विधान सभा निवड्णुक २०२४

Submitted by हस्तर on 15 October, 2024 - 16:44

चला विधान सभा पड्घम वाजले
मि कोण त्याही पक्षा चा प्रवक्ता नाही

पण विरोधकान् कडे महाराष्ट्र व्यापी अस मुद्दा नाहिये

पोर्षे , बदलापुर ,शिवपुतळा एवढी धग नाही राहीली

स्पर्धा परिक्शे चे घोटाळी पण जुने झाले

लाडकी बहीण जोरात चाललैये

विरोधी पक्ष जिन्कणार तर कसे?

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

ट्रंप येवो न येवो.
पैसे मोकळे करता आले आहेत.
आता १० दिवस मविआची हवा चालल्याने मार्केट पडले तर धमाल येईल.
२३ ला परत नफेखोरी करायची.
सर्वांना शुभेच्छा.
_/\_

आदर्णीय मोदीजींना ४०० पार काय एकहाती बहुमतही न मिळाल्याच्या जखमा आज ट्रंपजींच्या विजयाने काहीशा भरून निघाल्या.
आदर्णीय मोदीजींना ट्रंपजी अमेरिकेचे प्रेसिडेंट झाल्याने मदत होईल असं म्हणणं हा पण विश्वगुरू, नॉन बायॉलॉजिकल, ईश्वराचा दूत अशा आदर्णीय मोदीजींचा अपमान नाही. उलट आपल्या एका ट्वीटमध्ये ट्रंपजींनी आदर्णीय मोदीजींचं नाव घेतल्याने आणि बांग्लादेशात हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारांचा निषेध केल्यानेच ट्रंपजी पुन्हा निवडून आले आहेत.
सोरोस, मोहम्मद युनूस आणि क्षी यांच्यासाठी एकटे आदर्णीय मोदीजी पुरेसे आहेत.

लोकसभा निवडणूकीत भाजपाच्या निवडणूक आयोगाने मूळ पक्षाचे चिन्ह शिंदेसेनेला आणि अजित गटाला वापरण्याची परवानगी दिली. चिन्हाचे महत्व किती आहे हे भाजपाने चांगले जाणले आहे.

घड्याळ चिन्हाबाबतचा वाद सर्वोच्च न्यायालयांत आहे. दोन्ही पवारांनी चिन्हा साठी भांडण्यापेक्षा जनतेच्या कामावर लक्ष द्यावे असे न्यायालयाने म्हटले आहे. जाहिरांती मधे घड्याळ चिन्ह वापरतांना अजित गटाला आता डिस्क्लेमर द्यावा लागेल.
https://www.rediff.com/news/report/dont-waster-your-energy-in-court-focu...

अजित पवारांना देवेंद्र फडणिस चक्की पिसायला पाठविणार होते, शेवटी उपमुख्यमंत्री म्हणून शेजारी बसवावे लागले. आदेश होता म्हणून शिंदे यांचा उपमुख्यमंत्री बनावे लागले. हृदयावर ठेवलेला हा दगड बाजूला करायची संधी राज्यातली जनता देणार का?

राकॉ आणि सेनेच्या पक्क्या मतदाराच्या डोक्यात त्या निशाण्या बसलेल्या आहेत. त्यांच्या डोक्याचं रिप्रोग्रामिंग करावं लागेल आणि ते तितकं सोपं नाही.
पक्ष फूट झाल्यावर मूळ चिन्ह गोठवले जाते. दोन्ही किंवा जितके असतील तेवढ्या तुकड्यांना नवे चिन्ह दिले जआहे; ही रीत आहे ना?

चंद्रचूड महोदयांना आपल्या लीगसीची काळजी पडली आहे. दोन वर्षे उलटूनही त्यांनी पक्षफुटीवर निर्णय घेतला नाही. त्यांच्या सुटीकालीन खंडपीठाने चुकीचा निर्णय घेऊन एक सरकार पडू दिले. हे पाप त्यांच्या माथी कायम राहणार. (इतरही आहेत)

अमेरिकेतल्या निवडणुका पाहून नैराश्य दाटलं.
ना रामलीला मैदानावर उपोषणाचा सोहळा, ना अण्णा कि रसोई, मा मोर्चे , ना पक्ष फोडी, ना गद्दारी, ना पन्नास खोके, ना बंडखोरी !!
सर्वच पक्षातून एकाच कुटुंबातले नातेवाईक उभे नाहीत...
ना सत्तर हजार कोटींचा आरोप, ना त्याच्याशीच लग्न !

