वाहनांच्या मागे लिहिलेली वाक्ये

Submitted by webmaster on 11 August, 2008 - 01:06

ट्रक, बस, रिक्षा इत्यादी वाहनांच्या मागे लिहिलेली वाक्ये.

या अगोदरचं हितगुज इथे वाचा.

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

In GOD We Trust हे ऑफिशिअल अमेरिकन ब्रीदवाक्य आहे. करन्सीवरही छापलेलं असतं.
तो Ceremonial deism आहे - धार्मिक नव्हे, तर सांस्कृतिक संदर्भ.

(चूक की बरोबर हा निराळा भाग, पण आहे खरं. तशीही ब्रीदवाक्यं फार सीरियसली घ्यायची नसतात, 'सत्यमेव जयते' घेतो का आपण मनाला लावून? Proud )

'सत्यमेव जयते' घेतो का आपण मनाला लावून? >> हो ना. मुळात या वाक्यातच व्याकरण चुकलेलं आहे. जि - जय् हा १ प.प. धातु असल्यामुळे त्याचं रूप 'जयति' असं होईल, जयते नाही. ज्या मुण्डकोपनिषदातून हे घेतलं आहे, त्यातही बहुधा सत्यमेव जयति नानृतम् .. सत्येन पन्था विततो देवयान: - असंच आहे. आता लोकांनी रिव्हर्स इंजिनियरिंग करून मुण्डकोपनिषदातही 'सत्यमेव जयते नानृतम्' असा पाठभेद केला आहे. ब्रीदच चुकलेलं असल्यामुळे लोकसत्ताला कशाला नावं ठेवायची म्हणतो मी.

Ceremonial deism >> हे माहीत नव्हतं. खरं म्हणजे आता नव्या काळाला अनुसरून ह्यात बदल व्हायला हवा.

आता लोकांनी रिव्हर्स इंजिनियरिंग करून मुण्डकोपनिषदातही 'सत्यमेव जयते नानृतम्' असा पाठभेद केला आहे. >> अरे ते आर्ष रूप आहे, सत्यमेव जयते. ऋषी मुनींनी वापरले तर होते तसे आर्ष रूप ना.. बहुदा छंदात बसण्यासाठी केले असावे. ह्या ' जि ' धातू लाच वी आणि परा prefix लागले तर तो आत्मनेपदी चालेल, विपराभ्यां जेः I

आज एका रिक्षाच्या मागे लिहिलेलं
"गोत्यात आणणाऱ्या नात्यांना
पोत्यात घालून हाणलं पाहीजे"

हो लंपन, मी पण आर्ष रूप समजत होतो. पण शोध घेतल्यावर 'जयति' असाच पाठ दिसला. ही गीताप्रेस गोरखपूरची आवृत्ती, त्यात पान ९४ पहा.

ह्या ' जि ' धातू लाच वि आणि परा prefix लागले तर तो आत्मनेपदी चालेल >> बरोबर.

अतुल , फोटो Lol
सामो , हल्ली रोमँटिक लिहीत आहेस, बघतेय हां Wink Happy

अस्मिता Happy सत्य आहे. बातही कुछ ऐसी है!

Lol

मी एकदा कारवारहून येत असताना माझ्या पुढे असलेल्या जीपच्या मागच्या काचेवर फक्त एवढेच लिहिले होते

हवेत गारठा

हवेत गारठा >> Lol
मला कुठल्याच धाग्यावरचे फोटो दिसत नाहीयेत..

Lol रिक्षा जेव्हा अचानक वळते तेव्हा मागच्यांना धडकी भरते.

काल एक स्टिकर बघितला एका गाडीच्या मागे.
Don't read this. Concentrate on the drive

हे ट्रक च्या मागे वाचले इतक्यात :

दो बच्चे हैं मीठी खीर
दो से ज़्यादा बवासीर

Proud

(फोटो सापडत नाही आहे आता, काढला होता नक्की)
*बवासीर = मूळव्याध

हे ट्रक च्या मागे वाचले इतक्यात :

दो बच्चे हैं मीठी खीर
दो से ज़्यादा बवासीर>>>>
हे पंचायत नावाच्या सिरीज मधे आलेले वाक्य आहे. Happy

हि रिक्षा शिवाजीनगर परिसरात मी काही महिन्यांपूर्वी पाहिली होती. पण फोटो नाही काढता आला. काल फेसबुकवर का कुठे कुणीतरी फोटो पोस्ट केलेला पाहिला:

funny_quote_behind_auto.jpg

Pages