दिवाळी हा खरा तर दिपोत्सव. त्यात हे फटाके कुठून घुसले काय समजत नाही.पुर्वी दुष्ट शक्तींना जवळपास फिरकू न देण्यासाठी ढोला सारखी वाद्ये वाजवली जायची.कदाचित दिवाळी सारख्या मंगल सणामधे दुष्ट शक्ती चा वावर नको म्हणुन फटाके वाजवण्याची प्रथा आली असावी.
फटाकेनिर्मितीत वापरले जाणा-या रसायनांमुळे अनेक प्रकारचे आजार संभवतात. फटाक्यांमुळे हवा आणि वातावरण दूषित होते.त्यामुळे श्वसानाचे आजार वाढतात. ध्वनीप्रदूषणाची पातळीही वाढते. मोठ्या आवाजाच्या फटाक्यांमुळे श्रवण क्षमता कमी होते.फटाके फोडल्यामुळे कार्बन मोनॉक्साईड सारखे विषारी वायू वातावरणात पसरतात. ओझोनचा थर पातळ होतो.एकदा मराठी विज्ञान परिषदेचा फटाक्यामागील विज्ञान या कार्यक्रमात फटाक्यात वापरल्या गेलेल्या रसायनांबदद्ल स्लाईड शो कार्यक्रम दाखवला होता.
कॉपर मुळे श्वसननलिकेत त्रास कॅडमियम मुळे किडनीला धोका आणि अॅनेमिया.शिशाचा मज्जासंस्थेवर परिणाम अशा अनेक गोष्टी सांगितल्या होत्या.तपशीलात थोडाफार फरक असू शकतो. अशा प्रदुषण करणार्या फटाक्यांपासून मुक्त राहून दिवाळी साजरी करता येणार नाही का? नक्कीच येईल. फटाक्या शिवाय दिवाळी ही कल्पनाच काहींना करवत नाही. कारण दिवाळी आणी फटाके यांची संलग्नता मेंदुमधे ठामपणे कोरली गेली आहे.पिढ्यान पिढ्या ती संक्रमित होत गेली आहे.कालसुसंगत नसलेल्या अनेक प्रथा परंपरा आज पाळल्या जातात.खर तर कालबाह्य रुढी परंपरा या एक प्रकारच्या अंधश्रद्धाच आहेत.मनाला वाटणार्या असुरक्षिततेमुळे ते मोडण्याचे धाडस आज बर्याच लोकांना होत नाही.अंधश्रद्धा निर्मुलनाची चळवळ ही एक व्यापक समाज परिवर्तनाची चळवळ आहे.त्यामुळे अंनिस फटाकेमुक्त दिवाळीचे अभियान नेहमी राबवते. विद्यार्थ्यांमधे ही पर्यावरण जागृतीचे प्रमाण वाढू लागल्यामुळे त्यांना फटाके मुक्त दिवाळीचे महत्व पटू लागले आहे.काही सुसंस्कृत पालक ही आपल्या मुलांना फटाक्यांचे दुष्परिणाम पटवून त्यापासून परावृत्त करु लागले आहेत. डॊ नरेंद्र दाभोलकरांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी काही युवकांनी व विद्यार्थ्यांनी स्वत:हून फटाके मुक्त दिवाळी साजरी करण्याचे ठरवले आहे.पाहू या काय होते ते!
तुळशी लग्न बाकी आहे
तुळशी लग्न बाकी आहे
भारत वर्ल्डकप फायनल हराल्याने ते शिल्लक फटाके आता तेव्हा फुटतील.
31 डिसेंबर वर आमचे लक्ष आहे.
31 डिसेंबर वर आमचे लक्ष आहे.
दिवाळी मधील फटाके,ध्वनी प्रदुषण ,वायू प्रदूषण ह्या वर आक्रमक होणारे तेव्हा कसे react करतात.
कोण कोण विरोध करतात त्याची नोंद घेणार आहे
Merry Christmas and happy New
Merry Christmas and happy New year in advance hemant sir sir sir
२१ डिसेंबर तारखे पासून ढोंगी
२१ डिसेंबर तारखे पासून ढोंगी पर्यावरणवाद्यानी ख्रिसमस आणि नवीन वर्षाला वाजविले जाणाऱ्या फाटक्या विरोधात लिहिले नाही तर दुप्पट फटाके वाजवले जातील याद राखा !
बरोबर
बरोबर
तोंडाने वाजवणार ना? खुशाल
तोंडाने वाजवणार ना? खुशाल वाजवा. छान मनोरंजन होतंय.
ते नाही वाजवणार, मुलांना
ते नाही वाजवणार, मुलांना काहीतरी सांगणार. मग चिडली मुलं वाजवणार
त्यानिमित्ताने ख्रिश्चन सणाला
त्यानिमित्ताने ख्रिश्चन सणाला हिंदु फटाके वाजतील
दुप्पट फटाके वाजवले जातील याद
दुप्पट फटाके वाजवले जातील याद राखा !
कोण कोण विरोध करतात त्याची
कोण कोण विरोध करतात त्याची नोंद घेणार आहे
आणि नोंद घेऊन काय करणार?