अरे मग घेता कशाला निवडणुका ?
या देशात नाही याचं पहिल्यांदाच समाधान वाटलं. कसल्या नीरस निवडणुका !
टिंगल चालवलीय लोकशाहीची.

कांद्याचे भाव १०० झाले. मी काय कांदा खात नाय. तुम्ही खाता? नाहीना मग प्रॉब्लेम काय आहे? लाडक्या बहिणीला पैसे मिळाले ना ?
होउद्या खर्चा.
Vote for BJP!

महायुती लाडक्या बहिणींना सध्या १५०० देतेय तर पुढे २१०० देण्याचे आश्वासन दिले, यावर माविआने वरचढ होण्यासाठी ३००० चे आश्वासन दिले आहे. कांद्यासोबत बटाटे महाग होतील असे दिसतेय.

vote for BJP करावे का vote for काँग्रेस करावे?

अभ्यासू भाजप नेते , माजी मुख्यमंत्री व सध्याचे एक द्वितीयांश उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस , ऊर्फ देवाभाऊ यांनी इतर अनेक नेत्यांप्रमाणे कधी संविधानाचे पुस्तक पाहिलेले नाही. शिवाय लाल रंग म्हणजे कम्युनिस्ट. हिरवा म्हणजे जिहादी . पांढरा म्हणजे मिशनरी अशी समीकरणे त्यांच्या डोक्यत घट्ट बसलीत.

गोमाता रंगांधळी असल्याने लाल आणि हिरव्या रंगातील फरक गाईला ओळखता येत नाही. पिवळा रंग जरी दिसत नसला तरी लाल,हिरव्या रंगापासून पिवळ्या रंगाची छटा ओळखू शकते. म्हैसही रंगांधळी असल्याने वंदे भारत गाडीच्या वेग आणि रंगामुळे गाई आणि म्हशी गाडीखाली येऊन अपघातचे प्रमाण वाढले होते. त्यामुळे रंगाला विरोध
होता.

महाराष्ट्रात व्हिजन असलेले मोजकेच नेते आहेत.
शरद पवार - ऑटोमोबाईल इंडस्ट्री चाकण एरियात आणणे, कोकणात फळबागांना प्रोत्साहन देणे, बीकेसी व लवासा उभारणे.
देवेंद्र फडणवीस - इन्फ्रास्ट्रक्चर - समृद्धी महामार्ग, मुंबईतले मेट्रोचे जाळे, मुमं आरोग्य योजना

स्ट्रॉंग ऍडमिनिस्ट्रेटर असे मोजके नेते आहेत.
नारायण राणे - त्यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या छोट्या कारकिर्दीत कोकणात वाड्यावस्त्यांवर रस्ते पोहोचले.
अजित पवार - ते वीजमंत्री असताना कोकणात वादळाने झालेले वीज महामंडळाचे नुकसान त्यांनी उर्वरित महाराष्ट्रातले कर्मचारी पाठवून एका आठवड्यात सुरळीत केले होते. लोकसभेच्या प्रचाराची त्यांची गावागावातली भाषणे ऐकणे चांगले वाटायचे. कारण कुठल्या गावात कोणत्या कामासाठी किती निधीची गरज आहे हे ते खडाखडा सांगायचे. खूप काळ अर्थमंत्रीपद भोगल्याचा परिणाम.

आणि ऑफ कोर्स शरद पवार व देवेंद्र फडणवीस.

एकनाथ शिंदे यांच्या व्हिजन किंवा ऍडमिनिस्ट्रेटर पॉवर्स विषयी नीटसं सांगता येणार नाही कारण त्यांच्याकडे एकहाती सत्ता नाही. पण यंदा पावसाळ्यापूर्वी मुंबईत गल्ल्यागल्ल्यांमधून सिमेंटचे रस्ते झाले. खड्ड्यांचा त्रास प्रचंड कमी झाला. हायवेविषयी बोलता येणार नाही कारण ते NHAI + MMRDA असे त्रांगडे आहे. समृद्धी महामार्गाचा चार्ज शिंदेंकडे होता व त्यात ते यशस्वी ठरले.

पृथ्वीराज चव्हाण यांची प्रतिमा स्वच्छ आहे. पण ते मास लीडर नाहीत. त्यांना फॉलोअर्स (आमदार, बारीक सारीक नेते) नाहीत. कुठलाही मोठ्या प्रोजेक्ट किंवा धोरण त्यांच्या नावावर नाही. तेव्हढी सवड त्यांना मिळाली नाही.

