतुकाच्या लिहिल्या तर त्याचे इथे काय? रोहीत शर्माला मुलगा झाला वगैरे हे उल्लेख अगदीच अनावश्यक नाहीत का इथे? पर्सनल लाईफ आहे त्याची. स्कोअर सेटल करायला त्याचा वापर का करता? आणि स्कोअर तरी कसला सेटल करता आहात.. ते युद्ध देखील एकतर्फीच पुकारले आहे.. बस आपल्याच मनाचे समाधान.. आणि पुन्हा वर आपणच बोलायला मोकळे की तुलाच धाग्याला टीआरपी हवे असते ते मिळवून देतो. प्रत्यक्षात चांगला चालणारा धागा राजकारण धाग्यासारखा गोंधळ घालून बिघडावायचा हाच हेतू असतो हे कळत नाही का.. कारण इथे लोकं येतील आणि राजकारण्यांना शिव्या घालतील.. आणि आपला अजेंडा तर अश्याच काही राजकारण्यांचे गुणगान गाणे असतो.. मग पाडा हा धागा..
कम ऑन गाईज.. जगा आणि जगू द्या.. मलाही आणि हो, रोहीत शर्मालाही

क्रमशः

ललितलेखन हा एक विशिष्ट साहित्यप्रकार आहे. जशा कथा, कविता, प्रवासवर्णन, विनोदी लेखन , तसं ललितलेखन. >>>> अति झाले नी हसू आले, त्यासारखे हे लेखन सुद्धा विनोदाचाच एक प्रकार ( कुणाला कितीही असह्य्य होत असेल तरीही ), म्हणून हा धागा ललितलेखन या ग्रुपातच राहू द्यावा ही नम्र विनंती.

C + O 2 = CO2
हे बरोबर? मान्य आहे?
मग बिरबल आणि अलेक्झांडर यांच्या युद्धात बाजीराव पेशवेंनी मध्यस्थी केली.
हे कबूल करायला अडचण आहे का?

यावेळी मतदान करायला जाण्याचे एकमेव मोटीवेशन म्हणजे त्यासाठी माहेरी जाणार आहे.
काल रात्रीच निघणार होतो कारण सकाळी लवकर उठायला नको. दहा ते पाच उन्हात मी कधीच प्रवास करत नाही. त्यामुळे गेल्यावेळी संध्याकाळी निघालो होतो आणि अखेर पर्यंत वेळेत पोहोचतो की नाही याचे टेन्शन होते. यावेळी मुलांना सुद्धा सोबत न्यायचे असल्याने आदल्या रात्रीच निघणार होतो. पण काल अचानक उद्भवलेल्या ऑफिस पार्टी मुळे उशीर झाला. दगडापेक्षा वीट मऊ म्हणत आपण निवडून देणारे नेते पाच वर्षे आपल्याला पिळून खाणार आहेत तर त्यांच्यासाठी आपण का पार्टीतले फुकट खाणे सोडावे म्हटले.

पण वर म्हटले तसे, यावेळी मतदान करायला जाण्याचे एकमेव मोटीवेशन म्हणजे त्यासाठी माहेरी जाणार आहे...
त्यामुळे आज सुट्टी असूनही सकाळी लवकर उठलो आहे. तूर्तास तयारी चालू आहे. मनाची सुद्धा Happy

दगडापेक्षा वीट मऊ म्हणत आपण निवडून देणारे नेते पाच वर्षे आपल्याला पिळून खाणार आहेत तर त्यांच्यासाठी आपण का पार्टीतले फुकट खाणे सोडावे म्हटले.>>>अगदी अगदी. मी इथे सोसायटीतील उत्साही लोकांपासून वाचण्यासाठी पिक्चरला जाऊन बसणार आहे. मतदान करणे म्हणजे "मी च्यु आहे" चे बटण दाबणे. आज "When Comedy was the king" किंवा "महाराष्ट्राची हास्यजत्रा"चा शेवटचा एपिसोड.
अरे नाही. इतके निराश व्हायचे कारण नाही. पिक्चर अभी बाकी है. लगे राहो.

मतदान करणे म्हणजे "मी च्यु आहे" चे बटण दाबणे
>>>>

केशवकूल अगदी.. याच भावना आहेत.
तुम्ही सगळे मिळून आम्हाला मुर्खात काढत आहात हे आम्हाला माहीत आहे.. पण आमच्याकडे पर्याय काय आहे? हतबल भावना..

