# राजकीय एक्स्पर्ट ऐवजी सामान्य लोकांची मते, विचार, भावना जाणून घ्यायच्या असल्याने आणि स्वताच्या व्यक्त करायच्या असल्याने धागा मुद्दाम ललित लेखनात काढला आहे
--------------------------------+
आज ऑफिस मधून घरी परत येताना रस्त्यात प्रचाराची मिरवणूक लागली. ट्रक टेम्पो, जीप कार, वाहनांचा ताफा होता. नेता सुद्धा तितकाच मोठा होता. पक्ष कुठला ते महत्त्वाचा नाही. हल्ली मला सगळे सारखेच वाटतात. एकाच माळेचे शिरोमणी.
मोठमोठाले स्पीकर ध्वनी प्रदुषण करत होते. रस्ताभर फटाक्यांचा धूर वायू प्रदूषण करत होता. एकंदरीत शक्ती प्रदर्शन चालू होते.
या सगळ्यात माझी रिक्षा अडकली होती. ती प्रचाराची नव्हती. तिचे मीटर जागच्या जागी पळत होते. ज्याचे पैसे मला भरायचे होते. त्यामुळे अजून चीडचीड होत होती.
रस्त्याने जाताना गणपतीच्या मिरवणुकीमुळे असे अडकलो तर चीड चीड होणे दूर, मस्तपैकी थांबून एन्जॉय करतो ते वातावरण. मी स्वतः नास्तिक असलो तरी लोकं मोठमोठ्याने गणपती बाप्पा मोरया आणि एक दोन तीन चार गणपतीचा जयजयकार अश्या घोषणा देतात त्या ऐकायला आवडतात. त्यांचा उत्साह आवडतो. पण इथे त्या अमुक तमुक नेत्याच्या नावाने घोषणा देणारे कार्यकर्ते बघून या मेल्यांना इतका काय याचा पुळका म्हणून त्यांचा राग येत होता. कारण आदर असा हल्ली कोणाबद्दलच वाटेनासा झाला आहे.
दिवाळीतल्या फटाक्यांचा आवाज सुद्धा सणाचे उत्सवाचे वातावरण म्हणून आवडतो, इंडिया क्रिकेट मॅच जिंकताच दूरहून कानावर पडणारा फटाक्यांचा आवाज सुखावतो. पण इथे फटाके लावलेले बघून तोंडात शिव्या येत होत्या.
या आधी मात्र असे नव्हते. निवडणूक जवळ आली की ते प्रचाराच्या रणधुमाळीचे वातावरण आवडायचे. टीव्ही वरच्या चर्चा आवडीनुसार झेपेल तितके ऐकल्या जायच्या. आपल्या कुवतीनुसार जवळच्या मित्रासोबत चर्चा केली जायची.
पण एकूणच गेले काही वर्षात महाराष्ट्राच्या राजकारणाचा दर्जा ईतका खालावला आहे की सारे सोडूनच दिले आहे. इच्छाच उरली नाही.
पण म्हणून काही मत देणे चुकले नाही. ते द्यायचे आहेच. द्यावे लागणारच.
मी काही कुठल्या राजकीय पक्षाचा समर्थक नाही. माझे मत कधीच कुठल्या पक्षाला फिक्स नसते. त्या त्या वेळेस निर्णय घेतो. आतापर्यंत पाच राजकीय पक्ष आणि एकदा अपक्ष असे त्या त्या वेळेस जो योग्य वाटेल त्या सर्वाँना संधी दिली आहे. पण यावेळेस खरेच काही सुचत नाहीये.
यंदा कोणाला मत द्यावे हा निर्णय का घेता येत नाही याची प्रामुख्याने दोन कारणे आहेत.
१) कोणाला मत द्यावे हा निर्णय घेण्यासाठी साधारण मी असे करतो - माहिती गोळा करतो आणि आपल्या कुवतीनुसार त्याचे विश्लेषण करतो. किंवा दोनचार ठिकाणचे एक्स्पर्ट विश्लेषण ऐकतो. आता ते एक्स्पर्ट हे रिपोर्टर, सेलिब्रिटी, माझे मित्र कोणीही असू शकतील.