गडकरींकडे व्हिजन व ऍडमिनिस्ट्रेशन आहे पण सध्यातरी ते महाराष्ट्राच्या खेळात नाहीत. मुमंपदासाठी दावा करणाऱ्या इतर नेत्यांकडून व्हिजन/ऍडमिनिस्ट्रेशनचे ठळक उदाहरण मला दिसत नाही. त्यातल्या सर्वांना पूर्ण महाराष्ट्रात मान्यता आहे असेही नाही.

मी भ्रष्टाचार, पर्यावरण नुकसान हे मुद्दे बाजूला ठेवलेत. कारण ते इम्प्लिमेंटेशनचे दोष आहेत, व्हिजनचे नाहीत.

हे सरकार पडलं तर ‘लाडक्या बहिणीला’ मिळणारे पैसे नक्की बंद होणार अशी माझ्या कामवाल्या मावशीची पक्की धारणा आहे.

रंग असे वाटायला नाही पाहिजेत, काही लोकांनी वंदे भारत च्या भगव्या रंगाचा पण विरोध केला होता >>> शिक्षकाच्या मनात समिकरण घट्टच असणार , एखाद्या विद्यार्थ्याने त्या शिकवणूकीतून समिकरण बांधले तर तो दोष शिक्षकाच्या माथी विद्यार्थ्यांच्या नाही, ज्यांनी आधी स्वतः ची राजकीय पोळी भाजण्यासाठी तसेच ज्याचा शिखंडीच ब्रॅंड ॲंबॅसिडर बनू शकतो अशा आयडॉलिजीची पाळे मूळे रुजवण्यासाठी लोकांच्या ( सज्ञानांचे जाउद्यात हो यांनी तर शाळेतल्या निरागस कोवळ्या मनांना ही सोडले नाही ) मनात रंगाची समिकरणे घट्ट कशी बसतील यासाठी सर्वतोपरी जंगजंग पछाडाले आणि पुन्हा लोकांनी एखाद्या रंगावरून समिकरण बांधले तर त्याला हे असे करायला नको हे सुचवायचे, हा शर्विलकाचा प्रतीशंखनाद झाला, म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा... Rofl

कांजूरमार्ग कार शेडचा पर्याय असताना आरेमध्येच कार शेडचा आग्रह धरणे हा व्हिजनचा दोष की इम्प्लिमेंटेशनचा?

विरोधी पक्षातील नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप करून राळ उठवायची , चौकशी यंत्रणांना छू करायचं आणि मग त्यांना आपल्या पक्षात किंवा सोबत घ्यायचं की भाजपची व्हिजन म्हणावी का?

अण्णा हजारेंच्या रामलीला मैदानावरील तमाशा/ नाटकाच्या वेळी सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा असलेला भ्रष्टाचार भाजप सत्तेत येताच irrelevant होतो, ही काय जादू आहे?

एकदा कधीतरी मायबोलीवर लिहिले होते ते परत लिहावेसे वाटले म्हणून लिहितो.

या वादावादीतून काही निष्पन्न होणार नाही.

आपल्याला जो पक्ष / नेता आवडतो त्याला मतदान करायचे आणि तो निवडून येईल अशी आशा बाळगायची एवढेच आपल्या हातात आहे.

अर्थात, अश्या चर्चांच्या माध्यमातूनही काही वेळा प्रभावी आंदोलने उभी राहत असतील, पण येथील कोणी अश्या एखादया आंदोलनात सहभागी झाल्याचे वाचल्याचे काही आठवत नाही.

यावेळीच्या विधानसभा निवडणुकीत तर भयंकर गोंधळ आहे. कोण कुठल्या पक्षात आहे आणि कोणाचे कोणते चिन्ह म्हणायचे याबाबत अभूतपूर्व संभ्रम निर्माण होईल.

उद्या उद्धव ठाकरे मुख्यमंत्री व एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री झाले तरी नवल वाटणार नाही

बंगळुरू बायपास वर टेंपो त प्रचाराची गाणी वाजत होती.
अधून मधून प्रो कडून वदवून घेतलेले रेकॉर्डेड संवाद.

हा पक्ष नाही नि तो पक्ष नाही
तात्या आले आहेत बिल्कुल अपक्ष
घडविण्या बदल भोर मुळशीमधे
रिक्षावर शिक्का मारा शानमधे

ट्रंपतात्या आले निवडून अमेरिकेमधे
आमचे तात्या येणार मुळशीमधे
विकासाची गंगा वाहणार सुमडीमधे
ट्रंप टॉवर्स दिसणार भविष्यामधे
.
गलबलून आलं काव्य ऐकून. सदर गीतास पोवाड्याची चाल लावली आहे.