तरी बरे अजून कोणी असा उलटप्रश्न नाही केला की मग तुम्ही उतरा सक्रिय राजकारणात आणि स्वतः उभे राहा निवडणुकीला..

तावडेंचे पाच कोटी जप्त झाले का ?
थोडे माझ्यापर्यंत येतील या आशेने रात्रभर झोपलो नाही, पण पैसे वाटप करायला कुणीही आले नाही.

मी आता काय करतो कि बोटाला शाई लावून ठेवतो. लोक सारखे विचारतात, "केले की नाही मतदान?" त्यांना बोट दाखवून चूप करायचे नाहीतर देश, लोकशाही, कर्तव्य इत्यादींची रेडीमेड लेक्चरे ऐकावी लागतील.

केशवकूल हो Proud
आणि ऑफिसवाले सुद्धा बोट चेक करून बघतात की याने सुट्टी घेऊन केले काय. Proud
मतदान केले नाही तर जुनाच फोटो स्टेटसवर वायरल करायचा असा विचार होता. केस साधारण तसेच आहेत आजही..

मी सुद्धा अखेरीस अत्यंत नाट्यमय पद्धतीने मतदान केले...
आणि अखेर नोटामार्गे न जाता एका जिवंत आणि धडधाकट उमेदवाराला मत देऊन आलो.

पण बटणाचा आवाज नाही आला...
आधी यायचा ना?

दिवस माझाही खाऊन पिऊन लोळून छानच गेला.
माहेरी जे गेलेलो Happy

व्हॉट्सअँप वर जोक फिरतात..
मतदान करायला जा.. कोणी जुनी मैत्रीण भेटेल या आशयाचे..
तसेही झाले Happy

पण बटणाचा आवाज नाही आला...
आधी यायचा ना?......

यावेळीही येत होता, पण बटण दाबून लाल दिवा लागल्यावर VVPAT मध्ये स्लीप प्रिंट होऊन ती आत पडण्याच्या वेळेस येत होता. त्यामुळे आमच्या इथले कर्मचारी मतदारांना सांगत होते, बीप वाजेपर्यंत मतदान कक्षातच थांबा.

विक्षिप्त मुलगा..
आमच्याकडे माझ्या आणि आईच्या वेळेस सुद्धा आलाच नाही.. तिने पुन्हा एकदा बटण दाबले.. आणि मी तो माणूस हाकलेपर्यंत थांबलो होतो. पण आवाज आलाच नाही.

पण आवाज आलाच नाही.

“Is there any point to which you would wish to draw my attention?'
'To the curious incident of the dog in the night-time.'
'The dog did nothing in the night-time.'
'That was the curious incident,' remarked Sherlock Holmes.”
― Arthur Conan Doyle, Silver Blaze

>>>>व्हॉट्सअँप वर जोक फिरतात..
मतदान करायला जा.. कोणी जुनी मैत्रीण भेटेल या आशयाचे..>>>> यावरून एक्स वर पाहिलेली एक क्लिप आठवली.
एक माणूस मतदान करायला येतो. त्याचे ओळखपत्र तपासणी झाल्यानंतर तो संबंधित कर्मचाऱ्याला विचारतो माझी काकी मतदानाला येऊन गेली का? ती त्याला काकीचे नाव विचारते. तो नाव सांगतो. ती मतदार यादीत तपासते व त्याला सांगते ती आधीच येऊन गेली. तो म्हणतो या वेळेला तरी भेट झाली असती लवकर आलो असतो तर. यावर संबंधित कर्मचारी विचारते घरी भेटत नाही का? तो मतदार उत्तरतो, तिला जाऊन पाच वर्षे झाली. Happy

दसा Lol

माझ्या कामवाल्या मावशीने मत ना तर "लाडक्या भावाला " ना तर "ज्यांच्या कडून पैसे आले " त्यानां दिलं.

तिच्या घरच्यांनी सांगितलं त्या वेगळ्याच निशाणीला दिलं.

उत्तम केले.
निवडणुकीच्या तोंडावर जी खैरात लुटवली जाते तिला काही अर्थ नसतो.
उलट ती गुंतवणूक मोठ्या प्रमाणात वसूल करायची शक्यता वाढते Happy

Pages