विधान सभा निवड्णुक २०२४

Submitted by हस्तर on 15 October, 2024 - 16:44

चला विधान सभा पड्घम वाजले
मि कोण त्याही पक्षा चा प्रवक्ता नाही

पण विरोधकान् कडे महाराष्ट्र व्यापी अस मुद्दा नाहिये

पोर्षे , बदलापुर ,शिवपुतळा एवढी धग नाही राहीली

स्पर्धा परिक्शे चे घोटाळी पण जुने झाले

लाडकी बहीण जोरात चाललैये

विरोधी पक्ष जिन्कणार तर कसे?

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

अनेक भाजप नेत्यांनीही ती पोस्ट शेअर केली होती. खासदार मेधा कुलकर्णींनी सुद्धा केली. त्यांनी डिलीट केली नाही. मेधा कुळकर्णी हुशार आहेत एस मला वाटलं होतं. असो. ह्याना निवडून देणाऱ्या कोथरुडच्या नागरिकांबद्दल मला कणव वाटते. भयंकर आमदार भेटलेत त्याना, मेधा कुळकर्णी नंतर चंपा. नंतर कोण आणून छातड्यावर टाकतील कोथरुडकरांच्या माहित नाही. ते बिचारे गपगुमान जाऊन कमळ दाबून येणार. Happy

अजित पवारांनी न्युज लाँड्रीच्या श्रीनिवासन जैनला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं की २०१९ साली राकॉ भाजप सरकार स्थापन करण्याच्या दिशेने दिल्लीत शरद पवारांच्या निवासस्थानी एक बैठक झाली. त्या बैठकीला अर्थात शरद पवार, अमित शहा, देवेंद्र फडणवीस, प्रफुल पटेल, अजित पवार आणि गौतम अदाणी हजर होते.
मग शरद पवारांनी अंग का काढून घेतलं? तुमच्यासोबत का आले नाहीत यावर ते म्हणाले शरद पवारांच्या मनात काय चाललंय हे जगात कोणीही सांगू शकत नाहीत. अगदी माझ्या काकी (प्रतिभा पवार)सुद्धा.

आमच्याकडे भाजपच्या आमदार तिसर्‍यांदा विधानसभेत जायला तयार आहेत. विरोधात शिवसेना उबाठा. दोन्ही उमेदवारांच्या प्रचारफेर्‍यांत फक्त कार्यकर्ते आले. उमेदवार नाही.

श्याम भागवतजी मार्केट पडल्याने तुम्हाला नक्की काय फायदा होतो? मविआ सत्तेत येणार त्यामुळे मार्किट पडणार असा प्रचार करायला मिळतो.

मुंबईत धारावीच्या विकासाचे काम अदानीला मिळाले. यासाठी शिंदेंची पवारांनी तीन वेळा भेट घेतली.
फोनवरून देखील चर्चा झाली. राजू परूळेकर यांनी एका मुलाखतीत सांगितले.
अदानीला काम देताना ठरलेल्या टेंडरपेक्षा एक हजार एक अधिकच्या जागेचे काम त्याच टेण्डर मधे देण्यात आले.

यासाठी वेगळे टेण्डर का नाही काढले ?
विरोधी पक्षांनी यावर गदारोळ का नाही केला ?
मुंबईसारख्या ठिकाणी एकाच टेण्डर मधे अधिकचे हजार एकर याचा अर्थ काय होतो ?

या खाऊसाठी कोण कोण एकत्र येईल निकालानंतर ?
पेंटर भाऊ पण नजर ठेवून आहेत. मुंबईत त्यांना एफ एस आय किंग म्हणूनच ओळखतात.
हे सगळे शांत आहेत हे अजब आहे.

<महाराष्टांत एफडीआय ओढायला एकच हुषार माणूस आहे. तो सत्तेत असला की झालं. > म्हणजे आता तो सत्तेत नाही का?

इतर राज्यांत जात असलेले प्रोजेक्ट्स आदर्णीय मोदींकडून गुजरातकडे कसे वळवले जातात यावर न्युजलाँड्रीचा रिपोर्ट.

जाता जाता - क्रिकेट वर्ल्ड कपमधला भारत पाक सामना, अंतिम सामना हे दोन्ही अमदावादेत झाले. त्यासाठी अन्य राज्यांतून क्रिकेट प्रेमी अमदावादला गेले. विमान कंपन्या, तिथली हॉटेलं आणि रेल्वेचा फायदा.

श्याम भागवतजी मार्केट पडल्याने तुम्हाला नक्की काय फायदा होतो?>>

बरीच रेंगाळलेली भारत चीन चर्चा एकदम सुफळ संपूर्ण होताना पाहून ट्रंप नक्की येणार असे वाटायला लागले. मग मी प्रत्येक रॅलीत पैसे मोकळे करत गेलो. १/३ पैसे मोकळे झाले. (चीन आता ४ वर्षे भारताला त्रास देणार नाही हेही नक्की. तेवढ्या वेळांत बॉर्डरची रस्त्यांची कामेही पूर्ण होत आलेली असतील.)

आता खालच्या भावात गुंतवतोय. युती आली की बाजार उसळणार हे नक्की.

युती का येईल असे मला का वाटते ते मी अगोदर लिहीलेच आहे.
शेवटी अंदाज असतात. पैसे गुंतलेले असतात. त्यामुळे भाव भावनांना तिथे काही महत्व नसते. उद्योजकांना मविआ हवी असेल असे मला तरी वाटत नाही.
असो.