<< उद्या उद्धव ठाकरे मुख्यमंत्री व एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री झाले तरी नवल वाटणार नाही >>

------ फडणवीस मुख्यमंत्री व अजितदादा उपमुख्यमंत्री असा तो पहाटेचा शपथविधी सोहळा पाहिलेल्यांना नवल वाटणार नाही.
८० तास असा रेकॉर्ड कार्यकाळासाठी या जोडगोळीने काम केले आहे.

अर्थात आजही ते दोघे नेते शिंदे यांचे डेप्टी म्हणून एकत्र काम करत आहेत.

पाठिंब्यसाठी भुजबळांना भाजपाने वाचवलय हे उघड आहे. पण भुजबळ जेंव्हा शरद पवारांच्या राष्ट्रवादीत होते तेंव्हा ते त्यांचं समर्थन करत होते. म्हणजे निवडून येण्याची क्षमता असली की काही फरक पडत नाही.

अ) छभु सुस्वभावी, निष्कलंक, सभ्य, दूरदृष्टीचे नेते आहेत.
ब) छभु सुस्वभावी, निष्कलंक, सभ्य, दूरदृष्टीचे नेते नाहीत.
क) सांगता येत नाही.

यापैकी एखादे मत असू शकते. ते मत गैस दूर झाल्यावर बदलू शकते.
पण जर मत छभु कोणाच्या बाजूने आहेत याची माहिती बदलली कि बदलत असेल तर?

कोणाच्या बाजूने आहेत याची माहिती बदलली कि बदलत असेल तर?
>>>
तर मग "मत बदलू शकत नाही काय? आम्हाला आताच साक्षात्कार झाला. हे असे असतील असं वाटलं नव्हतं हो!" Proud

विकासाची गंगा सुमडीमधेच वाहते हे खरंय. कुणालाच दिसत ऐकू येत नाही कशी ती. मुळशीमधे मात्र ट्रंप टॉवर्स आले तर ते सुमडीत येणार नाहीत हे नक्की.

आमच्याकडे माधुरीताई, अश्विनीताईंची गाणी चालू आहेत. 'आशविनी ताईSSS, आशविनी ताईSSSSSS' असा काहीतरी अजब आक्रोश करणारी गाणी. हे शब्द आणि चाल इतके तर्हेवाईक आहेत, की या दोन्ही तायांच्या मतदारांशिवाय जगात कुणीही त्यांना ही गाणी ऐकून मत देणार नाही. साहजिक आहे म्हणा- या मतदारांसाठीच ती गाणी आहेत.

आशविनी ताईSSS, आशविनी ताईSSSSSS' असा काहीतरी अजब आक्रोश करणारी गाणी. हे शब्द आणि चाल इतके तर्हेवाईक आहेत, की या दोन्ही तायांच्या मतदारांशिवाय जगात कुणीही त्यांना ही गाणी ऐकून मत देणार नाही.
>>>>>> Lol Lol

लाडक्या बहिण योजनेसंबंधात मदत घेणार्‍या महिलांबद्दल महाडिकांचे विधान संताप आणणारे आहे. माझ्या वक्तव्याचा विपर्यास केला असे म्हणेल म्हणून...

https://youtu.be/CWwgNm_v25U

शासन आणि सरकार मधला फरकही याला कळालेला नाही. आमच्या शासनाचा पैसा. जनते चाच पैसा आहे आणि जनतेलाच वाटत आहे. हा कोण आहे महिलांचे फोटो काढा, नावे लिहा सांगणारा? या महिलांना बघून घेऊ म्हणजे काय करणार आहे? Angry

हा कोण आहे ?
In 2004, Mahadik contested Lok Sabha election as a candidate of Shiv Sena from Kolhapur against NCP's Sadashivrao Mandlik but lost. He parted ways with Shiv Sena and joined Nationalist Congress Party (NCP). But NCP did not consider him as the party's candidate for the 2009 Indian general election. He unsuccessfully contested the election as an Independent candidate.

He entered Lok Sabha as member of NCP in 2014.[2] On 10 January 2017, Mahadik, along with NCP MLA Hasan Mushrif, former NCP MP Nivedita Sambhajirao Mane, Kolhapur mayor Hasina Faras, and 400 others were arrested for blocking traffic on the Pune-Bengaluru National Highway as part of a protest against the effects of demonetization.

He received Sansad Ratna Award for his outstanding performance in 2017 and 2018.[3][4]

After representing Kolhapur in Lok Sabha (2014–2019), he unsuccessfully contested from the same seat in 2019 elections. He lost 2019 LokSabha election against Shiv Sena leader Sanjay Mandalik.

In September 2019, he along with his NCP colleagues joined BJP.[5] In 2022, he became a Rajya Sabha Member from Maharashtra state.

Pages