सध्या प्रॉब्लेम असा झाला आहे की कोणीच एक्स्पर्ट निःपक्ष आणि प्रामाणिक वाटत नाही. सगळे पेड किंवा अजेंडा असलेले वाटतात. किंवा मित्रही स्वतःच गोंधळलेले वाटतात.
दुसरे म्हणजे माहितीचा सोर्स सुद्धा इंटरनेट वर काय खरा काय खोटा याची काहीच कल्पना नसते. म्हणजे हे मी केवळ व्हॉटसअप फॉरवर्ड बद्दल बोलत नाही, तर कुठलीही वेबसाईट हल्ली विश्वासार्ह वाटत नाही.
२) दुसरे कारण महाराष्ट्र स्पेशल आहे. इतके पक्ष आणि इतका गोंधळ झाला आहे. आणि निवडून आल्यावर हे लोकं आणखी काय गोंधळ घालणार आहेत याबाबत जराही सुस्पष्टता नाही. सोप्या भाषेत सांगायचे झाल्यास आपले मत अखेर कुठल्या पक्षासोबत किंवा गठबंधनासोबत जाईल याची काहीच खात्री नाही.
पक्ष बघून नाही तर उमेदवार बघून मत द्या हे तत्व नगरसेवक निवडणुकीत बरे वाटते आणि पाळता सुद्धा येते कारण साधारण त्या व्यक्तीची माहिती सुद्धा असते. इथे आपल्या विधानसभा विभागातील उमेदवारांची माहिती घेणे म्हणजे पुन्हा सोर्स कुठले हा प्रश्न आलाच. त्यापेक्षा पक्षांचीच माहिती घेणे सोयीचे पडते आणि योग्य ठरते.
असो,
नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत नोटा विचार डोक्यात घोळत होता. ऐन क्षणाला विचार बदलून एका पक्षाला मत देऊन आलो.
पण ती लोकसभा होती. डोक्यात तितका गोंधळ नव्हता. महाराष्ट्राच्या राजकारणाबाबत मात्र विचार करू तितके डोके भंजाळून जाईल अशी परिस्थिती आहे.
तर काय करावे..
नोटासाठी जावे का?
नोटा वापरू नका असेही काही म्हणतात.
गलिच्छ राजकारणाचा कितीही वीट आला तरी दगडापेक्षा वीट मऊ म्हणत कोणालातरी निवडावे.
पण जर कोण दगड आणि कोण वीट हा निर्णय सुद्धा घेता येत नसेल तर अटक मटक चवळी चटक न करता सरळ नोटा दाबावे का?
नोटा - NOTA - None of the above
ललित लेख छान आहे.
ललित लेख छान आहे.
सर, तुम्ही का निवडणुकीला उभे राहत नाही? इतर सगळ्या उमेदवारांची डिपॉझिट जप्त होईल
आणि विधानसभेत तुम्ही बोलायला लागलात की सभापतींसकट सगळे आमदार डोकं गच्चं धरून पळायला लागतील.
आणि माझ्यापेक्षा जास्त मी मी करणारा आणि फेकणारा , यू टर्न घेणारा हा कोण? म्हणून आदर्णीय मोदी हिमालयात निघून जातील.
हो सर! नोटाला वोट द्यायचे आहे
हो सर! नोटाला वोट द्यायचे आहे. अजून थोडा वेळ आहे. कोण किती नोटा देणार आहे ते पाहून मतदान करणार. अजून ताणून धरले तर भाव वाढेल. काय बोलताय.
एकूणच गेले काही वर्षात
एकूणच गेले काही वर्षात महाराष्ट्राच्या राजकारणाचा दर्जा ईतका खालावला आहे की सारे सोडूनच दिले आहे.+१००
लेखातल्या भावना समजू शकतात. जवळपास सगळ्याच सामान्य जनतेची (भक्तांना मी सामान्य समजत nahi) ही अवस्था आहे.
महाराष्ट्रातील
महाराष्ट्रातील राजकारणाबद्दलच्या शब्दाशब्दाला अनुमोदन.
इतका सावळागोंधळ घातलाय या लोकांनी... सत्तेसाठी काहीही चालू आहे.