अमोनियम फॉस्फेट मिळेल ८८ रूपये ५० किलो या दराने मिळेल तेव्हढे घेऊन ठेवा.
निवडणुकीनंतर १० रूपये किलोने विकून मायबोलीमधे गुंतवणूक करू शकाल.

भूलभुलैय्या सिनेमाची सकाळी साडेआठच्या शोजची सर्व तिकीटे १०० रूपयेने घेतली तर १५० रूपये दराने विकता येतील.

बरोबर आहे. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होणार हे ठरलं तेव्हा मार्केट कोसळलं आणि शिंदे गौहाटीला गेले तेव्हा उसळलं होतं.
यावरून आठवलं, लोकसभा निवडणुकींदरम्यान आदर्णीय मोदींनी आदर्णीय अमित शहांनी ४ जूनच्या आधी शेअर्स विकत घ्या असं सांगितलं होतं.

अमोनियम फॉस्फेट मिळेल ८८ रूपये ५० किलो या दराने मिळेल तेव्हढे घेऊन ठेवा.
निवडणुकीनंतर १० रूपये किलोने विकून मायबोलीमधे गुंतवणूक करू शकाल.
भूलभुलैय्या सिनेमाची सकाळी साडेआठच्या शोजची सर्व तिकीटे १०० रूपयेने घेतली तर १५० रूपये दराने विकता येतील.

>>
कमोडिटीमधे व्यवहार करत नाही. कॅश मार्केटबद्दल काही सुचवा.
Happy

बरोबर आहे. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होणार हे ठरलं तेव्हा मार्केट कोसळलं आणि शिंदे गौहाटीला गेले तेव्हा उसळलं होतं. >>
Happy

कॅश मार्केटबद्दल काही सुचवा. >>
डॉलर, बिटकॉईन, युरो घेऊन ठेवा. किंवा मोदी पंतप्रधान झाल्यावर रूपयात गुंतवणूक करा. एक रूपयाला ८० डॉलर परतावा मिळेल.

४ जून ला आदानीचे शेअर्स पडले होते.
अगदी अगदी.
मोदी जाणार अशीच हवा तासभरासाठी झाली होती. डेरिव्हेटीव्ज मधे खूप जणानी बक्कळ पैसा मिळवला. तासाभरात मालामाल झाले लोक.
मी कॅशमधला रिटेलर. तरीपण बऱ्यापैकी पैसे मिळाले. अदानंमधे नाही. दुसरीकडे मिळवले. अदानींच्या शेअरचे बीझीनेस मॉडेल मला झेपणारे नाही. मी लांब असतो.
_/\_

एशिअन पेंट्स चे भगव्या रंगाचे डबे विकत घ्या. सगळ्या कॉलेजच्या भिंतींना आणि नंतर सगळ्या भिंतींना भगवा रंग द्यायचे फर्मान येणार आहे.
राजस्थान मध्ये आधीच आले आहे,

एक्झिट पोलच्या निकालांनंतर म्हणजे ३ जूनला मार्केट वर चढलं होतं की. आणि ४ जूनला बंद झालं तेव्हाही ६% खाली होतं.

डॉलर, बिटकॉईन, युरो घेऊन ठेवा. किंवा मोदी पंतप्रधान झाल्यावर रूपयात गुंतवणूक करा. एक रूपयाला ८० डॉलर परतावा मिळेल. >>
फक्त शेअर बाजार मधलं कॅश मार्केट. सगळं रोखीत. मार्जिनमधे पण खेळत नाही. एसटीटी टॅक्स वालं

एशिअन पेंट्स चे भगव्या रंगाचे डबे विकत घ्या. सगळ्या कॉलेजच्या भिंतींना आणि नंतर सगळ्या भिंतींना भगवा रंग द्यायचे फर्मान येणार आहे.
राजस्थान मध्ये आधीच आले आहे,
>>
कमोडिटी नाही.
Happy

The joint director further said in the order that in the first phase of the scheme, two government colleges of each division have been included and the front facade and entrance hall of the 20 colleges’ buildings should be phase painted with "Asian Paints White Gold 8292 and Asian Paints Orange Crown 7974".

काल फडणवीसांनी मुंबईत हिंदीत भाषण केलं, मराठी मुंबईत हिंदीत भाषण का? का? का??
प्रकल्प गुजरातला नी युपीची भाषा महाराष्ट्रावर लादायची?

मग एशियन पेंट्सचे शेअर्स घ्या. तसेही खूप पडले आहेत. >>
काहीही.
तो पडण्याचा निवडणूकीशी काहीही संबंध नाही.

गेली ३ तिमाही खराब कामगिरी करतोय. नफ्याचे प्रमाण चांगलंच घटलंय. स्पर्धाही वाढलीय. त्यामुळे तो शेअर खूप धोकादायक वाटतोय बॉ.

तुम्ही गुंतवणार असाल तर कंपनीची कामगिरी तपासून मग निर्णय घ्या असं सुचवेन.

तळटीप:
मी सेबी प्रणीत सल्लागार नाही व माझी त्या कंपनीत गुंतवणूक पण नाही. तेंव्हां गुंतवणूकीबाबत अधिकृत तज्ञाचा सल्ला घ्यावा.
_/\_

ओके.

श्याम भागवतजी चुकून माझा मोबाईल मित्राने घेतला आणि इथली चर्चा वाचली. तो सेबीत आहे. तुमचे डिटेल्स विचारतोय. मार्किटमध्ये काहीतरी घोळ करताय तुम्ही असं त्याला वाटलं आता सेबी तुमच्या पाठीवर लागेल. ते हिमालयातले बाबा तुम्हीच तर नाही ना?

Pages