म्हणजे आमच्या, आमच्या
म्हणजे आमच्या, आमच्या पोरांच्या नाकातोंडात धूर जाऊन त्यांना गुदमरलं, त्रास झाला तरी चालेल पण आम्ही या पुरोगामी लोकांना धडा शिकवणारच
धर्मासाठी इतका त्याग तर केलाच पाहिजे
बकरी ईद ला टक्कर म्हणून एकादशीला रस्तोरस्ती रताळी कापून आणि साबुदाण्याचे भिजवलेल्या पाण्याचे लोट करून अद्दल घडवली पाहिजे
धर्मासाठी इतका त्याग तर केलाच
धर्मासाठी इतका त्याग तर केलाच पाहिजे>>>> देव देश अन धर्मासाठी प्राण घेतलं हाती.म्हणूनच धर्माची कालसुसंगत विधायक चिकित्सा केली पाहिजे. गरज विवेकी धर्मजागराची हा दाभोलकरांचा दै सकाळ 30 ऑक्टोबर 2007 चा लेख मायबोलीवर उपलबध करुन दिला आहे
हिंदुत्ववाद्यांना स्वतःची
हिंदुत्ववाद्यांना स्वतःची अक्कल नसते. हा असं करतो, तो असं म्हणतो म्हणून मी असं करणार.
हा नमुना म्हणतोय 777
@kariasunidhi
the day muslims stop cutting goats on eid I’ll stop bursting crackers on diwali✨
happy diwali to you and yours from me and mine!
या बिन्डोकांना वाटतं दिवाळीचे फटाके जय श्रीरामच्या घोषणेसारखे आहेत. हे लोक मुस्लिम किंवा ख्रिश्चन माणसाला बघून जय श्रीराम ओरडतात . याने त्या लोकांना काही फरक पडत नाही, हे यांच्या गावीही नसतं. त्यांना वाटतं आपल्या फटाक्यांच्या आवाजाचा आणि धुराचा त्रास फक्त इतर धर्मियांना , लिबरल लोकांना, प्रदूषणाला विरो ध कर णार्यांना होतो. आपल्याला त्या फटाक्यांच्या धुरातून ऑक्सिजन मिळतो आणि आवाजात गायत्री मंत्राचा भास होतो.
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशात राग येण्यासारखं काय होतं त्याचं उत्तर अजून आलेलं नाही.
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशात
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशात राग येण्यासारखं काय होतं त्याचं उत्तर अजून आलेलं नाही.## अमित मालवीय बिझी असेल
यंदाच्या दिवाळीत मुंबईत 97
यंदाच्या दिवाळीत मुंबईत 97 ठिकाणी फटाक्यांमुळे आग लागल्याच्या घटना घडल्या असे अग्निशमन दलाकडून जाहीर केले गेले आहे. त्या 97 मध्ये हिंदु किती होते ते समजले नाही. पण हरकत नाही, धर्मासाठी एवढं नुकसान सहन केलं पाहिजेच. फटाके लावणारे फुगरु जमातीचे लोक असावेत.
1)
1)
फटाके वाईट नाहीत.
फटाक्यांचा अतिरेक वाईट..
2)
आग तर माचिसच्या काडीने सुद्धा लागते, घरगुती गॅस सिलेंडरने लागते. स्टोव्हने लागते. वगैरे वगैरे अन अमुक तमुक ने लागते. दगडावर दगड घासून लागते.
3)
इथे कोणी लहान नाही आहे. प्रत्येकाला कळते की फटाके कसे आग न लावायची काळजी घेत वाजवावेत.
(पोस्ट सर्कास्टिक आहे (सांगितलेले बरे).)
(पोस्ट सर्व प्रकारच्या दारूसाठी लागू)
पुणे शहरांत, दिवाळीच्या
पुणे शहरांत, दिवाळीच्या काळांत, फटाक्यांमुळे लागलेल्या आगीच्या एकूण ६० घटनांची नोंद अग्निशामक दलाने केली आहे. सुदैवाने मनुष्यहानी झाली नाही.
https://indianexpress.com/article/cities/pune/firecrackers-pune-diwali-f...
बंगळूर शहरांत, फटाके फोडतांना झालेल्या दुर्घटनेत १२० जणांच्या डोळ्यांना इजा.
https://www.esakal.com/amp/desh/120-people-injured-in-eyes-due-to-firecr...
दोन मोठ्या शहरांत नोंद झालेल्या दुर्घटनेच्या या बातम्या आहेत. देशपातळीवर काय परिस्थिती असेल माहित नाही. फटाके फोडतांना प्रत्येकाने काळजी घेतली तर अशा दुर्घटना टळतील.
फटाके कुठे फोडायचे किंवा
फटाके कुठे फोडायचे किंवा फोडायला नको यावर झालेल्या वादातून काही ठिकाणी दोन गटांत भांडणे झाल्याच्या घटना वाचण्यात आल्या.
https://www.hindustantimes.com/cities/mumbai-news/22yearold-killed-after...
फोटाके फोडतांना ते फोडणार्याला आनंद होतो पण त्या आवाजाचा इतरांना त्रास होत नाही याचे भान कोण ठेवणार? घरांत कुणी आजारी किंवा वयस्कर व्यक्ती किंवा छोटे बाळ असेल आणि त्या घरच्या लोकांनी फटाके न फोडण्याची विनवणी केली तर किती लोक त्यांच्या विनंतीला मान देतील?
Pages