आमच्याकडे पर्याय नाही. उदय सामंतच निवडून येतील गेल्या वेळेपेक्षा कमी मताने का होईना पण तेच येणार. कारण समोर दुसरा सक्षम उमेदवारच नाहीये. बाळ मानेंनी उबाठात प्रवेश करून काय साध्य केलं त्यांचं त्यांनाच माहीत.
नोटा मिळाल्या तर नोटा नको.
नोटा मिळाल्या तर नोटा नको.
निधी, शर्मिला.. हो ना. ज्या
निधी, शर्मिला.. हो ना. ज्या उमेदवाराची प्रचारफेरी मिरवणूक चालू होती तो फार फेमस होता. पण जेव्हा घोषणा देताना त्याची निशाणी सांगितलेली तेव्हा मला समजले तो सध्या कुठल्या पक्षात आहे. आणि तरीही त्याच्या वाटेवर त्याला ओवाळायला दर सोसायटी बाहेर बायकांचा जमा केलेला फौजफाटा उभा होता.
हे बायकांनी नेत्यांना ओवाळण्याची पद्धत आधीपासून मला खटकते. आता तर ते दृश्य डोक्यात गेले.
* एकूणच गेले काही वर्षात
* एकूणच गेले काही वर्षात महाराष्ट्राच्या राजकारणाचा दर्जा इतका खालावला आहे की सारे सोडूनच दिले आहे. >>>> +१००००
ललित लेख छान आहे.
ललित लेख छान आहे.
>>>>
धन्यवाद भरत
राजकीय एक्स्पर्ट ऐवजी सामान्य लोकांची मते, विचार, भावना जाणून घ्यायच्या असल्याने धागा मुद्दाम ललित लेखनात काढला
हो. फारच ललित आहे लेख.
हो. फारच ललित आहे लेख.
शाहरूख खान साहेबांचा पक्ष
शाहरूख खान साहेबांचा पक्ष नाही का?
दक्षिणेत विजयकुमार थलपती ने पक्ष काढला तर ट्रॅफिक जाम झाले होते. दहा लाखांपेक्षा जास्त भाविक आले होते.
कमल हसन, रजनीकांत, चिरंजीवी अशा सर्वांचे पक्ष आहेत.
देव आनंदने पण एकदा नॅशनल पार्टी ऑफ इंडिया असा एक पक्ष काढला होता.
वि आ बुवा किंवा रमेश मंत्री यांनी संभाव्य मंत्रीमंडळ सुद्धा सांगितले होते.
देव आनंद - पंतप्रधान
अमिताभ बच्चन - गृहमंत्री (अकेला ही काफी है?
दारा सिंग- संरक्षण मंत्री
सौंदर्य कल्याण मंत्री - हेमामालिनी
पती निगा व रखरखाव मंत्री - रेखा
वस्त्रोद्योगमंत्री - झीनत अमान
अल्पबचत मंत्री - कमाल अमरोही
खेलमंत्री - धर्मेन्द्र ( प्रोढ मताधिकार असलेल्या बालकांसाठीच)
महिला संरक्षण व विकास - आदरणीय रणजीत
सांस्कृतिक मंत्री - राज कपूर (सत्यम शिवम सुंदरम)
समाजकल्याण - प्राण
पोलीस दल मंत्री - इफ्तिखार
रघू आचार्य!
रघू आचार्य!
"नोटा को मत दो" - काय पाहिजे
"नोटा को मत दो" - काय पाहिजे तो अर्थ काढता येईल
@ भरत, तुम्ही प्लीज पर्सनली
@ भरत, तुम्ही प्लीज पर्सनली घेऊ नका.
धागा ललित लेखनात आहे कारण या राजकारणी नेत्यांनी कितीही कोलांट्या उड्या मारल्या तरी त्यांचा झेंडा हातात घेतलेल्यांना त्यासोबत जावेच लागते, त्यांच्या प्रत्येक कृतीचे समर्थन करावेच लागते. तीच तीच चर्चा वाद विवाद दोषारोप इथे नको इतकीच इच्छा आहे.
अन्यथा कुठल्याही पक्षाच्या निष्ठावंताना नावे ठेवायचा हेतू नाही. ते त्यांचे मत आहे आणि त्या मताचा आदर आहे.
नोटा को मत दो" - काय पाहिजे
नोटा को मत दो" - काय पाहिजे तो अर्थ काढता येईल
>>>
हपा
असाच एक विनोद होता.
राहुल गांधी यांचे लग्न होत नाही याचे कारण सोनिया गांधी आहेत.
कारण त्या लोकांना म्हणतात, हमे बहुमत दो
(No subject)
नोटा म्हणजे चलनी नाहीत तर
नोटा म्हणजे चलनी नाहीत तर मतदान पत्रिकेतील नोटा वर शिक्का मारुन काहीही उपयोग नाही. ती मते ग्राह्य धरत नाहीत. ९९ नोटा व १ उमेदबार मत असे असेल तर उमेदवार जिंकतो, निवडणुक रद्द होत नाही.
राजकारणात आता कोणीच धुतल्या तांदळाचा न उरल्याने सारासार विचार करुन त्यातल्याच कोणालातरी मत द्यावे. लोकशाहीतल्या नागरिकांचे मतदान हे आद्य कर्तव्य आहे.
नोटा म्हणजे चलनी नाहीत तर
नोटा म्हणजे चलनी नाहीत तर मतदान पत्रिकेतील नोटा वर शिक्का मारुन काहीही उपयोग नाही. ती मते ग्राह्य धरत नाहीत. ९९ नोटा व १ उमेदबार मत असे असेल तर उमेदवार जिंकतो, निवडणुक रद्द होत नाही. <<
मला वाटतं, ही योग्य वस्तुस्थिती नसावी.
जाणकार प्रकाश टाकतीलंच..
मायबोलीवर "लाईक" द्यायची सोय
मायबोलीवर "लाईक" द्यायची सोय असती तर भरत यांच्या पहिल्या प्रतिसादाला लाईक श्रेणी दिली असती.
<< सध्या प्रॉब्लेम असा झाला आहे की कोणीच एक्स्पर्ट निःपक्ष आणि प्रामाणिक वाटत नाही. >>
सर, आंतरजालावरील अनोळखी लोक तुम्हाला निष्पक्ष आणि प्रामाणिक वाटतात का? किती हा निरागसपणा?
निरु, मलाही माहिती हवीय, वर
निरु, मलाही माहिती हवीय, वर लिहिलेय ते तसेच वाचनात आलेय.
https://www.business-standard.com/amp/elections/lok-sabha-election/lok-s...
How does Nota impact the elections?
While it is imperative for secrecy and democratic expression that the Nota option is available on electronic voting machines, its significance in the final tally remains limited.
A Nota vote represents a neutral stance without any numerical value in determining the winning total. It is crucial to distinguish between a neutral vote and a negative vote. The court's rationale behind Nota was that it would incentivise political parties to nominate better candidates. As more voters expressed their disapproval through Nota, parties would be compelled to field candidates with integrity, thereby effecting systemic change reflective of the people's will.
Does the NOTA vote hold weight in the final count?
Nota, or the ‘none of the above’ option in Indian elections, does not carry direct electoral significance. Even if it garners the most votes, the candidate with the most valid votes, even if just one, will still be declared the winner.
Since the introduction of NOTA, extensive deliberations have ensued regarding its potential electoral ramifications, rendering it a subject of heated debate. On the one hand, Nota serves as a valuable metric to gauge the level of dissatisfaction among voters, revealing the number of voters who deem none of the candidates suitable for governance
त्याच्या वाटेवर त्याला
त्याच्या वाटेवर त्याला ओवाळायला दर सोसायटी बाहेर बायकांचा जमा केलेला फौजफाटा उभा होता.
हे बायकांनी नेत्यांना ओवाळण्याची पद्धत आधीपासून मला खटकते. आता तर ते दृश्य डोक्यात गेले>>>>>>
भारतीय लोक मनाने सरंजामी आहेत. त्यांना कोणीतरी त्यांच्या डोक्यावर बसलेला हवा असतो, राजासारखा. त्या मानसिकतेतुन सालंकृत बायांनी ओवाळणे, कुंकुमतिलक लावणे, विजेत्याने तलवार उंचावुन लोकांचे अभिवादन स्विकारणे वगैरे गोष्टी घडतात.
विजयी नेते जेव्हा हवेतुन फिरतात तेव्हा त्यांच्यासाठी विमाने खोळंबतात. रस्त्यावरुन फिरतात तेव्हा ट्रफिक खोळंबतो. खरे तर ते लोकांचे प्रतिनिधी म्हणुन फिरतात, त्यांनी प्रत्येक ठिकाणी स्वतःला प्राधान्य घेणे स्वतःच बंद करुन लोकांना प्राधान्य द्यायला हवे. ह्या अपेक्षा अवास्तव वाटाव्या अशी सध्या स्थिती आहे.
On the one hand, Nota serves
On the one hand, Nota serves as a valuable metric to gauge the level of dissatisfaction among voters, revealing the number of voters who deem none of the candidates suitable for governance>>ओके. पुढे काय? मतदान म्हणजे टाईम पास.
मी असे ऐकले होते कि जपानी
मी असे ऐकले होते कि जपानी कंपन्यातून बॉस लोकांच्या डम्या ठेवलेल्या असतात. कुणाला आपल्या म्यानेजरचा राग आला असेल तर त्याने त्या डमीला जाऊन बुकलायाचे, लाथा मारायच्या, शिवीगाळ करायची. राग शमला कि मग पुन्हा काम सुरु.
नोटा म्हणजे सेम.
जाणकार प्रकाश टाकतीलंच..>>
जाणकार प्रकाश टाकतीलंच..>>
|जाणकार येतो.!|
|कोणीच जाणकार निष्पक्ष किंवा प्रामाणिक वाटत नसल्याने आल्या पावली परत जातो!|
धागा रॉक्स, जाणकार शॉक्स।
सहमत!
सहमत!
सर, हा धागा २० तारखेपर्यंत
सर, हा धागा २० तारखेपर्यंत खेचायचा आहे ना? विक्रमी संख्येने प्रतिसाद यायला हवेत ना? त्यात मी तुमची मदत करतो.
पहिला प्रश्न - ललितलेखन कशाला म्हणतात , सर?
नोटा ला मत द्यावं अस कितीही
नोटा ला मत द्यावं अस कितीही वाटलं तरी देण्यात अर्थ नाही त्यामुळे दगडापेक्षा वीट मऊ याच न्यायाने मत दिलेले बरे ,तसही शेवटी नेतेलोक जिथे सत्ता तिथे जातात. आताची युती तोडून पुन्हा दुसरी युती आली तरी नवल वाटणार नाही
भारतीय लोक मनाने सरंजामी आहेत
भारतीय लोक मनाने सरंजामी आहेत. त्यांना कोणीतरी त्यांच्या डोक्यावर बसलेला हवा असतो, राजासारखा. त्या मानसिकतेतुन सालंकृत बायांनी ओवाळणे, कुंकुमतिलक लावणे, विजेत्याने तलवार उंचावुन लोकांचे अभिवादन स्विकारणे वगैरे गोष्टी घडतात.>>>>
Le भिडे गुरुजी: आधी कुंकू लहाव!!!
नोटा ला मत द्यावं अस कितीही
नोटा ला मत द्यावं अस कितीही वाटलं तरी देण्यात अर्थ नाही
>>>>
वाटायला तर मला जवान सारखे इवीएम् मशीन पळवावे असे वाटतेय.. पण खरया आयुष्यात ते शक्य नाही. म्हणून नोटा. एक नोंदवलेला निषेध समजा. जसे ते मेणबत्ती मोर्चा असतो.
एवढी सगळी मतमतांतरे वाचल्यावर
एवढी सगळी मतमतांतरे वाचल्यावर कदाचित अजून गोंधळ उडेल.... म्हणून बेटर इव्हिल....ऐकावे जनाचे...
निषेध नोंदवायला हवाच. पण
निषेध नोंदवायला हवाच. पण केल्या निषेधाची नोंद पक्षांनी घ्यावी, विचार करावा ही अपेक्षा नोटा सुरु करताना होती त्याला हरताळ फासला जातोय. १ विरुद्ध ९९ नोटांनी विजयी झालेला उमेदवारही ओवाळुन घेणार, तलवार उगारणार. हे करणारे लोक जसे गोळा होतात तसेच नोटावाल्यांनी गोळा होऊन काळे झेंडे दाखवायचे. जाड कातडीचे गेंडे कधीतरी पाहतील या अपेक्षेने.
Pages